प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चांचेगिरी - चांच नांवाचें बेट काठेवाडनजीक अरबी समुद्रांत आहे. तेथील लोक लुटारूपणाचा धंदा समुद्रावर मोठ्या प्रमाणांत करीत असल्यामुळें चांचिया हा शब्द समुद्रावरील लुटारूंस सामान्य अर्थानें रूढ झाला. दुसरें असें एक स्पष्टीकरण करण्यांत आलें आहे कीं हे दर्याचार चोंच असलेली पगडी वापरीत; तशी पगडी आज गुजराथ्यांत बरीच रूढ आहे. इंग्रजी कायद्यांत ‘पायरसी’ ( चांचेगिरी ) म्हणजे समुद्रावर जहाज किंवा त्यांतील माल यांची लुटालूट किंवा दरोडेखोरी करणें असा अर्थ आहे. समुद्रावरील लुटालूट हा गुन्हा कोणाहि विशिष्ट राष्ट्राविरूद्ध नसून कोणत्याहि देशांतील लोकांविरूद्ध होणारा असल्यामुळें चांचे लोकांनां शासन करण्याचा अधिकार गुन्हेगारांनां पकडून ज्या. देशांतील कोर्टापुढें हजर करण्यांत येईल अशा कोणत्याहि देशांतील कोर्टास असतो. या लुटारू लोकांचा पाठलाग करून त्यांचा उपद्रव नष्ट करण्याचा हक्क प्रत्येकास आहे; मात्र प्रत्यक्ष लढाईखेरीज इतर वेळीं चांचे लोकांस ठार मारण्याचा हक्क नाहीं; फक्त त्यांनां पकडून न्यायकोर्टापुढें खेंचतां येतें.

पा श्चा त्य इ ति हा स.-जमीनीवरच्या पेक्षां समुद्रावर शांतता व सुव्यवस्था राखण्याचें काम नेहमींच अवघड असल्यामुळें कोणत्याहि प्राचीन किंवा अर्वाचीन राष्ट्राला जमीनीवरील बंदोबस्त नीट केल्यावरच समुद्रावरील बंदोबस्ताकडे लक्ष देणें शक्य झालेलें आहे. त्यामुळें कोणत्याहि देशांत जमिनीवर अशांतता माजली किंवा प्रत्यक्ष लढाई सुरू झाली कीं चांचे लोकांस उत्तेजन मिळतें. तसेंच चांचे लोकांपासून लुटींतला माल विकत घेण्यास व्यापारी मिळत असले म्हणजे चांचेगिरी फैलावते.

इतिहासांत चांचेगिरीचा शिक्का परस्पर अगदीं भिन्न स्वरूपाच्या व्यक्तींवर मारलेला आढळतो. लढाईच्या वेळची लुटालूट आणि चांचेगिरी यांत मोठी तफावत आहे. निव्वळ चांचेगिरी करणारा इसम आपपरभाव न ठेवतां परदेशांतल्याप्रमाणें स्वदेशांतल्या इसमांसहि लुबाडतो. पण स्वदेशाचा अभिमान धरून स्वकीय सरकारच्या कायद्यास पूर्ण अवलंबून परकीयांची समुद्रावर लुटालूट करणारे शूर व धाडसी इसम प्राचीन ग्रीकांप्रमाणें अर्वाचीन इंग्रजादि यूरोपियनमध्यें आढळतात. इलिझाबेथ राणीच्या काळांत असे अनेक इंग्रज, फ्रेंच, डच वगैरे इसम होऊन गेले. त्यांनां चांचे म्हणतां येत नाही. सरकारी सैन्यांत ज्यांचा अंतर्भाव नाहीं अशा खासगी मालकीच्या सर्व लढाऊ जहाजांवरील इसमांची चांचे लोकांत गणना केली पाहिजे या नेल्सनच्या म्हणण्यांतील तत्व आधुनिक यूरोपीय राष्ट्रांत जसजसें पटत गेलें त्या मानानें स्वदेशहितोद्युक्त अशा खाजगी स्वरूपाच्या लढाऊ लोकांवरहि नियंत्रण घालण्याचा यूरोपीय राष्ट्रांनीं प्रयत्‍न सुरू केला.

१७ व्या शतकांत कायदा व पोलीस यांचा अम्मल वाढत गेल्यामुळें यूरोपीय किनार्‍यावरील चांचेगिरीच्या धंद्यास बराच आळा बसला. पण नूतन वसाहत झालेल्या अमेरिका खंडाच्या बाजूला हा धंदा जोरावला. विशेषत: अमेरिकेंतील नूतन वसाहतवाल्यांनीं मायदेशाशींच व्यापार केला पाहिजे, इतर देशांशीं व्यापार करणें तो मायदेशामार्फत केला पाहिजे, अशा प्रकारचे निर्बंध स्पेन, फ्रान्स, ग्रेटब्रिटन वगैरे देशांनीं आपापल्या वसाहतवाल्यांवर घातल्यामुळें एका निराळ्या प्रकारचा गुप्त व्यापाराचा व तदनुषंगिक चांचेगिरीचा धंदा वाढला. परंतु अमेरिकेंतील वसाहतींनां जसजसा कायमपणा येऊन कायदा व शांतता अधिकाधिक प्रस्थापित होत गेली त्या मानानें अमेरिकन राष्ट्रांनींहि चांचेगिरी बंद करण्याचे जोरानें प्रयत्‍न केले; व १९ व्या शतकाच्या पूर्वार्धांत ती बहुतेक बंद झाली. तरी इकडे ग्रीक बेटांकडे चांचेगिरी चालू होतीच, आणि मलाया बेटांत तर १८५० पर्यंत ती बंद पडूं शकली नाहीं. मलाफा सामुद्रधुनी व चीनचा समुद्र यांमध्यें यूरोपीयांनां १५ व्या शतकाच्या उत्तरार्धांतहि अनेक वेळां चांचे लोकांपासून उपद्रव झालेला आहे. चांचे लोकांचीं कृत्यें प्राचीन ग्रीक अद्भुत कथालेखकांप्रमाणें आधुनिक काव्यकादंबरीलेखकांनांहि रम्य संविधानकें रचिण्यांत उपयुक्त झालीं आहेत. पाश्चात्य चांचे लोकांमध्यें कॅप्टन अव्हेरी, कॅप्टन किड, बार्थोलोम्यू रॉबर्टस वगैरे इसम प्रसिद्ध आहेत. यूरोपीय इतिहासांत समुद्रावर लुटालूट करणार्‍या लोकांस ‘व्हिकिंग्ज’, बुकॅनियर्स’ ‘डच बेगर्स ऑफ दी सी’, ‘इंग्लिश सी डॉग्ज’ वगैरे निरनिराळीं सामान्य नामें लावलेलीं आहेत.

म ल बा र कि ना र्‍या व री ल चां चे-वास्को द गामा यानें हिंदुस्थानाचा शोध लावल्यापासून यूरोपिय चांच्यांचा उपद्रव हिंदुस्थानास होऊं लागला. वास्कोच्या बरोबर आलेला विन्सेन्ट सोडर हा पहिला यूरोपियन चांचा होय. इ. स १६२८ च्या सुमारास इंग्लंडच्या राजानें कॅक्वेल याला चांचेगिरी करण्यास हुकूम दिला होता. त्यानें मोंगलाचें एक जहाज पकडलें, परंतु पुढें सुरतच्या ई. इ. कंपनीनें त्याची भरपाई मोंगलास करून दिली ( १६३० ). त्यानंतर पोर्टर, बोनेल, किनॅस्टन, कॉब वगैरे इंग्लीश लोक चांचेगिरी करण्यास निघाले ( १६३५ ). कॉबनें त्या वेळीं तांबड्या समुद्रांत मोंगली ( दिल्लीच्या पातशाहीचीं ) जहाजें लुटलीं, तेव्हांहि सुरतच्या इं. कंपनीनें भरपाई केली. या पोर्टर वगैरे चांच्यांनां इंग्लंडच्या राजानेंच अशी लुटालूट करण्यास परवाने दिले होते असें म्हणतात. पोर्टरनें जेव्हां हा धंदा सुरू केला व एक भागीदार मंडळी काढली, तेव्हां तींत तर इंग्लंडच्या राजानेंच १० हजार पौंडांचा एक भाग घेतला होता असें म्हणतात. पोर्टरनें पुन्हां मोंगलाचीं सरकारी जहाजें लुबाडलीं व त्याबद्दल सुरतकर वखारवाल्यांना कैद व पावणेदोन लाखांचा भूर्दंड पडला. हिंदुस्थानचीं जीं गलबतें जेड्डा बंदराशीं व्यापार करीत त्यांना मालांच्या किंमतीबद्दल प्रत्यक्ष रूपें व सोनें मिळे आणि त्यांची लूट हे यूरोपीय चांचे तांबड्या समुद्रांत जमून करीत असत. पुढें ( १७८३ ) जॉन हॅन्ड व इतर चार इंग्रज व दोन डच चांचे प्रख्यातीस आले. यांच्यापैकीं कांहींजणांनीं एका फेरींत सहा लाखांची लूट मिळविली होती. यापुढें ( १६८५-८६ ) कांहीं डेन्स लोकहि सुरत ते मुंबई यांच्या दरम्यान चांचेगिरी करीत होते. तसेंच एका इंग्रज चांच्यानें व ब्रबिंग्टन या ऐरिश चांच्यानें तेलिचरीजवळ धुमाकूळ घातला. यानंतर ( १६८९ ) वेस्ट इंडीजकडील पुष्कळ यूरोपिय चांचे इकडे आले व त्यांनीं हिंदुस्थानी व पुढें पुढें युरोपिय ( एवढेंच नव्हें तर स्वत:च्या देशचींहि ) जहाजें लुटण्यास प्रारंभ केला. या लोकांनीं या वेळीं मलबार किनारा, इराणी आखात, तांबडा समुद्र, मोझांबिकची खाडी वगैरे ठिकाणी धुमाकूळ मांडला होता. या दहा वर्षांत यांच्यापासून झालेलें नुकसान अपरिमत होते. स. १६९१ डेन व विल्यम आणि टयू नांवाचे इंग्रज चांचे सुरतेजवळ प्रख्यातीस आले. इंग्रज ई. इं. कंपनीकडून यांचें पारिपत्य होत नसें कारण कंपनीचे खलाशीच चांच्यांनां अनुकूल असत. या वेळीं सर्व चांच्यांवर ताण करणारा असा हेन्री एव्हरी हा इंग्रज पुढें आला. यानें हिंदी महासागरांत अतिशय लुटालूट केली. याचें एक चरित्रहि प्रसिद्ध झालें आहे. यानें अनेक लोक ठार केले. गलबतांनां आगी लाविल्या व गांवें जाळलीं. कंपनीकडून याचें पारिपत्य झालें नाहीं ( १६९५ ). एव्हरीनें पेरिम व मादागास्कर येथें वसाहत केली, व किल्ले बांधले. मादागास्कर येथें यापुढील ३०|४० वर्षें या यूरोपीय चांच्यांच्या अनेक वसाहती झाल्या. त्यांनीं माणुसकीस काळिमा लावणारे अनेक प्रकार तेथें केले. न्यू इंग्लंड व वेस्ट इंडीज येथून या यूरोपीय चांच्यांची भरती होई. हे हिंदी व्यापार्‍यांस फार वाईट वागवीत, त्यांचें हालहाल करीत, मात्र यूरोपियनांनां चांगलें वागवीत. या एव्हरीमुळें सुरतच्या इंग्रज वखारवाल्यांनां तर अनेकदां मोंगल पातशहानें कैदेंत टाकिलें होतें. एव्हरीला पकडण्याकरितां मोठमोठालीं बक्षिसें लाविलीं होतीं. पण तो शेवटपर्यंत कोणाच्याच हातीं लागला नाहीं. याच सुमारास इंग्रजांचं सातआठ जहाजें ( डिफेन्स, जोसाथा, रेझोल्यूशन वगैरे )चांचेगिरी करीत होती. ई. इं. कंपनीचे बहुतेक खलाशी त्यांनां अनुकूल होते. पुढें ( १६९६ ) इंग्रज व्यापर्‍यांनीं एक जहाज तयार करून त्यावर किड् यांस नेमून त्याला चांच्यांच्या बंदोबस्तास नेमिलें. परंतु हाच किड् उलट अट्टल चांचा बनला. त्यानें इतर व्यापार्‍यांचीं, एवढेंच नव्हें तर ई. इं. कंपनीचींहि जहाजें लुटण्यास सुरूवात केली. त्याला कोणी पकडावयास आल्यास, त्याच्याजवळ असलेलें इंग्लंडच्या राजाचें फर्मान ( चांच्यांचा नाश करण्याबद्दलचें ) तो त्यांनां दाखवून फसवीत असे. तो १६९७ त अरबी समुद्रांत आला व तेव्हांपासून मलबार किनार्‍यावर त्यानें धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळें मोंगल सरकारनें सर्व यूरोपीय वखारवाल्यांच्या वखारीवर पहारे ठेविले व नुकसानभरपाई जबरदस्तीनें भरून घेतली. इंग्लंडनें चांच्यांच्या बंदोबस्ताकरितां नेमलेले आरमारी लिटलटन वगैरे अधिकारी त्यांनांच आंतून अनुकुल होते. लिटलटननें तर एकहि चांचा पकडला नाहीं. पुढें मोठ्या प्रयासानें किड्ला पकडून त्याला व त्याच्या साथीदारांनां फांशीं दिलें. यानें अनन्वित दुष्कृत्यें केलीं होतीं. सन १७०० च्या सुमारास मादागास्करकडील चांचेगिरीस थोडासा आळा बसला. इंग्लंडनें यावेळीं त्यासाठीं ठिकठिकाणीं कोर्टें स्थापिलीं व त्यांनां फांशीचे अधिकार दिले. हीं कोर्टें १७२२ पर्यंत अस्तित्वांत होतीं. यूरोपियनांप्रमाणेंच अरब वगैरे मुसुलमानहि या वेळीं चांचेगिरी करीत असत. १७१३ सालीं इंग्लंड, टेलर, बूश या नांवांच्या इंग्रज चांच्यांनीं तर ई. इं. कंपनीच्या मोठमोठ्या लढाऊ जहाजांचाहि पराभव करून लुटालूट ( मलबार किनार्‍यावर ) केली; इ. स. १७२३ पर्यंत स्टौट, फोर्ड, बोवेन, शिव्हर्स, नॉर्थ, हल्से, विलयम्स व्हाईट वगैरे इंग्लिश व इतर यूरोपियन चांचे लोक ई. इं. कंपनीस मधून मधून लुटीत होतेच. पुढें मराठ्यांचें आरमार महत्वास चढल्यानें व त्यांचा आरमाराधिपती कान्होजी आंग्र्यासारखा प्रख्यात पुरूष असल्यानें या यूपियन व मुसलमान चांच्यांची चांचेगिरी बंद झाली व मलबार किनारा सुरक्षित झाला. [ जॉन बीडल-धि पायरेट्स् ऑफ मलबार ]

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .