विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घोशी - संयुक्तप्रांत. अजमगड जिल्ह्यांतला एक तालुका. क्षेत्रफळ ३६७ चौ.मै.हा तालुका १९०४ मध्यें बनविण्यांत आला. लोकसंख्या (१९११) २४५२६५. शहरें दोन दोहरीघाट व कोपागंज, व खेडी ७३६ आहेत. सारा २७२००० रू.व कर ४६०००. हा छोटी शरयु व टोन या नद्यांच्यामध्यें असल्यानें पुरामुळें वगैरे नुकसान होण्याचा संभव असतो.