विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चंद्रकोना - हें बंगालच्या मिदनापूर जिल्ह्याच्या घाटाल विभागांतील शहर आहे. यांत सन १९११ त ८१२१ लोकसंख्या होती. बरद्वानच्या कीर्तिचंद्रराय नांवाच्या राजानें हें शहर इ. स. च्या १८ व्या शतकांत एक हिंदू राजापासून घेतलें; व तेव्हांपासूनच हें बरद्वानच्या राज्यांस जोडलें गेलें. येथें म्युनिसिपालिटी सन १८६९ त स्थापन झाली.