विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घायपात, व स्तु क्षे त्र. - ही वनस्पति मूळची दक्षिण अमेरिकेचा उष्ण कटिबंधातींल भाग व दक्षिणेक डील संस्थानें येथील होय. समशीतोष्ण कटिबंधांतील उष्ण प्रदेश व इतर उष्ण कटिबंधातील प्रदेश; दक्षिण यूरोप, आफ्रिका, हिंदुस्थान, वेस्ट इंडीज व अमेरिका खंडातील कांहीं भागांत ही वनस्पती आढळते. हिंदुस्थानांतील कित्येक उष्ण प्रदेशांत ही वनस्पति कायमची राहिली असून जमीन कोरडी व खडकाळ आणि हवा फार सर्द नसल्यास ६००० फूट उंचीपर्यंतच्या प्रदेशांत ही वनस्पति वाढते.
इ ति हा स - स्पॅनिश वेस्ट इंडीज व मेक्सिको यासंबंधीं लिहितांना गोमारानें या वनस्पतीचा उल्लेख केला आहे. हिच्या वाखाचा शिवण्याच्या दो-यासारखा उपयोग करीत असत असें तो म्हणते. फ्रॅगोसस यानें या वनस्पतीपासून निघणा-या मद्याचा उल्लेख केला आहे. डोडोनिअस यानें क्लुशियसपासून आणलेलें चित्र प्रसिध्द केलें. ह्याचा पुढील लेखकांस बराच उपयोग झाला. पुढें १७२७ सालीं ट्रयु यानें या झाडाच्या फुलांचें चित्र काढून झाडासंबंधीं बरीच माहिती दिली आहें. हिंदुस्थानांत याच्या संबंधीं महत्वाची माहिती रॉक्सबर्ग यांजकडून मिळते. त्यानें ए.कॅन्टला, ए. लुरिडा व ए. टयुबेरोसा अशा तीन जातींचा उल्लेख केला आहे. यांपैकीं पहिलीचा कलकत्ता येथें १७९४ सालापूर्वीच प्रवेश झाला. हीस कौंतल (कौटल) असें संस्कृत नांव होतें. दुसरी जात मूळची अमेरिकेंतील असून तिसरी क्यू येथील होती. परन्तु कौंतल हें नांव संस्कृत असल्याचें दुस-या लेखकांस मान्य नाहीं. याचीं दुसरीं नावें आहेत ती वर्णनात्मक आहेत.
जा ती. - मुख्य जाती सात (१) ॲगाव्हा ही जात केवळ शोभेकरितां बागेंत लावतात. तिचा विणकामांत उपयोग होत नाहीं. ही मूळ वेस्ट इंडीजबेटांतील होय. (२) ए. कॅटाला ही जात हिंदूस्थानांत सर्वत्र विपुल आढळते व तिचा कुंपणाकरितां उपयोग करतात. या झाडाच्या पानांपासून वाख काढतात. (३) ए.इलाँगेटा ही जात पंजाब, दिल्ली, ग्वालेर आणि चंबळा व यमुना या नद्यांमधील कोरडया प्रदेशांत पुष्कळ सांपडते. हिच्या तंतूंची नीट परीक्षा झालेली नाहीं. पण ते अत्यंत उपयोगी असण्याचा संभव आहे. (४) ए.सिसालाना ही जात मूळ युकॅटनमधील असून ती १८९० च्या सुमारास हिंदुस्थानांत आली व ती हल्लीं हिंदूस्थानांतील बहुतेक प्रांतांत आहे. (५) ए. व्हेराक्रूझा ही जात मूळ मेक्सिकोमधील असून ती १८३६ च्या सुमारास हिंदुस्थानांत आली. ही सर्द हवेंत चांगली होते, व म्हैसुरांत तिचा प्रसार फार आहे. हिच्या तंतूंची उपयुक्तता अद्याप माहीत नाहीं. (६) ए.विघटी ही जात म्हैसूर ते पंजाबपर्यंतच्या सर्व कोरडया प्रदेशांत सांपडते. (७) ए. लॉगिसेपाला ही जात सहराणपूर येथें रामबन्स (रामवंश) केवडा या नांवानें प्रसिध्द असून ती कलकत्ता, ब्रम्हदेश व दक्षिणहिंदुस्थानांत आढळते. हिचा वाख फार चांगला निघतो.
उ प यो गं.- औषधि, अन्न, पेय, साखर, द्राक्षासव, साबणासारखें द्रव्य, संधान द्रव्य वगैरे कामांकरितां या वनस्पतीचा उपयोग होतो. यांच्या पानांपासून वाख निघतो. यापैकीं अलो फयबर, सिसल हेम्प अथवा व्हिजिटेबल सिल्क हीं मुख्य असून यांनां पीत म्हणतात. मोठया, जाड व ओलसर अशा पानांचा पोटिसाकरितां उपयोग करतात. अमेरिकन डॉक्टर उपदंशानंतर रक्त शुध्द करण्याकरितां या पानांचा रस देतात. याचीं मुळें मूत्ररेचक व उपदंशहारक आहेत. सार्सापरिल्यांत या पानांचे मिश्रण करतात. योग्य रीतीनें शिजविलें असतां याच्या मुळयांचें स्वादिष्ट व पौष्टिक अन्न तयार होतें. हिरव्या बुंध्यांचा मनुष्यांनां व पानांचा गुरांनां खाण्याकरितां उपयोग होतो. फुलांच्या हंगामांत याची मधली कळी तोडली असतां त्या जागेंतून आंबट-गोड रस बाहेर निघतो. त्यापासून जिला स्पॅनियर्ड्स ‘पल्क’ म्हणतात ती दारू तयार होते. पल्क करितां ए. साल्मियाना जातीच्या झाडाची लागवड करतात. या रसापासून साखर किंवा सिरकाहि तयार करतां येतो. या रसाचा साबणाऐवजींहि उपयोग करतां येतो. वाळवी लागूं नये म्हणून या रसाचा उपयोग भिंतीस लावावयाच्या चुन्यांत करतात. हातांस किंवा पायांस हा रस चोळला असतां अग्नीपासून अपाय होत नाहीं. याचा बुंधा वाळवून कापला असतां त्याचा वस्तरा घासण्याकरितां किंवा बुचाऐवजीं उपयोग करतां येतो. वाख काढून घेतल्यानंतर उरलेला लगदा खताच्या उपयोगी पडतो. घायपाताच्या तंतूचा उपयोग दार सतरंज्या, चटया, कुंचले वगैरे करण्याकरितां करतात. उरलेल्या वाईट तंतूंचा कागद करण्याच्या कामीं उपयोग होतो. कामीं उपयोग होतो. सफाईदार तंतूंचें कापड विणतात. तागाऐवजीं किंवा त्यांत मिसळण्याकरितां घायपाताच्या वाखाचा उपयोग करतात. घाय पाताचे तंतू काढण्याचें काम यंत्राच्या सहाय्यानें करतात. घायपाताच्या झाडाची पूर्ण वाढ, बाहेरचीं मोटालीं पानें वर चेवर न कापल्यास ६ वर्षांत पूर्ण होते. कित्येक वेळां पूर्ण वाढ होऊन दांडे येण्यास २०-२५ वर्षेहि लागतात. १००० पानांपासून ५० ते ७० पौंड वजनाचे तंतू निघतात व एक टन तंतूंस ३० ते ३५ पौंडपर्यंत किंमत येते.