विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घाटाळ, पो ट वि भा ग. बंगाल. मिदनापूर जिल्हा.क्षे.फ. ३७२ चौ.मै.लो.सं (१९११) ३०१३९६. यांत पांच शहरें व ७१९ खेडीं असून जमीन उत्तम आहे पण नेहमीं पुराची भीति असते. पीक बहुधां नेहमीं चांगलें असतें पण लोकांनां मलेरियाचा उपद्रव फार होतो.
ता लु का. - शे.फ.९१ चौ.मै.व लो.सं. (१९११) ८३३४१. यांत २ शहरें व १४७ खेडीं आहेत.
श ह र.- तालुक्याचें मुख्य ठिकाण. लो.सं (१९११) १२०६४. सीलाई व रूपनारायण यांच्या संगमावर आहे. येथून बोटीनें कलकत्याशीं व्यापार चालतो. पूर्वी येथें डच लोकांची फॅक्टरी होती. हल्लीं कपडा व रेशीम बनते. म्युनिसिपालिटी व इतर आफिसें वगैरे इतर ठिकाणाप्रमाणें आहेत.