विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चानन शानन - मलयालम् भाषा प्रचारांत असलेल्या प्रदेशांतील इझवा जातीसारखीच एक तामिळ जात. लो. सं. ( १९११ ) ८०८२६४. शेतकी व ताडी तयार करणें हे यांचे प्रमुख धंदे होत. १९११ सालच्या खानेसुमारींत यांच्या सुमारें ३६ पोटजाती नोंदल्या होत्या. [ सेन्सस रि. ( त्रावणकोर ) १९११ ].