विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चानोड - मुंबई. रेवाकांठा. सांखेडमेहवाच्या अगदीं पश्चिमेकडील नर्मदेच्या तीरावरील ठिकाण उ. अ. २१ ५८’ व पू. रे. ७३० ३०’ येथील बहुतेक सर्व इमारतींत देवळें, मठ व विश्रांतीगृहेंच पुष्कळ आहेत. यात्रेकरूंची येथें नेहमीं गर्दी असते. सर्व देवळांत कपिलेश्वर महादेवाचें, काशिविश्वनाथ महादेवाचें, चंडिकामातेचें, श्रीहनुमानजींचें, श्रीमार्कडेश्वर महादेवाचें वगैरे देवळें मुख्य आहेत. येथील शेषशायी मूर्तीची कार्तिक शुद्ध १३ पासून वद्य २ पर्यंत जत्रा भरते, व दुसरी एक जत्रा भरते, व दुसरी एक जत्रा नर्मदा व ओर या नद्यांच्या संगमावर चैत्री पौर्णिमेला भरते.