विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घनी - हें मिर्झा महंमद ताहीर ह्याचें काव्यविषयक टोपणनांव होतें. त्याला बहुतेक धैनी काश्मिरी असें म्हणत असत; कारण तो काश्मीरचा रहिवासी होता. तो शेख मुह सीन फानीचा शिष्य असून त्यानें विद्वत्तेच्या व काव्याच्याबाबतीत गुरूच्याहि वर ताण केली. त्यानें “दिवाण घनी” नांवाचें एक काव्य केलें आहे. तो काश्मीर येथें इ.स.१६६८ मध्ये मरण पावला. अवरंगझेब ह्यानें आपला काश्मीरचा सुभेदार सैफखानाला धनी यास दरबारीं पाठविण्याबद्दल कळविलें होतें; परंतु धनीनें जाण्याचें नाकारून खानाला अवरंझेबास असें कळविण्यास सांगितलें कीं, धनी हा वेडा झाला असून तो दरबारांत येण्यास नालायक आहे. खानानें धनीसारख्या शहाण्या मनुष्यास वेडा म्हणण्याचें नाकारलें. त्यानंतर धनी खरोखरच वेडा झाला व पुढें तीन वर्षांनीं मरण पावला. मरणाच्या वेळीं तो अगदीं तरूण होता. अठरा वर्षेपर्यंत त्याची कवित्वाबद्दल ख्याति झाली होती. अठरा वर्षेपर्यंत त्याची कवित्वाबद्दल ख्याति झाली होती. कवितेंत तो कधीं कधीं ताहीर असेंहि आपलें नांव घालीत असे (बील ओरि. वायॉ. डिक्श.)