प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चन्नबसव -लिंगाईत धर्माचा संस्थापक जो प्रख्यात बसव त्याचा हा भाचा होता. बसवाची बहीण नागलंबिका तिचा हा पुत्र. बसवानें काढलेल्या वीरशैव धर्माची यानें पूर्णपणें स्थापना केली. या चन्नबसवाविषयीं एक पुराण आहे त्याचा गोषवारा पुढें दिला आहे.

च न्न ब स व पु रा ण-हें पुराण कानडी भाषेंत ‘वर्धिक षट्पदी’ ह्या वृत्तांत विरूपाक्षी कवीनें शालिवाहन शक १५०७ मध्यें रचले. ह्या वृत्ताचे सहा चरण असून त्यांपैकीं पहिला, दुसरा, चौथा व पांचवा चरण वीस वीस मात्रांचा असतो. ह्या पुराणाचा मुख्य विषय म्हणजे चन्नबसव यानें सिद्धरामास दिलेल्या लिंगायत धर्माच्या दिक्षेचें कथानक होय.

पहिल्या प्रास्ताविक अध्यायांत शिव, वृषभ, वीरभद्र, बसव, चन्नबसव, सिद्धरामेश, महादेवी अक्का, शंकरदेव, इत्यादि देवतांस व लिंगायतपंथी विभूतींस नमन केलेलें असून त्यानंतर मलिमल्लेश साधूनें परधर्मीय म्लेच्छांसह मक्केस यात्रा करुन तुरुकान्य देशांत वृष्टी पाडली ह्यासंबंधी माहिती असून विद्यानगरींतील सिद्धवीरेश साधूंची माहिती दिली आहे. त्यानंतर लिंगायत लोकांच्या प्रार्थनेवरून विरूपाक्ष कवीनें हें पुराण कशा रीतीनें रचलें ह्याची माहिती आहे.

प्रथम विरूपाक्षानें सरसकवि, बाण, मयूर, भवभूति, सद्वर, कालिदास, मलुहनस मलेयराज, अतिबिरिदंक कवि, राघवन, हंपेयहरेश्वर, हलायुध, उद्धट, गुरूपंडितेश, पाल्कुरिकेअराध्य, भीमरस, मोग्गेय, मायिदेव, चामरस, शंकर केरयपद्मरस इत्यादि शैव कवींनां प्रथमारंभीं नमन केलें असून नंतर सर्व काव्यांत शिवकाव्याची महती किती आहे हें सांगून प्रस्तुत चन्नबसव पुराणांत नवरसांनीं किती परिपूर्णता आली आहे ह्याचें वर्णन आहे. ह्या पुराणांचा सारांश थोडक्यांत सांगावयाचा म्हणजे ( १ ) कैलासवर्णन, ( २ ) नारददर्शन, ( ३ ) चन्नबसव जन्म. ( ४ ) जन्मोत्सव, ( ५ ) बाललीला. ( ६ ) राजावाडा, ( ७ ) कल्याण राजधानी व भोंवतालच्या प्रदेशाचें वर्णन, ( ८ ) सिद्धरामेश्वरास चन्नबसवानें केलेला शिवतत्वोपदेश, ( ९ ) शिवाची ताण्डवलीला, ( १० ) सोमवर्णन, ( ११ ) वृषभ, ( १२ ) महालिंग, ( १३ ) अर्धनारी नटेश्वर, ( १४ ) ब्रह्मदेवाचें शीर्षच्छेदन, ( १५ ) भिक्षालीला, ( १६ ) दक्षिणामूर्ती ( १७ ) विष्णुस्वरूपपरिग्रह, ( १८ ) नीलकण्ठ, ( १९ ) भालचंद्र ( २० ) जालंधरनाश, ( २१ ) सुदर्शनदान, ( २२ ) गजासुरनाश, ( २३ ) दक्षयज्त्र, ( २४ ) विष्णुनाशक, ( २५ ) कामदहन, ( २६ ) शिवपार्वती परिणय, ( २७ ) कुमारजन्म. ( २८ ) तारकासुरवध. ( २८ ) त्रिपुरदहन, ( ३० ) आनंदसमय, ( ३१ ) गंगावतरण, ( ३२ ) अंधकासुर वध, ( ३३ ) यमदाह, ( ४४ ) अर्जुनास पाशुपतास्त्रदान, ( ३५ ) आनंदस्वरूप, ( ३६ ) चंद्रसूर्याची शर्यंत, ( ३७ ) शिवोपसक साधूंच्या कथा, ( ३८ ) दीक्षाविधि, ( ३९ ) षट्स्थानें, ( ४० ) भविष्यकथन, हीं ह्यांतील मुख्य प्रकरणें होत.

प्रथम ब्रह्माण्डगोलांतील सप्तद्वीपांतील जंबुद्वीपाभोवतीं असलेल्या समुद्राचें वर्णन असून नंतर जंबुद्वीप व कैलासपर्वत यांचें वर्णन आहे. या पर्वतावर महेश्वरापुढें सर्व देव, गंधर्व, अप्सरा, महनद्या, अनेक श्रृंगीभृंगी इत्यादि भूतगणांसमवेत जमले होते. त्या वेळीं ब्रह्मविष्णू इत्यादिकांनीं महेश्वरास स्तुतींनीं संतुष्ट केलें, इतक्यांत पार्वतीनें महेश्वरास “पृथ्वीवर शिवतत्वकथनाकरितां चित्कला प्रगट करीन” अशा पूर्वीं दिलेल्या वचनाची आठवण केली. त्यानंतर शंकरांनीं प्रणवध्यान करून भरतखंडांत शिवोपासना किती कमी झाली आहे आणि जैन, बौद्ध, चार्वाक इत्यादि दुष्ट मतांचा किती फैलाव झाला आहे इत्यादि नारद महषींनीं सांगितलेली माहिती षण्मुखास सांगून पृथ्वीवर भरतखंडांत जंगमाचें स्वरूप स्वत:ईश्वरानेंच धारण करून शिवोपासनेचा प्रसार करणें किती जरूरीचें झालें आहे त्याबद्दल पार्वतीस सांगितलें. त्यावर पार्वतीनें ईश्वरास पृथ्वीभार हलका करण्याची प्रार्थना केली व नंदीश्वरानें ह्या म्हणण्यास पुष्टी दिली. यावर महेश्वरानें नंदीस भारतवर्षांत मनुष्यरूपानें अवतार घेण्यास सांगून वीरशैवोपासनेचा प्रसार करण्याची आज्त्रा केली व स्वत:च्या चित्कलेकरवी षट्स्थानाची उपासना प्रसृत करण्याचें अभिवचन दिलें.

त्यानंतर ‘मादिराज’ ब्राह्मणाच्या ‘मदांबी’ स्त्रीच्या पोटीं पार्वतीचा अंश म्हणून नागलंबिका जन्मली व नंदी ‘बसव’ रूपानें तिचा बंधू झाला व तोच बिज्जल राजाचा मुख्य प्रधान झाला. ह्यानंतर महेश्वरांनीं षण्मुखास नागलंबिकेच्या पोटीं जन्म घेण्याची आज्त्रा केली.

च न्न ब स व ज न्म - नागलंबिकेनें गुरूची पूजा केली व प्रसाद भक्षण करून शिवाचें ध्यान करीत ती बिछान्यावर पडली. इतक्यांत महेश्वर तिजपुढें आविर्भूत होऊन त्यांनीं तिच्या उदरांतून वीरशैव लिंगायत धर्माचा प्रस्थापक जन्मणार आहे असें सागितलें. प्रात:कालीं नागलंबिकेनें रात्रीं घडलेला प्रकार बसव प्रधान व इतर लिंगायत लोकांस जाहीर केला. नागलंबिकेची गरोदर स्थिति कळतांच लोक तिच्याबद्दल कुजबुज करूं लागले व राजास देखील ही गोष्ट कर्णोपकर्णीं कळली व बसव प्रधान लबाड मनुष्य आहे असें ठरवून नागलंबिकेस समक्षच भेटण्याचा विचार केला. इतक्यांत पोटांतील गर्भानें राजास आंतून प्रत्युत्तर देऊन स्वत:च्या दिव्यत्वाबद्दल खात्री पटवली. तरी राजाचें समाधान होईना. म्हणून नागलंबिकेनें आपलें उदर विदारण करून राजापुढें दाखविलें. तो आंतून एक दिव्य तेज:पुंज तापस वेषधारी कुमार बाहेर आला. मग मात्र राजाची खरी खात्री पटून त्या दिव्य बालकाची राजानें स्तुती केली. त्या दिव्य बालकाच्या जन्मोत्सवानिमित्त सर्व नगर शृंगारलें गेलें आणि राजानें त्यास पालखींत घालून मोठ्या समारंभानें त्याची मिरवणूक काढली. नगरवासी स्त्रियांनीं बालकास आशीर्वाद दिले. ह्यानंतर बसवानें जंगमपूजा केली व लिंगायत लोकांबरोबर भोजन वगैरे उरकलें. रात्रीं दिव्य बालकास जवळ घेऊन नागलंबिका झोपी गेली असतां महेश्वर व पार्वती यांनीं बालकाचें जातकर्म करून ‘चन्नबसव’ असें त्याचें नामाभिधान ठेवलें व कांहीं वेळ बालकाशीं खेळून व त्याच्या जवळ सुवर्ण कलश व सोनेरी पाळणा ठेवून नाहीसे झाले. नागलंबिकेनें वरील प्रकार सत्य समजून बसव प्रधानास सांगितला. सर्व शास्त्रें आपोआप चन्नबसवास प्राप्त झालीं व त्याचें दिव्य सामर्थ्य पाहून बसव प्रधानानें त्याजकरितां एक राजवाडा बांधला व त्यांत चन्नबसव यास ठेवलें. चन्नबसवानें शिवतत्व जाणणारे सहा द्वाररक्षक सहा द्वारावर ठेवून नित्य हजारो जंगमांचा यथास्थितपणें आदरसत्कार करीत राहिला.

प्रा ण लिं गो पा स ना.- एका प्रांत:काळीं लिंगायत लोकांसह बसव प्रधान चन्नबसवाकडे आला व बसवाचा इष्टलिंगउपासनेचा बाह्य प्रकार पाहून प्राणलिंगोपासना कशी करावी ह्याबद्दल विवेचन करून लौकरच जंगमांस निराळीं घरें बांधून देण्याविषयीं व अल्लमा प्रभूच्या दर्शनविषयीं आश्वासन दिलें. ज्यावेळीं ह्या नवीन बांधलेल्या मठांत रहाण्यास जंगमांस आज्त्रा झाली, त्यावेळीं कांहींनीं ही गोष्ट नाकारली. इतक्यांत चन्नबसवानें त्या मठास आग लावली व त्यामुळें चोहोंकडे एकच गोंधळ उडाला. ह्यांपैकीं तिघेजण मात्र लिंगध्यान करीत धैर्य धरून त्याच ठिकाणीं राहिले. चन्नबसवानें आपल्या प्रभावानें सर्व आग विझविली.

एकदां एका दिव्य जंगमानें बसव प्रधानाचा प्राण आकर्षण केला आणि राजदूतांनीं ह्या बसवाच्या चमत्कारिक मृत्यूबद्दल राजास कळविल्यावर त्यास अतिशय वाईट वाटून त्यानें चन्नबसवास खरी हकीकत विचारली. चन्नबसवानें सांगितल्याप्रमाणें तो जंगम बसवाजवळ आल्याबरोबर तो सजीव झाला व राजा आनंदानें परत गेला. चन्नबसवानें बसावास लिंगास प्राण समर्पण करणार्‍या कांहीं साधूंच्या कथा सांगितल्या:-

लिंगान्न गामक याच्या गळ्यांत बांधलेलें लिंग हरवलें, त्याबरोबर त्याचा प्राण गेला व नातलग रडूं लागले, परंतु तें लिंग पुन:जेव्हां त्याच्या गळ्यांत बांधलें त्यावेळीं तो सजीव झाला. सत्यान्न मारण्ण राजा व राणी, घट्टीवाल देव इत्यादिकांच्या देखील अशाच गोष्टी आहेत.

चन्नबसव हा शिवाचा अवतार असून बसव हा साक्षात् वृषभ होय व बिज्जल राजा हा द्वाररक्षक असून कल्याण हें प्रतिकैलासच होतें, व त्यांतील रहिवासी हे शिवगण होते. ह्या अवतारी विभूतीस पहाण्याकरितां लांबलांबून शिवोपासक येत आणि सर्व नगरांत महोत्सव चालू असत. ही भरभराट सहन न होऊन मंचन्न नामक एका दुष्ट मनुष्यानें चन्न बसवाच्या वाढत चाललेल्या मोठेपणाबद्दल राजाचे कान भरविले. ह्यावर राजानें चन्नबसवास बोलावून घेऊन जंगमांनां खजिन्यांतील पैसे देणें, त्याचप्रमाणें जंगमांमध्यें चाललेले अनाचर इत्यादि गोष्टीसंबंधीं त्यास विचारलें. ह्यावर चन्नबसवानें राजास स्वधर्मपालनाचा उपदेश विविध तर्‍हांनीं करून बसव. अमात्याबद्दल राजाच्या मनांत उत्पन्न झालेला किंतु काढून टाकला. इतक्यांत सायंकाळ झाला व नगरांत फिरण्याची राजास इच्छा झाली व त्यानें शहराच्या निरनिराळ्या भागांत चाललेले प्रकार पाहिले.

सृ ष्ट्यु त्प त्ति ( अ. ११-१५ ).- कल्याण येथें बसव व चन्नबसव यांस भेटण्याकरितां सिद्धराम यास बरोबर घेऊन प्रभु सोलापुराहून निघाला. वाटेंतील प्रदेशाची शोभा पाहून वाटसरूंचीं मनें प्रसन्न झालीं. कल्याण नगराच्या बाहेरील उपवनाची शोभा पाहून वरील दोघे प्रवासी राजवाड्याकडे फिरले. यानंतर शांतीचें परमस्थान अशा बसव प्रधानांच्या राजवाड्यासमीप येतांच बसवानें आपल्या चाकराकरवीं ह्या वाटसरूंनां आंत बोलाविलें, परंतु हा भाडोत्री आदरसत्कार पाहून प्रभूनें आमंत्रण नाकारिलें. इतक्यांत चन्नबसवानें वरील प्रकाराचे परिणाम अत्यंत अनिष्ट होणार हें जाणून वरील पूज्य अतिथींची अर्ध्यपाद्यादिकांनीं पूजा केली.

प्रभू सिद्धरामासह चन्नबसवाच्या वाड्यांतील बाहेरच्या एका दिवाणखान्यांतच बसले, कारण शिवतत्वाच्या षट्स्थानांची दीक्षा न घेतलेल्यांस आंत घ्यावयाचें, नाहीं असा चन्नबसवाचा प्रघात होता.

सिद्धरामानें शरीरावर इष्टलिंग धारण केलें नव्हतें, कारण स्वत:प्राणलिंगी मनुष्यास इष्टलिंग धारण करण्याची जरूरी नाहीं अशी त्याची समजूत होती. परंतु हा प्रघात शिवोपासकाचा असून वीरशैवोपासनेचा प्रकार अगदींच निराळा आहे ही गोष्ट चन्नबसवानें सिद्धरामास समजाऊन दिली.

ह्या ठिकाणीं सृष्ट्युत्पत्तीचें वर्णन आलें आहे. त्यांत वेदांत मतातील ब्रह्माऐवजी “परशिव” तत्व कल्पिलें असून त्याजपासून मायाशक्ति, तीपासून महालिंग, महालिंगापासून पराशक्ति, पराशक्तीपासून सदाशिव व आदिशक्ति, त्याजपासून ईश्वर व इच्छाशक्तिमहेश्वर व संज्त्रानशक्ति ह्या महेश्वरानेंच विराट् स्वरूप धारण करून स्वर्ग, पाताल इत्यादि लोक व चराचर भूतें जन्मलीं, असा थोडा फरक आहे. ब्रह्मा हा त्याच्या उजव्या बाहूपासून व विष्णू हा त्याच्या डाव्या बाहूपासून उद्भवल्याचें वर्णन आहे. कल्पांतीं महेश्वर प्रलयनृत्य करून जगताचा संहार करतो.

ह्या महेश्वराच्या आज्त्रेनें प्रकृति-महत्तत्व-अहंकार-त्रिगुण व त्यानंतर पंचमहाभूतें हा सृष्ट्युत्पत्तीचा क्रम आहे. नंतर महेश्वरापासून रूद्र, ब्रह्मा, त्याजपासून मरीचि, अत्रि, अंगिरस, पुलस्त्य, पलाश, क्रतु, भृगु, वसिष्ठ, दक्ष हे नऊ ब्रह्मे होतात. नंतर इतर दक्षसृष्टीचें वर्णन इतर ठिकाणच्या प्रमाणेंच आहे. पुढें चतुर्दशभुवनांचें ठराविक वर्णन असून एकंदर ब्रह्माण्डरचना वर्णिली आहे.

म हा लिं गो पा स ना ( १६-२५ ).- ह्या दहा अध्यायांत महालिंगाचें महत्व प्रस्थापित करणारी अशी एक कथा आली आहे कीं, एकदां ब्रह्मा व नारायण ह्यांमध्यें बलवान् कोण ह्याबद्दल वाद माजला. विष्णूनें पुष्कळ प्रकारें शंभु हाच श्रेष्ठ आबे असें सिद्ध केलें, परंतु पत्‍नीस अर्धांग देणारा व स्मशानांत फिरणारा हा शंभु मोठा देव कसा हें ब्रह्मदेवास कळेना. इतक्यांत पांच तोंडें, दहा हात, पंधरा नेत्र असें स्वरूप महेश्वरानें धारण केलें तरी ब्रह्मदेव त्याची निंदाच करूं लागला. इतक्यांत एक आकाशास शिखर भिडवणारें व पाताळांत पाया असलेलें असें महालिंग उत्पन्न झालें आणि त्याचें शिखर किंवा पायथा जो शोधील तो मोठा अशी आकाशवाणी झाली. नारायणानें वराहरूप धारण करून पृथ्वी खणण्यास सुरवात केली आणि ब्रह्मदेवानें हंसाचें रूप धारण करून शिखर पाहण्याचा प्रयत्‍न चालविला. परंतु तेथील केतकीनें, ब्रह्मदेवानें शीर्ष पाहिलें अशी खोटीच साक्ष देण्याचें कबूल केलें. परंतु पुढें दोघेहि महालिंगापुढें नम्र झाले व आपापलें काम करूं लागले.

अ र्ध ना री श्व र.-ब्रह्मदेवानें अतिशय तप करून महेश्वरास आपल्या पोटीं पुत्ररूपानें जन्मून सृष्ट्युत्पत्तीस मदत करण्याची प्रार्थना केली. त्यावेळीं महेश्वरानें: ‘रूद्रस्वरूप’ व महाशक्तीनें ‘महाकालीं’ स्वरूप धारण केलें. परंतु ब्रह्मदेवानें भीतिग्रस्त होऊन दुसरें सौम्य स्वरूप धारण करण्यास सांगितल्यावरून शंभूनें अर्धनारीश्वर स्वरूप धारण केलें व अकरा रूद्राचीं मदत ब्रह्मदेवास सृष्ट्युत्पत्तीच्या कामीं मिळवून दिली.

ब्र ह्मा शी र्ष च्छे द न.-ब्रह्मदेवानें एकदां सभेंत सर्व मुनींपाशीं बढाई मारली कीं आपण सर्वश्रेष्ठ आहोंत. विष्णूनें शंभूच्या मोठेपणाबद्दल पुष्कळ सांगितलें तरी देखील त्याची बरोबरी करण्याकरितां स्वत:च्या ठिकाणीं आणखी एक पांचवें मुख उत्पन्न केलें व त्यांतून शिवनिंदा करूं लागला. तेव्हां शंभूनें रूद्रस्वरूप धारण करून त्याचें तें मस्तक तोडलें. तेव्हां सबंध विश्वांत रक्ताचा पूर झाला. तो शंभूनें तृतीयनेत्रांतील ज्वालेनें नाहींसा केला. तेव्हां ब्रह्मदेवास पश्चात्ताप झाला व शंभूनें त्याला प्रेमानें उचलून त्याचें सांत्वन केलें.

शि व भि क्षा ट न-ब्रह्मदेवाचें तोडलेलें पांचवें मस्तक घेऊन भिक्षेकर्‍याच्या वेषांत विष्णुप्रमुख इतर देवांची आपल्या ठिकाणीं किती भक्ति आहे हें पाहण्याकरितां शिवभिक्षाटनास निघाला तो प्रथम वैकुंठास आला. त्या ठिकाणीं ‘विध्यक्सेन’ नामक द्वाररक्षकानें जाण्यास निर्बंध केल्यावरून त्याचें मुंडकें त्रिशूलानें छेदून टाकलें, तरी देखील तो शिवदर्शनानें आनंदीतच दिसत होता. विष्णूनें अंतर्ज्त्रानानें ह्या अतिथीस ओळखून केवळ स्तुतीनें ह्याचें समाधान होणार नाहीं असें जाणून सुदर्शन चक्रानें त्यानें आपल्या भालप्रदेशांतील रक्ताचा त्या ब्रह्मदेवाच्या मस्तकास उपहार एक हजार वर्षें दिला, व शिवानेंहि ह्याबद्दल विष्णूची वाहवा केली. ह्यानंतर शिव हा इंद्र, अग्नि, यम वगैरेकडे गेला व सरतेशेवटीं तो हिमालयांतील तपस्वी लोकांची सत्वपरीक्षा करण्याकरितां जाऊन त्यानें तेथील पतिव्रता तापसस्त्रियांस मोह घालून आपल्या सौंदर्यानें आकर्षित केलें. स्त्रियांची अशी स्थिति पाहून मुनिवृंदास अत्यंत कोप आला व त्यांनीं ह्या याचकवेषधारी शिवास दग्ध करण्याकरितां एक होम सुरू करून त्यांतून बरेच दैत्य, सर्प, शस्त्रास्त्रें उत्पन्न केलीं व त्याकरवीं याचकास दग्ध करण्याचा प्रयत्‍न केला. परंतु सर्व प्रयत्‍न निष्फळ झाले. सरतेशेवटीं मनिवरांस शिवस्वरूपाचें ज्त्रान होऊन त्यांनीं शिवाची क्षमा मागितली.

म त्स्य भे द व वि ष्णू चे द शा व ता र.-एकदां ब्रह्मदेवास निद्रा लागली व वेद त्याजपासून निघून जात असतां ‘तम’ दानवाच्या हातीं गेले, त्यावेळीं देवांच्या प्रार्थनेवरून विष्णूनीं मत्स्यावतार घेऊन वेद परत आणले. परंतु त्या मत्स्यास आपल्या पराक्रमाचा गर्व येऊन तो देवास त्रास देऊं लागला, त्यावेळीं शिवानें मत्स्यास ठार मारून त्याच्या अस्थींचें हत्यार बनविलें. या विष्णूच्या दशावताराचें कारण असें झालें कीं, देवदैत्यांत लढाई सुरू असतां देवगुरूनें शिवापासून संजीवनी विद्या मिळविण्याचें ठरविलें व त्याचप्रमाणें शुक्राचार्यानेंहि ठरविलें. दोघांनीं खडतर तपश्चर्या केली म्हणून शिवांस अत्यंत संकट प्राप्त झाल्यामुळें शिवानें अशी युक्ति काढली कीं, जो कोणी एखाद्या खड्ड्यांत विस्तव पेटवून त्यांत धूम्रपान करीत दहा हजार वर्षें राहील त्याला संजीवनी प्राप्त होईल. बृहस्पति भ्याला परंतु शुक्राचार्यानें धाडस करण्याचें ठरविलें व दैत्यास भृगुमुनींच्या आश्रयास जाऊन राहण्यास सांगितलें. त्यावेळीं नारायणानें त्याजवर हल्ला केला. भृगुपत्‍नीनें मंत्रसामार्थ्यानें देवांचें स्तंभन केलें. त्यावेळीं नारायणानें तिला ठार मारलें. इतक्यांत दैत्यांच्या आरड्यामुळें भृगु भानावर आले व त्यांनीं नारायणास दहादां पृथ्वीवर अवतीर्ण होण्याचा शाप दिला. पुढें एकदां समुद्रमंथन करतांना हालहलविष शिवाच्या वांट्यास आलें व अमृत देवांस मिळालें.

जा लं ध र व ध व सु द र्श न दा न. ( अ. २६-२७ ).-एकदां शिवास इंद्रानें एखादा बरोबरीचा वीर युद्धाकरितां उत्पन्न करण्यास प्रार्थना केली. त्यावेळीं शिवानें आपल्या तृतीय नेत्रांतील एका तेजस्वी ठिणगीपासून समुद्रांत जालंधर दैत्य उत्पन्न केला. त्यानें राहुकेतु यांची कथा ऐकून देवाशीं युद्ध आरंभिलें. प्रथम दैत्यांचा पराजय झाला परंतु पुढें पुढें जालंधराच्या मारानें जेव्हां देव भयभीत झाले त्यावेळीं नारायणानें जालंधराशीं युद्ध आरंभिलें आणि सरतेशेवटीं सर्व देव जालंधराचे कैदी बनले. परंतु दैत्यसेना शिवगणापुढें भयभीत झाली व शिवांनीं जालंधरवध केला व त्याच्या शरीरापासून सुदर्शनचक्र तयार करून तें नारायणास दिलें. परंतु एकदां तेंच चक्र विष्णूनें आपला पूजक जो क्षुप राजा त्यास द्यूतांत जिंकणारा दधीच याच्या नाशाप्रत योजलें परंतु तें व्यर्थ गेलें. त्यामुळें क्षुपानें शैवोपासना स्वीकारली.

ग जा सु र व ध व शि व लो क व र्ण न( अ. २८-२९).-कावेरी तीरावर अगस्त्यमुनी तपश्चर्या करीत असतां आकाशांत फिरणार्‍या एका गंधर्वानें आपल्या स्त्रीच्या हारांतील एक पुष्प त्यास मारलें व त्यामुळें अगसत्याच्या शापानें तो बलाढ्य हत्ती झाला व त्रैलोक्यास ताप देऊं लागला. कोणाहि देवास त्याचा वध करतां येईना. तेव्हां सरतेशेवटीं शिवानें त्याचें मुंडकें तोडलें व कैलासावर येतो तों पार्वतीनें आपल्या अंगाच्या मळाचा केलेला एक पुत्र त्यास आडवूं लागला तेव्हां शिवानें त्याचें मुंडकें कापलें व त्यास हत्तीचें लावलें आणि यामुळें तोच पुत्र पुढें ‘गणपति’ नांवानें प्रख्यात झाला. याप्रमाणें शिवलोकवर्णनाचा हा २९ वा अध्याय आहे.

द क्ष य ज्त्र, पा र्व ती प रि ण य व कु मा र ज न्म ( ३०-४० ).-दक्षप्रजापतीचें हें कथानक इतर पुराणांतल्या सारखेंच आहे. परंतु मध्यंतरीं दक्षयज्त्रांत वीरभद्रानें शरभ पक्षाचें स्वरूप धारण करून नृसिंहवध केला. आणि शिवास त्याचें सिंहासन करून दिलें असें वर्णन आहे. पुढें तारकासुराचा वध करण्याकरितां षण्मुख जन्मला व त्यानें दैत्याचा वध केला.

त्रि पु र दा ह व गं गा धा र ण ( अ.४१-५० ).-तारकासुराचे तीन पुत्र तारकाक्ष, कमलाक्ष व विद्युन्मति यांनीं बापाच्या मृत्यूनंतर उग्र तपश्चर्या करून ब्रह्मदेवापासून अभेद्य् अशा त्रिपुरांची प्राप्ति करून घेतली व सर्व त्रैलोक्यास त्रास देण्यास सुरूवात केली. परंतु षण्मुख व नंदीश्वर ह्यांनीं विद्युन्मति, शिंशुमार इत्यादींचा नाश केल्यामुळें तारकराक्षसास फार काळजी लागली. त्यावेळीं शिवानें ब्रह्मा व विष्णू यांस त्याच्या नगरांतील अमृतनिधि पिऊन टाकण्यास व त्याच्या स्त्रियांचें पातिव्रत्य भ्रष्ट करण्यास आज्त्रा केली. त्याप्रमाणें दोघांनीं पशूंचीं रूपें धारण करून अमृत संपविलें व विष्णूनें बौद्ध स्वरूपानें स्त्रियांत भ्रष्टाकार माजवला; आणि नंतर शिवानें त्याचा नाश केला. पुढें इंद्राच्या चित्ररथ उद्यानांत क्रीडा केल्यावर पार्वतीश शिवानें गंगा आपल्या जटेंत धारण करण्याची लीला केली, पुढें कमलाक्षानें तप:सामर्थ्यानें अंधकासुर नामक पुत्र शिवापासून मिळवला. पुढें शिवानें त्रिशूलानें त्याचा नाश करून त्याच्या छातीवर तांडव नृत्य केलें. ह्या नंतर विष्णूचे दशावतार वर्णन केले आहेत.

श्वे त रा ज व गौ त म मु नि यां च्या क था( अ. ५१-५४ ).- श्वेत नामक एक बलाढ्य राजा सैन्याचें निरीक्षण करीत नगरांतून चालला असतां प्रवासास गेलेल्या व्यापार्‍याची एक सुंदर स्त्री पाहून तो मदनातुर झाला व त्यानें तिला पकडून आणून भ्रष्ट केलें. एकदां तिला चंपक पुष्पांचा गुच्छ देत असतां त्यांतील एक फूल खालीं पडल्यावरून त्यानें “हें फूल शिवास अर्पण” असें सहजगत्या वाक्य उच्चारलें पुढें यमाचे दूत त्यास नेण्यास आले असतां त्याच्या पापाबद्दल शिक्षा देण्यापूर्वी एक रात्र रंभेसह क्रीडेंत काढण्याची परवानगी दिली. तो रंभेकडे गेला असतां रंभेनें त्याला लिंगायत होण्याविषयीं उपदेश केला व अजाणतां घडलेल्या पुण्याच्या योगानें कैलासी गेलेल्या कित्येक प्राण्यांच्या कथा सांगितल्या. एक मरणोन्मुख पापी जुन्या देवळांत पडला असतां एक कुत्रें तो मेला असें समजून त्याला खाण्याकरितां भस्माच्या पायांनीं त्याच्या अंगावर चालून येत होतें. तों तो जिवंत आहे म्हणून पळालें. पण त्या कुत्र्याच्या पायाचें भस्म त्याच्या कपाळास लागल्यामुळें त्याला केलास प्राप्ति झाली. अशा कथा ऐकून तो श्वेत राजा लिंगायत झाला. जेव्हां यम त्यास नेऊं लागला तेव्हां त्यानें शिवाचें ध्यान केलें, तों लिंगातून शिव आविर्भूत होऊन त्यानें तृतीयनेत्रांतील अग्नीनें यमराजास दग्ध केलें. परंतु ब्रह्मदेवाच्या मध्यस्थीनें जगाचा संहार करावयासाठीं शिवानें त्यास पुनरपि जिवंत केलें.

एकदां भयंकर दुष्काळ पडला असतां गौतम नामक ऋषीनें खडतर तपश्चर्या करून “बीं पेरल्याबरोबर ताबडतोब धान्य व्हावें” असा वर शिवापासून मागून घेतला. पुढें त्यायोगानें हजारों ऋषींचे प्राण वांचविले. पाऊस पडून आबादानी झाली.

५३ व्या अध्यायांत सूर्यवंश व चंद्रवंश यांतील राजांच्या वंशावळी असून पहिल्यांतील राम हा स्त्रीच्यामुळें व दुसर्‍या वंशांतील पांच पांडव हे संपत्तीच्या आशेनें नाश पावल्याचें उत्तम उदाहरण म्हणून दिलें आहे.

५५ व्या अध्यायांत शिवोपासनेनें कोणाकोणास सद्गति मिळाली असा सिद्धरामानें प्रश्न केला असतां चन्नबसबानें कथा सांगितल्या आहेत.

सा नं द मु नि ( अ. ५६ ) -संपूर्णवित्त मुनीचा पुत्र सानंद मुनि हा शैवोपासकांपैकीं एक प्रख्यात पुरूष होय. एकदां दुसर्‍या एका ऋषीनें त्यास मरणानंतर चांगल्या व वाईट माणसांस प्राप्त होणार्‍या शिक्षेचें स्वरूप सांगितलें. तें ऐकून सानंदाच्या मनांत यमलोकांत जाण्याची इच्छा उत्पन्न झाली. यमानें सर्व भाग त्यास दाखविले. परंतु नरक दाखविण्याचें त्याच्या जिवावर आलें. मोठ्या कष्टानें त्यानें सानंदास नरकाकडे नेलें. तेथील प्राण्यांची दु:खद स्थिति पाहून सानंदाने त्यांस मुक्ति दिली. हें पाहून यमास राग आला व त्यानें शिवाकडे आपल्या जागेचा राजीनामा पाठविला. परंतु शिवानें समजूत घालून त्यास पुन:स्वपदावर नेमलें.

वी र शै व पं थी सा धूं च्या क था ( अ. ५७ ).-शैव पंथात सांगितलेल्या मार्गानें जर कैलासप्राप्ति होते, तर इष्टलिंग धारण करून वीरशैव होण्याची काय जरूरी आहे? असा सिद्धरामाचा प्रश्न ऐकून चन्नबसव म्हणाला, शैवपंथांतील उपासक कैलासांत जाऊन फक्त बाहेरच उभे राहतात, आणि नंदीश्वराकडून त्यांच्या गळ्यांत इष्टलिंग बांधलें जाई. तोंपर्यंत त्यांस आंत जातां येत नाहीं, परंतु वीरशैव उपासक थेट कोठें मृज्जाव न होतां अगदीं अंतर्गृहांत जातात. यानंतर वीरशैव पंथातील साधूंच्या कथा सांगितल्या कथा सांगितल्या आहेत.

च न्न ब स वा चा सि द्ध रा मा स उ प दे श. ( अ. ५८ ) -ह्या अध्यायांत लिंगायत धर्मांतील आधिभौतिक व अध्यात्मिक तत्वज्त्रानाचा:चन्नबसव सिद्धरामास उपदेश करतो. प्राणि हा स्वेदज, अंडज, उद्भिज, व जारज या प्रकारांनीं कसा जन्मास येतो, पंचमहाभूतापासून पंचवीस मूलपदार्थ कसे उत्पन्न होतात, कर्मेंद्रियें व ज्त्रानेंद्रियें यांचे व्यापार कसे चालतात, एकंदर स्थूल, सूक्ष्म व कारण यांतील शरीराची स्वरूपें काय, वगैरे गोष्टीचें सविस्तर वर्णन आहे.

शि व त त्व वी र शै व ध र्म ( अ. ५९-६१ ).- सिद्धराम हा शैव होता परंतु वीरशैव धर्माची दीक्षा देतांना चन्नबसवानें पुढीलप्रमाणें त्यास उपदेश केला.

वीरशैव होऊं इच्छिणारानें प्रथम पृथ्वी, संपत्ति, व स्त्री ह्या तीन दोपांपासून अलिप्त राहिलें पाहिजे. दीक्षा देण्याच्या कामीं पांच जलपात्रांचा उपयोग करावयाचा असतो, कारण मूळ ‘परशिव’ ह्यानें प्रथम सदाशिव, ईश्वर, महेश्वर व रूद्र ह्यांस लिंगायत धर्माचा उपदेश केला, व त्याच प्रत्येकापासून ( १ ) रेवणसिद्ध, ( २ ) सारूळीसेद्धश्वर ( ३ ) येकोराम, ( ४ ) पंडिताराध्य हे पृथ्वीवर अवतार झाले व त्यांच्याच नांवानें चार पात्रें ठेवलीं जातात. मधलें पात्र मुख्य शिवतत्व याचें दर्शक असून त्याचा पार्थिव अवतार चन्नबसव होय. लिंगपूजा सूर्योदयापूर्वीं केली तर उत्तम, सूर्योदयाच्या वेळींच केली तर मध्यम, व सूर्योदयानंतर कनिष्ठ होय. प्रथम शिवापासून चित्प्रणव, त्याजपासून नाद, बिंदु, कला व ह्या तीनपासून अ, उ, म् हीं तीन अक्षरें उत्पन्न झालीं.

शि व पू जे चे प्र का र.- ( १ ) वेद व आगम यांचें ज्त्रान नसतांना केलेली, ( २ ) वेदावर श्रद्धा न ठेवतां केलेली, व ( ३ ) लिंगायत शास्त्राप्रामाणें केलेली पूजा.

 शि वा चीं ष ट् स्था नें.-पहिलें ऐक्यस्थल, दुसरें शरणस्थल, तिसरें प्राणलिंगीस्थल, चौथें प्रसादीस्थल, पांचवें महास्थल व सहावें भक्तिस्थल. ह्या स्थानांची प्राप्ति झालेल्यास अनुक्रमें:-( १ ) ऐक्य, ( २ ) शरण, ( ३ ) प्राणलिंगी, ( ४ ) प्रसादी, ( ५ ) महेश, ( ६ ) भक्त, असें म्हणतात. ह्यांपैकीं साधकास प्रथम भक्तिस्थलापासून वर मार्ग आक्रमण करावा, लागतो.

भ वि ष्य क थ न ( अ. ६२  ).-यानंतर प्रभूनें चन्नबसवाची रजा घेतली. नंतर सिद्धरामानें भविष्यकालाबद्दल प्रश्न केल्यावरून चन्नबसव सांगूं लागला:-प्रभु हा फिरतां फिरतां कल्याण येथें बसवाच्या यज्त्रकुंडावर आरोहण करील व त्यामुळें सर्व जंगम रागावतील, पुढें प्रभु हा तें सर्व अन्न एकटाच खाऊन तो जंगमासहि संतुष्ट करील. पुढें विज्जल राजाच्या, बसव प्रधानाच्या मृत्यूनंतर चन्नबसव हा प्रधान होईल. नागलंबिकेच्या सांगण्यावरून चन्नबसव हा राजास भविष्य  सांगेल. त्याप्रमाणें तो राजा ६० वर्षें राज्य करून, नंतर तुर्क लोक ७७० वर्षें राज्य करतील व कल्याण शहराची धुळधाण होऊन कुरूगली शहर भरभराटीस येईल व ह्या प्रदेशास “तुरकान्य” हें नांव पडेल. सिद्धराम हा सोलापुरासच राहिल व चन्नबसव हा शिवध्यानांत गर्क होईल. इतक्या सुमारास होयसल राजवंश राजपदावर चढेल. ह्या वंशातील राजा बेलापूरांत विष्णूचें एक देवालय बांधील व त्यांत विष्णूची प्रतिमा स्थापन करील. श्रीशैव पर्वतावर वारांगना आपल्या झोंपड्या बांधतील व मद्यविक्रय करतील व कुम्मट किल्ला दिल्लीच्या तुर्कांकडून काबीज केला जाईल. ( अ. ६३ ) अनेगोंदीचे राजे विद्यानगरी हें हंपीशेजारी नवीन शहर बांधतील. १०१ साधू लिंगायत धर्माचा प्रसार करतील. ह्यानंतर पुन:७०० साधू शैवोपासनेचा प्रसार करतील. ह्यानंतर तुरकांचा नाश होईल व हा राजा कल्याण शहराची बांधणी पुनश्च करून लिंगायत धर्माचा चोहोंकडे प्रसार करील [ रॉयल ए. सो. पु. ३ ].

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .