विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

घोसाळें -  या वेलास लॅटिन नांव लफ्फा इजिप्टिआका मराठी शिराळें-पारोसे इत्यादी नांवें आहेत. या वेलाचीं फुलें पिवळीं असतात. फळें आंखूड  (६ ते ९ इंच) अगर लांब  (१२ ते १८ इंच) व घडदार (एकाच देंठास ४I६ फळें ३I४ इंच लांब) असतात. याचीं आळीं मृगाच्या सुमारास घालतात. वेल कुंपणावर, झाडावर, मांडवावर अगर छपरावर चढवितात. वेल सर्व पावसाळाभर वाढतात. हिवा
ळयांत फळें यावयास लागतात. पाणी घातल्यास उन्हाळयांत वैशाखापर्यंतहि फळें येतात. फळांची भाजी, भजीं व भरीत करितात. भजीं फार उत्तम होतात. वाळलेल्या फळांचा सांगडा खाजविण्याकरितां अगर लांकडांस पॉलिश करण्यास उपयोगी पडतो. तो फार चिवट असतो. बीं पांढरें, करडें अगर काळें असतें. परंतु तें दोडक्याच्या बींसारखें खडबडीत नसतें. घोसाळीं बाजारांत दोडक्यापेक्षां महाग विकतात.

शि रा ळे क डू वस्तुक्षेत्र. - हा वेल  हिंदुस्थानांत सर्वत्र व विशेषत; पश्चिम बाजूस सांपडतो.

उ प यो ग - या वेलीच्या फळांचा एतद्देशीय औषधींत उपयोग करतात. भाजलेल्या फळांचा रस काढून तो कानशिलास लावला असतां डोकें दुखण्याचें थांबतें असें म्हणतात.

ए ल ए जि प्टि आ का. - लफ्फा वर्गातील तिसरी जात. हिची नांवें घीआ-तरई,  धुंडुल, भोल, लीआसद दिलपसंत घोसाळी इ.