प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चांदा, जि ल्हा.-मध्यप्रांताच्या नागपूर भागांतील एक जिल्हा. याचें क्षेत्रफळ १०१५६ चौरस मैल आहे. याच्या उत्तरेस नांदगांव संस्थान, भंडारा, वर्धा आणि नागपूर जिल्हा; पश्चिमेस व दक्षिणेस यवतमाळ जिल्हा आणि निजामसरकारचें राज्य आणि पूर्वेस बस्तर आणि कांकर संस्थानें व द्रुग जिल्हा आहे.

नैसर्गिक वर्णन:-याच्या पश्चिमेस वर्धा, प्राणहिता आणि गोदावरी या नद्या व उत्तरेस वुन्ना नदी आहे. वैनगंगा नदी या जिल्ह्याच्या मध्यभागांतून उत्तरेकडून दक्षिणेस वाहत जाऊन शिवनी येथें वर्धा नदीस मिळते. या दोन्हीं नद्यांच्या संगमास प्राणहिता म्हणतात. वैनगंगेस अन्धारी, बोतेवाही देनी, गरव्ही व कोब्रागरही आणि वर्धा नदीस पेनगंगा, हराई या नद्या मिळतात. वैनगंगा नदीच्या पश्चिमेस चिमूर, मूल आणि फेरसागड व पूर्वेंस सुर्जाग आणि तिचागड या टेंकड्या आहेत. या टेंकड्यांवर दाट जंगल आहे. या जंगलांत साग, साज, बिजासाल, रोहन, कदम, हल्दू, सेमूर, महुआ, धावडा, तेंडू, गराई, पळस, सालई, बेहडा, रेउंझा, सिरिझ, कैका, मोयेन, मोरवा, पडेर, अंजन व निर्मळीचीं झाडें आहेत. या वस्तीच्या जवळ आंबा, ताड आणि चिंचेचीं झाडें फार आहेत. जंगलांत वाघ, चित्ते, अस्वल, गवा, रेडा, सांबर हरिण आहेत. उन्हाळ्यांत उष्णता जास्त असते परंतु एकंदरींत हवामान चांगलें आहे. वर्षांत एकंदर ५१ इंच पाऊस पडतो.

इतिहास,-पूर्वीं वाकातक नावांच्या हिंदू राजांची राजधानी भांदक येथें होती. या राजांनीं चौथ्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत राज्य केलें. याच्यानंतर गोंड राजांनीं या ठिकाणीं आपली गादी स्थापिली. गोंड लोकांच्या राजघराण्यांत इ. स. च्या १२ व्या शतकापासून १७५१ पर्यंत एकंदर १९ व्या राज्यकर्ते पुरूष होऊन गेले. सर्जाबल्लारासाह या गोंड राजानें आपल्या घराण्यास बल्लारसाही हें नांव दिलें. हीरसाह नांवाच्या राजानें चांद्याचा किल्ला बांधला व शहराच्या भोंवतालच्या भिंती उभारण्याचें काम पूर्ण केलें. हिंदूंचा धर्म स्वीकारणारा गोंडराजा कर्णशाह नांवाचा होता. ऐने. ई. अकबरींत कर्णशाहाचा मुलगा स्वतंत्र असून दिल्लीच्या बादशहास खंडणी देत नव्हता. याच्या जवळ १००० घोडेस्वार आणि ४०,००० पायदळ सैन्य होतें असें वर्णन दिलें आहे. अकबराच्या वेळेपासून मराठ्यांच्या वेळेपर्यंत हे गोंडराजे स्वतंत्र व प्रबळ होते. यांच्या राज्यांत सर्वत्र शांतता नांदत होती. पुष्कळ पडित जमीनी नांगरून तयार करण्यांत आल्या व त्यांनां पाणी देण्यासाठीं कालवे बांधण्यांत आले. इ. स. १७५१ सालीं गोंडराजाला पदच्युत करून हा जिल्हा मराठे लोकांनीं नागपूरच्या राज्यास जोडला. या जिल्ह्यावर आणि छत्तिसगडावर भोंसले राजाचे दोन लहान भाऊ ( एक झाल्यावर दुसरा ) नेमिले होते. परंतु त्यांची राज्यव्यवस्था जुलमी पद्धतीची असल्या कारणानें याची प्रगति बरीच मंदावली. सन १८१७ त अप्पासाहेब भोंसल्यानें बंड केलें व इंग्लिशांविरूद्ध आप्पासाहेबाची बाजू घेऊन अहीरीच्या जमीनदारानें चांद्याच्या किल्ल्यांत लष्कर जमविलें. त्याच वेळीं पुण्याच्या पेशव्यांनीं आप्पासाहेबाच्या मदतीकरितां कांहीं फौज पाठविली होती. तिचा ब्रिटिशांनीं सन १८१८ च्या एप्रिलांत पांढरकवड्याजवळ पराभव करून चांदा किल्यास वेढा दिला व थोड्या दिवसांनंतर एकदम हल्ला करून तो सर केला. किल्ल्यावरील फौजेनें अखेरचा मनुष्य पडेपर्यंत किल्ल्याचें रक्षण केलें. सन १८१८ पासून १८३० पर्यंत ब्रिटिश अधिकारी सर रिचर्ड जेंकिन्स याच्यावर देखरेख करीत होता. नंतर भोंसले घराण्यांतील शेवटचा राजा तिसरा रघूजी यास हा जिल्हा देण्यांत आला. सर १८५३ त रघुजी वारल्यावर याचा कोणी वारसदार नसल्यामुळें हा ब्रिटिश राज्यास जोडण्यांत आला. सन १८५७ सालच्या बंडांत मनुपल्ली व अरपल्ली जमीनदारांनीं बंड उभारून तारायंत्रावरील दोन अधिरार्‍यांचे खून केले. हें बंड मोडून अहीरीची जमीनदारीण लक्ष्मीबाई, हिच्या मदतीनें त्या दोघां जमीनदारांस पकडण्यांत आलें व त्याबद्दल तिला ६७ गांवें देण्यांत आलीं. जुन्या गोंड राजाचा वंशज चांद्यास रहातो. त्याला हल्लीं पोलिटिकल पेन्शन देतात. यांत ज्या प्राचीन काळच्या वस्तू वगैरे सांपडतात त्यांची माहिती भांदक, चांदा शहर व मार्कंडी या सदराखालीं दिली आहे. या जिल्ह्यांत चांदा व वरोडा हीं शहरें असून २५८४ खेडीं आहेत. याच्या चांदा, वरोडा, ब्रह्मपुरी, सिरोंचा व गडचिरोली या तहसिली आहेत. सन १९०५ त अहीरी जमीनदारी सिरोंचा तहसिलींत सामील केली गेली. हिचें क्षेत्रफळ १०१५६ चौ. मैल व लोकसंख्या ( १९२१ ) ६६०६३० आहे. जमीनदारींत फार जंगल असल्यामुळें तींत फार थोडे लोक रहातात.

गोंड लोकांत मारीआ गोंड म्हणून एक निराळी जात आहे. त्यांची अंगकाठी बळकट असून उंच आहे. त्यांच्यांत प्रौढविवाह आहे व लग्नाला वधूची संमति जरूर लागते. लग्नाच्या अगोदर स्त्रीपुरूषांनीं व्यभिचार केला तरी त्याचा विधिनिषेध मानीत नाहींत. परंतु लग्न झाल्यानंतर ज्या स्त्रिया व्यभिचार करतांना सांपडल्या तर त्यांचे खूनहि पडतात. मारिआ गोंडांत स्त्रीपुरूषनृत्य प्रचलित आहे.

जमीन व शेती.-वर्धा नदीच्या जवळील व वर्धा आणि एरई या नद्यांमधील जमीन बरीच काळी आहे. वैनगंगेच्या तीरावरील जमीन काळी आहे परंतु तींत रेती आहे. जमीनदारींतील जमीन रेताड व खडकाळ आहे वरील प्रदेश सोडून यांत सगळीकडे पिंवळी माती आहे. खुद्द चांद्यातल्या काळ्या जमीनींत गहूं, हरबरा व जवस, सिरोंचा व वरोडा तहसिलींत ज्वारी व जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागांत तांदूळ होतो. याच्या क्षेत्रफळापैकीं सन १९०३-४ पर्यंत नांगरून तयार केलेली जमीन १५१२ चौ. मैल होती व तीपैकीं १८२ चौ. मैलांत पाटाचें पाणी देतां येतें; २६७२ चौ. मैल जमीनीवर जंगल आहे; बाकीची जमीन पडित आहे. ज्वारी आणि कापसाची पिकें वर्षांतून दोन वेळ काढतात, पहिलें शरदृतूंत व दुसरें वसंतऋतूंत. दुसर्‍या पिकाच्या कापसाचें सूत मजबूत असतें. सुमारें १००० एकर जमीनींत उसाची लागवड केली जाते.

या जिल्ह्याच्या क्षेत्रफळापैकीं २६७२ चौ. मैल सरकारी जंगल व ३९१९ चौ. मैल जमीनदारी व मालगुजारी जंगल आहे. अहीर जंगलांतून सागाचीं झाडें बाहेरगांवीं व वरोड्याच्या कोळशाच्या खाणीकडे जातात. १९०३-४ सालांत जंगलाचें उत्पन्न जवळ जवळ २ लाख रू. झालें. पैकीं ७५००० रू. लांकडांपासून व ५५००० रूपये चराईपासून झालें.

खनिज पदार्थ :-इ. सन १८७१ पासून वर्धानदीजवळ वरोडा येथें सरकारनें कोळशाची खाण सुरू केली. १९०४ त जवळ जवळ ११२००० टन कोळसा निघाला. तो ५२ लाख रूपयांस विकला जाऊन २ लाख रू. निव्वळ नफा राहिला. सुमारें १००० लोक खाणींत काम करीत असत. हा कोळसा जी. आय. पी. रेल्वे, म्युनिसिपालिटी, कापसाच्या गिरण्या वगैरेस विकला. वरोडा येथील कोळशाची खाण १९०६ त बंद केली. वरोड्यापासून ३० मैलांवर बंदर येथें व चांद्यापासून ६ मैलांवर बल्लारपूर येथें कोळशाच्या खाणी आहेत. तलोघीजवळ गोविंदपूर येथें राजोलीजवळ मेढें येथें आणि थनवासन येथें जुन्या तांब्यांच्या खाणी आहेत. कोठें कोठें उत्तम प्रकारचे लोखंडाचे दगडहि आढळतात. देवळगांव, गुंनेवाही, लोहार, पिंपळगांव आणि रत्‍नापूर हीं प्रसिद्ध ठिकाणें होत. लोहार आणि पिंपळगांव येथील दगडांत अनुक्रमें शेकडा ६९ आणि ७१ लोखंड सांपडतें. १९०४ सालांत जुन्या चालीच्या कोळशांच्या भट्टींत सुमारें ११५० टन लोखंड गाळलें गेलें; परंतु हा धंदा किफायतशीर झाला नाहीं. पूर्वीं वैरागड जवळ साटीननदीवर हिर्‍याच्या खाणी होत्या. आणि इंद्रावती आणि वैनगंगानदींत सोन्याचें कण सांपडतात. उत्तम इमारती दगड पुष्कळ ठिकाणीं आढळतात. वर्‍हाडांतील चुनखडीचा भांदक येथें चुना होतो आणि नवगांव जवळ रत्‍नापूर येथेंहि चुना तयार करितात.

व्यापार व दळणवळण.-तसर रेशीम ज्या किड्यांपासून होतें. त्या किड्यांची ढीवर लोक वैरागड आणि सिंदेवाही येथील जंगलांत जोपासना करितात आणि चामुरसी व इतर खेडेंगांतील कास्काटी हे लोक या रेशमाचें कापड विणतात. पागोट्याकरितां याचा मुख्यत्वें उपयोग होतो. चांदा येथें रेशमी धोतरजोडे होतात. त्यांचा पूर्वीं फार दूरवर प्रसार होता. चांदा, चिमूर आणि आरमोंरी हीं व्यापाराचीं मुख्य ठिकाणें होत. परंतु मोठमोठ्या खेडेगांवांतूनहि विणकरी लोकांची वस्ती आहे. कधीं कधीं जरीकांठीं धोतरेंहि विणलीं जातात. गिरणीतींल सुतापासून साधें, जाडेभरडें कापड महार लोक विणतात. गिरणींत रंगविलेल्या सुतापासून रंगीत कापड तयार केलें जातें, परंतु कधीं कधीं आयात निळीपासून सूत येथेंच रंगविलें जातें. छिप आणि रंगारी लोक हलक्या प्रतीच्या कापडास तांबडा आणि जांभळा रंग देतात. रंगारी लोक चांदा, मुल, सावली आणि ब्रह्मपुरी येथें पुष्कळ आहेत. वरील रीतीनें रंगविलेलें कापड फक्त गरीब लोक वापरतात. कारण त्यास एक प्रकारचा वास येत असतो. विशेष प्रकारच्या नमुन्याचे सोनें आणि चांदीचे दागिने चांदा येथें तयार करितात; त्याचे नमुने दिल्ली येथील प्रदर्शनांत ठेविले होते. तांब्याचीं व पितळेचीं भाडीं चांदा आणि ब्रह्मपुरी तहसिलींत नेरी येथें होतात. तींन भाग पितळ व एक भाग जस्त यांच्या मिश्रणापासूनहि दागिने केले जातात; व ते गरीब लोक बापरितात. बांबूचें रंगीत सामान चांद्यास होतें. चंद्रपूर हें नक्षीदार जोड्याविषयीं प्रसिद्ध होतें. पण आजचे जोडे अगदीं खराब आहेत. वरोड्यास उत्तम प्रकारच्या कौलांचा व विटांचा सरकारचा कारखाना होता. नुक्तेंच कांहीं वर्षांपूर्वीं चार कापूस पिंजण्याचे व दोन दाबण्याचे कारखाने सुरू केले आहेत. या जिल्ह्यांतून रेल्वेनें जवस, तीळ, इमारती लांकूड, कांतडी, जनावारांचीं शिंगें, कापूस व कडधान्यें हे जिन्नस बाहेर जातात. हैदराबाद, वर्‍हाड व वर्धा येथें तांदूळ बैलगाडीनें जातात. सागवानी लांकूड अलापिलई व उत्तरेकडील जमीनदारींतून बाहेरच्या गांवीं जातें. रेल्वेजवळील जंगलांतून बांबू, डिंक, हरडा आणि लांख बाहेर पाठविली जाते. गवत व लांकडी कोळसा ही कधीं कधीं उत्तरेकडील जमीनदारीतून रायपुर जिल्ह्यांत विक्रीकरिता नेतात. चाकूच्या मुठीसाठीं सांबरांचीं शिंगें बाहेर जातात. मोहाचीं फुलें वर्‍हाडांत व वर्धा येथें जातात. रेशीमकांठीं धोतरें नागपूर, वर्‍हाड व हैदराबाद येथें जातात. जोडे व चामड्याचे दोर, वर्‍हाडांत जातात. मीठ, साखर, सूत, सुती कापड, मातीचें तेल आणि धातू हा आयात माल आहेत. मुंबईहून मीठ, मॉरिशस व उत्तरहिंदुस्थानांतून साखर, बंगलोर व उत्तरहिंदुस्थानांतून गूळ हा माल येतो. गुळाचा व्यापार गेल्या दहा वर्षांतच भरभराटीस आला. वर्ध्यापासून जी. आय. पी. रेल्वेचा फांटा चंद्रपुरास जातो व त्यावर हिंगणघांट आणि वरोडा हीं स्टेशनें आहेत. बाहेर जाणारा बहुतेक माल वरोडा स्टेशनावरून जातो. चांद्याला गोंडिया दुसर्‍या एका रेल्वेनें जोडलें आहे. वरोड्याहून चांदा व चिमूर यांस पक्की व वर्‍हाडांत वणी येथें कच्ची सडक जाते. चंद्रपुराहून आंत जाण्यास मुल आणि सिरोंचा हे मुख्य रस्ते आहेत. पावसाळ्यांत कांहीं माल वैनगंगा नदींतून होड्यांनीं भंडारा व अरमोरी येथें नेतात. दुष्काळांत गडचिरोळीस नावानींच धान्य आणिलें होतें. जिल्ह्यांत रस्ते कमी आहेत. यांत पक्क्या सडकांची लांबी ७९ व कच्च्या सडकांची लांबी ३९६ मैल आहे, व यांच्या दुरूस्तीसाठीं वर्षाच्या कांठी ५४००० रू. खर्च येतो. येथील राज्यव्यवस्था इतर जिल्ह्यांप्रमाणेंच आहे.

शिक्षणासंबंधीं मध्यप्रदेशांत चांद्याचा १३ वा नंबर लागेल. शेकडा २ लोकांस लिहितांवाचतां येतें. यांत १ खासगी हायस्कूल, ३ मिडलस्कुलें, ४ व्हर्नाक्युलर मिडलस्कुलें आणि ११४ प्रायमरीस्कुलें, व ४ मुलींच्या शाळा आहेत.

त ह शी ल.- चांदा जिल्ह्याची तहसील. क्षेत्र. ११७४ चौ. मै. व लोकसंख्या ( १९११ ) १३४६६०. हींत एक शहर ( चांदा ) असून ३९७ खेडीं आहेत. येथें तांदुळाचें मुख्य पीक आहे. या तहशिलीचा बराचसा भाग टेंकड्या व जंगलांनीं व्यापिला आहे. येथील शेतसारा ६०००० रूपये होता.

श ह र.-चांदा जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. या ठिकाणीं एरई व झरपत या नद्यांचा संगम झाला आहे. हें शहर वरोडा रेल्वेस्टेशेनपासून २८ मैलांवर आहे. याची लोकसंख्या इ. स. १९११ साली १९८६६ होती याठिकाणीं इ. स. १२ पासून १८ व्या शतकापर्यंत गोंड राजांची राजधानी होती. याच्या पूर्वेस व उत्तरेस दाट जंगल आहे. दक्षिणेस माणिकद्रुग नांवाची टेंकडी आहे व पश्चिमेस जिराईत जमीन आहे. याच्या सभोंवतीं तट बांधलेला आहे. यांत अचलेश्वर, महाकाली आणि मुरलीधर हीं तीन मोठीं देवळें आहेत. यांत रमाल नांवाचें एक तळें असून त्यांतून नळानें शहरांत पाणी आणिलें होतें. पण हल्लीं विहिरींचें पाणी पितात. या शहराच्या बाहेर एके ठिकाणीं रावण, दुर्गा वगैरे देवतांच्या मोठाल्या मूर्ती पडलेल्या आहेत. येथील म्युनिसिपालिटीची स्थापना इ. से. १८६७ सालीं झाली, येथें रेशमी कपडा, रेशिमकाठी धोतरें. नक्षीदार जोडे, सोन्याचांदीचीं भांडीं, बांबू विणकाम व लांकडांचीं कामें होतात. येथें एप्रिल महिन्यांत अचलेश्वर देवालयाजवळ मोठी यात्रा भरत असते. येथें पुष्कळ इंग्रजी व मराठी शाळा असून एक हायस्कूल व दोन दवाखाने आहेत.

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .