विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घोळ - हिच्या मोठी व चिलघोळ अशा दोन जाती आहेत. हिची महाराष्ट्रांत मुद्दाम लागण करीत नाहींत. उत्तर हिंदुस्थानांत करतात. तिकडे तिला ‘कुलफा’ असें नांव आहे. हिची भाजी करतात.
घोळीच्या दोन जाती आहेत. एक लहान किंवा रानघोळ व दुसरी मोठी किंवा राजघोळ. रानघोळीचीं पानें रंगानें फार तांबूस व राजघोळीपेक्षां लहान परंतु चरबट अशीं असतात. राजघोळीचीं पानें व झाडें जरा मोठीं असून किंचित कोमल असतात. घोळीची भाजी थंड असून अमांशादि उपद्रव करणारी आहे.