प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

घोडा - वेदकालीन घोडयासंबंधीं माहिती ज्त्रानकोशाच्या तिस-या विभागांतील वेदकालांतील शब्दसृष्टी या प्रकरणांत पान २३५ ते २३८ येथें दिलेली आहे. त्याचा थोडक्यांत सारांश असा कीं त्या काळीं विविध रंगांचे व जातींचें घोडे होते. त्यांनां सोन्यामोत्यांच्या दागिन्यांनीं शृंगारीत असत. रथाकडे त्यांचा उपयोग होत असे आणि घोडयांनां पागेंत बांधणें, व त्यांच्याकरितां मोतद्दार नेमणें वगैरे सर्व गोष्टी वेदकालीं होत्या. शिवाय लगाम, काढणी व चाबूक वगैरें चाहि उल्लेख आढळतो. शर्यतीचे घोडेहि त्यावेळीं होते व राजसूय यज्त्राच्या वेळीं व वाजपेयक्रतूंत शर्यती होत असत.

प्राणिशास्त्राच्या द्दष्टीनें एक्किडी या जातीपासून घोडयांच्या सर्व उपजाती झालेल्या आहेत असें आढळून येतें. इतर प्राण्यांहून घोडयाचा असा विशेष आहे कीं, त्याची शेपूट लांब केसांच्या झुबक्याची असून त्याची आयाळहि मोठी असते. त्याचे कान आंखूड असतात, अवयव लांब असतात व डोकें आखूड असतें. त्याचा रंग करडा, पांढरा व पिंगट असा असतो. घोडयांच्या दोन संकरज अशा जाती आहेत. नॉर्वे देशांतील ‘डन’ तट्टे, व अरबस्तानांतील ‘बार्ब’ जातींची तट्टे प्रसिध्द आहेत. यूरोपच्या वायव्येकडील घोडे ‘डन’ व ‘बार्ब’ अशा दोन्ही जातीचे आहेत. शिवाय केल्टिक घोडा व मंगोलियांतील रानटी घोडा अशाहि जाती आहेत. यूरोपातील बहुतेक काळया रंगाचे घोडे ‘डन’ व  ‘बार्ब’ अथवा ‘अरब’ या दोन जातींच्या मिश्रणामुळेंच झालेंले आहेत.प्रागैतिहासिक काळीं यूरोपांत रानटी घोडे पुष्कळ होते असे संशोधन करणा-यांस आतां आढळून आलें आहें इतिहासाला सुरूवात होण्यापूर्वीच्या काळांत तत्कालीन लोकांच्या शिक्षणामुळें रानटी थोडे माणसाळलेले होते असें दिसून येतें. परंतु सध्या सर्व जगांत घोडयाच्या विविध जाती असलेल्या आढळतात व त्यांच्यात बरीच सुधारणा झाल्याचेंहि द्दष्टीस पडतें. घोडा, रानटी घोडा व तट्टू याप्रमाणें गाढव झिब्रा, क्कॅग्गा अशा घोडयांच्या उपजाती आहेत. शिवाय संकरज अशी एक जात आहे ती वेगळीच होय. गाढव, नामक घोडयाच्या उपजातीचे, कान मध्यम असतात पण त्याचें शेंपूट बरेंच लांब असतें. एशीआटिक रानटी गाढवांच्या दोन उपजाती असून, चिंगेटाइ व किआँग मिळून एक जात व ओगॅनर म्हणून एक दुसरी जात आहे व ती वायव्य हिंदुस्थान, पर्शिया, सीरिया, बलुचिस्तान व अरबस्तानमध्यें आढळून येते. या दोन्ही जातींत घोडयाचें पुष्कळ साद्दश्य असते. झिब्रा नांवाच्या जातींत सोमालिलाँड व अबिसीनिया येथील ग्रेव्हीझिब्रा प्रसिध्द असून त्याचा विशेष असा कीं झिब्रा जातीच्या घोडयाच्या मागील भागावर रंगाचे पट्टे असतात व त्याचे कान केसाळ असतात. दक्षिण आफ्रिकेंतील क्कॅग्गा जातीच्या घोडयाचे कान लहान व अणकुचीदार असतात. त्याच्या अंगावर काळे पट्टे असून मधून मधून पिंगट व पांढरा रंगहि असलेला दिसतो.

प्राणिशास्त्रवेत्यांच्या मतें घोडयांच्या वर दिल्याप्रमाणें अनेक  उपजाती आहेत व त्यांचा परस्परसंबंध इतका निकट आहे कीं वरीलपैकीं कोणत्याहि एका जातीचा दुस-याशीं संबंध घडला तर सहज निपज होऊं शकते. उपर्युक्त वर्गांतूनच संकरज जाती होऊं शकतात. घोडा व गाढव यांपासून खेचर निर्माण होतें. वरील सर्व उपजातींच्या बाह्य स्वरूपांत ज्याप्रमाणें वैचित्र्य आढळतें; त्याचप्रमाणें त्यांच्या मनोभूमिकेंतहि फरक दिसून येतो. गाढवाचा सोशिकपणा, घोडयाची तेजस्विता व खेंचराचा हट्टीपणा सर्वश्रुत आहे.

मराठी इतिहासांत भिमथडी घोडीं अतिशय चपळ म्हणून प्रसिध्द आहेत. काठेवाडी ब अरबी घोडेहि भारतीय इतिहासांत प्रसिध्द आहेत.

घोडे निर्माण करण्यासंबंधीं बरेच नियम आहेत. दोन किंवा तीन वर्षांनीं घोडयाचें जनन होऊं शकतें. घोडीचा गर्भस्थ काल साधारणत अकरा महिने असतो. त्या स्थितीत घोडीस कामाला लावणें गैर असतें. पोटशूळ न व्हावा म्हणून शिंगरास तें गवत खाऊ लागण्यापूर्वी एक प्रकारचें अन्न घालतात.शिंगरांस अति खाऊं घातल्यानें तीं पुढें अशक्त व जड होतात.

अश्वशिक्षेला प्रारंभ घोडा दोन वर्षाचा झाल्यानंतर होतो. त्यावेळीं त्याच्या तोंडांत लगाम घालून व वारंवार कैचींत आणून त्यास अश्वशिक्षेंतील विविध प्रकार शिकविण्यांत येतात. गॅलव्हनिंग नांवाची पध्दति अश्वशिक्षेंत अत्यंत उपयुक्त आहे असें तज्ज्त्रांचें मत आहे. अश्वशिक्षकांत सुस्वभाव, जागरूकता व अढळपणा असावा लागतो. घोडयास गाडीला जुंपून फेरफटका करणेंहि हितावह असतें. कारण त्यावेळीं घोडयाचे गुणावगूण कळून येतात. बसावयाच्या घोडयास फार खाऊं घालणें हितावह नसतें व त्याच्याकडून फाजील काम करून घेण्यानें सुध्दा घोडयास वाइट संवयी जडतात. सदोष व्यवस्था व टाळतां येण्यासारखे अपघात घडल्यांमुळेहि घोडे बिघडतात.

रवंथ करणा-या इतर प्राण्यांपेक्षां घोडयांचें पोट लहान असतें. त्यामुळें त्यांस आहारहि कमी लागतो. ओट गवतानें घोडीं पुष्ट होतात. ओट नांवाचें धान्यहि त्यांनां चांगलें मानवतें. आपल्या देशांत हरळी हें घोडयाचें विशेष प्रिय असें गवत आहे. ओला हरभराहि घोडयास चांगला मानवतो. घोडयास हरब-याची चंदी विशेषेंकरूंन देतात. कांहीं धान्यें कांहीं घोडयांनां वर्ज असतात. कोणतेंहि शिजलेलें अन्न घोडयांनां देणें घातुक असतें कारण त्यामुळें पोटशूळ उत्पन्न होतो. वहानास जुंपल्या जाणा-या घोडयांनां बहुधा गवतच घालतात. अति श्रमानें घोडा थकला कीं त्यास कुरणांत सोडून द्यावें. हिवाळयांत इजा झालेला घोडा लवकर बरा होतो. मोठी सफर करावयाची असल्यास टप्याटप्यावर घोडयास थोडी दारू किंवा पाणी द्यावे व इष्ट स्थलीं पोचल्यावर त्यास तीं पेयें अधिक प्रमाणांत द्यावीं. या उपायानें घोडयास थंडाई व नवा दम प्राप्त होतो. मराठेशाहींत व पेशवाईंत चांगले घोडे तयार करण्याचा प्रयत्न करीत असत. सातारचे प्रतापसिंह यांनीं आपल्या कारकीर्दीमध्यें जनावरांच्या चांगल्या जाती आणवून, राज्यामध्यें चांगलीं जनावरें निपजवून त्यांची समृध्दि करण्याचाहि प्रयत्न केला. त्यांनीं चांगले घोडे तयार व्हावे याकरितां लोकांस उत्तेजन देण्यासाठीं जो जाहीरनामा प्रसिध्द केला होता तो पुढील प्रमाणें :-

“जाहीरनामा श्रीमन्महाराज राजश्री छत्रपति सरकार राजमंडळ हुजूरून इलाखा सातारा येथील लोकांस महशूर व्हावयाकरितां आज्त्रा केली ऐसी जे :- या मुलखांत पेशजीं लोक घोडे पाळीत होते. अलीकडे फौजेची चाकरी नाहीं, व लोकांत घोडी पाळावयास ताकद नाहीं. याजमुळें घोडयांची कमती पडली. त्यास घोडयांची आमदानी असावी हें सरकारचे मनांत आहे. सर्वांनीं समजोन घोडीं आपलें घरीं पाळून तयार करावीं. येविशीं :-

१ लोकांच्या घरीं घोडीं तीन वर्षेपर्यंत उमरीचीं हल्लीं तयार असतील तीं पेस्तर दुसरीयाचे दिवशीं, हुजूर सातारीयांत सरकारांत आणून दाखवावीं. व पुढें तयार होतील तीं दरसाल दसरीयास दाखवीत जावी. त्यांत जीं घोडीं चांगलीं असतील, त्यांपैकीं चौ घोडयांचे धण्यास एक सालीं इनाम पावेल. त्याचा तपशील  (१) चांगलें, उत्तम, नामी, घोडें असेल त्याचे धण्यास रूपये ४०० चारशे पावतील. (२) त्याहून कमी असेल त्याचे धण्यास रूपये ३०० तीनशें पावतील. (३) त्याहून कमी असेल त्याचे धण्यास रूपये २०० दोनशें पावतील. (४) त्याहून कमी असेल त्याचे धण्यास रूपये १०० एकशें पावतील.

२ सदरहूप्रमाणें चौ घोडयांचे धण्यास इनाम पावेल. बाकीच्यांस मिळणार नाहीं. नंतर घोडें ज्याचे त्याणें माघारीं न्यावें फरोक्त करावयाचें असल्यास, सरकारांत घ्यावयाचें असले तरी, खुषखरेदी घेतील, त्याची किंमत इनामाचे ऐवजाखेरीज पावेल. अगर माल धण्याचे खुशीस पडेल तेथें विकावे, अगर घरीं पाळावे.

३ घोडे चांगले अवलादीचे व्हावयाकरितां, घोडे आरबी वळू सरकारांतून जागजागीं ठेविले आहेत, तीं ठिकाणें शहर सातारा येथें, मौजे दहिवडी कर्यात मलवडी पेटा खटाव येथें, क्षेत्र पंढरपूर येथें. एकूण तीन ठिकाणीं तूर्त ठेविले आहेत. मार्गांतून मुनासब पाहून आणखी ठिकाणीं ठेविले जातील त्यास, ज्यास, आपलीं घोडीं सरकारचे घोडयांकडून काढिवणें असेंल त्यानें या घोडयाकडून काढवावी. त्याजपासून घोडीं काढण्याबद्दल खर्च कांहीं सरकरांत घ्यावयाचा नाहीं

४ सरकारांतून चांगले अवलादीकरितां आरबी घोडे वळू जागजागीं ठेविले आहेत. या घोडयांपासून (झालेलें) घोडें नर अगर मादी, तीन वर्षांचे उमरींचे जो कोणी सरकारांत आणून दाखवील, त्याबद्दल त्यास पांचशें रूपये सरकारांतून इनाम पावतील. घोडें त्याणें आपलें माघारें न्यावे, घरीं पाळावें, अगर सरकरांत अथवा दुसरें कोणास खुष खरेदी किंवा मर्जीस पडेल तसें द्यावें.

५ घोडे आणून सरकारांत दाखवील त्यास वर लिहिल्याप्रमाणें इनाम द्यावयाविषयीं लिहिलें आहे, त्य प्रमाणें  नक्त  पावतील. कोणाचे मनांत रूपये घेऊं नये, हा बहुमान सरकारचा असावा असें असल्यास त्यास त्या किमतीअन्वयें कडें सोन्याचें अथवा पोशाख पावेल.

६ कोणाचे घरीं जो घोडीं विकावयाचीं असतील, तीं त्यांणीं दसरीयाचे दिवशी सातरियास दरसाल घेऊन येत जावी. त्यांतून सरकार पसंत पडतील तीं सरकारांत खरेदी होतील व ज्यास गरज असेल तेहि घेतील. परंतु घोडा आणावयास दस-यापुढें एक दिवस देखील जास्ती लागूं नये. बरोबर दसरीयाचे दिवशी सातारीयास येऊन घोडीं दाखल असावी.

एकूण सहा कलमें जाहीरनामा पेटामजकुरीं सर्वांस महशूर होई तें करणेक्त जाणिजें  (१९ जानेवारी सन १८२२) मोर्तब सुद (इतिहास संग्रह पु. ६ अं. ७I८I९).

घोडयाच्या शुभाशुभ लक्षणासंबंधीं अनेक संस्कृत ग्रंथांतून माहिती सांपडते. अश्वशास्त्र किंवा शालिहोत्रशास्त्र म्हणून एक स्वतंत्र शास्त्रच असे. या शास्त्रावरील ग्रंथांकरितां ‘अर्थशास्त्र’ लेख  (पान ४४६) पहा. घोडयाचीं काहीं अशुभ लक्षणें खालीलप्रमाणें होत. अंसुढाळ किंवा अंसुपात आसनकुहा उघडगांडया किंवा केरसुणी, एकांडया कैराडोळा एकवागी, उतरंड, खुंटेउपाड, गोस, चिमुट किंवा चिमोट, चक्रावळ, दळभंजन, कुसभोवरा, कुसगोम, जांघडजाड, रिकाबदाल, अदमचसम, खांडकुहा, आसनखोड, जांघभोवरी हृदावळ चोटीभोवरी भुजभोवरी, त्रिकर्ण दोखुरी पंचदंती, विक्राळनामा, कृष्णतालु, काळमुखी, काखभोंवरा, पंचनखी, रक्तनेत्र, काळांजनी, जानुवर्त, नाकभुंकन, कर्ण मूळ, सारभुंकन, लेंडावर्त, मेंडुकमुख, लघुदंती, खिमावर्त, विषानैनी, पीतानी, काळटिक्या, सर्पजाति, कीरमुख किंवा रावामुख, चांदणी, शीरगामी, हयभग, अंगावर्त्त, पांढरपायी कपिमुख, शिरीगोम, फासोळीस उजळटिक्या, ऊर्ध्वमुखी गोम, एकरंगी, पाठीवर शुभ्र, एकरंगी किंवा हरएक रंगी. शुभ लक्षणी घोडयाचें तोड, शेंपूट, आयाळ, छाती, आणि खूर पांढरे असतात; त्याला अष्टमंडळ म्हणतात.

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .