विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चामन, पो ट वि भा ग.-बलुचिस्तानांतील क्वेटापिशिन जिल्ह्यांतील अगदीं उत्तरेकडील एक पोटविभाग व तहशील. उ. अ. ३०० २८’ व ३१० १८’ आणि पू. रे. ६६० १६’ व ६७० १९’ मध्यें आहे. याच्या उत्तरेस अफगाणिस्तान आहे. यांतील बहुतेक भाग डोंगराळ आहे. त्यास टांबा म्हणतात. याची सरासरी उंची ८००० फूट आहे. जमीनीची लागवड थोडी होते; बहुतेक लोक गुरांस कुरणांत चारून त्यांच्यावर उपजीविका करतात. याचें क्षेत्रफळ १२३६ चौ. मै असून १९११ मध्यें लोकसंख्या १७२५२ होती. यांत एकच महत्वाचें ठिकाण चामन शहर आहे व तें मुख्य ठाणें आहे. येथील मूळचे रहिवासी अचाकशी अफगाण भटकत असतात, व त्यांनां कायमची वस्ती माहीत नसल्यामुळें कायमची खेडीं नाहींत.
श ह र.-बलुचिस्तानांत क्वेटापिशिन जिल्ह्यांत चामन पोटविभागाचें ठाणें. हें नॉर्थ-वेस्टर्न रेल्वेच्या सरहद्दीवरचें शेवटचें स्टेशन आहे. हें समुद्रसापटीवर ४३११ फू. उंच आहे. हें देशी असिस्टंटचें मुख्य ठाणें आहे. १९११ मध्यें लोकसंख्या २००९ होती. किल्ल्यांत कांहीं देशी पायदळ व घोडेस्वारांची फौज रहाते.