विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घोडाघांट - दिनाजपूर (बंगाल) जिल्ह्यांतले एक पडकें शहर. येथील कांहीं अवशेषाचा संबंध महाभारतांतील विराटराज्याशीं जोडतात. पंधराव्या शतकाच्या शेवटी मुसुलमानी अंमलांत अल्लाउद्दीनानें येथें बसवलेल्या कारभाराचे व लष्करी ठाण्याचेहि अवशेष अद्याप आहेत.