प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चलत्-चित्रे - (सिनेमांतील चित्रें) हल्ली करमणुकीकरतां उपयोगांत असलेली ही चित्रें फोटोग्राफनें प्रतिमा घेऊन तयार करण्यांत येतात. पंचवीस वर्षापूर्वी चलत-चित्रे हा मुलांचा खेळ समजला जाई. पण आज हजारों लोकांनां किफायतशीर उद्योग देणारा, लाखो लोकांनां शिक्षण व करमणूक करून देणारा व जगांतील मोठमोठ्या धंद्यांत उच्च स्थान मिळवून अगणित पैशाची उलाढाल करणारा असा हा धंदा होऊन बसला आहे. कँमेरानें चलत्-चित्रें घेणारा मनुष्य आपला फिरता कॅमेरा मोठमोठ्या जंगलांतून व त्याचप्रमाणें दाट वस्तीच्या शहरांतून उभा करतो. तो राजांची पदच्युती, राष्ट्राध्यक्षांचे अधिकारारोहण, मोठाल्या आपत्तीतील देखावे आणि लोकप्रिय योध्यांच्या कर्तबगारी नमूद करीत असतो. सृष्टीत आणि मनुष्यकृतीत नाटकांत व खर्‍या आयुष्यांत जे जें कांही मनोरंजक असेल तें तें सर्व तो आपणापुढें आणून ठेवतो.

याच्या लवचीक विपर्यस्त (निगेटिव्ह) पटावर एकामागून एक भराभर अनेक चित्रें घेतां येतात. कँमेरांतील हा लवचिक विपर्यस्त पट म्हणजे जिलेटिन अवलेहानें आच्छादिलेली सेल्युलॉईडची एक लांब पट्टी असते. वास्तविक पट पारदर्शकं असल्यामुळें एखाद्या पडद्यावर ती चित्रें मोठी करून वठवितां येतात व ती अशी वठविली असतां असंख्य प्रेक्षकांस पाहणें सुलभ जाते. आरंभापासूनच अशा चलत् चित्राना जनतेचा आश्रय मिळून ती करण्याचा धंदा लवकरच वाढत गेला. आरंभी आरंभी हालचाल असलेली कोणचीहि गोष्ट फोटो घेऊन वरील रीतीनें दाखविली असतां प्रेक्षक आश्चर्यानें थक्क होऊन जात असे. त्यानंतर चित्रांचा विषय, प्रवास, शास्त्रीय गोष्टी आणि प्रासंगिक हास्यकारक प्रहसनें ही बनली. त्यावेळी नाटकें (पडद्यावर दाखविली जाणारी) माहीत नव्हती. लवकरच लोकांना असें आढळून आलें की, रंगभूमीवर होणार्‍या नाटकापेक्षां चित्र-नाटकें जास्त वस्तुस्थितिदर्शक असतात, व चित्रपटांचे विषय अगणित व अमर्यादित असूं शकतात. या नाटकांत कृत्रिम रंगवलेले देखावे उपयोजण्याऐवजी त्यांस लागणारा देखावा खरोखरीचा दाखविणें अगदी शक्य असतें. जेव्हां चित्रोत्पाद्काला एखाद्या जहाजाचा देखावा पाहिजे असेल तेव्हां तो कापडाचें रंगविलेलें जहाज न बांधता नटवर्गासह समुद्रांतून प्रवास करणार्‍या खरोखरीच्या जहाजावर जाऊन तेथील देखावा उध्दृत करतो. वस्तुस्थितिदर्शनाची वाढती इच्छा ही चित्र-द्दश्यें पुरवितात.

कधी कधी चित्रोत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी किंवा छतावरून उलटे चालणें, आगगाडीखाली चिरडणें असे असंभाव्य देखावे दाखविण्यासाठी कांही युक्त्या लढवाव्या लागतात. पण त्या इतक्या बेमालूम रीतीनें लढविल्या जातात की नाटकगृहांत चलत्-चित्रें बघणार्‍या पैकी फारच थोड्यांनां त्या लबाड्या कळून येतात. याकरितां चित्र-पटलोत्पादक हुशार असावा लागतो. थोडक्या श्रमांत व खर्चांत ज्यास्त परिणामकारक द्दश्यें अनेक युकत्या लढवून त्याला तयार करावी लागतात. पुढें या चित्रांच्या कारखानदारांनां असें आढळून आलें कीं, बाह्य देशांतील देखावे त्यांच्या आश्रयदात्यांना जास्त आकर्षक होतात. त्यामुळें प्रवासांची चित्रें अस्तित्वांत आली. ही चित्रें मनोरंजक असतात एवढेंच नव्हें तर बोधप्रदहि असतात.

केवळ सिनेमाकरितां बांधलेली गृहें अस्तित्वांत आल्यापासून नाटकांच्या चित्रांनां मागणी वाढूं लागली. त्यामुळें चलत्-चित्रांच्या कारखानदारांनां नाटकें करण्यासाठी सोईस्कर जागा मिळविणें, नाटकें लिहण्यासाठी लेखक ठेवणें, फिरत्या कँमेरापुढें नाट्यसंविधानक वठविण्यासाठी नटवर्ग आणि रंगभूमिचालक नेमणें, आणि देखावें रंगवण्यासाठी चित्रकार ठेवणें भाग पडलें. सारांश उत्तम नाटकगृहाप्रमाणेंच चलत्-चित्र-गृह तयार करावें लागतें. तेथील व्यवस्थेप्रमाणेंच इकडेहि सर्व व्यवस्था करावी लागते. फक्त प्रेक्षकांनां बसण्याची सोय मात्र उत्पादन जागी (स्टुडिओमध्यें) करावी लागत नाही. व तेथें खरें नाटक कॅमेरापुढें एकदांच करावें लागतें.

एकामागून एक येणार्‍या प्रवेशांतून गुंतविलेले कथानक सांगणारें नाट्यचित्रपट, खर्‍या रंगभूमीवरील नाटकाप्रमाणेंच सर्व बाबतीत असतात असें म्हणण्यास हरकत नाही. फरक एवढाच कीं, ही मुग्ध नाट्यें असतात. या नाट्यांतील प्रंसग खर्‍या नाटकाप्रमाणेंत एखाद्या हस्तलिखीतानुसार किंवा गोष्टविरून बसविलेले असतात. त्याला द्दश्य-नाट्य वस्तु (सेनेरिओ) म्हणतात. नटवर्ग साध्या नाटकांतल्याप्रमाणें कँमेरापुढे खेळ करून दाखवितात. या ठिकाणी कँमेरा प्रेक्षकाचें काम करितो. नाटकांतील अंतर्द्दश्य कारखानदाराच्या स्टुडिओमध्यें घेण्यांत येऊन, बहिदृश्यें खुद्द खेळांत सांगितलेल्या जागी, मग ती जागा आर्टिक महासागराच्या दक्षिणेला असो की अंटार्टिका महासागराच्या उत्तरेला असो, जेथें प्रसंग घडला असेल त्या ठिकाणी घेतात.

खेळांतील अभिनय, प्रवेश इत्यादि सर्व कामें चित्रोत्पादकाला पहावी लागतात. नाटकें बसविणें व स्टुडिओची व्यवस्था ठेवणें यांतील मुख्य भाग त्याच्याकडे असतो. लेखकानें दिलेला दृश्य- नाट्यप्रबंध हाती पडल्यापासून तों विपर्यस्त पट व्यक्तीकरण (डेव्हलपिंग) खात्याकडे जाईं पावेतों तो नटांची कामें आणि देखावें यांजवर सारखा देखरेख करीत असतो. लेखकानें द्दश्य-नाट्यप्रबंध हाती दिल्यावर त्यांत तो जरूर ती छाटाछाट करतो किंवा अधिक भर घालतो. त्यांतील देखावे सविस्तर नमूद करून ठेवतो आणि खेळाला लागणारें साहित्या कोणतें तें पहातो. स्टुडिओबाहेरील देखावे असले तर त्यांनां योग्य जागा कोणती तें ठरवितो, व त्याच वेळी नटवग निवडून त्यांनां तालमीला बोलवितो. जर तालीम स्टुडिओमध्यें घेण्यासारखी असेल तर तेथें रंगभूमि तयार करून पात्रे ठरीव पोषकांत तेथें येतील अशी व्यवस्था ठेवितो. तेथेंच कँमेरा लावून ठेवलेला असतो. उद्देश हा कीं, ऑपरेटरला प्रवेशांची व तालमीत होणा-या गोष्टीची आगोदर माहिती व्हावी. प्रवेश वठविण्यासाठी किंवा पटांच्या नियमित कालकक्षेंत येण्यासाठी जरूर तो कमी अधिकपणा उत्पादक अनेकवेळां करीत असतो व शेवटीं त्याची संमति मिळाल्यावर कँमेरावरील मनुष्य आपलें काम सुरू करतो. नंतर लगेंच “ काम सुरू करा ” अशी आज्त्रा होते. “तूं कॅमेराच्या बाहेर आहेस.”, “केली! लवकर लवकर चालूं दे, ” ” ए जनान्यांतील पेषा करणारे !   आनंदी दीस;”  “ इतके नको,” “डोळे फिरव ” “ जास्त गंभीर हो.” इत्यादि अनेक सूचना उत्पादक देत असतो. तालमीच्या वेळी पात्रे प्रसंगाला अनुरूप अशी भाषणें नेमून दिलेली किंवा स्वत:चीच करीत असतात. भाषणें पडद्यावर वठत नाहीत पण त्यायोगानें चेहर्‍याला हवीतशीं वळणें मिळून चित्र जास्त हुबेहुब तयार होतें.

फोटो घेताना जर कांही चूक झाली तर तो चित्रपट रद्द करण्यांत येतो व पुन्हां खेळ सुरू करितात. बाहेरचे देखावे घेण्यापूर्वी स्टुडिओमध्यें त्यांची तालीम घेतात. विशेषत: रस्त्यांतील प्रवेशाच्या बाबतींत तरी असें करण्यांत येतें. कारण त्या ठिकाणी जास्त वेळ प्रवेश केल्यास रस्त्यांतील तमासगिरांकडून अडथळा येण्याचा संभव असतो.

बहुतकरून पात्रें नेहमीच्या नाटकांतीलच घेतात. एका वेळी एक दिवसच कांही पात्रें चाकरीस ठेवण्याची वहिवाट आहे. कारण त्यानां इतर स्टुडियोकडून मागणी असतें. एकाद्या दिवशी उत्पादकाला पाचशें नट लागतील तर दुसर्‍या दिवशी पंचवीस सुध्दां लागणार नाहीत; कारण त्यांची संख्या त्यावेळी चाललेल्या खेळाच्या जातीवर अवलंबून असते. कंपनीजवळ कायमचे कांही पगारी नट असतातच. नट व नटी निवडणें हें कांही सोपें नाही. कारण ते मुग्ध चित्रविष्करणांत पटाईत असले पाहिजेत. एवढेंच नव्हे तर त्यांनी आपलें पात्र उत्तम तर्‍हेनें रंगविलें पाहिजे. कॅमेरा हा एक निष्ठुर टीकाकार असून सर्व दोष व नटांचे हावभाव मोठ्या प्रमाणांत पुढें मांडतो. जे दोष रंगभूमीवर प्रेक्षकांनां दिसणार नाहींत ते पडद्यावर ठळकपणें दिसून येतात. एखादे पात्र चरबीच्या रंगानें सफाईदार करणें अशक्य होतें. कारण पडद्यावर त्याची प्रतिमा मोठी झाली असतां फार हास्यास्पद दिसूं लागते. याच कारणामुळें म्हातार्‍याला तरण्याची किंवा तरूणाला म्हातार्‍याची भूमिका घेणें अशक्य होतें. ज्या कंपनीत निरूपमचंद्र गूह हा बंगाली गृहस्थ दुय्यम उत्पादकाचें काम करीत आहे (१९१६), ती युनिव्हर्सल कंपनी अमेरिकन असून तीत निरनिराळे २६ उत्पादक काम करीत आहेत. कंपनी प्रत्येकाला नाटकाची लेखी प्रत व पैसा पुरविते. हे उत्पादक चित्रपट तयार करतात. अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांत हीच कंपनी सर्वांत मोठी असून तीत रोज वीस हजार माणसें काम करितात. तिचे स्टुडिओ व कारखाना चार हजार एकर जागेवर असून “ युनिर्व्ह्सल सिटी ” असें त्याचे नांव आहे. रानटी प्राण्यांच्या शिकारीची व आफ्रिकेंतील चित्रें तयार करण्यासाठी म्हणून कंपनीनें रानटी प्राण्यांचा शिकारखाना बाळगला आहे.

स्टुडिओ हें उत्पादकाचें खातें असून कारखाना फोटोग्राफरचें खातें मानला जातो. कारखान्यावरील सुपरिटेंडेंट म्हणजे फोटोग्राफर हा स्वत: फोटोचें काम फारसें करीत नाही. चित्रपट तयार करण्याकरितां उपयोगी अशी ती त्याच्या कारखान्यांत पोटखाती केली असतात, ती येणेप्रमाणें. कच्चे, ज्यावर प्रतिमा घ्यावयाच्या असतात, ते पट खरेदी करून त्याचें तुकडे करून जास्ती डब्यांतून भरतात. दाहप्रतिरोधक लोखंडी कोठीत त्यांची जरूर लागेपर्यंत ते ठेवून देतात. तेथून एकएक पट भोकें पाडण्याच्या खोलीत नेऊन त्याच्या कडांना भोकें पाडण्यांत येतात. नंतर हा विपर्यस्त पट कँमेरा चालण्याच्या मनुष्याकडे जातो. हा मनुष्य फोटोग्राफरच्या हाताखालचा असून उत्पादकाकडे काम करण्यास त्याला ठेविलेलें असतें. त्यानें त्यावर प्रतिमा घेतल्यानंतर त्यांचा विकास करण्याकरितां ठराविक जागेकडे तो पोंहचता करतात. याच्यापुढें चित्रांनां नांवें कोणती द्यावयाची तें ठरवून त्याप्रमाणें ती छापून घेतात. छापण्याच्या खोलीत विपर्यस्त पटावरून वास्तविक (पॉझिटिव्ह) पट छापण्यांत येतो. सर्व छापून झाल्यानंतर विपर्यस्त पट साठयाच्या खोलीत कायमचा जाऊन बसतो. छापलेला व्यक्तीकरण (डेव्हलपिंग) करण्याच्या खोलींत नेतात. तेथून धुण्याच्या खोलीत कायमचा जाऊन बसतो. छापलेला वास्तविक पट व्यक्तीकरण (डेव्हलपिंग) करण्याच्या खोलीत नेतात. तेथून धुण्याच्या खोलीत, तेथून वाळवण्याच्या खोलीत, असें एकामागून एक नेण्यांत येतें. वाळवल्यानंतर त्याची तपासणी होऊऩ चिकटविण्याच्या खोलीत त्याला नेतात. तेथून पुन्हां दाहप्रतिरोधक अशा सांठयाच्या खोलीत त्याला परगांवी पाठविण्याची वेळ येईपावेतों ठेवून देतात. येणेप्रमाणें फोटो ग्राफरच्या कारखान्यांतील खात्यांचें वर्णन झालें. त्यांची थोडक्यांत याद म्हणजे, पट साठवणें. भोकें पाडणें, नांवें तयार करणें, विकास करणें, छापणें, धुणें, आणि वळविणें, तपासणें आणि बोटीवर चढविणें. फोटोग्राफरचें एकंदर काम म्हणजे उत्पादकानें प्रवेश दाखविल्यानंतर व त्यानां नांवे दिल्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट तयार करणें हें होय. या कामाकरितां फोटोग्राफरला जेव्हां उत्पादक प्रवेश करून दाखवितो त्यावेळी आपला दुय्यम जो कँमेरावरील मनुष्य त्याला तेथे हजर ठेवावें लागतें. व या कँमेरामनुष्यामार्फत विपर्यस्त पटावर प्रवेश उत्तम रीतीनें घेण्याची सर्व जबाबदारी फोटोग्राफरकडे येते.

जर कँमेरा मनुष्याच्या चुकीमुळे पट खराब झाला, तर ही चुकी फोटोग्राफखात्याची असल्यामुळें फोटोग्राफरकडे त्याच्या नालायक दुय्यमाबद्दल दोष साहजिकच येतो. फोटो घेण्यापासून तो बोटीवर पट चढवीपर्यंतच्या सर्व क्रिया फोटो ग्राफखात्याच्या म्हणून समजतात. उत्पादकाला पाहिजे असेल त्यावेळी फोटोग्राफर आपला दुय्यम, कॅमेरा, विपर्यस्त पट, वगैरे साहित्य देऊन त्याकडे धाडतो, व उत्पादकाच्या परीक्षणार्थ छापील पटांची प्रुफें त्याच्याकडे पाठवितो. दुरूस्त प्रुफावरून शेवटचा चित्रपट तयार करण्यांत येऊन, ग्राहकाकडे मागणी येईल त्याप्रमाणें बोटीवर चढविण्यांत येतो.

चलत् चित्रांच्या धंद्याचें क्षेत्र अति व्यापक आहे. त्याच्या शैक्षणीक महत्वामुळें तर तो कधीहि जुना होत नाही. मनुष्याच्या मेंदूतून निघालेली इतकी अमर्याद शैक्षणिक व मनाचें रूपांतर करण्याची शक्ती दुसरी कोणतीहि नाही असें म्हटल्यास चालेल.

पाश्चात्य देशांत शाळांतून याची मदत शिक्षणाच्या कामी घेतली जाते. तिकडे कांही शाळांतून आठवड्यांतून एक दिवस त्या मागील आठवड्यांत शिकविलेल्या धड्यांची सिनेमा दाखवून प्रत्यक्ष समजावणी करण्यांत येते. निरनिराळ्या शाळांतील वर्ग नेहेमीप्रमाणें वर्गांत भूगोल व शास्त्रें वगैरे शिकण्याकरितां न बसतां, थेट सिनेमा थिएटरकडे जातात. व त्यांच्याकरितां मुद्दाम तयार ठेविलेला चित्रपट पाहिल्यानंतर परत शाळेंत जातात.

पिट्सबर्ग येथील कार्नेगी इन्सिटटयूट ऑफ टेन्कॉलजी मध्यें पोलाद तयार करण्याचा धंदा चित्रपटमालिकांच्या द्वारे शिकविण्यांत येतो. या विशिष्ट चित्रपटाचें नांव “ लोखंडाच्या दगडापासून ते बनावट पोलादापर्यंत    ” असें आहे. मिनेसोटाच्या मेसाबा जिल्ह्यांतील “ हल-रस्ट ” नांवाची जगांतील सर्वांत मोठी लोखंडाची खाण या पटांत दृष्टीस पडते; तसेंच वाफेच्या राक्षसी फावड्यांनी खाण कशी खणली जात आहे, कुजलेल्या लाकडाचें सर्पण कसें वाहून नेलें जात आहे इत्यादि या धंद्यांतील प्रकार सविस्तर दाखविले जातात. वाङ्मयाला सुध्दां ही पडद्यावरील हालचाल करणारीं चित्रे आपल्या प्रभावांत मागें सारतील. अमेरिकन व यूरोपियन पाठशाला व विश्र्वविद्यालयें यांतील शैक्षणिक क्रमांत या चित्रांचा प्रवेश झालेला आहे. ती केवळ निर्जीव चित्रें असली तरी त्यांचा परिणाम खराच असतो. लोकांनां चित्रें आवडतात आणि गोष्टी आवडतात; तेव्हां चलत्-चित्रनाटक सचित्र गोष्टीचें असल्यानें तें लोकप्रिय होण्याला दुप्पट कारण झालें आहे. मानवेतिहास रचणाया मानवी शोधांमध्यें ही कल्पना अगदी नवी आहे.

लहानमोठ्या माणसांनां इतिहास व पौराणिक गोष्टी नुसत्या वाचून न दाखविंतां त्यांच्या समोर त्या करून दाखविल्या असतां त्यांच्या ध्यानांत त्य़ा चांगल्या रहातात. ऐतिहासिक दृश्यें घडलेल्या जागीं घेतां येतात अशिक्षित सामान्य लोकांनांसुध्दां ही सचित्र कथा फार मनोरंजक होतें.

हिंदुस्थानांतील सिनेमा कंपन्या :- पाश्चात्य चलत्- चित्रें बघून तशी स्वदेशी चित्रें बघून तयार करण्याची महत्वाकांक्षा धरणा-या हिंदी गृहस्थांत रा. फाळके यांचा बराच वर नंबर लागेल. त्यांनी मोठ्या परिश्रमानें विलायतेंतून ही विद्या शिकून येऊन नाशकास ‘ हिंदुस्थान फिल्म कंपनी’ काढली. या कंपनीचे पौराणिक हरिशचंद्र, लंकादहन, कृष्णजन्म वगैरे पट लोकप्रिय होऊन या कंपनीशी इतरांची स्पर्धा सुरू झाली; व महाराष्ट्र फिल्म कंपनी, पाटणकर फ्रेंड्स कंपनी, भारत फिल्म कंपनी यांसारख्या पौराणिक व ऐतिहासिक पट तयार करणा-या देशी कंपन्या निघाल्या. कोल्हापुरच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीचे सिंहगड, कल्याणखजीना हे पट शिवकालीन महाराष्ट्र डोळ्यांपुढें उभा करतात. इंग्रजी न जाणणाया प्रेक्षकांनां विशेषत: बायकामुलांना देशी पट उपयुक्त होतात व आवडतातहि. पण कलेच्या दृष्टीनें पहातां फोटोग्राफी व अभियन या बाबतींत देशी पट अगदी कमी दर्जाचे ठरतील. चलत्-चित्रदर्शनांत अभिनयावरूनच कथासंगति लावावयाची असल्यानें अभिनय हुबेहुब व अकृत्रिम पाहिजे. नाटकांतील नटांनां ज्याप्रमाणें अभिनयाचे धडे द्यावे लागतात, त्याचप्रमाणें सिनेमा-नटांनांहि अभिनयाचे उच्च शिक्षण दिलें पाहिजे. त्याचप्रमाणें कथाप्रंसगांतील स्थळें जितकी नैसर्गिक व रम्य घेता येतील तितकीं घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि विशेषत: ऐतिहासिक पटांत तत्कालीन पेहेराव व स्थळे अवश्य दाखविल पाहिजेत. सारांश हिंदी (देशी) पट अद्याप बाल्यावस्थेंतच आहेत. मादन थिएटर्स कंपनी, कोहिनूर कंपनी यांसारख्या हिंदुस्थानांतील सिनेमा कंपन्या पूर्ण देशी नाहीत. तथापि त्यांचे प्रयत्न पाश्चात्य धर्तीवर आहेत यामुळें त्यांचे पट सरस असतात.

हिदुस्थानांत सुध्दां मोठ्या काळजीपूर्वक व हुषारीनें असले चित्रपट तयार करून परकीय देशांत धाडण्याची व्यवस्था केली तर तो एक मोठा किफायतशीर धंदा होऊन शेंकडो गरीब लोकांना उपजीविकेचें साधन होईल व त्याच प्रमाणें लोकांना सुशिक्षित करण्यासहि बरीच मदत होईल. पाश्चात्य देशांत बाहेरील देशांची विशेषत: पौरस्त्य देशांची चित्रें फार हवी असतात. अमेरिकेंत अशी चित्रें करण्याला जो खर्च येतो त्याच्या ½ खर्चात ती येथें तयार होऊं शकतील. असें तज्ज्त्रांचें मत आहे.

ज्या कांही थोड्या कंपन्या हिदुस्थानांत आहेत, त्यांनी आपले पट युरोपियन मार्केटांत पाठविल्यास त्यांचें चांगलें चालेल. तेव्हां आपल्याकडील चित्रपटकारांनां आपला धंदा चांगला स्थिर करण्यास मोठा वाव आहे. थोडेसें धाडस मात्र पाहिजे. त्यांनी हें काम केलें नाही तर यूरोपियन कंपन्या आपल्या स्टुडियोच्या शाखा हिंदुस्थानांत काढतील यांत संशय नाही.  सबंध संयुक्त संस्थानांत दर आठवड्यास सुमारे दोनशे पौरस्त्य चित्रपट (द्दश्यें) तयार होतात. एकट्या लॉस्एंजल्स शहरांत दर आठवड्यास बहुतेक हिंदुस्थानविषयक दहा नाटकें तयार करितात. ही द्दश्यें ज्यांच्या सहाय्यानें घेण्यांत येतात ते पौर्वात्य चालीरितीविषयी अगदीं अनभिज्त्र असतात.

चलत्-चित्रें तयार करणें व विकणें हें काम एखादें वर्तमानपत्र किंवा मासिक छापण्याविकण्यासारखेंच आहे. सिनेमा नाटकगृहांतील खेळांचा कार्यक्रम बहुधा दर आठवड्यानें बदलत असतो. तेव्हां चित्रपट भाड्यानें देणारा आठवड्याच्या बोलीनें तो थिएटरला भाड्यानें देतो व कारखानदाराकडूनहि तशाच बोलीनें आणतो. ज्याप्रमाणें व्यापारी मनुष्याला रोज सकाळी वर्तमानपत्र मिळतें. त्याचप्रमाणें रोज नवीन चलत्-चित्रें दाखविणाया नाटकगृहाला  गुमास्त्याकडून रोज नवीन नवीन पट मिळतो. व गुमास्त्यालाहि कारखान्याकडून रोजच्यारोज पट मिळत जातात. यांचा हिशोब मात्र आठवड्यावर असतो. [मॉडर्न रिव्हू, अंक आक्टोबर १९१६ मधील निरूपम चंद्रगूह यांच्या लेखाच्या व इतर माहितीच्या आधारें].

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .