विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घुराम - (अथवा रामगड). पतिआळा संस्थानांत घनौर तालुक्यांतलें एक जुनें शहर. दंतकथेवरून येथें श्रीरामचंद्राचें आजोळ होतें असें दिसतें. ११९२ मध्यें महमद घोरीनें हें घेतलें. प्रारंभीं हें दिल्लीचें मांडलिक म्हणून होतें. पुढें तें मोडकळीस आलें व आतां त्याच्या पूर्ववैभवाची साक्ष देणारे कांहीं अवशेष मात्र आहेत.