विभाग तेरावा : घ - जलपैगुरीङ - या वर्णाला आजचें स्वरूप प्राप्त होण्यास तीन अवस्थांतून जावें लागलें. बुध्दगया येथील स्तंभावर पहिल्या अवस्थेंतील ङ दिसतो. यांतील ङ चौकोनी कंसासारखा आहे. राज यशोधर्माच्या वेळच्या मंदसोर लेखांत (इ.स.५३२) ‘ङ्शो’ या जोडाक्षरांत दुस-या अवस्थेंतील ङ आहे. ड वर्णासारखी दिसणारी तिसरी अवस्था उदयादित्याच्या वेळच्या (११ वें शतक) उज्जनीच्या लेखांत पहावयांस सांपडेल.