विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चानस्मा - बडोदा संस्थानच्या कडी प्रांतांतील वडावली तालुक्याचें हें मुख्य ठिकाण आहे. येथील लोकसंख्या १९११ सालीं ७००३ होती. येथें एक मराठी शाळा, मॅजिस्ट्रेट कोर्ट, दवाखाना व कांहीं कचेर्या आहेत. येथील म्युनिसिपालिटीस १७०० रू. ची वार्षिक देणगी आहे. येथें जैन लोकांचें एक देवालय आहे. तें ध्रांगघ्रा दगडाचें बांधलेलें असून त्याच्यावर चांगलें खोदीव काम केलेलें आहे व आंतील सर्व फरसबंदी संगमरवरी दगडाची आहे.