विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चंगर - पंजाबांतील एक जात. लो.सं. १९११ ४०४०७. हें मुख्यत्वें मुसुलमान आहेत. चंगरद ही जात मूळची रानटी असून पुष्कळ दिवसांपूर्वी सुलतानच्या शामा ताब्रेझनें तिला मुसुलमान करून घेतलें असें सांगतात. ही एक जिप्सी जात आहे असें यांच्या भटक्या संवयीव रून वाटतें. चंगर लोक कामाकरितां गांवोगांव भटकतात ते वाटेल तें काम करितात. परंतु विशेषत पीक कापणें टोपल्या बनविणें, गाडया हांकणे हीं यांचीं कामें होत. काश्मीरांतहि थोडें चंगर आहेत [से.रि (पंजाब) १९११].