प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चलन :- प्रत्येक समाज सुसंस्कृत झाला म्हणजे सर्व वस्तूंचें क्रयविक्रयानें होणारें प्रसरण सुलभ करण्याकरितां कांही विवक्षित पदार्थ सर्वमान्य होतात. ह्या पदार्थांची प्रत्येकास अपेक्षा असते व ते सर्वत्र चलनांत येतात त्यामुळें त्यांना चलन अशी संज्त्रा देतात. याशिवाय प्रत्येक सरकारास आपल्या देशांत कोणत्याही देण्याची फेड करण्याकरितां कायद्याप्रमाणें कोणत्या वस्तू देणें व घेणें हें आवश्यक आहे हें ठरवावें लागतें. या वस्तूंस कायदेशीर चलन असें म्हणतात. या दोहोंत फरक हाच की चलन ही अधिक व्यापक जाति आहे व त्यांत अधिक वस्तूंचा समावेश होऊ शकतो. उदाहरणार्थ व्यापारी लोकांत सर्व देशांमध्यें चेक मोठ्या खुशीनें ग्रहण करतात. परंतु चेक कायदेशीर चलन नाही. चेक घेण्याविषयी ऋणकोनें आग्रह केल्यास तो कोर्टांत चालणार नाही. त्याचप्रमाणें सोनें हें सार्वत्रिक चलनांत असलें तरी सोन्याचा गट हें कायदेशीर चलन होऊं शकत नाही. इंग्लंडांत किंवा हिंदुस्थानांत ऋणकोनें सोनें दिल्यास धनको तें घेण्यास बांधला नाही. यावरून सर्वग्राह्यता हें चलनाचें मुख्य अंग समजले पाहिजे. चलनांतील पदार्थांस दुसरें आवश्यक गुण प्राप्त झाले म्हणजे त्यास पैसा ही संज्त्रा प्राप्त होते व तें पैशांचें कार्य उत्तम रीतीनें करूं लागतात.

चलनासंबंधी महत्वाचा सिध्दांत “ ग्रेशॅमचा सिध्दांत ” या नांवांनें प्रसिध्द आहे. या सिध्दांताचें स्वरूप असें आहे की, ‘खोटा पैसा खर्‍या पैशाचें नि:सारण करतो. ’ चांगली नाणी व वाईट नाणी एकाच काळी प्रचारांत असल्यास चलनांत वाईट नाणी राहून चांगली नाणी आटविली जातात, किंवा परदेशांत पाठविली जातात. याकरितां नाणें कायद्यानें ठरविलेल्या मर्यादेच्या पलीकडे कमी वजनाचें झाल्यास तें सरकारनें परत घेऊन रद्द केलें पाहिजे. अशा तर्‍हेची आपत्ति मध्ययुगांत अनेक वेळां अनेक संस्थानांत आली होती व याचें मुख्य कारण राजांचा कर्जबाजारीपणा हें होय. कर्ज मिळेनासें झालें म्हणजे चलनांत लटपट करून पैसा जमा करणें हा सोपा मार्ग असे, व याचा अवलंब करण्यास त्या काळांतील अनियंत्रित राज्यपध्दतीमुळें राजांस कोणताहि प्रतिबंध नसे. लोकांच्या हातांत सत्ता आल्यापासून हलकें हलके ही स्थिति बदलून आजमितीस नाण्यांत ढवळाढवळ करण्याचें साहस बहुतकरून कोणीहि करीत नाही. वाईट चलनाचे व्यापारावर फार अनिष्ट परिणाम होतात, हें सत्यहि आतां सर्व मुत्सद्यांस कळून चुकलें आहे.

प्रेशॅमच्या सिध्दातांचे दुसरे उदाहरण नोटा व नाणी हीं दोनहि चलनांत असून नोटांची किंमत कमी झाल्यास द्दग्गोचर होतें. असें झाल्यानंतर होतां होईल तों नोटांत व्यवहार करून नाणी आटविण्याकडे व परदेशी पाठविण्याकडे प्रत्येकाची प्रवृत्ति होते. १८६२ पासून १८७९ पर्यंत युनायटेड स्टेट्समध्यें नोटांची किंमत अतिशय कमी झाली व त्यामुळें सोनें परदेशी जाऊं लागलें. ही आपत्ति टाळण्याचा उत्तम उपाय हाच की नोटांच्या मोबदला केव्हांहि नाणी मिळतील अशी सरकारनें खबरदारी घेतली पाहिजे. शिवाय नोटांचें चलन अमर्याद न वाढेल अशी व्यवस्था केली पाहिजे. हल्ली जर्मनीत नोटा पैशापासरी झाल्यामुळें सोन्यारूप्याचें चलन अजीबात बंद झालें आहे. हिंदुस्थानांत अशा त-हेची आपत्ति कधीहि आली नाही याचें मुख्य कारण हें आहे की नोटांचें रूपये देण्याची हिंदुस्थानसरकारची पूर्ण तयारी असते. महायुध्दाच्या अतिशय बिकट प्रसंगांतसुद्धां नोटांचे रुपये देण्याची जबाबदारी सरकारें पार पाडली. ही गोष्ट सरकारास भूषणावह आहे.

चलनपध्दतीचें तीन प्रकार आहेत :-     (१) एकचलनपध्दति, (२) द्विचलनपध्दति व (३) तुलनात्मक पध्दति. एकचलन पध्दतींत मुख्य नाणें सोनें किंवा रूपें यांपैकी एका धातूचें असतें. इतर धातूंची नाणी ही फक्त उपनाणी अथवा परचुटण म्हणून वापरण्यांत येतात, परंतु एका ठराविक मर्यादेपलीकडे कायदेशीर चलनें असूं शकत नाहीत. मुख्य चलन हें कोणत्या वाटेल त्या रकमेंपर्यत कायदेशीर चलन असतें. शिवाय पूर्ण एकचलन पध्दतीमध्यें मुख्य धातु दिल्यास नाणें पाडून घेण्याचा वाटेल त्यास अधिकार असतो. उदा. अजमासें ७ २/३ मासे सोनें दिल्यास इंग्लडमध्यें एक सॉव्हरिन पाडून देतात; हिंदुस्थानांत १८९३ च्या पूर्वी पंधराषोडशांष तोळे अथवा ११ ¼ मासें चांदी दिल्यास एक रूपया पाडून देत असत. एक चलनपध्दतीत अशी व्यवस्था असते की चलनांतील नाणें आटविल्यास मूळ धातुगत मूल्य प्राप्त होतें व त्या धातूचें वाटेल तेव्हां पुन्हा नाणें पाडून मिळतें. यामुळें धातुगत मूल्य व नाण्याचें मूल्य यांमध्यें नेहमी एकवाक्यता असतें. या कारणानें नाणी आटविण्यासंबंधानें विशेष कायदे करावे लागत नाहीत. लोकांस जें सोईचे असेल तें स्वरूप लोक पसंत करतात. गट पाहिजे असल्यास नाणीं अटवावी व नाणीं पाहिजे असल्यास टांकसांळीत गट नेऊन त्यांस नाण्याचें रूप द्यावें. या पध्दतीमुळें एक प्रकारची नैसर्गिकता व कृत्रिम युवत्यांता अभाव ही या पध्दतीत साध्य होतात. ही मुख्य धातु सोनें असल्यास सुवर्णकपध्दति व रूपें चलन असल्यास रौप्यैकचलनपध्दति अशी नांवें द्यावी लागतात.

या पध्दतीचा एक फायदा असा आहे की द्विचलनपध्दतीमध्यें जी अनेक नियंत्रणे व दोनहि धातूंचे प्रमाण ठराविक रहाण्याविषयीं प्रयत्न करावे लागतात तीं या पद्धतीत अनवश्यक असतात. खुली टांकसाळ ठेविली म्हणजे इतर कोणत्याहि गोष्टीकडे सरकारास लक्ष द्यावें लागत नाही.

द्विचलनपद्धतींत सोनें व रूपें या दोनहि धातूंची नाणी कायदेशीर चलन असतात व दोनहि नाण्यांकरिता टांकसाळ खुली असते. अर्थात् त्या नाण्यांत असणारें धातूचें प्रमाण व दोन नाण्यांमधील गुणोत्तर ही कायद्यानें ठरवावी लागतात. उदा. अमुक सोनें दिल्यास सॉव्हरिन व अमुक चांदी दिल्यास रूपया अशी नाणी पाडून दिल्यास, व सॉव्हरिन = १५  रूपये असें ठरवून टाकल्यास हिंदुस्थानांत द्विचलनपध्दति होईल या पध्दतीची विशेष खुबी अशी आहे की या नाण्यांपैकी कोणतें द्यावयाचें हें ऋणकोच्या इच्छेवर सोंपविलेलें असतें. त्यामुळें ज्या धातूची नाणी पाडून घेणें फायदेशीर असतें त्या धातूंची नाणी सर्वच लोक पसंत करतात. याचा परिणाम स्वाभाविक असा होतो की, दोहोंपैकी जी धातु तात्पुरती स्वस्त असते तिची नाणी चलनांत येऊन दुसर्‍या धातूची नाणी ग्रेशँमच्या सिध्दांताप्रमाणें आटविली जातात किंवा बाहेरच्या देशांत जातात. कल्पना करा की, पौडाचा व रूपयाचा भाव ठरविल्यानंतर बाजारांत सोनें स्वस्त झालें; अर्थात् १५ पेक्षां कमी रूपये देऊन पौंडांत जितकें सोनें असतें तितकें मिळूं शकतें.  असें दिसून येतांच प्रत्येक व्यापारी व बँक रुपये देऊन सोनें खरेदी करून त्याचे पौंड टाकसाळीतून घेऊन पौंडात आपलें देणें देऊं लागेल. उलटपक्षी चांदी स्वस्त झाल्यास प्रत्येकजण रूपये पाडून घेईल. एका पौंडास १६ रूपयांत जी चांदी असतें ती मिळाल्यास तेवढ्या चांदीचें सोळा रूपये पाडून मिळतील व त्यांपैकी पंधरा रूपये धनकोस देऊन एक रूपयाचा फायदा ऋणकोस होईल. अशा रीतीनें तत्वत: द्विचलनपध्दति असून प्रत्यक्ष अमलांत दोन एकचलनपध्दतीचें रहाटगाडगें सुरू होईल. कांही दिवस रूप्याचीं नाणी आटविली जातील व कांही दिवस सोन्याची नाणी आटविली जातील. देशांमध्ये सोनें व रूपें यांमध्यें कोणतेंहि गुणोत्तर ठरविणें सरकारच्या हातांत असतें;  परंतु सर्व जगांतील या दोहोंतील गुणोत्तर ठरविणे हें एका देशांतील राजसत्तेच्या कक्षेच्या बाहेर आहे.

सोळाव्या शतकाच्या अखेरपर्यंत बहुतेक देशांत द्विचलनपध्दति अमलांत होती परंतु इंग्लडनें एकचलनपध्दतीचा स्वीकार केल्यापासून एकचलनपध्दतीकडे राष्ट्राचा कल जास्त होऊं लागला, फ्रान्सनें मात्र ही पध्दति अमलांत आणण्याची पराकाष्ठा केली. १८०३ साली नेपोलियननें द्विचलनपध्दतीचा आश्रय केला. परंतु नवीन सोन्याच्या खाणीचा शोध लागल्यापासून सोन्याची पैदास जास्त होऊं लागली व फ्रान्समधून रूपें नाहीसें होऊं लागलें.

१८५६ त फ्रान्स, बेल्जम स्वित्झर्लड, इटली व ग्रीस या राष्ट्रांनी ‘ लॅटिन युनियन ’ नांवाचा संघ स्थापन केला व द्विचलनपध्दति कायम ठेवण्याचा निश्चय केला. नंतर १८७१ साली जर्मनीनें सुवर्णेकचलनपध्दतीचा स्वीकार केला. १८७२ मध्यें नॉर्वे, स्वीडन व डेनमार्क यांनीहि एकचलन पध्दति अमलांत आणिली. त्यामुळें या चार देशांतील सर्व रूपें ‘लॅटिन युनियन’ मध्यें येऊन तेथील सर्वच नाणें रूप्याचें होण्याची भीति वाटूं लागली. तिचा परिहार करण्याकरितां ‘ लॅटिन युनियन ’ नें रूप्याची खुली टाकंसाळ बंद केलीय १८७६ मध्यें युनायटेड स्टेट्सनें द्विचलनपध्दतीस शक्य तितकी मदत केली. १८७२, १८८१, १८९२, १८९७ या सालांत सर्व राष्ट्रांच्या चलनावर परिषदा भरल्या; परंतु इंग्लड व जर्मनी यांचा विरोध असल्यामुळें द्विचलनपध्दति स्वीकारणें इतर राष्ट्रांस सोईचें नव्हतें. सर्व जगांत द्विचलनपध्दति होत नाही. असें पाहून हिंदुस्थानांतहि १८९३ साली टांकसाळ बंद करून सोन्याचें नाणें सुरू करण्याचें हिंदुस्थान सरकारनें ठरविलें. तेव्हापासून द्विचलनपध्दति ही निकामी झाल्यासारखीच आहे. फ्रान्सच्या अनुभवावरून असें स्पष्ट दिसतें कीं, दोन चार देशांनी द्विचलनपध्दति अमलांत आणल्यास ती फायदेशीर न होतां उलट दु:खदायक होते. याकरितां या पध्दतीच्या कट्टया पुरस्कर्त्याचें म्हणणें असें आहे की सर्व राष्ट्रांनी ह्या पध्दतीचा अंगिकार केल्यास पूर्वीच्या इतिहासांत घडून आलेल्या गोष्टी असंभाव्य होतील. कारण प्रत्येक देशांत दोन्ही धांतूची नाणी मुख्य असली म्हणजे रूपें स्वस्त झाल्याबरोबरच प्रत्येक देशांतील लोक रूप्याचें नाणें देऊं लागतील व या वाढलेल्या मागणीमुळें पुन्हां रूपें पूर्वपदावर येईल. त्याचप्रमाणें सोनें व रूपें यांमधील गुणोत्तर किंचित् बदलून सोनें स्वस्त होऊं लागल्यास सर्व जगांतील देशांत सोन्याची मागणी जास्त होऊन हें गुणोत्तर पुन्हां कायदेशीर गुणोत्तरावर येऊन स्थिर होईल. कांही देशांत द्विचलनपध्दति असल्यास सोनें किंवा रूपें इतर देशांत जाईल. परंतु सर्व जगांत हीच पध्दति असल्यास सोनें व रूपें बाहेर जाणार कोठे ? जर भविष्यकाळी राष्ट्रसंघाच्या मार्फत सर्व देश त्या पध्दतीचा अंगिकार करतील तरच ही पध्दति यशस्वी होईल, नाहीतर होणार नाही. संध्यां तरी द्विचलनपध्दतीचा कोणी पुरस्कार केल्यास त्याची गणना विक्षिप्त मनुष्यांत होते. शिवाय सध्यां सुवर्णैकचलन हेंच उत्तम असा सर्वांचा पूर्वग्रह झाल्यामुळें दुसर्‍या पध्दतीचा  कोणीहि नि:पक्षपातानें विचार करीत नाही. ज्या वेळेस सोन्याची पैदास अतिशय कमी होऊन सर्व देशास सोनें पुरेनासें होईल त्या वेळेस द्विचलनपध्दतीचा उदयकाल येईल. द्विचनपध्दतीचा मोठा फायदा हा आहे. की एकंदर चलनांचें प्रमाण वाढून पैशाची टंचाई पडत नाही. हल्लीच्या पध्दतीत सोन्याची कधीं कधीं इतकी टंचाई पडते कीं एका देशास जरूर लागल्यास दुसया देशांतून सोनें पळवून आणण्याविषयी अनेक क्लृप्त्या सुरू आहेत. विशेषत: इंग्लंडचा १८४४ चा बँक चार्टर अँक्ट हा अगदी ढिला असल्यामुळें इंग्लंडवर हा प्रयोग अनेक वेळां होतो. जर्मनी, युनायटेड स्टेट्स, रशिया यांनां सोनें लागलें म्हणजे ते इंग्लंडातून वाटेल तेव्हां नेतात. पुष्कळशी ‘ बिल्स ऑफ एक्सचेंज ’ म्हणजे परराष्ट्रांच्या लंडन येथील व्यापार्‍यांवर दिलेल्या हुंड्या जमा केल्या म्हणजे त्यांच्या नोटा मिळतात व त्या नोटा पटवून बँक ऑफ इंग्लंड या संस्थेस रोख सॉव्हरिन कायद्यानें मिळतात व हे पेट्यांत घालून बाहेर देशांत नेण्यासहि कायद्याचा प्रतिबंध नसतो. अशा रीतीने अनेक वेळां ८|१० कोटी पौडांचें सोनें इंग्लंडातून इतर देशांत गेलेले आहे. अशा तहेच्या प्रयोगास इंग्रजीत कॉर्नर (कोंडी) अशी संज्त्रा आहे. सोन्याचें उत्पादन दरसाल अधिकाधिक वाढत चाललें आहे. १९१५ साली १४५ कोटी रूपयांचें सोनें जगांत पैदा झालें. असें असूनहि सर्व देशांत सुवर्णचलन झाल्यास हल्लीचें सोनें सर्व राष्ट्रांत पुरणार नाही हें खास. अशी स्थिति असतां रूप्यावर बहिष्कार घालून चलनाची संख्या कमी करणें हें दुराग्रहाचें व अदूरदर्शित्वाचें लक्षण आहे. शिवाय हल्ली चलनाच्या अस्थिरतेमुळें सर्व देशांत किमतीवर जो परिणाम होतो तो द्विचलन पध्दतीत होणार नाही असें या पध्दतीच्या पुरकर्त्यांचें म्हणणें आहे. हें मत पुष्कळ अशी ग्राह्य आहे यांत शंका नाही. रूप्याची नाणी दिसण्यांतहि इतकी तेजस्वी व सुंदर दिसतात की सोन्याच्या नाण्यांत व ह्या नाण्यांत कोणताहि फरक नाही. रूप्याचें नाणें मुख्य नाणें केल्यास रूप्याची किंमतहि हल्लीपेक्षां पुष्कळ वाढेल; कांहीच्या मतें ती इतकी वाढेल की सोनें व रूपें यामधील गुणोत्तर १:१० असें थोडक्या अवधीत होईल. परंतु हें करावयाचें कोणी ? मिल, फॉसेट यांस द्विचलनपध्दतीचें रहस्य मुळीच कळलें नाही असें त्यांच्या ग्रंथावरून स्पष्ट दिसतें. आधुनिक इंग्रजी अर्थशास्त्रज्त्रांत प्रो. मार्शल यानी द्विचलनपध्दतीस अनुकूल अशा कांही सूचना केल्या आहेत त्या त्यांच्या ‘ प्रिन्सिपल्स ऑफ् एकॉनॉमिक्स’ या ग्रंथाच्या तिसर्‍या भागांत वाचकांस सांपडतील. तुलनात्मक पद्धतींत दोनहि धातूंचीं नाणीं तोलून त्यांचें जें बाजारांतील भावाप्रमाणें मूल्य होईल त्याप्रमाणेंच त्यांचा स्वीकार होतो. किंबहुना नाण्यास गटाचेंच स्वरूप प्राप्त होतें. किंबहुना नाण्यास गटाचेंच स्वरूप प्राप्त होतें. ही पद्धति कोणत्याहि एकाच देशांत सध्यां चालू नाहीं. परंतु मध्ययुगीन युरोपांत व हिंदुस्थानांतहि शेंकडों नाणीं प्रचारांत असल्यामुळें ह्या पद्धतीचा अवलंब करीत असत हल्लीं फक्त आंतरराष्ट्रीय व्यापारांत ही पद्धति दृग्गोचर होते.

भा र ती य.-हिंदुस्थानांत ऋग्वेद काळापासून सोन्याचें चलन होतें. परंतु तें नुसत्या धातूचें असावें असें दिसतें. कारण वेदांत नाण्यांचा उल्लेख आढळत नाहीं. महाभारतांतसुद्धां नाण्यांविषयीं स्पष्ट उल्लेख सांपडत नाहीं. तथापि गट या रूपांत सोन्याचें चलन त्या कालीं होतें हें नि:संशय आहे. अकबराच्या वेळीं द्विचलनपद्धति सुरू होती. सोनें व रूपें या दोनहि धातूंचीं नाणीं असून त्यांचें एकमेकांशीं गुणोत्तर ठरविलें होतें. परंतु प्रत्यक्ष बाजारांमध्यें कमीजास्त भाव होऊन बटाव द्यावा लागे. मराठी साम्राज्यांत सोन्याचीं नाणीं पुष्कळ वापरीत असत परंतु सामान्य व्यवहारांत निरनिराळ्या तर्‍हेचे रूपये आंतील रूप्याच्या मानानें किंमत ठरवून घेत असत.

ईस्टइंडिया कंपनीनें उत्तम रूपये पाडण्याचें सुरू केल्यापासून तिचे रूपये सर्व ठिकाणीं लोकप्रिय होऊं लागले. मद्रास प्रांतांत सोन्याचें नाणें जास्त चलनांत होतें परंतु १८१८ मध्यें कंपनीनें त्या प्रांतांत रूपया चलनांत आणला. नंतर १८३५ सालीं रूपया हेंच फक्त कायदेशीर चलन आहे असें कंपनीनें जाहीर केलें. परंतु खजिन्यांत सोन्याचीं नाणीं धातूच्या किंमतीप्रमाणें घेत असत. १८५३ सालीं लॉर्ड डलहौसीनें सोन्याचीं नाणीं बेकायदेशीर ठरवून रौप्यै कचलनपद्धति प्रस्थापित केली. यानंतर १८९३ पर्यंत ही पद्धति चालू होती. १८६६ मध्यें एका कमिटीनें सोन्याचें नाणें चालू करण्याविषयीं शिफारस केली परंतु भारतमंत्री यानीं ही सूचना मान्य केली नाहीं.

१८९३ सालीं सरकारनें खुली टांकसाळ बंद केली. याचीं कारणें दोन होतीं. एक कारण असें कीं, १८७० पासून रूपें स्वस्त झाल्याकारणानें पौंड व रूपया यांमधील हुंडणावळ रूपयाच्या बरीच विरूद्ध झाली होती. कधीं कधीं तर १ पौंड = ३० रूपये इतका रूपयाचा दर कमी लागे. यामुळें इंग्लंडांत पाठविण्याची रक्कम पौडांत ठरली असल्यानें तिची रूपयांत अधिक किंमत होऊन करांचें ओझें जास्त वाढत चाललें. शिवाय हुंडणावळीच्या अस्थिरतेमुळें बजेट करणें कठिण पडूं लागलें. दुसरें कारण हें होतें कीं रूप्याच्या स्वस्तपणामुळें हिंदुस्थानांत रूपें आणून त्याचे रूपये इतर देशांतील व्यापारी पाडून घेऊं लागले. त्यामुळें चलनांत रूपये अमर्याद वाढून रूपयाची किंमत या देशांतहि कमी होऊन सर्व किंमती वाढण्याची खात्री वाटूं लागली. ही आपत्ति टाळण्यांस नवीन रूपये बंद करणें हा मार्ग होता. कारण त्यायोगें रूपयांची टंचाई पडून किंमती पूर्ववत् राहतील हें निश्चित होतें. या दोनहि कारणांमुळें टांकसाळ बंद करून सोन्याचें नाणें करण्याचें सरकारनें ठरविलें. १८९८ मध्यें सॉव्हरिन हें कायदेशीर चलन ठरवून त्याचें रूपयाशीं प्रमाण १:१५ असें निश्चित केलें व सोन्याची खुली टांकसाळ करण्याचें ठरविलें. १९०२ त हीं टांकसाळीची कल्पना रद्द झाली. चलनांत फक्त इंग्लंडांतून आलेले सॉव्हरीन येऊं लागले. परंतु त्यांचें एकंदर चलनांशीं प्रमाण फार थोडें होतें. यानंतर चेंबरलेन कमिशननें असें ठरविलें कीं हिंदुस्थानास सुवर्णचलनाची मुळीच अपेक्षां नाहीं; रूपये व नोटा हें चलन उत्तम आहे; फक्त परदेशीं सोनें पाठविण्याची जरूर पडल्यास सरकारनें रूपये घेऊन लंडनवर पौंडांचे ड्रॅफ्ट विकावे. या कमिशनचा अहवाल मान्य झाल्यापासून सोन्याच्या चलनाची कल्पना सरकारनें सोडून दिली. गेल्या वीस वर्षांत गोखले, ठाकरसी, वेब इत्यादि अर्थशास्त्रज्त्र धुरीणांनीं सुवर्णचलनाविषयीं शक्य तितकी चळवळ केली परंतु तिचा फायदा झाला नाहीं.

आजमित्तीस जें चलन आहे त्याचें वर्णन ‘सुवर्णसंलग्नचलन’ या नांवानें केलें जातें. या पद्धतीचीं तत्वें अशीं आहेत कीं, खरोखरी चलनांत सोनें न ठेवितां सोन्याच्या नाण्याशीं व्यवहारांतील चलनांत संबंध जोडून देणें; एका केंद्रस्थानीं सर्व सोनें ठेवणें व त्या सोन्याच्या आधारावर इतर राष्ट्रांचें देणें फेडून टाकणें; सोन्याचें नाणें व व्यवहारांतील रूप्याचें नाणें यांचें प्रमाण पक्कें ठरवून टाकून तें अनेक युत्क्यांनीं कायम ठेवणें. ह्या तत्वांनुसार पुढीलप्रमाणें प्रत्यक्ष आचरणांत योजना केलेल्या आहेत.

प्रत्यक्ष चलनांत रूपये व नोटा हीं महत्वाचीं अंगें आहेत; सॉव्हरिन कोणाजवळ इंग्लंडांतून आले असल्यास ते कायदेशीर चलन आहेत. महायुद्धापर्यंत पौंड १ = १५ रूपये असा भाव होता व हल्लीं पौंड १ = १० रूपये असा भाव आहे. परंतु हें चलन महत्वाचें नाहीं. भारतमंत्री हे ‘होमचार्जेस’ वसूल करण्याकरितां इंग्लंडांत हुंड्या विकतात व त्या हुंड्यांचे हिंदुस्थानांत हिंदुस्थानसरकाराकडून रूपये अथवा नोटा मिळतात. आतां कोणांस इतर राष्ट्रांचें देणें चुकविण्याकरितां पौंड लागल्यास प्रत्यक्ष पौंड देण्यास सरकार बांधलें गेलें नाहीं. परंतु या कामाकरितां ‘उलट हुंड्या’ विकण्यास सरकार नेहमीं तयार असतें. उलट हुंड्या सरकारास येथें रूपये देऊन मिळतात व त्या लंडन येथें दाखविल्या म्हणजे भारतमंत्री त्याबद्दल पौंड देतात. म्हणजे येथील चलनाचा मोबदला केव्हांहि सोन्याचें नाणें पौंड हें मिळूं शकतें. ही व्यवस्था कायम राखण्याकरितां जितक्या हुंड्या भारतमंत्री विकतील तितक्यांचे रूपये येथील खजिन्यांत ठेवितात; रूपये कमी पडल्यास रूपें इंग्लंडांतून पाठवून टांकसाळींत नवे रूपये पाडतात. याशिवाय सॉव्हरिन देऊन त्यांच्या मोबदला  रूपये मागतां येतात. रूपये पाडण्यांत प्रत्येक रूपयामागें ५|६  आणे नफा होतो. हा नफा सर्व एकत्र करून त्याचा सुवर्णनिधि बनविला आहे. याशिवाय नोटांच्या निधीमध्यें सॉव्हरिन घेऊन रूपये किंवा नोटा दिल्यामुळें जें सुवर्ण सांचतें त्याचा दुसरा एक निधि होतो. या दोनहि निधींचा उपयोग उलटहुंड्या विकण्याकडे करण्याची भारतमंत्री यास परवानगी आहे. याच कारणाकरितां हे दोनहि सुवर्णनिधि इंग्लंडमध्यें ठेवतात, कारण त्यांचा हिंदुस्थानांत विशेष उपयोग नसतो. याशिवाय हे निधी इग्लंडांत ठेवण्याचा उपयोग असा होतो कीं एखाद्या सालीं ‘हुंड्या’ किफायतशीर भावानें न विकल्या गेल्या तर ‘होमचार्जेस’ ची सर्व रक्कम भारतमंत्री या निधींमधून काढून घेतात; व त्याच रकमेइतके रूपये हिंदुस्थानांत जो निधीचा भाग असतो त्यांत जमा करतात.

हिंदुस्थानचा निर्यात माल आयात मालापेक्षां पुष्कळच अधिक असल्यामुळें इतर देशांचें कर्ज फिटून या देशास ४०| ५० कोटि घेणें निघतें. त्यामुळें उलटहुंड्या विकत घेण्याचे प्रसंग फार कमी येतात. असे प्रसंग गेल्या तीस वर्षांत १९०७, १९१४, १९१८, १९२०, या सालीं आले होते. सामान्यत: इतर लोकांस हिंदुस्थानचें देणें असल्यामुळें ‘हुंड्या’ विकत घेण्याचीच यूरोपांतील बँकांनां जरूर असते. या देशांत दुष्काळ पडतो तेव्हां निर्यात माल कमी असतो, परंतु लोकांच्या संवयीमुळें आयात माल फारसा कमी होत नाहीं. त्यामुळें अशा सालांत हिंदुस्थान रिणको देश बनतो व उलटहुंड्या विकण्याचा प्रसंग येतो.

नोटांच्या चलनाची व्यवस्था पुढें लिहिल्याप्रमाणें आहे. एकंदर चलनांत जेवढ्या नोटा असतील तितकी रक्कम रोख रूपये, पौंड किंवा सोन्याचा गट आणि सिक्यूरिटी या स्वरूपांत नोटांच्या निधींत पाहिजे. सिक्यूरिटी किती असाव्यात यासंबंधाचा नियम आहे. १८९० पर्यंत सिक्यूरिटींचीं संख्या ६ कोटी होती. ती १९११ मध्यें १४ कोटींवर नेली. महायुद्धामध्यें जास्त रकमेची जरूर लागल्यामुळें सिक्यूरिटींची मर्यादा १०० कोटीपर्यंत नेली. एकंदर नोटांच्या संख्येंत हे १०० कोटि वजा केले म्हणजे बाकीचे रूपये किंवा सोन्याचें नाणें अथवा गट असे निधीमध्यें असलेच पाहिजेत असा कायद्यानें निर्बंध आहे. हल्लींच्या मितीस चलनामध्यें अजमासें १७५ कोटींच्या नोटा आहेत. सुवर्णनिधि फौलर कमिटीच्या शिफारसीप्रमाणें १८९८ त जमा करूं लागले. त्यावेळेस असा उद्देश होतो कीं, हा निधी ५० कोटींइतका झाला म्हणजे इंग्लंडांतील चलनाप्रमाणें येथें सुवर्णचलन सुरू करावयाचें. परंतु नंतर सरकारनें चेंबरलेन कमिशनच्या सल्ल्यावरून ‘सुवर्णसंलग्नचलन’ हेंच हिंदुस्थानास हितावह आहे असें ठरविलें. आतां फिरून हा प्रश्न वादास लावण्याची सरकारची इच्छा नाहीं. तथापि हिंदुस्थानांतील सर्व अर्थशास्त्रज्त्र पंडित व मुत्सद्दी यांचें असें ठाम मत आहे कीं हल्लींची चलनपद्धति अतिशय सदोष व देशाच्या हितास विघातक अशी आहे. व सुवर्णचलन स्थापित करणें हाच श्रेयस्कर मार्ग आहे.

हल्लींच्या चलनपद्धतींत पुढीलप्रमाणें ठळक दोष आहेत. ही पद्धति कृत्रिम आहे. सोनें व रूपें यांचे भाव नेहमीं बदलत असल्यामुळें रूपया व पौंड यांमधील गुणोत्तर कायम राखणें कठिण पडतें. हें करण्याकरितां ज्या क्लप्त्या कराव्या लागतात, त्यामुळें सरकारचा चलनपद्धतीशीं निकट संबंध येऊन सरकारास नेहमीं जागृत रहावें लागतें त्याच्या मज्जातंतूंवर चांगलाच ताण बसतो. रूपें महाग व सोनें स्वस्त झाल्यास ही पद्धति टिकणार नाहीं. कौन्सिलबिलें अथवा ‘हुंड्या’ विकल्यामुळें हिंदुस्थानांत रूपयांचें चलन अमर्याद वाढलें आहे. यामुळें चलनाचें द्रवीभवन होऊन किंमतीवर परिणाम होऊन १८९८ पासून किंमती अतोनात वाढल्या आहेत. किंमती वाढल्यामुळें कर वाढवावे लागतात, लष्करी खर्च वाढतो, नोकरांचे पगार वाढवावे लागतात. अशा रीतीनें अनर्थपरंपरा सुरू होते. दोन देशांमधील हुंडणावळ ही व्यापाराच्या नेहमींच्या स्थितीवर अवलंबून असते. परंतु हुंडणावळ कृत्रिम केल्यास आयात व निर्गत मालाच्या नैसर्गिक गतींत विरोध उत्पन्न होतो. हुंडणावळ हें कारण व व्यापार हें कार्य असा विपर्यास कधीं कधीं होतो. हुंडणावळ अनुकूल वाटल्यास जरूरी नसतां व्यापारी माल मागवितात व मागणीकडे दुर्लक्ष करतात. सुवर्णनिधि इंग्लंडांत ठेवल्यामुळें त्या रकमेचा इंग्लंडमधील व्यापार्‍यांस फायदा मिळतो, व हिंदुस्थानांत व्याजाचे दर वाढत जातात. सिक्युरिटींमध्यें इंग्लंडांतील व इतर देशांतील सिक्यूरिटी जास्त असल्यामुळें आमच्या निधीचा फायदाहि इतर देशांस मिळतो. व आम्हांस फक्त ३|-३|| टक्के व्याज मिळतें. हा निधि येथें ठेवल्यास आमच्या व्यापारास अतिशय सहाय्य होईल. हल्लीं सोनें व सिक्युरिटी या रूपांत इंग्लंडांतील सुवर्णनिधि जवळ जवळ ८० कोटींचा आहे.

सुवर्णचलन केल्यास या सर्व आपत्ती नाहींशा होऊन इंग्लंड व हिंदुस्थान या दोनहि देशांत एकच चलन झाल्यामुळें हुंडणावळीचा प्रश्न तापदायक होणार नाहीं. हिंदुस्थान देश हा सुवर्णचलन करण्यास सर्वस्वी पात्र आहे. येथील निर्यात आयतीपेक्षां ३०|४० कोटींनीं जास्त असल्यामुळें आठ वर्षांत हें सोनें एकत्र केल्यास जवळ जवळ ३०० कोटीचें सोनें सुवर्णचलन करण्यास उपयोगी पडेल. नंतर हल्लींच्या नोटा रद्द करून त्यांच्याऐवजीं पौंडांच्या नोटा केल्या म्हणजे पूर्ण सुवर्णैकचलनपद्धति अस्तित्वांत येईल. पटचुरण म्हणून ५० कोटि रूपये लहान सहान व्यवहारांकरितां पाडले म्हणजे पुरेसे होतील. १०० रूपये रकमेच्या पलीकडे रूपया हें कायदेशीर चलन नाहीं असें कायद्यांत नमूद केलें म्हणजे रूपयास खरें उपनाण्याचें स्वरूप प्राप्त होईल. प्रत्यक्ष चलनांत पौंड फारसे न रहाण्यास बँकिंगची पद्धति सार्वत्रिक करणें हा उपाय आहे. हा उपाय अमलांत आणून प्रत्येक जिल्ह्यांत इंपीरियल बँकेची शाखा उघडली व चेकचा प्रसार जास्त वाढत गेला म्हणजे इंग्लंडांतल्या प्रमाणें येथेहि प्रत्यक्ष धातूच्या चलनाची काटकसर करतां येईल.

हल्लीं चलनाची स्थिति फारच घोंटाळ्याची झाली आहे. पूर्वीची हुंडणावळ कायम ठेवण्याची प्रतिज्त्रा महायुद्धाच्या कालांत मोडावी लागली. हल्लीं हुंडणावळ स्थिर नसून नेहमीं बदलत असते. परंतु हल्लीं ती जास्त नैसर्गिक आहे. सरकारनें आपलें नियंत्रण काढून टाकल्यामुळें व्यापाराच्या क्रियेमुळें जी हुंडणावळ निश्चित होते तिला अनुसरून देवघेव होते. हुंडणावळ स्थिर करण्याविषयीं अनेक लोक मागणी करूं लागले आहेत; व हल्लीं सर पुरूषोत्तम यांनीं त्या आशयाचें बिल असेंब्लीमध्यें आणलें आहे. एकदम उलट कांहीं अर्थशास्त्रज्त्रांचें असें मत आहे कीं, सुवर्णचलन अमलांत आणावें म्हणजे हुंडणावळीचा प्रश्नच उदभवणार नाहीं.

स्मिथ कमिटीच्या शिफारसीवरून १९१९ मध्यें सरकारनें कायदा करून पौंड व रूपया यांमधील प्रमाण १:१० असें ठरविलें. परंतु पौंडांची खरी किंमत बदलत असून मध्यंतरीं १६-१७ रूपये असल्यामुळें सरकारी भावानें पौंडघेणें अशक्य झालें. यामुळें इंग्लंडांतून पौंड आणण्याचें बंद झालें. व व्यवहारांतहि पौंडांचें चलन बंद झालें. सरकारी हिशेब ठेवण्याकरितांच या प्रमाणाचा अवलंब केलेला आहे. व हुंडणावळ ठरविण्याचा सरकारचा यांत मुळींच उद्देश नाहीं असें नुकतेंच सर बेसिल ब्लॅकेट यांनीं जाहीर केलें आहे. एकंदर जगांतील किंमतीची व हुंडणावळीची स्थिर स्थावर झाल्यानंतर हिंदुस्थानांतील सुवर्णचलनाचा प्रश्न हातांत घेऊं असेंहि १९२४ च्या मार्चच्या बजेटाच्या वेळीं हिंदुस्थान सरकारनें अश्वासन दिलें आहे. नुकत्याच व्हाइसरायांनीं दिल्लीस केलेल्या भाषणांत हा प्रश्न लवकरच विचारांत घेतला जाईल असें सांगितलें आहे [ ले. व्ही. एन. गोडबोले ].

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .