विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घातमपूर संयुक्तप्रांत. कानपूर जिल्ह्यांतला तालुका. क्षेत्रफळ ३४५ चौ.मै.लो.सं. (१९११) १२२२९३. डर चौ.मै.प्रमाण ३४५. शहर एकहि नाहीं खेडीं २३३. तालुक्याच्या मध्यावरून शोण नदी वहाते. उत्तरेकडील जमीन सुपीक आहे. दक्षिणेकडचीहि जमीन बरी आहे, पण तींत रान फार माजतें व नाले फार पडतात. १९०३ सालीं २१६ चौ.मै.जमीन लागवडीखालीं होती. पैकी ६२ मै. कालव्यानें भिजत असे. भोगनीपूर कालव्यानें त्यांतल्या पांचषष्ठांश म्हणजे ५०I५१ मैलांना पाणी मिळें.