विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चकिया.- संयुक्त प्रांतांतील मिर्झापूर जिल्ह्यांतील एक तहसील. बनारस इस्टेटीचा हा एक भाग आहे. लोकसंख्या (१९११) ७०३८३. उत्तरेचा भाग सुपीक आहे. तेथें तांदूळ पिकतो. डोंगरसपाटीवरील भाग जंगलांनीं व्याप्त आहे. त्यांतील पुष्कळसा भाग शिकारीसाठीं राखून ठेवला आहेत. क्षेत्रफळ ४७४ चौ. मैल १६० चौ.मै. जमीन लागवडीखालीं आणली आहे. ही तहसील स्वतंत्र जमीनदारी आहे व हींतून सरकारांत महसूल जात नाही.