विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चरी - पंजाबच्या कांग्रा जिल्ह्यातील एक खेडें आहे. येथील लोकसंख्या १९०१ त २५९७ होती. येथें सन १८५४ त एका जुन्या पडक्या देवळांत शिलालेख सांपडला होता. त्याच्या एका बाजूस बौध्द धर्माची तत्वें दुसर्या बाजूस वराही देवीची मूर्ती खोदलेली होती. ही शिला गमावली आहे.