प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

घाशीराम कोतवाल - याचें नांव मराठी इतिहासांत प्रसिध्द आहे. हा कनोजी ब्राह्यण असून ह्याच्या बापाचें नांव शामळदास (सावळदास) असें होतें. हा मूळ अवरंगाबादचा राहणारा. पण नोकरी किंवा व्यापार करून आपलें नशीब काढण्याकरितां हा पुण्यास आला होता. गोड वर्तन आणि हुषारी यामुळें लौकरच त्याचा पुण्याच्या दरबारांत प्रवेश होऊन नाना फडणविसाची मर्जी त्याच्यावर बसली.

घाशीराम लवकरच बढतीला चढून १७८२ मध्यें पुणें शहरचा कोतवाल झाला. खरोखरच तो लायख व कार्यक्षम अधिकारी होता. कोतवाली (पोलीस) खातें सुधारून वाढ विण्यांत यांनें अतिशय परिश्रम घेतले व नजरबाज (गुप्त पोलिस)  लोक ठेवून पुण्यांत फंदाफितुरास पुष्कळच आळा घातला. जुन्या कागदपत्रांवरून असें दिसतें कीं, प्रथम कोतवालीची जागा आनंदराव काशीकडे असून १७७७ सालीं ती घाशीराम याला देण्यांत आली. पण १७८२ पर्यंत त्याला त्या जाग्यावर कायम करण्यांत आले नव्हतें. त्याचा ठराविक पगार म्हणजे अबदागिरी धरण्यांकरितां ठेवलेल्या नोकराचे ६६ रूपये आणि मशाल धरणा-याचा (दिवटयाचा) ५५ रूपये धरून एकंदर वर्षास ६२१ रूपये होता. घाशीरामाच्या हाताखालीं तीन अधिकारी असून त्यांच्याकडे कोतवालींतील तीन खातीं सोपविलीं होतीं. मुजुमदाराकडे दस्तैबज, अर्ज वगैरे लिहिण्याचें काम असे. दुस-याकडे
कागदापत्रें सांभाळण्याचें काम असे आणि तिसरा जमाबंदीचा अधिकारी असे. तिघांचा पगार मिळून वर्षास ६४० रू. खर्ची पडत.घाशीरामच्या वेळीं शहरांत खालील सहा चबुतरे किंवा मुख्य पोलीस ठाणीं होतीं.

(१) कोतवाल चावडी (२) सोमवार (३) वेताळ (४) रवि वार (५) नारायण व (६) शनवार. या सर्व पोलीस ठाण्यांचें उत्पन्न दरवर्षी अजमासें २५००० रूपये असे.
इ.स.१७९०-९१ मधील जमेच्या आंकडयांवरून कोतवाली उत्पनाच्या बाबी कोणकोणत्या असत. हें चांगलें दिसून येतें.

रू.३१५, नजर - माल मिळकत सज्त्रानाच्या ताब्यांत आल्या बद्दलची सरकारास द्यावी लागे ती.
रू.१५४ कमावीस.
रू.४६६३, घरविक्रीकर कर.
रू.२०५, पाट दाम  (पाट लावण्यावर कर).
रू.६१,  गवयांकडून फी.
रू.१५९८५,  दंड.
रू. ३०४२ बेवारसी मालमत्ता.
रू.२९३ जुगाराबद्दल दंड.
रू.२३७६, वजनें, मापें, कापड इत्यादिंवर सरकारी छाप मारण्याची फी.

हें एकंदर उत्पन्न २७६१० रूपये असे. आणि तें पुणें शहराच्या पोलीस खात्याचें उत्पन्न म्हणतां येईल. १७९१ सालीं पुण्यांत दंडाला पात्र असे फक्त २३४ गुन्हे होते. त्यावरून पुण्यास गुन्हे किती कमी होत हें दिसून येतें. या गुन्ह्यांत पुढील गोष्टी असत :-  सरकारच्या परवानगीशिवाय वेश्या होणें, परवानगीशिवाय बकरी मारणें; बेवारसी प्रेताची वाट लावणें; स्वत ची जात चोरणें, बहिष्कृत असतां फसवून जातीच्या पंक्तींत बसणें हीन वर्णाच्या हातचें जेवणें, कुंटिणपणा करणें, वेश्या करण्याकरितां मुली विकत घेणें, एक नवरा जिवंत असतांना दुसरा करणें, बायकोला काडी मोडून दिल्यानंतर तिला घेऊन राहणें, कोळयांनां चाकरीस ठेवणें इत्यादि. त्या वेळीं कोतवालाचें काम पुढें दिल्याप्रमाणें होतें. ‘शहराच्या पेठा, पुरे व कसबे येथील किरकोळ कजिया, पेठेचे कमाविसदार यांनीं मनास आणावा; मातबर कजिया असल्यास कोतवालीकडे मनास आणून हलकी गुन्हेगारी घेत जाणें. रस्त्याचा गल्लीचा व घरचा कजिया लागेल त्याचा इनसाफ कोतवालानें करावा.’  (इतिहाससंग्रह ऐ. गोष्टी, भा.; २ पूना इन बाय गॉन डेज; खरे-ऐ.ले.संग्रह.भा.९; वाड.भा.८.पृ.१२६)

वरील यादीवरून असें वाटते कीं स्त्रीपुरूषविषयक अनीति त्यावेळीं फार माजली असावी. घाशीरामाबद्दल लोकांत झालेल्या अप्रीतीचें हें एक कारण असूं शकेल. त्यांतून कदाचित नाना फडणविसांच्या बळावर तो जुलमी व उन्मत्त बनला असावा. त्यामुळें पुढें त्याचा फारच वाईट रीतींने अंत झाला.

१७९१ च्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस श्रावणमासाची दक्षिणा आटोपल्यानंतर पस्तीस द्रावीडी ब्राम्हण घाशीरामाच्या बागेंत गेले; तेथें त्यांनीं माळयाच्या परवानगीशिवाय कांहीं कणसें तोडिलीं. त्यावरून तंटा होऊन माळी घाशीरामाकडे आला व त्याला त्यानें सांगितलें कीं कित्येक चोर व कोमटी यांनीं बागेंत दंगा केला. तेव्हां कोतवालानें २५ प्यादे पाठवून  ब्राम्हणांनां पकडून स्वत:च्या  (भवानी पेठेंतील) वाडयांत भुयारांत त्यांना कोंडलें. रविवारची रात्र सोमवार दिवस रात्र व मंगळवार दिवसपर्यंत ते तेथें होते. मानाजी फांकडयास ही गोष्ट कळल्यावर त्यानें जबरीनें कुलूप तोडून ब्राम्हण बाहेर काढिले. त्यांत १८ ब्राम्हण मेले होते;  तीन बाहेर काढल्यावर मेले;  तेव्हां हें वर्तमान मानाजीनें पेशव्यांनां कळविलें. त्यांनीं नानांना सांगितल्यावरून त्यांनी घाशीरामास विचारिलें. त्यानें ते कोमटी चोर होते असें उत्तर दिल्यावरून नानांनी मुडदे जाळण्यास परवानगी दिली. परंतु मानाजी मुडदे उचलूं देईना. तेव्हां नानांनीं घाशीरामास चौकींत बसवून चौकशी चालविली. इतक्यांत हजार तैलंगी ब्राम्हण नानांच्या वाडयापुढें येऊन दंगा करूं लागले. न्यायाधीश अय्याशास्त्री हे वाडयांत जात असतां त्यांची शालजोडी व पागोटें ब्राम्हणांनीं फाडलें व मारामारी केली. शास्त्रीबुवांनी चौकशी करून घाशीरामास देहांतशासन शिक्षा दिली. तेव्हां मंगळवारीं रात्रीं त्याची धिंड काढली व बुधवारीं सायंकाळी भवानी पेठेच्या पलीकडे त्याला नेऊन सोडला. तेथें वरील द्रवीड ब्राम्हणांनीं ‘दगड उचलून मस्तकावर घालून (त्यास) जीवें मारला.’  मग ब्राम्हणांचीं प्रेतें जाळलीं. घाशीरामाच्या प्रेतास अग्नी दिला नाहीं. त्याच्या हाताखालील लोकांस व दोघा मुलांस कैद करूस त्यांची मालमत्ता जप्त केली  (खरे.ऐ.ले.सं.भा.९).

यावरून ब्राह्मणांबद्दल खरा प्रकार घाशीराम यास शेवटपर्यंत माहीत नव्हता असें दिसतें. चार्लस मॅलेटहि म्हणतो, हा भयंकर प्रकार उघडकीस येईपर्यंत घाशीरामाला त्याची माहिती नव्हती असें दिसतें. त्याच्या हाताखालच्या अधिका-यांनीं आपल्या नेंहमीच्या पध्दतीप्रमाणें आपलें काम बजावलें होतें तथापि घाशीरामाविरूध्द फार मोठी ओरड झाली, व श्रीमंतांनीं ब्राम्ह्यणांच्या भीतीनें त्या दुर्दैवी मनुष्याला पिसाळून गेलेल्या तैलंगी ब्राम्हणाच्यां स्वाधीन केलें. घाशीरामाला त्याच्या उत्कर्षाच्या दिवसांत मोठा मान असे.

अशा प्रकारानें घाशीरामाचा अंत झाला. पण त्याच्या अंगीं कितीहि दोष असले तरी त्यानें पुण्याच्या पोलिसांनां व्यवस्थेशीर वळण लाविलें एवढें खरें. त्यानें नवापुरा नांवांची भवानी पेठेच्या पूर्वेस एक नवी पेठ वसविली आणि हडपसरच्या रस्त्यावर एक बाग व तलाव त्यानें बांधला होता.

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .