विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चंदैली - संयुक्त प्रांत, बनारस जिल्ह्यांतील एक तहशील. हिचें क्षेत्रफळ ४२६ चौ. मैल आहे. व लोकसंख्या इ. स. १९११ सालीं २४३९२८ होती. इ. स. १९०३-०४ सालीं शेतसारा रू. २८०००० व जकात, कर वगैरेंचें उत्पन्न रू. ६४००० होतें. याच्या जवळून कर्मनाशा नदी वाहते. येथील माती चिकण आहे. येथें तांदुळाचें मुख्य पीक आहे.