प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

घोरपडे -  घोरपडयांचें मूळचें उपनांव भोसले. हें एक मराठयांचें मोठें घराणें आहें. बहामनी राज्यांत त्यांनीं कोंकणांतील एक किल्ला घोरपडीच्या साह्यानें वर चढून सर
केला, तेव्हांपासून त्यांस हें नांव प्राप्त झाले. विजापुरच्या राज्यांत त्यांस देशमुखी होती. कापशीकर, मुघोळकर, सोंडूरकर, दतवाडकर व गुत्तीकर अशीं घोरपडयांची अनेक घराणीं इतिहासांत प्रसिध्द आहेत. घोरपडयांचें घराणें पुष्कळ जुनें असून त्यास ‘हिंदुराव’ हा किताब बहामनीं राज्यांतून व ‘अमीर-उल-उमराव’ हा किताब आदिलशाहींतून मिळाला होता. कोल्हापूर प्रांताची देशमुखी व सर देशमुखी आदिलशाहींतून कापशीकर घोरपडयांस मिळाली असावी. कापशीकर म्हालोजी घोरपडे आदिलशहास सोडून शिवाजीस मिळाला. म्हालोजीचे मुलगे संताजी, बहीरजी व मालोजी हे पुढें मराठशाहींत उदयास आले.

घो र प डे इ च ल क रं जी क र :-  यांची बरीचशी माहिती ज्त्रा.  को.  च्या आठव्या विभागांत इचलकरंजी या नांबाखालीं आली आहे. तिच्या विरहीत जास्त माहिती येथें देतों. सातारचे महाराज व करवीरकर यांच्या दौलतींच्या इतिहासांत इचलकरंजी संस्थानाचा उध्दव, विस्तार व त्यावर आलेली नाना संकटांची परंपरा यांची गुंतागुंत झालेली असल्यामुळें इचलकरंजी संस्थानाचा इतिहास म्हणजे मराठी राज्यांतला अंतकल हाचा व विशेषेंकरून इचलकरंजी व करवीर या संस्थानां मधल्या कलहांचा इतिहास होय. इचलकरंजीकर घोरपडयांचें उपानम वरवडेकर जोशी. या घराण्याच्या मूळपुरूषाचीं (नारोपंताची) माहिती कापशीकर घोरपडयांच्या हकीकतींत आली आहेच.

व्यंकटराव नारायण हा नारोपंताचा पुत्र. नारोपंत मरण पावले तेव्हा त्यांचें कुटुंब बहिरेवाडी येथें रहात होतें. पंताच्या मृत्यूचें वर्तमान पिराजी घोरपडे यांस कळतांच ते बहिरेवाडीस आले. पंतांची स्त्री लक्ष्मीबाई व पुत्र व्यंकटराव यांची भेट झाल्यावर ते फार कष्टी होऊन बोलले कीं, “आमचे वडिलांनीं नारोपंतास पुत्राप्रमाणें मानून त्यांचें कल्याण केलें; तें स्मरून नारोपंतांनीं आमचे वडील वारले तेव्हां आम्ही नेणतीं मुलें होतों, तरी आमच्या दौलतीसाठीं बहुत खस्त खाल्ली. त्यांनीं भाऊपणाचें उत्तम सार्थक केलें. त्यांचे तुम्ही पुत्र आहां ते आमचेच आहां. आमचे देशमुखी सरदेशमुखीचें वतन मिरजप्रांतीं आहे तें आमचे वडिलांनीं व आम्हीं नारोपंतांकडे वहिवाटीस दिलें होतें. तेच वतन आम्ही तुम्हाकडे चालू ठेवितों.” असें म्हणून पिराजी परत गेला.

नारोपंतांच्या हृयातींत सेनापतीकडून व इतरांकडून इचलकरंजी, आजरें, आरग, मनेराजुरी, म्हापण, बहिरेवाडी व शिपूर इतकीं खेडीं त्यास इनाम मिळालेंली होतीं. शिवाय तर्फ आजरें येथील एकतर्फी खेडयांची वहिवाट व प्रांत मिरज येथील देशमुखीची वहिवाट सेनापतींकडून पंताकडे चालत होती. हें सारें उत्पन्न सालिना तीस चाळीस हजारांचे होतें. शिवाय करवीर राजमंडळांपैकीं सचिवाचें पद त्यांस मिळाले होतें (१७११) त्याचा सरंजाम ते उपभोगीत होते; व सेनापतीच्या संस्थानाचा कारभार त्यांजकडे असल्यामुळें त्यासंबंधींहि त्यांची प्राप्ति बरीच असावी. पण पंत वारल्यावर संभाजीनें सचिवाचें पद व्यंकटरावास दिलें नाहीं व सेनापतींनींहि त्यांच्या हातीं कारभार ठेविला नाहीं. कारण कीं नारोपंतांचे पुरस्कर्ते रामचंद्रपंत अमात्य हे यापूर्वीच वारले होते व व्यंकटरावांचें नीट बनत नव्हतें. अशा वेळीं व्यंकटराव यांची नजर शाहूचा आश्रय संपादण्याकडे लागली. पेशव्यांच्या द्वारें तिकडे त्यांचा वशिलाहि चांगला होता. पेशव्यांनीं त्या वेळेपासून त्यांची सोय, उत्पन्न व अधिकार वाढविण्याचा हळू हळू उपक्रम सुरू केला.

पेशव्यांच्या विनंतीस अनुसरून शाहूनें व्यंकटरावास सन १७२२ त शिरढोण हा गाव व पुढच्या वर्षी मनेराजुरी दणी, आरग व म्हापण हे गांव इनाम दिले. त्याच्या पुढच्या वर्षी उत्तूर हा गांव इनाम दिला. या सालीं (१७२४) व्यंकटराव यांच्या नांवें निराळा सरंजामजाबता करून दिला. मागलें (१७०३) सरंजामजाबत्यांत व्यंकटरावांनीं कापशीकरांच्या हाताखालीं चाकरी करावी असें ठरलें होतें. परंतु आतांच्या जाबत्यामुळें त्यांचा कापशीकर व करवीरकर यांशीं अजीबात संबंध तुटला व ते शाहू महाराजांचे स्वतंत्र सरदार झाले.

व्यंकटराव व अनूबाई हीं दोघेंहि आतां वयांत आलीं होतींक्त पेशव्यांनीं (१७२२) व्यंकटरावास रहाण्यांकरितां पुण्यांत वाडा बांधून दिला. आणि तेथच्या संसाराच्या सोईकरितां त्यास वडगांव (चाकण) हा सबंध गांव, पर्वतीनजीकचा बाग व हडपसर येथील बाग इनाम दिला.

याप्रमाणें पुण्यांत रहाण्याची सोय झाल्यामुळें व्यंकटराव वर्षांतून कांहीं दिवस तेथें रहात असत. त्यांस दोन अपत्यें झालीं. पहिली कन्या वेणूताई व दुसरा पुत्र नारायणराव ही वेणूताई ही पुढें पेशवाईंतले प्रसिध्द सरदार त्रिंबकराव मामा पेठे यांस दिली.

इ.स.१७३० मध्यें सातारकर व करवीरकर यांच्या दरम्यान वारणातीरीं जी लढाई झाली तींत व्यंकटराव घोरपडे हे करवीरकरांकडून लढत होते. सभोवतीं संभाजींचें राज्य आपण दूर एकटे पडल्यामुळें अपली काय जीं खेडीं आहेत तीं तात्काळ हातचीं जाऊन नाश होईल, या भयानें ते त्यांच्या फौजेंत हजर झाले असावे. या लढाईत करवीरकरांचा पराभव होऊन भगवंतराव अमात्य व्यंकटराव घोरपडे वगैरे करवीरकरांकडील प्रमुख असाम्या कैद झाल्या. शेवटीं बाजीराव पेशव्यांनीं दहा हजार रूपये दंड भरून आपल्या मेहुण्याची सुटका करून घेतली.

यापुढें शाहूनें आपल्याजवळ रहाण्याविषयीं व्यंकटरावास आज्त्रा केल्यावरून साता-यास ते राहिले. पूर्वी त्यांचें पथक पांचशें स्वारांचें असतां आतां सातशें स्वारांचे झालें. त्या पथकास शाहूकडून सरंजामास यावेळीं आणखी कडलास, पापरी व बेडग हे गांव मिळाले व वाडा बांधण्याकरितां सातारा येथें जागा मिळाली. त्या पेठेचें अद्यापि व्यंकटपुरा हें नांव प्रसिध्द आहे.

व्यंकटरावांचे पुत्र नारायणरावतात्या यांचें लग्न याच वेळीं झालें. त्यांच्या स्त्रीचें नांव लक्ष्मीबाई. पूर्वी व्यंकटराव लहान होते तोंच त्यांच्या वडिलांनीं देशमुखीचा मामला त्यांच्या हवालीं करून व त्यांस वडिलांनी देशमुखीचा मामला त्यांच्या हवालीं करून व त्यांस त्र्यंबक हरि पटवर्धन हे दिवाण नेमून देऊन त्यांजकडून त्या वतनाचा करभार करविला. तसेंच आतां नारायणराव वयांत येण्याच्या पूर्वीच व्यंकटरावांनीं तीच देशमुखी त्यांच्याहि हवालीं केली व त्र्यंबक हरि यांसच त्यांचे दिवाण नेमून दिले. (१७३३).

सन १७३९ त व्यंकटरावांनीं इचलकरंजीचें ठाणें वसवण्याची सुरूवात केली. गांवकुसवापैकीं अमुक उंचीचा व रूंदीचा भाग रयतेपैकीं प्रत्येक कुळानें बांधून द्यावा, याप्रमाणें ठराव करून त्यांनीं गावक-यांकडून सक्तीनें गांव कुसूं घालविलें.

वसईची मोहिम चालू असतां व्यंकटरावांनीं गोव्यावर स्वारी करून तेथें फिरंग्यांचा पुरा मोड केला व ते परत देशीं आले (१७३९). त्या वेळीं शाहूमहाराज  मिरजेच्या किल्ल्यास वेढा घालून बसले होते. त्यांच्या लष्करांत व्यंकटराव चांरशे स्वारानिशीं येऊन दाखल झाले. त्यावेळी इंग्रजांकडून गॉर्डन नांवाचा वकील शाहूमहाराजांकडे आला होता. यानें त्या वेळची अशी एक बातमी लिहून ठेविली आहे कीं “गोवेकर पोर्च्यगीज लोकांनीं सहा लक्ष रूपये देण्याचें कबूल करून मराठयांशीं (व्यंकटरावांशीं) समेट करून घेतला. त्यांपैकीं त्यांनीं पस्तीस हजार रूपये रोख व एक लक्ष पस्तीस हजार रूपये किमतीचीं ताटें तबकें वगैरे चांदी दिली. सर्व रकमेचा फडशा होईपर्यंत मराठी फौज गोंव्याच्या आसपास रहावयाची आहे व गोवेकरांनीं तिच्या खर्चाकरितां दरमहा दोन हजार रूपये देण्याचें कबूल केलें आहे.” गोव्यावरच्या स्वा-यांत व्यंकटरावांनीं जितका मुलूख जिंकिला होता तितका सर्व शाहूमहाराजांनीं त्यांजकडे जहागीर म्हणून वहिवाटीस ठेविला. त्या मुलखाच्या आसपास कोल्हापूरकरांचे कांहीं टापू असल्यामुळें त्यांशीं नेहमीं तंटें होतील या भयानें ते टापूहि व्यंकटराबांनीं संभाजीपासून कमविशीनें घेतले होते. गोव्याच्या स्वारीहून परत आल्यावर करवीरकर संभाजी यांनीं व्यंकटरावांस सुळकूड, टाकळी व दोन्ही शिर्दवाडें मिळून चार गांव इनाम दिले.

मिरज प्रांतीं मोंगलांचा अंमल होता तेथपर्यंत (१७४०) तिकडचा देशमुखीचा अंमल व्यंकटरावांस कधींच सुरळींतपणें मिळाला नाहीं. मोंगलाई मुलुखांत महाराजांची देणगी जरी असली तरी तिजवर मोंगल अधिकारी मोंगलबाब म्हणून एक कर घेत असत. पन्हाळा प्रांतीं शाहूमहाराजांनीं व्यंक
टरावांस देशमुखी दिली होती त्याबद्दल जिजाबाईचा कार भार सुरू झाल्यावर करवीर दरबारानें व्यंकटरावांजवळ इनाम तिजाई मागितली परंतु ती त्यांनीं देण्याचें साफ नाकारिलें. त्यामुळें यापुढें करवीरकर व व्यंकटराव यांच्या नेहमीं कटकटी होत. एकदां तर इचलकरंजीवर करवीरकरांनीं चाल केली होती परंतु त्या वेळीं त्यांचा पराभव झाला (१७४२).

गोव्याच्या स्वारीहून परत आल्यावर व्यंकटराव कांहीं दिवस साता-यास होते. त्यानंतर आणखीही एकदोन  मोहिमांत ते नानानाहेब पेशव्यांच्या  फौजेबरोबर चाकरी करीत होते. पुढें १८४३ पासून त्यांच्या शरीरावर क्षयरोगाचा पगडा दिवसेंदिवस हळू हळू बसत चालला या आजारांत एके जागीं राहून त्यांच्या प्रकृतीस बरें वाटेना, म्हणून ते इचलकरंजी, नांदणी, टाकळी, उत्तूर या ठिकाणीं रहात असत. त्या काळीं देवधर्मांवर व भुतांखेतांवर लोकांचा विश्वास फार असे. सदलगें येथें कोणी प्रसिध्द देवरूषी होता त्याजकडून कांहीं दैवी उपाय करविण्याकरितां ते सन १७४५ त कुटुंबसुध्दां जाऊन राहिले होते. तेथेंच त्यांचें देहावसान झालें.

व्यंकटराव हे शूर व कर्तृत्ववान् पुरूष होते. करवीर व सातारा या दोन्ही दरबारांत त्यांचे वजन चांगलें असे. इचलकरंजी संस्थानाच्या इतिहासांत त्यांनीं शाहूमहाराजांची स्वतंत्र सरदारी मिळविली ही गोष्ट महत्वाची आहे. ही सरदारी मोठया योग्यतेची होती. त्यांचा ‘ममलकत मदार’ हा किताब शाहूनें मान्य केल्याचें सरंजामजाबत्यावरून स्पष्ट होतें.

ना रा य ण रा व व्यं क टे श व अ नू बा ई. -  यापुढें नारायणरावतात्यांची कारकीर्द येते. ही कारकीर्द पंचवीस वर्षाच्या अवधीची असून तींत इचलकरंजी संस्थानाच्या वैभवाचा कळस झाला म्हटलें तरी चालेल. त्या संस्थानाचें वैभव इतकें वृध्दिंगत होण्यास तात्यांची करामत कारण नसून त्यांच्या मातोश्री अनूबाई यांचेच कर्तृत्व होय. (अनुबाई पहा.) मुलगा संस्थानाचा कारभार व सरदारीचा बोजा सांभाळण्याजोगा होण्यापूर्वीच व्यंकटराव वारले त्यामुळें तीं दोन्ही कामें नीट चालतील अशा तजविणी योजणें अनूबाईंचें कर्तव्य होतें.

नानासाहेब पेशवे व त्यांचे बंधू हे अनूबाईचे भाचे असल्यामुळें त्यांनीं तात्यांचा पुरस्कार करण्याचें मनावर घेतलें व त्यांच्या वडिलांकडे सरदारी होती तीच त्याजकडे कायम करून प्रत्येक स्वारींत त्याजकडे कांहींना कांहीं तरी कामगिरी सोंपविली इतकेंच नव्हें तर इनामें तैनाता देऊन मोठमोठया मामलती सांगून व मुलुखगिरींत संस्थानिकांकडे खंडणी करार करण्याच्या बोल्या त्यांजवरच सोंपवून त्यांस लाखों रूपये मिळवून दिले. व्यंकटराव वारल्यावर शाहूनें सबंध आजरे महाल अनूबाईस इनाम करून दिला.

पूर्वी गोकाकचा देसाई शिवलिंगप्पा म्हणून होता. त्यानें बंडावा केल्यामुळें सावनूरचा नबाब अबदुल मजीदखान यानें त्यावर स्वारी केली. तेव्हां तो देसाई पळून चिकोडीकर देसायाच्या आश्रयास जाऊन राहिला. नबाबानें त्याचें देसगतीचें वतन त्याचाच भाऊ अमीन आप्पा म्हणून होता त्यास दिलें. इकडे चिकोडीकरानें शिवलिंगप्पास दगा करून मारून टाकिलें व त्याचे मुलगे लखमगौडा व शिवरामगौडा म्हणून होते त्यांस कैदेंत ठेविलें. प्रस्तुतच्या प्रसंगीं त्या दोघां मुलांनीं आपली मुक्तता करण्याविषयीं प्रार्थना केली व त्यांनां आश्रय दिला.

यावेळीं पेशवें कर्नाटकांत आले होते व त्यांचा धारवाड काबीज करण्याचा मनसबा ठरला होता. तेथें मोंगलांचा किल्लेदार पृथ्वीसिंग म्हणून होता. त्याजकडे राजकारण करून शिबंदी खर्चाबद्दल त्यास ३५००० रूपये देऊन तारीख १३ रोजीं श्रीमंतांनीं तो किल्ला व त्याखालचा सरंजाम ताब्यांत घेतला व तेथील मामलत तात्यांस दिली. पुन: सन १७५४ च्या कर्नाटकाच्या मोहिमेंत महादजीपंत पुरंदरे व नारायणरावतात्या हेच मुख्य सरदार होते. पुरंदरे व तात्या यांनीं प्रथमच गोकाकचें ठाणें देसायापासून हिसकावून घेऊन माजी देसायाचे दोन मुलगे तात्यांच्या आश्रयास राहिले होते त्यांसच त्यांनीं या वेळीं हें देसगतीचें वतन देऊन गोकाकचें ठाणें आपल्या ताब्यांत ठेविलें. देसायाच्या मुलांनीं यावेळीं कृतज्त्रताबुध्दीनें हुनशाळ हा गांव तात्यांस इनाम दिला. नंतर हें लष्कर श्रीरंगपट्टणापर्यंत जाऊन त्यानें कित्तुर, सोंदें, सावनूर, बिदनूर, चित्रदुर्ग, रायदुर्ग, श्रीरंगपट्टण, बसवापट्टण, कनकगिरी या नऊ संस्थानांपासून एकंदर खंडणी ३८७०००० रूपये घेतली. संस्थानिकाशीं खंडणीचा ठराव तात्या यांच्या विद्यमानें होत असे. सन १७५५ च्या मे महिन्यापर्यंत हा मजकूर झाला. नंतर तात्यांनीं पाच हजार फौजेसह धारवाडास छावणीस रहावें याप्रमाणें पेशव्यांचा हुकूम झाल्यावरून पुरंदरे पुण्यास गेले व तात्या धारवाडास राहिले. स्वारीच्या सुरूवातीस गोकाक परगणा तात्यांनीं घेतला होता त्याची मामलत पेशव्यांनी त्यांसच सांगितली.

सन १७५६ च्या सावनूरच्या मोहिमेंत तात्या व अनूबाई हजर होती. पुढें तात्यांच्या शरीरीं आराम नसल्यामुळें ते परत इचलकरंजीस आले. परंतु सरदार व मुत्सद्दी व फौजेसुध्दां अनुबाई श्रीमंतांच्या स्वारीबरोबर राहिल्या. यावेळीं काबीज केलेला मर्दनगड इचलकरंजीकरांचडेच ठेवावा असें मनांत आणून श्रीमंतांनीं त्यांचेंच लोक किल्ल्यांत ठेविले. नंतर श्रीमंतांनीं पटवर्धन व इचलकरंजीकरांचे कारभारी यांस धारवाड प्रांतीं छावणीस ठेवून त्या प्रांतांची मामलत पटवर्धन, इचलकरंजीकर व विठ्ठल विश्राम या तिघांस सारखी वाटून दिली. पूर्वीचा व हल्लींचा नवीन मिळालेला मुलूख मिळून हा धारवाडचा सुभा इचलकरंजीकरांच्या ताब्यांत आला. त्या वेळीं सुभ्याचें क्षेत्र फार मोठें असून त्याखालीं मिश्रीकोट, धारवाड वगैरे तेरा परगणे होते. खुद्द धारवाडचा किल्ला अनूबाईच्या ताब्यांत होता. बाकींची ठाणीं व परगण्यांतील किल्ले अनूबाईंनी आपल्या तर्फेनें त्या त्या परगण्याच्या मामलेदारांच्या ताब्यांत दिले होते. याशिवाय वल्लभगड, पारगड, भीमगड, कलानिधि, खानापूर व चंदगड हीं ठाणीं व कितूर संस्थानांपैकीं बागेवाडी हीं सर्व गेल्या तीन सालांत पेशव्यांनीं इचलकरंजीकरांच्या हवालीं केलीं होतीं. परगणा कंकणवाडी हाहि त्याजकडे पेशव्यांकडून मामलतीनें होता. एवढा हा मोठा धारवाडचा सुभा जो इचलकरंजीकरांकडे दिला होता त्याचा वसूल सरकारांत नियमितपणें यावा म्हणून येसाजीराम व रामचंद्र नारायण हे पेशव्यांच्या तर्फे सुभ्याची वहिवाट करण्यास नेमिले होते व वसुलाबद्दल पेशव्यांस व बंदोबस्ताबद्दल इचलकरंजीकरांस ते जबाबदार होते. रायबागची कमाविशीहि पेशव्यांकडून याच वेळीं तात्यांस मिळाली होती.

तात्या या लाडांत वाढलेला अनूबाईचा एकुलता एक मुलगा. त्याचे वडील व्यंकटराव यांनीं त्यास लहापणींच देशमुखीच्या कामांत घालून राज्यकारभाराचा ओनामा पढविला होता. परंतु दुर्दैवानें तात्यांस एकविसावें वर्ष लागतें तोंच वडील मृत्यू पावून सर्व कारभार  अनूबाईस पहाणें प्राप्त झालें. बाईची हिंमत, धोरण व महत्वाकांक्षा जबरदस्त होती. त्यांचे भाचे नानासाहेब पेशवे भाऊसाहेब दादासाहेब यांजवर त्यांची चांगली छाप होती. तात्यांस त्यांनीं स्वतंत्रपणें कधीं वागूं दिलें नाहीं. ‘हें लहान पोर याला काय समजतें!’  अशा भावनेंनें अनूबाई त्यास जन्मभर वागवीत गेल्या. तात्या  हे सरदारीचे मालक नांवाचे मात्र होते. या सर्व गोष्टींचा परिणाम तात्यांच्या मनावर प्रतिकूल रीतीचा होऊन बाईच्या ओंजळीनें पाणी पिण्याचा त्यांस कंटाळा येंऊ लागला. संस्थानांतील लबाड लोकांनीं तात्यांस भर देऊन आई व तिचे कारभारी यांविषयीं त्यांच्या मनांत वितुष्ट उत्पन्न केलें.

सन १७५७ च्या प्रारंभीं नानासाहेब व भाऊसाहेब श्रीरंगपट्टणच्या स्वारीस आले. स्वारींत अनूबाई नव्हत्या. तात्या धारवाड प्रांतीं फौजेसह होते. त्यांस श्रीमंतांच्या स्वारींत हजर रहाण्याविषयीं अनूबाईनीं लिहून पाठविले. तेव्हां वर सांगितलेल्या वितुष्टाचा प्रकार प्रथम उघडकीस आला. तात्या श्रीमंतीबरोबर स्वारीस गेले नाहींत. अनूबाईंच्या हाती कांहीं सत्ता नसावी, सर्व कारभार आपल्या हातीं असावा, मन मानेल त्याप्रमाणें वागण्यास आपणास कोणाची आडकाठी नसावी ही त्यांची इच्छा आतां उघड रीतीनें दिसू लागली. स्वारी आटोपून श्रीमंत परत पुण्यास गेले तेव्हां अनूबाईचें ह्मणणें पडलें कीं, तात्यांनी आपणाबरोबर पुण्यास श्रीमंतांकडे जाऊन आपल्या सरदारीचे व दौलतीचे लढे उलगडून घ्यावे. परंतु तें त्यांच्या मर्जीस येईना. ते धारवाडाकडे परत आले. मग बाईंनीं धारवाडास जाऊन तात्यांची कांहींशी समजूत काढून त्यांस घेऊन त्या परत इचलकरंजीस आल्या.

तात्यांस तीन अपत्यें होतीं. धोरला मुलगा व धाकटया दोघा मुली. मुलाचें नांव व्यंकटरावदादा व मुलींची नांवें अनुक्रमें बयाबाई व सगुणाबाई अशीं होतीं. पुण्यास भिडे म्हणून सावकार होते त्यांची कन्या व्यंकटरावांस दिली होती. तिचें नांव रमाबाई.

सन १७५९ च्या अखेरीस मराठयांची व मोंगलांची लढाई सुरू झाली. भाऊसाहेब व दादासाहेब बरोबर फौज घेऊन बेदरच्या रोखें चालले व वेळ पडल्यास त्यांस कुमक करितां यावी म्हणून पेशवे खुद्द अहमदनगर तेथें तळ देऊन राहिले. व्यंकटरावाचें लग्न उरकून अनूबाई तेथेंच श्रीमंतांजवळ राहिल्या. पेशव्यांच्या ल्ष्करास मिळण्याकरितां नग राहून निघून तात्या उध्दीर येथें दाखल झाले. परंतु ते तेथें पोंचण्याच्या आधींच मोंगलांचा पूर्ण पराजय झाला होता. पुढें रास्ते व पटवर्धन यांजबरोबर पेशव्यांनी कर्नाटकाच्या स्वारीस त्यांसहि पाठविलें.

त्या वेळीं तात्यांनीं (१७६१ डिसेंबर) कोपळावर स्वारी केली. तिकडे काटकांनीं दंगा करून ठाणीं घेतलीं होतीं. त्यांचें पारिपत्य करून ते गजेंद्रगडास येऊन तेथून बागल कोटाकडे गेले.

या सुमारास अनुबाईचें व तात्यांचें सौरस्य पुन्हां कमी झालें व तंटा मोडण्यासाठीं पुण्यास जाण्याचेंहि त्यानीं साफ नाकारलें. एवढेंच नव्हे तर ते कारभारांत व खासगी वागणुकींतहि अव्यवस्थितपणा करूं लागले. त्यामुळें त्यांस व त्यांच्या स्त्रियेस यापुढें अनूबाईंनीं जवळ जवळ नजरकैदेंतच ठेविलें. या सुमारास कडलास येथील देशपांडयांच्या मुलीशीं त्यानीं लग्न केलें असें ऐकण्यांत आहे. नानासाहेब पेशवे यानीं देशस्थाच्या मुलीशीं लग्न लाविलें. हें मामेबंधूचें उदाहरण पाहून तात्यानींहि त्याचप्रमाणें केलें. दुस-या कांहीं गोष्टींत अलीकडे त्यांचें जें बेफामपणाचें वर्तन सुरू होतें त्या वर्तनानें ते राज्यकाराभारासारख्या व सरदारीसारख्या जबाबदारीच्या कामास अगदी नालायख झाले होते. अनूबाई, खुद्द पेशवे, त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनीं व इतर पुष्कळ थोर लोकांनीं त्यांस मातोश्री गोपिकाबाई यांनीं व इतर पुष्कळ थोर लोकांनीं त्यांस दुर्व्यसनांपासून परावृत्त करावें म्हणून बहुत यत्न केला, धाक घालून पाहिला, निष्ठुरपणानें व कडकपणानें बागवून पाहिलें, पण सर्व व्यर्थ.

स.१७६२ त थोरले माधवरावांच्या बाजूस दादासाहेबां विरूध्द अनूबाई होत्या व त्यांचें पथक घेऊन विसाजी नारायण हा दादासाहेबांशीं झालेल्या लढायांत कामगिरीवर हजर होता. नंतर दादासाहेबांनीं मिरज घेतली तेव्हां सामान व पायदळ वगैरे कुमक इचलकरंजीहून पेशव्यांस होत होती. स. १७६३ त मोंगलानें पुणें जाळिलें व पेशव्यांनीं बेदर शहर जाळिलें व अवरंगाबाद व भागानगर या शहरांपासून खंडणी घेतली. त्यावेळीं नारायण तात्या पेशव्यांबरोबर होते. यावेळीं दोन तीन निरनिराळया प्रसंगीं श्रींमंतांनीं तात्यांस स्वतंत्र कामगिरीवर पाठविलें होतें व त्यानीं थोडीबहुत खंडणीहि वसूल करून आणिली होती.

इकडे मोंगल व मराठे यांचें युध्द सुरू असतां कर्नाटकांत हैदरअल्ली फार प्रबळ होऊन त्यानें धारवाडचा सुभा बहुतेक काबीज केला. धारवाडचा सुभा हातचा गेल्यामुळें इचलकरंजीकरांचें फार नुकसान झालें. यापूर्वी याच वर्षी मर्दनगड किल्ला व त्याखालचा मुलूख पोर्तुगीज लोकांनीं त्यांज पासून हिसकावून घेतला होता. ती नुकसानी झाली होतीच. याप्रमाणें हैदरीचें प्राबल्य फार वाढल्यामुळें पेशव्यांनीं १७६४ त त्याच्यावर स्वारी केली. त्यावेळीं इचलकरंजीचें पथक नरगुंदास होतें तें या लष्करास येऊन मिळालें होतें.

पुढें १७६४ त धारवाडचा सुभा मोकळा होतांच त्याची मामलत इचलकरंजीकरांस पेशव्यांनीं दिली; कारण त्यांच्या कडे ती पूर्वी बहुत वर्षे होती. व त्यांच्याहि पैसा त्या मामलतींत पुष्कळ गुंतला होता; यावेळीं तात्या इचलकरंजीहून निघून स्वा-या करीत भटकत होते.श्रीमंतांनीं त्यांस धारवाडास बोलावून नेलें व उपदेश केला. परंतु त्यापासून कांहीं निष्पन्न झालें नाहीं.

अनूबाई इचलकरंजीस दुखणेकरी पडून होत्या. ती संधि साधून तात्यांनी परत आल्यावर बराच दंगा केला. प्रथम ते आज-यांस आले. तेथें स्वार व पायदळ मिळून पांच सातशें नवे लोक त्यांनीं चाकरीस ठेविले आणि राणोजी घोरपडे सेनापति यास कांहीं उपद्रव केला. तात्यांचे आजे नारो महादेव यानीं दत्तक कांहीं घेतलेले नरसिंगराव यांचे पुत्र सदाशिव घोरपडे हे रघुनाथराव दादासाहेब यांजवळ होते. त्यांच्या द्वारें दादासाहेबांशीं तात्यांनीं संधान बांधिलें होते. मातोश्रीच्या निसबतीचे जितके लोक आहेत त्यांचें पारिपत्य करावें, सर्व दौलत आपल्या स्वाधीन करून घ्यावी, गोविंद हरि व त्रिंबक हरि पटवर्धन यांशीं कज्या करावा हे त्यांचें बेत होते. तात्यांनीं इचलकरंजीच्या ठाण्यांत प्यादे होते त्यांस वश करून घेतलें व किल्ल्या हिसकांवून घेतल्या. सर्व दौलतींत त्यांचा अंमल बसला. परंतु अनुबाईंची प्रकृती बरी झाली व पेशवेहि कर्नाटकांतून परत
आले. तेव्हां त्यांचे सर्व बेत विरघळून जाऊन त्यांस पुन्हां पूर्वीप्रमाणेंच प्रतिबंधांत रहाणें भाग पडलें.

सरकारची कामगिरी करून दाखवून आपली बढती करून घ्यावी, इकडे तात्यांचें लक्ष नसल्यामुळें त्यांची सरदारी काढून घ्यावी असें श्रीमंतांच्या मनांत आलें; त्यामुळें (सन १७६६) अनुबाई व त्यांचे नातू व्यंकटराव दादा ही पुण्यास गेलीं. तात्यांची कशी तरी समजूत घालून त्यांनीं त्यांसहि बरोबर नेलें. अद्यापि अनुबाईंची भीड पुणें दरबारीं बरीच असल्यामुळें त्यानीं पेशव्यांकडून व्यंकटरावांच्या नावें सरदारी कंरून घेतली व पुन्हां पथकाची उभारणी केली. कडलास, पापरी व बेडग हे गांव इचलकरंजीकरांकडे पथकाच्या सरंजामांत चालत होते ते. या सालच्या डिसेंबरांत पेशव्यांनीं दूर करून तेच गांव त्यांच्या तैनातीस लावून दिलें. पेशवे सरकारांतून एकंदर ११४१० रूपयांची तैनात इचलकरंजीकरांस रोख मिळत होती. तिच्या ऐवजीं त्यांनीं या तीन गांवांचा वसूल तैनातीकडे घेत जावा असें ठरलें.

कोल्हापूरकर जिजाबाईंनीं इचलकरंजीकरांचें सरदेशमुखीचें वतन जप्त केलें होतें तें सोडण्याबद्दल व तिकडे इचलकरंजीकर यांची गांवें, खेडीं, शेतें, कुरणें, बाग, मळे वगैरे आहेत त्यांस उपसर्ग न देण्याविषयीं श्रीमंतांनीं जिजाबाईस पत्रें लिहिलीं. म्हापण गांवास वाडीकर सावंत यांजकडून उपद्रव होत होता तो बंद करण्यांविषयींहि पेशव्यांनीं सावंतांस एक ताकीद पत्र पाठविलें. आपल्या दौलतीचा याप्रमाणें बंदोबस्त करून घेऊन अनुबाई, तात्या व दादा; परत इचलकरंजीस आलीं. पुढें तात्या ख्यालीखुशालींत व दुव्यसनांत मग्न होऊन इचलकरंजींत आयुष्याचे दिवस घालवू लागले. त्यामुळें (१७६९) धारवाडचा सुभा इचलकरंजीकरांकडून काढून पेशव्यांनीं नारो बाबाजी नगरकर यांस सांगितला.

सन १७७० व १७७१ सालीं हैदरअल्लीवर मोहीम सुरू होती. तींत इचलकरंजीकरांची पागा मात्र होती. यावेळीं तात्या बेहोष व व्यंकटराव दादा अल्पवयी असल्यामुळें इचलकरंजीचें पथक मोडल्यासारखेंच झालें होतें. याच सुमारास नारायणराव तात्या हे (१७७० च्या प्रारंभापासून) आजारी पडले होते. तें दुखणें वाढत जाऊन शेवटीं त्याच वर्षी (नोवेंबर १०) त्यांचें देहावसान झालें.

व्यंकटराव ना रा य ण रा व उ र्फ दा दा सा हे ब. - इचलकरंजीकरांकडून धारवाड सुभा काढून तो दुस-या मामलेदाराकडे पेशव्यांनीं दिला होता. सुमारें सोळा वर्षेपर्यंत तो सुभा त्यांजकडे होता. त्यां अवधींत मामलतीसंबंधीं तफावत रहातां रहातां आजपर्यंत सरकारची बाकी बरीच तुंबली होती. सरकारचा तगादा उठविण्यासाठीं अनूबाईंस पुण्यास जावें लागलें. व्यंकटरावदादा त्याजबरोबर या खेपेसहि गेले होते. तेथें गेल्यावर हिशेब होऊन मुत्सदी व पेशवे यांजवळ अनुबाईंनीं बहुत रदबदली केल्यावरून शेवटीं यांजवळ अनुबाईंनीं बहुत रदबदली केल्यावरून शेवटीं ७३००० रूपयांवर तोड झाली. पेशव्यांची स्वारी कर्नाटकच्या मोहिमेस निघाली तेव्हां व्यंकटरावांसह अनूबाई पुण्याहून निघून जेऊरच्या मुक्कामीं लष्करांत जाऊन पोंचल्या. तेथें चार दिवस रहावयाचा त्यांचा बेत होता, परंतु इचलकरंजीस तात्यांस देवाज्त्रा झाल्याचें वर्तमान कळतांच त्या व व्यंकटराव तेथून ताबडतोब निघून इचलकरंजीस आल्या. या व्यंकटराव नारायणाची व त्यांच्या पुढील वंशाची या घराण्याची हकीकत ज्त्रानकोशच्या आठव्या विभागांत ‘इचलकरंजी’ या शब्दाखालीं आलेली आहे; तरी ती तेथें पहावी. (डफ; ऐ.इ.ले. संग्रह; इचलकरंजी इतिहास).

घो र प डे का प शी क र - विजापूरच्या बादशहाकडून कापशीचें ठाणें व त्याभोंवतालचा कांहीं तालुका क्रापशीकरांकडे सरंजाम म्हणून चालत होता. त्यांस ‘हिंदुराव’ हा किताब बहामनी बाहशहाकडून व ‘अमीर-उल्-उमराव’ हा किताब आदिलशहाकडून मिळालेला आहे. कोल्हापूर प्रांताची देशमुखी व सरदेशमूखी कापशीकरांकडे विजापूरकरांच्या अमदानीपासून चालत आली असावी.

कापशीकरांनां नऊकस घोरपडे म्हणतात. शिवाजीमहाराजांचा अभ्युदय होत होता त्यावेळीं कापशीकरांच्या घराण्यांत म्हाळोजी घोरपडे मुख्य होते. त्यानीं बादशहाची चाकरी सोडून महाराजांचा पक्ष धरला होता. त्यांचें पांचशें स्वारांचें पथक होतें.त्या पथकानिशीं स्वारींत हजर राहून ते शिवाजीची एकनिष्ठेनें चाकरी करीत असत. त्यांस संताजी, बहिरजी व मालोजी असे तीन पुत्र झाले. ते तिघेहि पराक्रमी निघाले. तेव्हां शिवाजीनें त्या तिघांस तीन स्वतंत्र पथकांची सरदारी सांगून त्यांची चाकरी हंबीरराव सेनापतीच्या निसबतीस लावून दिली. त्या तिघां भावांत शूरत्वाविषयीं संताजीचा नांवलौकिक विशेष झाला. परंतु कापशीकर व त्यांचे अनुयायी इचलकरंजीकर यांची प्रसिध्दि ते ‘कर्नाटकांतले सरदार’ म्हणून आहे. कापशीकर घोरपडयांचीं पाटिलकीचीं वतनें सातारा जिल्ह्यांत आहेत. पण त्यांनीं कृष्णेच्या उत्तरेस कधीं जहागीर मिळविण्याचा यत्न खेला नाहीं. प्रथमपासून त्यांचें वळण कर्नाटकाकडे पडत गेल्यामुळे तोच मुलूख त्यांच्या व इचलकरंजीकर यांच्या कर्तृत्वाचें क्षेत्र होऊन बसला.

सं ता जी घो र प डे. -  संताजीनें १६७४ तच शिवाजीच्या वेळीं आपलें नांव काढलें होतें. अवरंगझेबानें संभाजीस धरून कैद केलें त्यावेळीं लढाई झाली तींत म्हाळोजी घोरपडे ठार झाले. बादशहाच्या फौजेचा छापा येण्यापूर्वींच संभाजीस सुरक्षित स्थळीं पोहोंचवावें म्हणून बहिरजीनें यत्न केला. परंतु संभाजीच्या दुराग्रहामुळें त्याचें कांहीं चाललें नाहीं. त्यानंतर राजाराम गादीवर बसला. त्यांनें इ.स. १६९१ मध्यें संताजी घोरपडे यास सेनापतीचें पद दिलें.

संताजीस दोन बायका होत्या व प्रत्येकीस एकेक पुत्र झाला होता. थोरला राणोजी व धाकटा पिराजी. शिवाय संताजीचा मानलेला मुलगा नारोपंत  (इचलकंजीकर) हा तिसरा पुत्र होय.

संताजीबरोबर नारोपंत प्रत्येक स्वारींत हजर रहात असल्यामुळें त्यास लष्करी कामाचा अनुभव येत चालला. सेनापती झाल्यापासून संताजीच्या अचाट पराक्रमांची परंपरा सुरू झाली. तो काळ विलक्षण धामधुमीचा होता. त्यामुळें आपल्या अंगचा पराक्रम व कर्तृत्व प्रकट करण्यास त्यास ती उत्तम संधि सांपडली. नारोपंतावर संताजीचा पूर्ण विश्वास असल्यामुळें आपल्या दौलतीचा सर्व कारभार त्यानें त्याजकडे सोंपविला. राजारामाच्या कारकीर्दीत महाराष्ट्राचें स्वातंत्र्य राखण्याकरितां  संताजीनें जे असाधारण पराक्रम केले आहेत, त्यांच्या योगानें त्याचें नांव इतिहासांत अजरामर झालें आहे.

सन १६९० त मोंगलांच्या फौजा महाराष्ट्रांतील किल्ल्यांस वेढा घालून बसूं लागल्या. कित्येक किल्ले त्यांनीं काबीजहि केले. त्यापुढें आपला निभाव लागत नाहीसें पाहून राजाराम गुप्तपणें चंदीचंदावरास गेले. त्याबरोबर जे मुत्सद्दी व सरदार गेले त्यांत संताजीहि होता. हा प्रवास फारच धोक्याचा होता व त्यांत एका प्रसंगीं महाराजांचा जीव बचावण्याकरितां संताजीचा बंधु मालोजी यांस आपल्या प्राणाची आहुति द्यावी लागली. चंदोस गेल्यावर राजारामानें संताजीस सेनापतीचें पद, जरीपटका व नौबत दिली. आणि “हिंदुराव ममल कतमदार” असा किताबहि दिला. संताजी वगैरे त्रिवर्ग बंधूच्या घराण्यांत यावेळीं तीन निरनिराळे किताब मिळाले. संताजीच्या घराण्याकडे “ममलकतमदार”, बहिरजीच्या घराण्याकडे हिंदुराव व मालोजीच्या घराण्याकडे “अमीर उल् उमराव” असे हे  किताब असून ते अद्यापि चालत आहेत.

सन १६९१ च्या प्रारंभी संताजी व धनाजी जाधव परत महाराष्ट्राकडे येऊन रामचंद्रपंत हुकमतपन्हा यांस मिळाले. त्यांच्या मदतीस संताजींनें कर्नाटकांत जातांना कांहीं फौजेसह नारोपंतांस ठेविलें होतें मोंगलांवर स्वा-या करण्याकरितां फौजेची नवीन जमवाजमव केली. संताजी व बहिरजी व विठोजी चव्हाण हिंमतबहाद्दर यांनीं खुद्द अवरंगझेबाच्या फौजेवर छापा घालून त्याच्या डे-याच्या तणावा तोडून सोन्याचे कळस काढून आणिले.

सन १६९२ त संताजींनें वाईच्या फौजदारावर छापा घालून त्यास सैन्यासह कैद केलें. नंतर मिरजेच्या फौजदा राचीहि हीच दुर्दशा केली. त्यावेळीं महाराजांच्या आज्त्रेवरून रामचंद्रपंतांनीं संताजींस मिरज प्रांतांची देशमुखी व सरदेशमुखी इनाम दिली. सन १६९६ त संताजी व धनाजी जाधव यांनीं गंगथडीवर स्वारी केली व तीन वर्षे तिकडे राहून तो मुलूख लुटला आणि बादशहाच्या लष्करास पुरवठा करण्याकरितां हिंदुस्थानांतून रसद व खजिना त्या मार्गानें येत असे तो कित्येक वेळां लुटून घेतला. यांच्या पारिपत्याकरितां बादशहाकडून आलेल्या एकामागून एक तीन फौजा त्यांनीं मोडून गर्दीस मिळविल्या. झुल्फिकारच्या स्वारींत संताजी हा छत्रपतींची कुमक करण्याकरितां पुन: कर्नाटकांत (१६९६) गेला. त्याच्याबरोबर त्यावेळीं फौज वीस हजार होती. संताजीनें धनाजीस पुढें पाठविलें. संताजी मागून येत असतां त्यावर त्या प्रांताचा फौजदार अल्लीमर्दान चालून आला. त्या प्रसंगीं फौजदाराचा पूर्ण पराजय करून त्याची फौज लुटून काढिली व त्यास पकडून जबर खंड घेऊन सोडून दिलें. नंतर चंदीस पोंचल्यावर त्यानें मोंगलांवर वारंवार तुटून पडून त्यांस चंदीचा वेढा उठविणे भाग पाडिलें. नंतर तो कर्नाटक, बलेघांट या प्रांतांत शिरून तेथें लुटालूट करूं लागला. तेथील फौजदार कासिमखान यास त्यांशी युध्द करण्याचि छाति होईना; सबब त्याच्या कुमकेस बादशहानें मोठे मोठे सरदार पाठविले. ते कासिमखानास येऊन मिळाल्यावर ति सर्व सेना संताजीवर निघाली तोंच त्यानें एकदम येऊन चोहोंकडून या फौजेस घेरा दिला.संताजीचा ही मगरमिठी सुटेनाशी झली. तेव्हां त्या फौजेची सुटका करण्याकरितां बादशहाने हिंमतखान नांवाचा सरदार पाठविला तो संताजीने त्यास परस्पर वटेंतच गांठून त्याची फौज उधळून दिली.

इकडे आठपंधरा दिवस मार खातांच कासीमखानाचीहि फौज टेंकीस आली. शेंवटीं कासिमखानानें विष खाऊन प्राण दिला. व बाकीची सव फौज संताजीच्या हाती लागली, तेव्हां त्यांनें ती लुटली व सरदारांपासून भारी खंड घेऊन त्यांस सोडून दिलें. इतकयांत हिंमताखान पुन्हां नवी फौज घेऊन लढाईस आला परंतु संताजीने तीहि फौज धुळीस मिळविली, व त्यास मारून टाकिलें.

धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांमध्यें यावेळीं वांकडें आलें. सन १६९७ त राजाराममहाराज जिंजीहून स्वदेशीं परत आले. त्यांनी या उभय सरदारांचा समेट करून द्यावा.
तें न कारतां जाधवाचा पक्ष धरिला, त्यामुळें संताजीचें बळ कमी पडलें. त्या दोघां सरदारांच्या फौजांचा विजापुरानजीक तळ पडला असतां जाधवरावोंन घोरपडयांच्या बहुतेक फौजेंत फितूर केला व त्या फौजेच्या मदतीनें संताजीस धरण्याचा बेत केला. ही बातमी संताजीस कळतांच त्यानें नारो महादेव वगैरे आपले विश्रासू सेवक व मुलेंमाणसें व जिवास जीव देणारी थोडीशी फौज होती ती घेऊन तेथून पळ काढिला. त्यानंतर कांही दिवस तो जाधवरावाचा शह चुकवीत मुलखातूंन हिडत होता. एके प्रसंगीं त्याचा मुकाम म्हसवडास पडला. तेथें म्हसवडकर माने नागोजी यानें. (आपल्या सास-याचा सूड घेण्यासाठीं) संताजीस दग्यानें ठार मारिलें.

याप्रमाणें संताजी हा मारेक-यांच्या हातें प्राणांस मुकला. संताजीरावांचे मुलगे राणोजी व पिराजी हे त्यावेळीं लहान होते. यावेळीं नारोपंतानें कापशीकर घराण्याची लाज राखिली. धन्यास दगा देऊन तो जाधवरावास मिळता तर राजाराम महाराज यांची मर्जीं त्याजवर सुपसत्र झाली असती व त्यास मोठें वैभवहि मिळालें असतें, पण त्याची बुध्दि तशी नव्हती. त्यानें राणोजी व पिराजी यांस हातीं धरून सेनापतींचे अनुयायी एकत्र जमविले व बहिरजी घोरपडे निराळी सरदारी करून कर्नाटकांत होता त्यास आणविलें. मग ही घोरपडयांची एक स्वतंत्रच फौज जमा झाली असें पाहून जाधवरावानें त्यांशीं विरोध करण्याचें सोडून दिलें.

ताराबाईच्या कारकीर्दीत घोरपडे ताराबाईच्या ताब्यां न रहातां नेहमी स्वतंत्रपणें मोगलाई व मराठी राज्यांत स्वा-या करीत असें डफ म्हणतो; परंतु तें खरें दिसत नाहीं. कारण कीं, सन १७०३-४ या सालीं ताराबाईंचे पुत्र शिवछत्रपति यांनीं पिराजी घोरपडे यांच्या नांवें सरंजामजाबता करून दिला आहे त्यांत कलमें आहेत तीं :-
(१) मशारनिल्हेचे पितें संताजी घोरपडे यांस मामले मिरज येथील अठरा कर्यातीचें देशमुखी वतनें दिलीं होतीं तेणेंप्रमाणें यांजकडे करार. (२) सरदेशमुखीचें वतन मशारनिल्हेस पेशवीपासून होतें तेणेप्रमाणें करार. सुभा पन्हाळा व मामले मिरज.  (३) मशारनिल्हेचे वडील बंधु राणोजी स्वामिकार्यावरी पडले त्यानिमित्त त्यांची स्त्री संतुबाई इजवरी कृपाळु होऊन तिचा योगक्षेम चालण्यानिमित्त कसबे कापशी गांव इनाम दिला.  (४) नारो महादेव, यांनीं कष्ट मेहनत बहुत केली. या बाबे त्यांस भिलवडी हा गांव इनाम दिला.  (५) नशार निल्हेकडे सरंजाम करून सरदार दिले.  (अ) संभाजी निंबाळकर. हजार फौजेची दौलत. (आ) वेंकटराव नारायण पांचशें जमावाची तैनात.
 
ताराबाईंचा व घोरपडयांचा जर बिघाड असता तर छत्रपतींकडून असा सरंजाम पिराजीस कधींच मिळाला नसतां हें उघड आहे. या राजपत्रावरून नारो महादेव यांच्या कर्तृत्वाचें अनुमानहि होतें.

सन १६९८ ते १७०५ पर्यंत बेदर, गुलबुर्गे व विजापूर याप्रांतीं घोरपडयांची धामधूम व लुटालूट एकसारखी सुरू होती औरंगझेबाच्यानें घोरपडयांचा बंदोबस्त झाला नाहीं. यावेळीं नारो महादेव यांची तेजस्विता उत्तम रीतीनें प्रकट झालीं. सन १७०७ ता घोरपडयांनीं स्वराज्यांतच कांहीं स्वारी शिकारीं केल्यावरून ताराबाईंचा क्षोभ होऊन त्याचें पारिपत्य करण्याकरितां त्यांनीं त्यांवर धनाजी जाधव यास पाठविलें; तेव्हां घोरपडयानींहि झुलपिकारखान यास मदतीस बोलाविलें. संताजीरावांची व खानाची मैत्री फार दिवसांची होती, सबब त्यानें कुमकेस जाऊन जाधवरावास हुसकून लाविलें. त्यानंतर बहिरजी व त्याचे पुत्र शिदोजी हे संताजीच्या मुलांमाणसांस घेऊन गजेंद्रगडाकडे गेले व तिकडे मोंगलाच्या आश्रयानें त्यांनीं आपली जहागीर वाढविली.

घोरपडयांनीं स्वराज्यातल्या मुलखावर स्वारी केल्याचें वर लिहिलें आहे. त्यांत नारो महादेव यांचें अंग नव्हतें. मोंगलांचें अंकित ह्मणवून घेऊन कर्नाटकांत रहावें ही गोष्ट नारोपंतास मुळींच पडली नाहीं. छत्रपतींच्या पदरीं राहून आपल्या धन्यानें मिळेल त्या भाकरीवर निर्वाह करावा हा त्याचा निर्धार पूर्वीपासून पक्का होतां. यामुळें आतां घोरपडयांची वांटणी होतऊन त्यांच्या कर्तृत्वास भिन्न भिन्न दिशा लागल्या. बहिरजी व शिदोजी हे गजेंद्रगडास राहून मोंगलाईंचें सरदार ह्मणून आपणांस ह्मणवून घेऊं लागले व तिकडे त्यांनीं गुत्ती व गजेंद्रगड वगैरे मुलुख मोंगलांकडून सरंजाम मिळविला; त्यावरून त्यांस गर्जेद्रगडकर हें नांव पडलें. संताजीचीं मुलेमाणसें त्यांजवळ
होतीं परंतु नारोपंतांनीं त्यांशीं तंटा करून ती सर्व मंडळी आपल्या ताब्यांत घेऊन ते कापशीस येऊन राहिले. इतउत्तर पिलाजीराव व त्यांचे वंशज हे मात्र कापशीकर या नांवानेंच प्रसि‍द्धि पावले व त्यांनी छत्रपतींचा आश्रय कधीं सोडिला नाहीं.

नारो महादेव यांनीं हिंमत धरून आपले अल्पवयी धनी पिराजीराव यांच्या नांवें त्यांचीं वडलोपार्जित वतनें छत्रपतींकडून करार करून घेतलीं व आपले अल्पवयी पुत्र व्यंकट
रांव यांची पांचशें स्वारांच्या सरदारींवर नेमणूक करून घेतली ! त्यावेळीं छत्रपतींच्या दरबारांत नारो महादेव यांचें फार वजन होते.

कापशीकर घोरपडयांचा एकंदर सरंजाम सत्तावीस लक्षांचा होता. त्याचा तिसरा हिस्सा (म्हणजे नऊ लक्षांचा) संताजीरावांस मिळालेला होता. परंतु त्यांचे पुत्र पिराजीराव यांच्या ताब्यांत सुमारें पांच लक्ष रूपये उत्पन्नाचा मुलूखच राहिला. इतका मुलुख तरी नारोपंतांच्या मर्दुमकरमुळेंच राहिला. कापशीकर आपल्या पक्षास चिकटून राहिल्यानें राज्याला उपयोग होत आहे हें ताराबाईच्या प्रत्ययास आल्यामुळें त्यांनीं मिरज व पन्हाळा येथील देशमुखी व सरदेशमुखी वतन पुन: पिराजीराव यांजकडे कायम केलें. या वतनाचा सर्व कारभार नारोपंतांनीं पिराजीरावांकडून आपल्या नांवें करून घेतला.

पुढें करवीर राजमंडळाचा पक्ष अधिक प्रबल करावा म्हणून कापशीकर व नारो महादेव यांस रामचंद्रपंतांनीं पूर्णपणें अनुकूल करून घेतलें. रामचंद्रपंतांनीं ‘हिंदुराव’ यांस वळविण्याचाहि प्रयत्न केला पण तो सफल झाला नाहीं. त्या घराण्याचे स्थापक बहिरजी घोरपडे गजेंद्रगडकर मरण पावले होते. त्यांचे पुत्र सिदोजीराव यांस रामचंद्रपंतानीं करवीरकाकडून सेनापतीचें पद देवविलें. ते फौजबंद व शूर होते.  परंतु त्यांचे मन कर्नाटकच्या स्वा-यांत गुंतलें असल्यामुळें करवीरच्या मसलतींत पुढाकार घेघ्याचें त्यांच्यानें होईना.  मग त्यांजकडून सेनापतीचें पद काढून रामचंद्रपंतानीं पिराजी कापशीकर यांस तें देवविलें. तें पद त्या दिवसापासून आजपर्यंत कापशीकरांच्या घराण्याकडे अव्याहत चालू आहे. त्या वेळीं पिराजीराव वयानें लहान असल्यामुळें अर्थात सेनापतीनिस बतींचीं सर्व कामें नारो महादेवच पहात. याप्रमांणें त्या वेळीं करवीर राजमंडळाच्या सचिवाचे व सेनापतीचे अधिकार कांहीं वर्षेपर्यंत त्यांच्या हातीं आले होते ! कापशी घराण्याच्या किताबांपैकी ‘ममलकतमदार’ व मानमरातबापैकीं जरीपटका व नौवत हीं कापशीकरांचे अनुयायी व संताजीरावांना मानलेले पुत्र या नात्यानें बाळगण्याविषयीं नारो महादेव यांस परवानगी मिळाली होती. इचलकरंजीकरांच्या घराण्यांत हा किताब व बहुमान अद्यापपर्यंत चालू आहे.

सन १७२८ सालीं पिराजी घोरपडे मौजे हलकर्णी हें ठाणें काबीज करण्याकरितां गेले होते. तेथें ते लढाईंत ठार झाले. त्यानंतर त्यांचे पुत्र राणोजी हे सेनापतीच्या दौलतीचे मालक झाले. कापशीकर यजमान व इचलकरंजीकर नोकर हा संबंध आतां राहिला नव्हता. तथापि कापशीकरांच्या दौलती विषयीं व्यंकटरावांची  (नारोपंताचा पुत्र) अनास्था नसे. जेव्हां जेव्हां राणोजीचें काम शाहू महाराजांच्या दरबारींपडे तेव्हां तें व्यंकटरावांच्या वशिल्यानें सिध्दीस जाई. या दोन्ही घराण्यांत परस्परांविषयी प्रेमभाव व घरोबा पुढेंहि कायम राहिला. पिराजीराव मरण पावल्यावर कापशीकरांच्या दौलतींत पुष्कळ अव्यवस्था होऊन ती दौलत अगदीं नात वानीस आली. कोल्हापुरकर संभाजीच्या मनांतून सबंध कापशी संस्थानच खालसा करावयाचें आलें. त्याचा तो बेत  पाहून संताजीराव घोरपडे यांची थोरली स्त्री द्वारकाबाई अद्यापि हयात होती ती आपल्या नातवास  (राणोजी) बरोबर घेऊन साता-यास शाहूमहाराजांच्या आश्रयास राहिली. (ही इ.स.१७६२ त मरण पावली. त्यावेळीं तिचें वय ऐशीं वर्षांपेक्षा अधिक असावें. तिचा मुलगा पिराजी व पिराजीचा मुलगा राणोजी. द्वारकाबाईच्या स्मरणार्थ राणोजीनें कृष्णा व पंचगंगा यांच्या संगमावर कुरूंदवाडच्या घाटांवर घोरपडयांचा कुलस्वामी सुब्रह्यण्य, याचें देवालय बांधिलेलें आहे). वर सांगितलेल्या मिरज व पन्हाळा प्रांतची देशमुखी सरदेशमुखीच्या वतनाची सनद पूर्वीच्या क्रमाप्रमाणें शाहूकाडून्हि कापशीकरांस करार करून मिळाली. वतनाच्या मालकीस नांव मात्र कापशीकरांचें व भोगवटा व्यंकटरावांचा असल्यामुळें व सासुरवाडीकडून (पेशव्यांकडून) शाहूच्या दरबारांत व्यंकटरावांचा वशिला उत्तम रीतीचा असल्यामुळें ही वतनाची सनद पिराजीस मिळण्यास अडचण पडली नाहीं (१७२१).

द्वारकाबाई व राणोजी साता-यास असतां शाहूनें त्यास सन्मानानें वागविलें.राणोजी यास सरंजामाचे महाल नवीन नेमून देऊन त्याच्या सरदारीची स्वतंत्र उभारणी करावी त्यांस नवीन इनाम गांव द्यावे, याप्रमाणें महाराजांचा मनोदय होता व त्याप्रमाणें सरंजामाच्या सनदाहि तयार झाल्या होत्या. परंतु पुढें लौकरच संभाजीकडून समेटाविशयीं संदर्भ आल्यावरून घोरपडयांच्या सरदारीचें काम थांबलें. पुढें  संभाजीं हा शाहूच्या भेटीकरितां साता-यास आला त्यावेळीं ‘तुम्हीं कापशीस परत या, आम्ही तुमचे संस्थान तुम्हांकडे चालवितों’ असें संभाजी द्वारकाबाईस व राणोजीस म्हणूं लागला. परंतु शाहू व त्याचे पेशवे बाजीराव यांची हमी घेतल्याखेरीज ती दोघे परत जाण्यास कबूल झाली नाहींत. शेवटीं पेशवे, प्रतिनिधि व मंत्री यांस बरोबर घेऊन शाहू महाराज राणोजीच्या घरीं गेले व तुमचें संस्थान चालविण्याबद्दल आम्हीं संभाजींस सांगितले आहे, त्याप्रमाणे ते बिनदिक्कत चालवितील तुम्हीं कापशीस जावें, असें त्यांनीं व प्रधानमंडळींनीं त्यांस आग्रहानें सांगितलें. त्यावरून तीं दोघें कापशीस परत गेलीं व कबूल केल्याप्रमाणें संभाजींनें त्यांचें संस्थान त्यास परत दिलें (१७३०). पिराजीराव मरण पावल्यानंतर राणोजीस सनद मिळावयाची;  परंतु व्यंकटरावांवर शाहूची कृपा असल्यामुळें त्यांनीं त्यास आज्त्रा केली कीं ‘देशमुखीचा भोगवटा अनेक वर्षे तुम्हीच करीत आहां. नवी सनद द्यावयाची तींत राणोजींचे नांव कशाला तुमच्याच नांवें सनद देतों’ पण ती गोष्ट व्यंकटरावास पसंत पडली नाहीं. त्यानें सांगितलें कीं, सनद पूर्वीप्रमाणें राणोजी यासच द्यावी. ते देतील तर तीच सनद त्यांजपासून आम्हीं मागून घेऊं. मग शाहूनें (१७३४) राणोजीच्या नांवें सनद तयार केली. तें वर्तमान राणोजी यांस कळतांच व्यंकटरावाच्या कृतज्त्रतेचें हें उदाहारण पाहून त्यास हर्ष झाला व त्यानें तीच देशमुखीची सनद त्यास बक्षीस दिली. एवढेंच नव्हे तर पुढच्या वर्षी मौजें रांगोळी हा आपला इनाम गांव त्यास इनाम करून दिला.  राणोजीचा पुत्र संताजी होय. यापुढें या घराण्यांत विशेष प्रख्यात पुरूष झालें नाहींत. पेशव्यांशीं व पुढे कोल्हापूरकरांशीं सूत्र ठेवून हें घराणें राहिलें. (डफ पु.१ राजारामछत्रपतीची बखर; इचलकरंजीचा इतिहास).

ग जें द्र ग ड क र घो र प डे -यांची माहिती गजेंद्रगड या शब्दाखालीं झाली आहे ती तेथें पहावी.

गु त्ती क र घो र प डे.- या घराण्याचा मूळ पुरूष सेनापती संताजी घोरपडयाचा भाऊ बहिरजी हिंदुराव हा होय. संताजीच्या खुनानंतर बहिरजी कनारटाकांत आला व त्यानें मौंगलांची नौकरी पत्करून, गजेंद्रगड, गुत्ती वगैरे मुलुख मिळविला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र शिदोजी हा गादीवर बसला. शिदोजीच्या मागून त्याचा पुतण्या यशवंतराव हा गुत्तीचा मालक झाला. हा पुढें मोंगलांकडून निघून पेशव्यांनां मिळाला. हा हैदराच्या स्वा-यांत नेहमी पेशव्यांतर्फे हजर असे. शिदोजीचा मुलगा प्रख्यात मुरारराव ह्यानें त्या भागांत आपलें सामर्थ्य फार वाढवून पुष्कळच प्रांत मिळविला  (मुरारराव घोरपडे) पहा. हाहि गुत्तीचा कारभार पाहत असे.पुढें टिपूनें एका लढाईंत मुरारराव व यशवंतराव यांस पकडून कैदेंत ठेविलें.तेव्हां यशवंत रावाचा मुलगा मालोजी हा गुत्तीचा मालक झाला. त्यानंतर दुसरया एका लढाईंत गुत्ती टिपूनें घेऊन आपल्या राज्यास जोडली.त्यामुळें पेशव्यांनीं मालोजीस गुत्ती ऐवजीं सोंडूर (हें टिपूकडून घेऊन) ठाणें दिलें व त्याबरोबरच कंकण वाडी, बेळवती वगैरे तालुके सरंजामादाखल दिले. यानंतर सोंडूर संस्थान स्थापन होऊन त्याचा पइिला पुरूष शिवरात्र घोरपडे हा बनला. पुढें गुत्तीकर घरण्यांतील दुसरा यशवंतराय हा नाना फडणिसांनां कैदेंतून सोडविण्याच्या वेळीं पुढें आला होता. पेशवाइअखेर हा रावबाजी विरूध्द्र इंग्रजांस मिळाला. आणि त्यांच्या तर्फें पेशव्यांर्शी लढला. या त्याच्या मदतीबद्दल ज.वेलस्लीनें त्यास सदतीस हजारांची जहागीर दिली. पुढें दौलराव शिद्यांच्या दरबारींहि हा इंग्रजांतफें काम करीत असे. हा सन १८२१ सालीं पुणें येथें मरण पावला; त्यास मालोजी हा एक पुत्र होता. याचा वंश हल्लीं सोंडूर प्रांतीं नांदत आहे (गजेंद्रगड पहा). ( खरे-ऐ. ले. संग्रह; डफ;  बाड- कैफियती).

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .