विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चंपा - मालिनी नगरीस चंप राजानें ठेविलेलें नांव. ही अंग देशाची राजधानी होय ( भार. वन. अ. ११३ ). हींत पांडवांच्या वेळेस कर्ण रहात होता ( भार. शांति. अ. ५ ). हल्लीं या जागीं भागलपूर आहे असें म्हणतात. येथें बौद्धांचीं लेंणीं आहेत असें सांगतात. येथें ह्युएनत्संग गेला होता. हें ठिकाण मोंगीरपासून ५० मैलांवर आहे. चंपावती, चंपमालिनी, चंपापुरी अशींहि दुसरीं नांवें आहेत