प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चंद्र - सूर्यमंडळांतील पृथ्वीचा उपग्रह. या लेखामध्यें चंद्राची सामान्य माहिती दिली आहे. चंद्रग्रहणाविषयीं विवेचन ‘ग्रहण’ या लेखांत केलेंच आहे. सर्व नक्षत्रांतून चंद्राची एक प्रदक्षिणा होण्यास मध्यम मानानें सुमारें २७ दिवस १९ घटका लागतात. कधीं याहून कांहीं घटिका कमी लागतात व कधीं जास्त लागतात. अशा कमजास्त मानांच्या सरासरीनें काढिलेलें जें मान त्यास ज्योतिषशास्त्रांत मध्यम म्हणतात. एका तारेजवळ एकदां चंद्र दिसला तर पुन्हां वर लिहिलेल्या काळानें तो तेथें येईपर्यंतच्या काळास नाक्षत्रमास म्हणतात. २७ नक्षत्रांतून कांहींच्या दक्षिणेकडून नेहमीं चंद्र जातो; कांहींच्या उत्तरेकडून जातो; आणि बाकी कृत्तिका, रोहिणी, पुष्य, मघा, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, शथभिषक्, रेवती, यांचें तो कधीं कधीं आच्छादन करितो. ह्या आच्छादनास पिधान असें म्हणतात. रोज सरासरी पांच तारांचें पिधान चंद्र करितो. परंतु त्यातल्या तेजस्वी तारांचें मात्र पिधान नुसत्या डोळ्यांनीं चांगलें पाहण्यास सांपडतें. मघा, ज्येष्ठा, चित्रा, रोहिणी, ह्या पहिल्या प्रतीच्या तारा आहेत. त्यांतहि क्रमानें त्या एकीकहून एक जास्त तेजस्वी आहे. रोहिणी सर्वात तेजस्वी आहे. यामुळें चंद्र सर्वांहून तिच्या फारच जवळ येईपर्यंत ती दिसत असते. अर्थातच तिचें पिधान सर्वांहून मनोहर दिसतें. हीच गोष्ट चंद्राची रोहिणीवर अति प्रीति आहे या समजुतीचें कारण होय. आणि ही गोष्ट अति प्राचीनकाळीं आमच्या लोकांस ठाऊक होती असें तैत्तिरीय संहितेंतील [ २. ३. ५. ] कथेवरून ठरतें. ती कथा अशी आहे:-

“प्रजापतीला ३३ कन्या होत्या. त्या त्यानें सोमराजास दिल्या. तो त्यांपैकीं रोहिणीशीं मात्र समागम करूं लागला. यामुळें इतरांस मत्सर उत्पन्न होऊन त्या प्रजापतीकडे गेल्या. सोम त्यांच्या मागून जाऊन त्यांस प्रजापतीपाशीं परत मागूं लगाला. प्रजापतीनें सांगितलें, सर्वांशीं सारखा वागेन अशी शपथ घे, म्हणजे तुला कन्या परत देतों. त्यानें शपथ घेतलीं प्रजापतीनें कन्या परत दिल्या. तरी तो पुन्हां त्यांच्या पैकीं रोहिणीजवळ मात्र जाऊं लागला. त्यामुळें त्यास यक्ष्मा झाला. सोमराजास यक्ष्मा झाला म्हणून त्यास राजयक्ष्मा म्हणतात. याप्रमाणें राजयक्ष्म्याची उत्पत्ति झाली. नंतर सोम त्या तारांच्या पायांत पडत पडत त्यांच्या मागें जाऊं लागला. त्या बोलल्या, तूं आम्हां सर्वांशीं सारखें वागावें असा आम्ही वर मागतों. मग त्यांनीं आदित्यास चरू दिला, आणि त्याच्या योगानें सोमास पापापासून मुक्त केलें.

चंद्राच्या योगानें कांहीं तारांचें पिधान कां होतें याचें कारण असें:- चंद्र पृथ्वीभोंवती फिरतो. म्हणजे तो पृथ्वीचा उपग्रह आहे. तो पृथ्वीभोंवतीं क्रांतिवृत्तांतून फिरत नाहीं. त्याची कक्षा क्रांतिवृत्तास छेदिते. त्या दोहोंच्यामध्यें सुमारें सवापांच अंशांचा कोन आहे. यामुळें चंद्रकक्षेचा अर्धा भाग क्रांतिवृत्तांच्या उत्तरेस सुमारें सवापांच अंशांपर्यंत व अर्धा भाग दक्षिणेस सवापांच अंशांपर्यंत असतो. म्हणून चंद्र नेहमीं क्रांतिवृत्ताच्या दक्षिणेस किंवा उत्तरेस सवापांच अंशांत असतो. खस्थ पदार्थापासून क्रांतिवृत्तापर्यंत जें अंतर त्यास शर म्हणतात. हें अंतर त्या खस्थापासून क्रांतिवृत्तांवर लंब काढून त्यानें मोजितात. चंद्राचा शर सवापांच अंशांपर्यंत असतो. क्रांतिवृत्त आणि चंद्रकक्षा ह्यांच्या दोन पातबिंदूंस अनुक्रमें राहु आणि केतू म्हणतात. राहूमध्यें किंवा केतूमध्यें चंद्र असतो तेव्हां अर्थातच क्रांतिवृत्तापासून त्याचें अंतर मुळींच नसतें. म्हणजे त्या वेळीं शर शून्य असतो. क्रांतिवृत्ताच्या आसपास सवापांच अंशांच्या आंत ज्या तारा आहेत, म्हणजे ज्यांचा शर सव्वापांच अंशांच्या आंत ज्या तारा आहेत, म्हणजे ज्यांचा शर सवापांच अंशांहून जास्त नाहीं, त्यांचें पिधान चंद्र करितो. विषुववृत्तांपासून क्रांतिवृत्ताचें परम अंतर सुमारें २३|| अंशांवर आहे. आणि चंद्र कधीं त्याच्या दक्षिणेस किंवा उत्तरेस असतो. म्हणून चंद्रांची परम क्रांति कधीं सुमारें २८|| अंश होते, कधीं सुमारें १८| अंशच होते. याहून जास्त ज्यांची क्रांति असेल त्या तारांचें पिधान कधींहि होण्याचा संभव नाहीं. चंद्रकक्षा आणि क्रांतिवृत्त यांचे पात म्हणजे राहूकेतु हे स्थिर नाहींत; त्यांस गति आहे ( आणि म्हणूनच हे भारतीय ज्योतिषांत ग्रह कल्पिले आहेत. वस्तुत: हे दृश्य किंवा द्रव्यघटित पदार्थ नाहींत ). ते सुमारें १८|| वर्षांत क्रांतिवृत्तांत एक फेरा करितात. यामुळें क्रांतिवृत्ताच्या कोणत्याहि बिंदूशीं चंद्राचा शर सर्वदा सारखा नसतो. कधीं शून्य असतो, कधीं सवापांच अंशांपर्यंत असतो. यामुळें एका तारेचें पिधान चंद्र एकदां करूं लागला म्हणजे सुमारें २ वर्षें करितो; व पुढें करीनासा होतो. तो पुन्हां १८|| वर्षांनीं करूं लागतो. ज्या तारा क्रांतिवृत्तावर किंवा त्याच्या अगदीं जवळ आहेत त्यांचें पिधान तो १८|| वर्षांत दर खेपेस दोन दोन वर्षें असें दोनदां करितो. वर ज्या नक्षत्रांचें पिधान चंद्र करितो असें सांगितलें त्यांतील बहुतेकांच्या सर्व तारांचें पिधान तो १८|| वर्षांत केव्हां ना केव्हां तरी करितो. जेव्हां करीत नाहीं, तेव्हां त्यांच्या उत्तरेकडून किंवा दक्षिणेकडून तो जातो.

कधीं कधीं बुधशुक्रादि ग्रहहि चंद्राच्या सपाट्यांत सांपडून त्यांचेंहि पिधान चंद्र करितो. ग्रह बहुधा पहिल्या प्रतीच्या तारेएवढे किंवा त्याहून मोठे दिसतात. यामुळें त्यांचें पिधान पाहण्याची विशेष मौज असते. कधीं कधीं तारा आणि ग्रह यांचें पिधान एका कालीं होण्याचा संभव आहे. बुधाला रौहिणेय असें नांव आहे, ह्या गोष्टीचें मूळ ह्या पिधानांत आहे. बुध आणि रोहिणी यांचें एकाकालीं पिधान झालें असतां त्यावेळीं चंद्रबिंबांतून बुध बाहेर पडला असें पाहून रोहिणीचंद्रसमागमापासून बुध हा पुत्र झाला अशी कल्पना होण्याचा संभव साहजिक आहे. गुरूपत्‍नी तारा हिचें हरण चंद्रानें केलें आणि तिला बुध हा पुत्र झालान या कथेंत तारा म्हणजे वस्तुत: रोहिणी नामक जी तारा ती होय. बुधाला रौहिणेय अशी संज्त्रा आहे. त्याप्रमाणें इतर ग्रहांसहि अशा संज्त्रा आहेत. त्या फारशा प्रसिद्ध नाहींत. तरी पुराणांत त्या आहेत. शुक्र, मंगळ ह्यांस अनुक्रमें मघाभू व आषाढाभू अशीं नांवें आहेत. त्या त्या  तारा, ते ग्रह आणि चंद्र, यांच्या एककालिक निकट समागमापासून तीं नावें पडलीं यांत संशय नाहीं.

चंद्रपृष्ठाचा जो भाग काळा दिसतो तो चंद्रानें धारण केलेला ससा किंवा हरिण आहे अशा कल्पना अद्भवल्या. त्याप्रमाणें जो भाग चकचकीत दिसतो तेथें पाणी असावें अशी कल्पना होणें हें त्याहून अधिक स्वाभाविक आहे. दुर्बिण प्रथमच प्रचारांत आली तेव्हां तींतून दिसून आलें कीं, चंद्राचा जो भाग चकचकीत दिसतो तो पर्वतांचीं शिखरें व ज्वलतपर्वतांचीं मुखें यांनीं उंचसखल झालेला आहे; आणि काळा भाग दिसतो तो सखल आहे व त्यावरून पाश्चात्य ज्योतिष्यांनीं प्रथम असें अनुमान केलें कीं, काळा भाग दिसतो तेथें समुद्र आहेत. परंतु मोठमोठ्या दुर्बिणींनं चंद्राचे वेध झाल्यावर चंद्रावर पाणीं मुळींच नाहीं असा निर्णय झाला.

पृथ्वीपासून चंद्राचें मध्यम अंतर २४०००० मैल आहे. कधी तें याहुन १९ हजार मैल कमी होतें, कधीं जास्त होतें. इतक्या अंतरावरून चंद्र आपल्या पृथ्वीभोंवतीं फिरत असतो. आपल्या पायापासून पृथ्वीच्या मध्यबिंदूपर्यंत अंतर सुमारें ४ हजार मैल आहे. म्हणजे भूगोलाची त्रिज्या इतकी आहे.  हिच्या साठपट चंद्र दूर आहे.  चंद्राचा व्यास सुमारें २१६० मैल आहे. म्हणजे पृथ्वीच्या व्यासाच्या चौथ्या हिश्याहून थोडा जास्त आहे. पृथ्वीच्या पृष्ठाचें क्षेत्रफळ म्हणजे पृथ्वीचें पृष्ठफळ चंद्राच्या सुमारें १३ पट येतें. म्हणजे चंद्रावर जेवढी जागा आहे त्याच्या १३ पट पृथ्वीवर आहे. चंद्राच्या आकाराच्या सुमारें ४९ पट पृथ्वी मोठी आहे आणि चंद्राच्या ८१ पट पृथ्वीचें वजन आहे. दोन गोलांचे व्यास ठाऊक असले तर त्यांचीं पृष्ठफळें आणि आकार म्हणजे घनफळें ह्यांची तुलना करतां येते. चंद्राच्या ४९ पट पृथ्वीचा आकार आहे, तर वजनहि तितकें पट असलें पाहिजें असें मनांत येईल. दोन्ही गोलांची घनता सारखी असती तर तसें झालें असतें. परंतु दोहोंची घनता सारखी नाहीं; पृथ्वीच्या निम्याहून किंचित् जास्त इतकीच म्हणजे पाण्याच्या सुमारें ३|| पट चंद्राची घनता आहे. आणि अर्थात् इतकेंच त्यांचें विशिष्ट गुरूत्व आहे. म्हणुन चंद्राच्या ८१ पट पृथ्वीचें वजन आहे. चंद्राचा एक तुकडा घेतला आणि तितकेंच पाणी घेतलें तर त्या पाण्याचें जितकें वजन भरेल त्याच्या सुमारें ३|| पट वजन त्या तुकड्याचें भरेल. हें चंद्राचें विशिष्टगुरूत्व होय.

चंद्राच्या काल वाढूं लागल्यापासून सुमारें १५ दिवसांनीं तो पूर्ण होतो. चंद्र एकदां पूर्ण झाल्यापासून पुन्हां होईपर्यंत किंवा एक रात्रीं मुळींच न दिसल्यापासून पुन्हा दिसेनासा होईपर्यंत सुमारें ३० दिवस जातात. इतक्या काळास चांद्रमास म्हणतात. प्राचीन खाल्डियन लोकांत चंद्रमानाचें प्राधान्य होतें. मुसलमानांत अजूनहि आहे. ते बारा चांद्रमासांचेंच वर्ष धरितात. आम्हीं अधिकमास धरून चांद्र आणि सौर या दोहोंचा मेळ ठेवतों. युरोपियन लोक चांद्रमास हल्लीं मुळींच धरीत नाहींत. सौरमास घेतात.

चंद्र पृथ्वीभोंवतीं फिरत फिरत सूर्याभोंवतीं फिरतो. नक्षत्रांतून त्याची एक प्रदक्षिणा सुमारें २७| दिवसांत होते असें मागें सांगितलें. पृथ्वी स्थिर असती तर इतक्यात काळांत चंद्राची पृथ्वीप्रदक्षिणा झाली असती परंतु इतक्या काळांत पृथ्वी थोडीशी पुढें जाते म्हणून प्रदक्षिणेस सुमारें २९|| दिवस लागतात. पृथ्वीभोंवतीं चंद्र जितक्या काळांत फिरतो तितक्या काळांत तो आपल्या आसाभोंवतीं एक प्रदक्षिणा करतो. त्यामुळें चंद्राचा अर्धा भाग मात्र आपल्यास नेहमीं दिसतो. या भागावर जसजसा सूर्यप्रकाश पडलेला आपणांस दिसतो तसतसें चंद्रबिंब कमी जास्त दिसूं लागतें. यालाच कला म्हणतात. अमावास्येच्या २ र्‍या व ३ र्‍या दिवशीं चंद्राची अगदीं बारीक कोर दिसते. तिच्या टोकांस शृंगें म्हणतात. या टोकांच्या उच्चनीचतेवर समृद्धिमहर्गता अवलंबून असतें असें मानतात. समुद्राची भरती ओहटी चंद्राच्या उदयास्तावर अवलंबून आहे. ‘भरती ओहटी’ पहा.
चंद्रावर कांहीं डोंगरांच्या रांगा आहेत; कांहीं शांत झालेलीं ज्वालामुखें निरनिराळीं पसरलीं आहेत; व कांहीं प्रदेश सपाट आहे. जेथें बिंब काळसर दिसतें, तेथील प्रदेश चकचकीत प्रदेशांपेक्षां सपाट आहे. तरी अगदीं सपाट आहे असें नाहीं. त्यावरहि उंचवटे आहेतच. परंतु ते इतर प्रदेशांतील उंचवट्यांपेक्षां पुष्कळ ठेंगणे आहेत. नुसत्या डोळ्यांनीं चंद्रावरील कांहीं प्रदेश काळसर व कांहीं पांढरा दिसतो. हा फरक मुख्यत: त्या प्रदेशांची घटकद्रव्यें भिन्न रंगांचीं आहेत त्यामुळें आहे. सपाट प्रदेशावर पूर्वीं समुद्र होता असें कांहींचें मत आहे. सांप्रत चंद्रावर पाणी नाहीं.

चंद्रावरील उंचवट्यांचें स्वरूप पृथ्वीवरील उंचवट्यांच्या स्वरूपाहून निराळें आहे. त्यांच्या कांहीं रांगा आहेत. तथापि निरनिराळे पसरलेले ज्वालामुखी फार आहेत. पृथ्वीपेक्षां चंद्रावर ज्वालामुखी पर्वत फारच मोठमोठाले आहेत. ते सर्व सांप्रत शांत आहेत. कांहीं लहान लहान डोंगर निरनिराळे पसरलेले आहेत. कांहीं पर्वतांचीं पठारें सपाट असून त्यांच्या भोंवतीं लहान लहान कडे आहेत. ह्या पठारांवर कोठे कोठें शंक्वाकृति उंचवटे आहेत. कांहींवर एकच उंचवटा आहे. कांहींचीं पठारें खोलगट आहेत. चिखल किंवा कमावलेला चुना सपाट पसरलेला असून त्यावर लहानसा दगड मारला असतां जशी आकृति दिसते त्याप्रमाणें चंद्रावरील उंचवट्यांची आकृति सामान्यत: दिसते.

चंद्राची प्रत्यक्ष माहिती करून घेण्याचें आजपर्यंत बरेच प्रयत्‍न झालेले आहेत. एक दारूनें भरलेला अजस्त्र बाण चंद्रावर सोडून कांहीं प्रत्युतर मिळतें कीं काय यासंबंधीं शोध चालू आहेत. चंद्रासंबंधीं पौराणिक माहिती ‘सोम’ लेखांत सांपडेल.

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .