विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चंगनाचेरी - मद्रास इलाख्याच्या त्रावणकोर संस्थानांतील चंगनाचेरी तालुक्याचें हें मुख्य ठिकाण आहे. येथील लोकसंख्या सन १९११ त १७२४२ होती. येथें आठवडयांतून दोनदां मोठा बाजार भरतो व त्यांत तांदूळ, गिरीं, सुंठ सुपारी व कापडाचा व्यापार होतो. हें राम अय्यन दलव नांवाच्या त्रावणकोरच्या महाराजा (मांर्तडवर्मा) यांच्या प्रधानानें सन १७५० त जिंकून त्रावणकोरच्या राज्यास जोडिलें.