विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चन्नगिरी - म्हसुरांतील शिमोगा जिल्ह्याचा एक तालुका. याचें क्षेत्रफळ ४६५ चौ. मैल आहे. येथील लोकसंख्या सन १९११ सालीं ८३२३३ होती. याचा शेतसारा सन १९०४-५ सालीं रू. १४५००० होता. याच्या मध्यभागी सुलेकेरें नांवाचें मोठें तळें आहे. याच्या दक्षिणेस व पश्चिमेस टेंकड्या आहेत. उत्तरेकडील प्रांत सपाट असून सुपीक आहे. त्यांत बगीचे व उसाची लागवड करतात.