विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चंडी - उद्दालक ऋषीची विपरीत स्वभावाची स्त्री. त्यानें तिला कांही दिवस विपरीत आज्त्रा देऊन आपल्या मनाप्रमाणें वागावयास लाविलें पण एकदां श्राध्दप्रंसगी तिनें सर्व यथासांग केल्यावर पिंड भागीरथीत टाकण्याऐवजी अमंगल स्थली टाकल्यामुळें ती शापानें शिला झाली. ती पांडवांचा अश्वमेधीय अश्व आला त्या वेळी अर्जुनाच्या स्पर्शानें पूर्वरूप पावली [जै. अश्वमेध, अ. १६].