विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घिरथ - पंजाबांतील एक जात. लो.सं. (१९११) १७११२९. हे मुख्यत: हिंदु असून विशेषत कांग्रा व होशियारपूर जिल्ह्यांतील डोंगरांत राहतात. रजपूत लोकांच्या अनीतिसंबंधापासून हे झालेले आहेत असें म्हणतात. ते फार उत्तम शेतकरी असून वरील जिल्ह्यांत ते शेतकरी आहेत. भाटी, चांग व ही जात एकच आहे. या तीन्ही जाती आपसांत रोटीव्यवहार करितात. [ से.रि. (पंजाब) १९११]