विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चक्रपाणि - इ.स.१०७५ आणि ११०० यांच्या दरम्यान चक्रपाणि नांवाचा कवि उदयास आला. गंगाधर कवीच्या शके १०५९ (स. ११३७) सालच्या शिलालेखांत त्याचा उल्लेख आला आहे व श्रीधरदासाच्या सदुक्तिकर्णामत (इ.स.१२०५) नांवाच्या पुस्तकांत, ज्या चक्रपाणिच्या कविता आल्या आहेत तो हाच चक्रपाणी असावा असें दिसतें.