विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घोटकी ता लु का. - सिंधमधील सक्कर जिल्ह्याचा टालुका. क्षेत्रफळ ३३९ चौ.मै. लोकसंख्या (१९११) ४६०८७. एक शहर व ८४ खेंडीं. उत्पन्न २.२ लाख रू. तालुक्यांत नेहमीं पूर येण्याचा संभव असतो. ज्वारीकरितां सिंधु नदीचे कालवे आणले आहेत. जमीनदार फारच लहान
व गरीब स्थितींत आहेत. नदीच्या काठानें बरेंच जंगल आहे.
श ह र. घोटकी तालुक्याचें ठिकाण. लो.सं. (१९११) ३४३० येथें १८५५ पासून म्यु. क. आहे. आणि दवाखाना व दोन शाळा आहेत. घोटकी १७४७ मध्यें वसवलें. सिंधमधील अत्यंत मोठी व सुंदर मशीद येथें आहे. येथें वस्ती बहुतेक मुसुलमानांचीच आहे व कांहीं हिंदु वाणीहि आहेत. येथील लोहारकाम कोरीव व रंगीत लांकूडकाम प्रसिध्द आहे. येथें धान्य, नीळ, लोंकर व ऊंस यांचा व्यापार चालतो