विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घुंड - पंजाब. केओंथळ संस्थानचें मांडलिक संस्थान. क्षेत्रफळ २८ चौ.मैल.लो.सं. (१९०१) १९२७. उत्पन्न २०००. केओंथळला २५० रू.खंडणी द्यावी लागते. संस्थानि काला सर्व अधिकार दिले आहेत. मृत्युच्या शिक्षेला मात्र सुपरिं. सिमलाहिल् स्टेट्स याची संमति घ्यावी लागते.