विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चंदगड - मुंबई इलाखा. बेळगांव जिल्हा. बेळगांवच्या पश्चिमेस २२ मैलांवर चंदगड पेट्यांचें हें मुख्य ठिकाण आहे. येथील रवळनाथाच्या देवळांत एक फारसी लिपीत शिलालेख आहे. येथें एक पडकी मातीचा गढी आहे. १७२४ साली सावंतवाडीचा प्रसिध्द फोंड सावंताचा पुत्र नागसावंत यानें चंदगड पेटा लुटला होता. पुढें १७५० साली पेशव्यांचें व सदाशिवराव भाऊंचें भांडण झाल्यावरुन सदाशिवराव भाऊंनी कोल्हापूर सरकारच्या पेशवेपदाचा मान आपणांस मिळवून चंदगड, पारगड आणि काळानंदीगड व सालिना ५००० रुपये उत्पन्नाचा मुलुख आपणांस कोल्हापूर सरकाराकडून मिळविला होता.