विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चंदीपुर - हें बंगालच्या बालासोर जिल्ह्यांतील एक खेडें आहे. हें समुद्रकांठीं बुर्हाबलंग नदीच्या मुखावर आहे. येथील लोकसंख्या सन १९०१ त ६२७ होती. येथें तोफखाना आहे व तोफा पारखण्याकरितां आर्डनन्स प्रूफ खात्यानें समुद्रांत एक जागा बांधली आहे. समुद्रकांठची हवा खाण्यास लोक येथें येत असतात. बालासोरपासून चंदीपूरपर्यंत बी. एन. रेल्वेचा एक फाटा निघणार आहे. येथें मच्छिमारीचा धंदा बराच चालतो.