प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चंदेल्ल ( बुंदेलखंड ) - चंदेल्ल हे आपणास चंद्रवंशी रजपूत म्हणवितात, परंतु यांनां त्या प्रांतीं मिश्रबीजाचे मानतात. या वंशाचा पहिला इंद्रजित गहरवार याची कन्या हेमवती हिला चंद्रापासून झालेला चंद्रवर्मा असून त्यापासून ( संवत् २०४ ) परमर्दी उर्फ परमालपर्यंत ४९ पिढ्या झाल्या अशा प्रकारची ही पौराणिक कथा आहे.

बुं दे ल खं ड चे चं दे ल्ल.-व्हिन्सेंटस्मिथ यानें रॉयल ए. सो. जर्नलमध्यें बुंदेलखंड अगर जेजाकमुक्तीचा पूर्वेतिहास दिला आहे; पण तो बराचसा दंतकथात्मक आहे असें रा. वैद्य याचें म्हणणें आहे. त्यावरून असें दिसतें कीं, बुंदेलखंडांत चंदेल्लाचा प्रवेश होण्यापूर्वीं तेथें प्रथमत: गहरवारांचें व नंतर परिहारांचें वास्तव्य होतें. बुंदेलखंडांतील मनोहर तलाव गरहवारांनींच बांधिले; परंतु “चंदेल्लांच्या पूर्वीं गहरवार बुंदेलखंडांत असावेत असें दिसत नाहीं” असें रा. वैद्य म्हणतात. ह्युएनत्संगानें आपल्या प्रवासवर्णनांत असें लिहिलें आहे कीं, जझ्झोटी येथें एक ब्राह्मण जातीचा राजा राज्य करीत होता. हा ब्राह्मण राजा कनोजच्या सम्राट हर्ष राजाचा सुभेदार असावा असें वैद्य म्हणतात. हर्षानंतर कनोज येथें मौखरी उर्फ वर्म घराणें राज्य करूं लागलें. जोंपर्यंत वर्म घराण्याची सत्ता अबाधित होती तोंपर्यंत जझ्झोटी प्रांतावर कनोजची पूर्ण सत्ता असावी. पण कनोजच्या साम्राज्याला उतरती कळा लागल्याबरोबर तो प्रांत हळूहळू स्वतंत्र झाला असावा; म्हणजे इंद्रायुध गादीवर बसला त्यावेळींच ही घडामोड झाली असावी. ह्या कालनिर्णयास बनारस येथें उपलब्ध झालेल्या चंदेल्ल वंशाच्या अतिप्रसिद्ध धंग राजाच्या लेखाचा ( एपि. इं. भाग १ पा. १२९ ) आधार मिळतो. ह्या लेखांत चंदेल्ल घराण्याच्या मूळ पुरूषापासून जी वंशावळ दिलेली आहे तीवरून नन्नुक हा या वंशाचा मूळपूरूष व नन्नुकापासून धंग राजाच्या कारकीर्दीचा विचार करितां नन्नुकाचा काल ८३१ ते ८५० असा ठरतो. महोबाच्या कानुगोजवळ सांपडलेल्या २०४ व २२५ या हर्षशकांतील लेखांवरून स्मिथनेंहि नन्नुकाचा राज्यारोहणकाल ८३१ च ठरविला आहे. त्याकाळीं हर्षशक चालू होता. त्याचा अर्थ असा कीं कनोजची सत्ता ह्या प्रांतावर अद्याप चालू होती. चंदेल्ल घराणें हर्षशक २०४ ( स. ८१० ) मध्यें भरभराटीस येऊं लागलें असावें व ८३१ मध्यें पडत्या सम्राटाशीं एखादी लढाई होऊन त्यांत नन्नुकास विजय मिळाला असावा व त्यानें परिहारास हुसकावून देऊन बुंदेलखंडांत चंदेल्लांची स्वतंत्र राज्यस्थापना केली असावी.

नन्नुकानंतर विजयानें ( ८७० ते ८९० ) राज्य केलें असावें. पण वरील लेखांत नन्नुकानंतर जयशक्ति व विजयशक्ति यांनीं अनुक्रमें राज्य केलें व हे दोघेहि भाऊ होते असें सांगितलें आहे. परंतु हर्षाच्या एका लेखांत नन्नुकाच्या पुढच्या राजाचें नांव नुसतें नेज्जक ( जयशक्ति ) असें दिलें आहे.

विजयानंतर राहिल ( इ. सन. ८९० ते ९१० ) यानें राज्य केलें. त्याची पराक्रमविषयीं बरीच ख्याति होती. त्याची राजधानी महोबा होती. राहिल राजाच्या पराक्रमाचें वर्णन पृथ्वीराज चव्हाणाच्या चंदभाटानेंहि केलें आहे. ह्या राजाच्या कन्येचा विवाह तत्कालीन चेदीच्या गादीवर असलेल्या कोक्कल राजाशीं झाला. राहिलानंतर त्याचा मुलगा हर्ष ( ९१०- ९३० ) राज्य करूं लागला. त्याचा विवाह चाहमान कुलांतील कंचुका नामक कन्येशीं झाला होता. हर्षाचा मुलगा यशोवर्मा असून त्यानें आपल्या पराक्रमानें चंदेल्ल कुलाची अत्यंत महती वाढविली. याचें दुसरें नांव लक्षवर्मा होतें असें माबेल डफ म्हणते. त्यानें कलचुरीचा पराभव करून प्रसिद्ध कालंजर किल्ला काबीज केला. कालंजर हें महाभारतकाला पासून तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून तो किल्ला ताब्यांत असणें हें एक मोठें भूषणच असें तत्कालीन राजे समजत असत. चेदीचे राजे तर आपणांत ‘कालंजर पुरवराधीश्वर’ असें म्हणवीत. परंतु यशोवर्म्यानें चेदीचा पाडाव केल्यामुळें वरील किताब यशोवर्म्यास मिळाला. शिवाय त्यानें गौड, खश, कोसल, काश्मीर, मिथला, मालवा, कुरू, गुर्जर इत्यादि देश जिंकले असें म्हणतात. यांपैकीं गुर्जरराज ( प्रतिहार राजा ) हा कनोजच्या सम्राट्पदावर असलेला महिपाल होय. कारण यशोवर्म्याच्या पित्यानें म्हणजे हर्षराजानें कनोजच्या देवपालाला, राष्ट्रकूटांच्या तिसर्‍या इंद्र नामक राजाविरूद्ध साहाय्य केलें होतें असें शिलालेखांतून लिहिलेलें आढळतें. म्हणजे त्याच काळीं कनोजच्या सत्तेला थोडीफार उतरती कळा लागली असावी. ह्या उतरत्या काळाचा फायदा घेऊन यशोवर्म्यानें कनोजच्या सम्राटाचा पराभव केला व त्यापासून वैकुंठाची म्हणजे विष्णूची मूर्ति मिळविली. यशोवर्म्याच्या राणीचें नांव पुष्पा होतें, खजुराहो लेखावरून ( सन ९५५ ) असें दिसतें कीं, ही विष्णूमुर्ति प्रथम भोत ( तिबेट ) च्या राजाजवळ असावी; त्याच्यापासून ती कीरच्या शाहीराजानें मिळविली; व नंतर ती महीपालास प्राप्त झाली. ह्याच लेखावरून असें समजतें कीं चंदेल्लाचा जझ्झोटी येथील राजा कनोज अगर इतर कोणत्याहि सार्वभौमाचा मांडलिक नसून पूर्णपणें स्वतंत्र होता. स्मिथच्या म्हणण्याप्रमाणें भोज व महेंद्रपालाच्या कारकीर्दींत हे चंदेल्ल राजे कनोजचे मांडलिक असून मागाहून ते स्वतंत्र राजे झाले. वि. सं. १०५३ ( इ. स. ९९९ ) च्या एका लेखांत हर्षाला व यशोवर्म्याला परमभट्टारक व परमेश्वर अशीं विशेषणें लावलेलीं आहेत ( इंडि. अँटि. व्हा. १६ पृ. २०२ ). त्यावरून हर्ष हाच चंदेल्लाचा पहिला स्वतंत्र राजा झाला असें अनुमान निघतें.

यशोवर्म्याच्या ( ९२५ ते ९५० ) नंतर चंदेल्लांचा अतिपराक्रमी पुरूष धंग राजा राज्य करूं लागला. खजूराहो लेखांत प्रथमच धंग राजाच्या राज्यविस्ताराच्या मर्यादा दिलेल्या आहेत. त्याच्या राज्याची सीमा उत्तरेस यमुने पासून दक्षिणेस मालवा ( बेटवा ) नदीच्या कांठच्या भास्वत ( भेलसा ) गांवापर्यंत आणि पूर्वेस कालंजरपासून पश्चिमेस गोपाद्री ( ग्वालेर ) पर्यंत होती.

धंग राजाच्या कारकीर्दींचे बरेच लेख सांपडले आहेत. त्यांपैकीं खजूराहोचा लेख ( ९५४ ) मुख्य असून दुसर्‍या दोन महत्वाच्या लेखांचे काल अनुक्रमें स. ९९८ व १००२ असे आहेत. ९९८ च्या लेखांत धंग राजाची तुलना हम्मिराबरोबर केली आहे. त्यावरून ( ९८९-९९० ) कम्मु येथें सबक्तेगिनाबरोबर झालेल्या रणसंग्रामांत धंग राजानें विशेष पराक्रम दाखविला असावा असें दिसतें. फेरिस्त्यानें यास दुजोरा दिला आहे. तो म्हणतो कीं लाहोरच्या जयपाळाच्या मदतीस कालंजर राजा मोठ्या सैन्यानिशीं व खजिन्यासह धांवून आला. ह्या लेखावरून हिंदूंचा जय झालेला दिसतो.

धंगाची कारकीर्द फार मोठी असून तो दीर्घायुषी होता. आयुष्याच्या अंतीं त्यानें गंगायमुनेच्या प्रवाहांत जिवंत जलसमाधि घेतली ( १००० सुमारें ) अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. धंग राजाच्या तिस-या दानपत्रावरुन असें दिसतें कीं, त्याच्या राज्याचा विस्तार काशीपर्यंत झाला असावा. सारांश धंग हा चंदेल्ल वंशांत विख्यात वीर पुरूष होऊन गेला यांत संशय नाहीं. तसाच तो मोठा शिवशक्त होता. त्यानें एक मोठें शंकरांचें देऊळ बांधलें होतें. ह्या काळांत शिव विष्णु, सूर्य किंवा देवी इत्यादि देवतांची उपासना विशेष प्रचारांत होती.

धंगानंतर त्याचा पुत्र गंड गादीवर आला ( १००० ). याला मुसुलमान इतिहासकार नंद म्हणत. याच्या कारकीर्दींत गझनीच्या महंमुदाच्या स्वार्‍या झाल्या. सन १००९ च्या स्वारीच्या वेळीं आनंदपालाला मदत करण्याकरितां गंड यानें आपलें सैन्य पाठविलें. परंतु दोस्तांबरोबर त्याच्याहि सैन्याचा पराभव झाला. महंमूद परत गेल्यावर गंडानें कनोजच्या राजावर स्वारी करून आनंदपालानें दाखविलेल्या भित्रेपणाबद्दल त्याला ठार मारून दुसर्‍या एका राजपुत्रस गादीवर बसविलें. त्याचा सूड घेण्याकरितां महंमुदानें गंडावर ( १०२० ) स्वारी करून त्याचा पराभव केला व पुष्कळ लूट नेली. या लुटीमुळें त्याला आणखी लोभ सुटून त्यानें पुन्हां ( १०२२ ) गंडावर स्वारी केली. गण्डानें लढाई न करतां महंमुदाला पुष्कळ नजराणा देऊन परत लाविलें. या नंतर चंदेल राज्यावर मुसुलमानानीं १७० वर्षेंपर्यंत स्वारी केली नाहीं.

गंडानंतर, विद्याधर, विजयपाल व देववर्मा यांच्या कारकीर्दींत महत्वाच्या गोष्टी घडल्या नाहींत. विद्याधर ( १०२५ ) कच्छपघाट अर्जुन याचा समकालीन होता. याच अर्जुनानें मागें गंडासाठीं कनोजच्या राज्यपालाला ठार मारिलें असें दुबकुंदच्या शिलालेखांत म्हटलें आहे. विजयपालाच्या राणीचें नांव भुवनदेवी होतें; त्यांचा पुत्र देववर्मा होय. त्याच्या मागून त्याचा भाऊ कीर्तिवर्मा याची कारकीर्द सुरू झाली; ती महत्वाची आहे. त्यानें देवगड नांवाचा प्रांत आपल्या राज्याला जोडला व तेथें कीर्तिगिरी नांवाचा किल्ला बांधला, तसेंच जबलपूर जिल्ह्यांतील बलिहि शहर यानेंच बसविलें अशी दंतकथा आहे. यानंतर स. ११०० पासून ११२८ पर्यंत सल्लक्षणधर्मी, जयवर्मा व पृथ्वीवर्मा, या राजांच्या कारकीर्दींत महत्वाच्या गोष्टी झाल्या नाहींत. संल्लक्षणानें माळवा अंतर्वेद व चेदी देश काबीज केले होते.

मदनवर्म्याची कारकीर्द महत्वाची आहे. ( ११२८-६५ ). यानें गुर्जर राजाचा पराभव केला. हा गुर्जर राजा सिद्धराज जयसिंह असावा. मदनवर्म्यानें मदनसागर नांवाचा तलाव बांधला. त्यानें चेदीच्या राजाचा पराभव केला. माळव्याच्या राजाची कत्तल केली व बनारस राजाची मैत्री संपादन केली. पुढें याचा पुत्र यशोवर्मा हा तरूणपणींच वारल्यानें त्याचा मुलगा म्हणजे मदनवर्म्याचा नातु परमर्दी अथवा परमाल हा गादीवर अला ( ११६७ ) याच्या कारकीर्दींत चव्हाण व चंदेल्ल यांच्यांत युद्ध झालें. त्यांत सिर्स्वागड येथें परमालचा पराभव झाला. हें ठिकाण जालनाच्या पश्चिमेस आहे. या वेळेला चंदेल्लांचा हमीरपूरपासून महोबापर्यंत पाठलाग करण्यांत आला. व महोबा पृथ्वीराजाच्या ताब्यांत गेलें. याला मुसुलमान इतिहासकार परमार म्हणतात. कुतुबुद्दीन ऐबक यानें पुढें याजवर स्वारी केली व कालंजर किल्ल्याला वेढा दिला. पुष्कळ दिवस लढून शेवटीं नाइलाजानें परमालनें खंडणी देण्याचें कबूल केलें परंतु आपलें वचन पुरें करण्याच्या पूर्वींच तो मरण पावला. तेव्हां त्याचा प्रधान अजदेव यानें कालंजर किल्ला मुसुलमानास दिला ( १२०३ ). नंतर कुतुबुद्दीनानें महोबा घेऊन कालंजरचा राज्यकारभार सरदाराच्या ताब्यांत दिला.

अशा तर्‍हेनें उत्तर हिंदुस्थानांतील चंदेल्ल राजघराण्याचा इतिहास स. १२०३ मध्यें समाप्त झाला. यापुढें त्या घराण्यापैकीं नांव घेण्यासारखा पुरूष राज्यपदावर बसला नाहीं. परमर्दीच्या नंतर त्रैलोक्यवर्मा ( १२१३ ) व त्याचा पुत्र वीरवर्मा गादीवर आले ( १२६१ ). वीरवर्म्याची राणी कल्याण देवी नांवाची होती. यांचा पुत्र भोजवर्मा होय; तो १२८९ त गादीवर बसला. परमर्दीच्या नंतर हे पुढले राजे मुसुलमानांचे मांडलिक बनले.

चे दे ल्लां चें स त्ता क्षे त्र.-यांचें अर्वाचीन नांव बुंदेलखंड असें आहे. त्यासच प्राचीन नांव जिझ्झोटी किंवा जिजाकभुक्ती असें होतें. कनिंगह्याम म्हणतो कीं पूर्वींच्या या बुंदेलखंडांत ( हल्लींचें ) हमिरपुर, बांडा, ललितपुर, अलाहाबाद व मिरझापुर यांचा कांहीं भाग व सागर व दमो हे जिल्हे येतात. शिलालेखांतील जिजाकमुक्ती प्रांत या प्रांताशीं साधरणत: जुळतो. हुएनत्संगहि याच प्रदेशाला जिजाकभुक्ती म्हणून उल्लेखितो. इब्न बतुता व अलबेरूनी यां यावेळीं या प्रांताची राजधानी खजुराहो होती. हल्लीं हें खेडें असून तें छत्रपुर संस्थानांत महोबाच्या दक्षिणेस ३४ मैलांवर आहे. या प्रातांत ह्युएनत्संग स. ६४१ त आला. त्यानें केलेल्या राजधानीच्या वर्णनावरून खजुराहो ही राजधानी नूसन एरण असावी असें दिसतें. या गांवासंबंधींच्या बुद्धगुप्ताच्या व तोरमाणाच्या शिलालेखावरून हें गांव पांचव्या शतकाच्या शेवटीं व सहाव्या शतकाच्या आरंभीं महत्वाचें होतें व सातव्या शतकांत तें राजधानीचें ठिकाण झालें असावें असें दिसतें.

चंदेल्ल वंशाचा खजुराहोवरील अतिप्राचीन ताबा दाखविणारा पुरावा म्हणजे खजुराहो येथील शिलालेख होय. नं. २ च्या शिलालेखांत यशोवर्म्यानें कांलजर जिंकलें असें आहे. चंदेल्ल वंशानें या यशोवर्म्याच्या राज्यारंभाच्या पूर्वी थोडे दिवस खजूराहो जिंकलें असावें. सारांश सातव्या शतकांत राजधानी एरण असावी व पुढें स. ९०० च्या नंतर खजुराहो झाली असावी असें दिसतें.

दंतकथेवरून छत्रपुर संस्थानांतील मनियागढ हें चंदेल्ल वंशाचें मूळ ठिकाण होतें असें म्हणतात.

खजुराहो हें गांव मूर्तिविध्वंसक मुसुलमानांच्या नेहमींच्या सस्त्याआड एकीकडे होतें म्हणूनच तेथील सुंदर देवालयें वगैरे कायम राहिलीं. उत्तरहिंदुस्थानांतील अतिशय सुंदर अशीं हिंदु देवालयें येथें आहेत. धंग राजाच्या कारकीर्दींत खजुराहो हें भरभराटीच्या शिखरास पोहोंचलें. पुढें गण्ड राजाच्या कारकीर्दींत गझनीच्या महमुदानें चंदेल राजाचा पराभव केला व तेव्हांपासून खजुराहोला उतरती कळा लागली.

चंदेल्लांचें दुसरें शहर म्हणजे महोबा होय. हें खजुराहोच्या उत्तरेस ३४ मैलांवर आहे. येथें व याच्या आसपास चंदेल्ल वंशाची स्मृति अनेक काळपर्यंत कायम राखणार्‍या इमारती व स्थळें असून त्यांत कीर्तिवर्म्यानें बांधलेला कीरत सागर तलाव, राहिलानें बांधलेला राहिलासागर तलाव व एक शिवमंदीर, मदनवर्म्यानें बांधलेला मदनसागर तलाव, व व कर्कामह नांवाचें स्फटिकमंदिर वगैरे स्थळें मुख्य आहेत. महोबा शहराशीं चंदेल्ल वंशांतील सर्व राजांपेक्षां परमर्दि याचाच संबंध जास्त होता. याला पृथ्वीराजानें महोबांतून जेव्हां हांकून लावलें, तेव्हां हा कालंजरला गेला ( ११८२ ). पुढें ( चंदभाट व दंतकथा यांच्या आधारावरून ) परमर्दिनंतर महोबा येथील कारभार त्याचा मुलगा समजरजित हा पाहूं लागला असें दिसतें. हा इ. स. १२०३ मध्यें मुसुलमानांकडून मारला गेला. महोबा हें गांव हल्लीं फार लहान असून हमीरपुर जिल्ह्यांत आहे.

अजयगड हें त्रैलोक्यवर्म्याचें मुख्य ठिकाण होतें. हें हल्लीं याच नांवाच्या संस्थानांत असून खजुराहोच्या जवळ आहे. इ. स. ९३०-९४० यांच्या दरम्यान कालंजर किल्ला चंदेल्ल राजांनीं जिंकला व कीर्तिवर्मा राजानें येथें एक तलाव बांधला. एक दंतकथा अशी आहे कीं, कीर्तिवर्मा राजाचा महारोग या तलावांत स्नान केल्यामुळें बरा झाला. हा किल्ला इ. स. १२०३ मध्यें कुतुबुद्दीन ऐबकनें घेतला. कुतुबुद्दीननें कालंजर घेतल्यानें पुढें चंदल्लांनीं अजयगड येथें राजधानी केली. चंदेल्लांच्य ताब्यांत वरील दोन किल्ल्यांखेरीज आणखी सहा प्रख्यात किल्ले होते. त्यांपैकीं ( १ ) बारीगड हा चरखारी संस्थानांत असून महोबापासून १० मैलांवर आहे.  ( २ ) मौढा हा किल्ला हमीरपुर जिल्ह्यांत आहे. ( ३ ) मनियागड हा किल्ला चंदेल्ल वंशाचें मूळ ठिकाण आहे असें म्हणतात. हा हल्लीं मोडकळीस आलेला आहे. येथील मनिया देवी चंदेल वंशाची कुलस्वामिनी होय. ( ४ ) बांडा जिल्ह्यांत कालंजरपासून १२ मैलांवर मार्का किल्ला होता. हल्लीं तेथें जंगल आहे. ( ५ ) गढा हा किल्ला जबलपूरच्या पश्चिमेस ४ मैलांवर आहे. ( ६ ) किल्ले महियर येथें हल्लीं अलाहाबाद जबलपूर रेल्वेचें स्टेशन आहे.

खजुराहो येथील दंतकथेवरून असें दिसतें कीं चंदेल्ल वंशाचे लोक मूळचे मनियागड येथील असावे; या चंदेल्लांचीं स्वतंत्र नाणीं कोठें कोठें सांपडतात. चेदी राजांच्या व चंदेल्लांच्या नाण्यांत विशेष साम्य आहे. फरक इतकाच कीं चेदींच्या नाण्यांवर दुर्गेचा शिक्का असे तर चंदेल्लांच्या नाण्यांवर हनुमानाचा शिक्का आहे; एकीकडे हनुमान व दुसरीकडे राजाचें नांव असतें. मात्र धंगाच्या पूर्वीच्या राजांचीं नाणीं आज उपलब्ध होत नाहींत. फक्त कीर्तिवर्म्यापासून वीरवर्म्यपर्यंतचीं कांहीं सांपडतात. कर्णदेव चेदीराजाचा पराभव कीर्तिवर्म्यानें केल्यानंतर त्यानें आपलें नाणें पाडलें व तें साधारण चेदीवंशाच्य नाण्याप्रमाणेंच पाडलें म्हणून त्यांत साम्य दिसतें. स्मिथनें हंडि. अँटि. व्हॉ. ३७ मध्यें चंदेल्लांचीं व त्यांच्या नाण्यांची १९०८ पर्यंतची माहिती दिली आहे. कीर्तिवर्म्याचीं नाणीं फक्त सोन्याचीं अस्त व तीं द्रम व अर्धा द्रम अशीं असत. बाबींच्या राजांनीं तांब्यांचींहि नाणीं पाडलीं होतीं. हनुमानाचा उपासक कोणता चंदेल्लराजा होता हें नक्की समजत नाहीं. खजुराहो लेखांत शेवटीं “विनायकपालाच्या कारकीर्दीत” असे शब्द आढळतात रा. वैद्यांच्या मतें हा विनायकपाल म्हणजे कनोजचा महीपाल नांवाचा सम्राट असावा.

 चंदेल्लघराण्यांतील राजांची वंशावळ.

चं दे ल्ल ठा कू र.-चंदेल ठाकुरांच्या खालील शाखा आहेत. ( १ ) चांदे चांदावाल ( २ ) चंदेरी स्थापनाकर्ता-दमखोह. ( ३ ) महोबा मदनवर्मा ( ४ ) कनोज ( सभाजित ). पहिलीं दोन घराणीं ऐतिहासिक कालापूर्वींचीं असून त्यांची माहिती उपलब्ध नाहीं.

इलियटच्या ग्लॉसरीप्रमाणें या वंशांत १८ राजे झाले. एका फरशी बखरीप्रमाणें ८ झाले व एका हिंदी बखरीप्रमाणें १४ झाले. त्यांचीं नांवें पुढें दिलीं आहेत:-

मानवर्मा, ग्यानवर्मा, जानवर्मा, गजवर्मा, कीलवर्मा, सकतवर्मा, भगतवर्मा, जगतवर्मा, रहिलीयावर्मा, सुरजवर्मा, रूपवर्मा, मदनवर्मा, किरातवर्मा, परमालदेव.

कनोज ( चंदेरी ).-ठाकूर कनोजची गादी सं. १२२३. या वर्षीं स्थापिली गेली. या वंशांत जे राजे झाले. ते येणेंप्रमाणें:-

( १ ) सभाजित, ( २ ) ग्यासदेव, ( ३ ) घनश्यामदेव, ( ४ ) विहरदेव, ( ५ ) लहरदेव, ( ६ ) सूपदेव, ( ७ ) वासदेव, ( ८ ) खाखदेव, ( ९ ) धामदेव. शिवराजपूरचें घराणें धामदेवाच्या नंतर अस्तित्वांत आलें. त्या घराण्याचा मूळ पुरूष धामदेव राजाचा मुलगा होय.

               
ओन्हा येथील रावत. साक्रेणचें घराणें. वातपूरचे रावत
सचेन्दि घराणें -गंगातीरीं विहरी गांवीं राहणार्‍या करकाल देवाचा मुलगा हरसिंगदेव यास हिंदुसिंग नांवाचा एक मुलगा होता. हा फार बलिष्ठ असून लोकांनां त्रास देत असे; म्हणून तेथील राजानें त्यास आपल्या राज्यांतून हांकलून लाविलें. तो तापासपीहि येथें जाऊन राहिला. यानें पुढें बनौर व सचेंदि येथें किल्ले बांधले व मोठी फौज जमवून आसपासचे प्रांत काबीज केले. त्यानें सचेंदी येथें गादी स्थापन केली.
                    
     

गजराजदेव मेल्यानंतर कम्पनदेव व हरसिंगदेव या दोघांत भांडण उपस्थित झालें. राणीनें कंपनदेवास गादी दिली. हरसिंगदेव तेथून निघून बनौरला आला व त्यानें तेथें नवें राज्य स्थापन केलें. [ संदर्भग्रंथ.-वैद्य-मध्ययुगीन भारत भा. २; माबेल डफ; जर्नल ए. सो. बंगाल. पु. १; इंडियन अँटिक्वरी. पु. ३२; सतिप्रसादकृत चंदेल्ल घराण्याचा फारसा इतिहास ].

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .