विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चकवाल, त ह सी ल - पंजाबांत झेलम जिल्ह्यांत वायव्येकडील तहसील. यांचे क्षेत्रफळ ९९९ चौ. मैल असून उ.अ. ३२ ४५ ते ३३ १३ व पू.रे.७२ ३२ ते ७३ १३ मध्यें आहे. १९११ मध्यें लोकसंख्या १७५२३६ होती. यांत चकवाल मुख्य ठाणें व २५१ खेडीं आहेत. १९०३ मध्यें जमीनसारा व कर ३.३ लाख होता.
श ह र - चकवाल तहशिलीचें मुख्य ठाणें. झेलम शहराच्या बरोबर पश्चिमेस ५५ मैलांवर लुल्लीपटटी मैदानांत उ.अ. ३७ ५६ व पू रे ७२ ५ त आहे. १९११ मध्यें लोकसंख्या ६४००. मद्यापासून चकवालपर्यंत लहान आगगाडी सुरू करण्याचा विचार आहे. येथें एक अँग्लोव्हरन्याकुलर शाळा व सरकारी दवाखाना आहे.