विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चतुर साबाजी – या पुरूषाबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही. कांही बखरीत तो निजामशाहीत तर कांहीत आदिलशाहित झाला असें म्हटलें आहे. तसेंच त्याच्या कालाबद्दलहि नक्की असें म्हटलें आहे. तसेंच त्याच्या कालाबद्दलहि नक्की माहिती नाही.शहाजीच्या वेळी हा झाला व शहाजी आणि मुरार जगदेव यांच्या विरूध्द पक्षास हा होता. याला शहाजीची भरभराट पहावली नाही व तो त्यामुळें मोंगलास मिळाला वगैरे गोष्टी बखरींतून आढळतात. फक्त एक गोष्ट सर्वसामान्य आढळते, ती ही की, यांचें नांव साबाजी अनंत असून आडनांव चतुर होतें. व यानें जमीनीची मोजणी करून उत्कृष्ट धारेबंदी अंमलांत आणिली. याची मोजणीची काठी सात हातांची होती. यानें ओसाड जमीनी कौल देऊन लागवडीस आणल्या, रयतेस तगाई, जनावरें दिलीं. याच्या चतुरपणाच्या अनेक गोष्टी (बिलबलप्रमाणे) प्रसिध्द आहेत. महाराष्ट्रसारस्वतांत तर याला पेशवाईअखेरचा म्हटलें असून यानें रावणगर्वपरिहार वगैरे काव्यें केल्याचें म्हटलें आहे. [शिवप्रताप; शिवदिग्विजय; मराठी रियासत; महाराष्ट्रसारस्वत].