प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

घटस्फोट - झालेलें लग्न रद्द करणें हा वास्तविक निव्वळ सामाजिक प्रश्न आहे. पण पुष्कळ समाजांत त्याला धार्मिक स्वरूप आहे. तसेंच घटस्फोटाचा प्रश्न अगदीं प्राचीन काळापासून व अगदीं रानटी लोकांतहि आढळतो. चीनसारख्या प्राचीन पुराणप्रिय राष्ट्रानेंहि या बाबतींत केलेंले नियम आधुनिक प्रगतिप्रिय पाश्चात्य राष्ट्रांना धडा  शिकविण्यालायक आहेत. घटस्फोटानंतर (१) मुलांवर कोणाची मालकी (२) इस्टेटीवर एकमेकांचा किती हक्क व (३) बायकोला पुन्हां लग्न करण्याचा हक्क, हे तीन महत्त्वाचे प्रश्न उद्धवतात व त्या बाबतींत निरनिराळया देशांत निरनिराळया चाली आढळतात.

भा र ती य.-हिंदु लोकांत विवाह हें धार्मिक बंधन असून तें यावज्जन्म टिकणारें आहें त्यामुळें घटस्फोट व पुनर्विवाह या गोष्टी हिंदु धर्मांत नाहीत. तथापि कांहीं स्मृतिकारांनीं स्त्रीला पहिला नवरा टाकून दुसरा विवाह करण्यास कांहीं परिस्थितींत परवानगी दिलेली आहे  (याज्त्रवल्क्य १.७२ नारद १२. ९२ ९३) पुनर्विवाहाला मुख्य आधारभूत असलेला पुढील श्लोक प्रसिद्ध आहेत :-

नष्टे मृते प्रवजिते क्लीबे च पतिते पतौ ।
पंचस्वापत्सु नारीणां पतिरन्योविधीयते ॥

या श्लोकांत नवरा बैरागी बनल्यास किंवा नपुंसक असल्यास किंवा धर्मभ्रष्ट झाल्यास स्त्रीनें दुसरा नवरा करावा, असें सांगितलें आहें तथापि या स्मृतिवचनानुसार आचार रूढ झालेला नाहीं. आधुनिक हिंदु कायद्यांतहि घटस्फोट उच्च हिंदू जातींत मान्य नाहीं. रूढी म्हणून पुष्कळ हलक्या जातींत घटस्फोट होऊं शकतो. मलबारांत स्त्रीपुरूष दोनतीन वेळांहि नवरा बायकोचें नातें बदलतात. मध्यप्रांतांत अनेक जातींत पूर्वीच्या लग्नाचा खर्च नव-याला देववून पंचायत घटस्फोट मान्य करते. बडोद्यामध्यें पुन:विवाह रूढ असलेल्या सर्व जातींत घटस्फोटहि रूढ आहे.
नेपाळांत नेवार स्त्री पहिल्या नव-याशीं असंतुष्ट झाल्यास केव्हांहि दुसरा नवरा करूं शकते.

योग्य कारणाकरितां नव-याने बायकोस सोडचिठ्ठी दिल्यावर त्या स्त्रीस पहिल्या नव-याच्या हयातींत पुनर्विवाह करतां येतो व तो सशास्त्र मानतात. नवराबायकोचे विवाहनिर्मित जे हक्क आहेत - म्हणजे नव-यानें बायकोस जवळ ठेवावें व बायकोनेंहि त्याच्याजवळ जाऊन राहावें व उपभोग घ्यावा अशाकरितां स्त्रीपुरूषांस एकमेकांविरूद्ध कोर्टांत फिर्याद करतां येते व तसा हुकूम न्यायमूर्तीस फर्माबितां येतो. परंतु नव-याजवळ बायकोनें जाऊन राहाण्यास तिला कोर्ट भाग पाडूं शकत नाहीं याचीं कारणें अशी :- (१) बायकोच्या जीवितास धोका येइल अशा निर्दयपणानें तिच्याशीं पतीनें वागणें रिपोर्ट १३ अला १२६ (२) हिंदूनें आपल्या घरांत मुसलमानीण वेश्या आणून ठेवणें व बायकोचा तेणेंकरून उपमर्द व मानखंडना करून तिला अब्रूनें घरांत रहाणें अशक्य करणे. (१४ डब्ल्यू आर. ४५१)   (३) लग्नसंबंधीं हक्काविरूद्ध गुन्हेगार होऊन बायकोस घराबाहेर घालवून देणें.  ३४ क. ९७१ (४)  हिंदूचा ख्रिश्चन होणें धर्मांतर करणें  (५ डब्लू आर.२३५.) हिंदू पति किंवा पत्नी यांनीं धर्मांतर केलें तरी त्यांचा परस्पर लग्नसंबंध तुटत नाहीं  (९ म. ४४६; ४ मुं. ३३०; १८ क.२६४)   (५) जातिभ्रष्ट होणें  (३१ मुं. ३६६) (६) महारोगी किंवा इतर गलिच्छ शरिरव्याधी (१ मुं. (१६४.५ मुं आ शि.)  (७) उभयतांच्या करारानें बायको निराळी रहात असल्यास  (५३ मुं. ८७९).

सोडचिठ्ठी देणें, पुनर्विवाह करणें-हे हक्क मुंबई हायकोर्टानें मान्य केले आहेत  (६ मुं.१२६; ४ मुं ३३०;  १ मुं ३४७; २ मुं. १२४.) मुंबई इलाख्यांत निदान खालच्या जातींत बायकोनें व विधवेंने दुसरें लग्न करण्याची चाल आहे असें दिसून येतें.

नवरा जर पुरूषत्वामध्ये कमी असला, पतिपत्नीचा निरंतर कलह होत असला, लग्न सशास्त्ररीतीनें झालेलें नसलें, नव-यानें बायकोच्या संमतींनें मंगलसूत्र तोडून टाकलें, व  तिला लेखी सोडचिठ्ठी दिली, किंवा नवरा देशांतरास गेला, व तो बारा वर्षांत परत आला नाहीं किंवा त्यानें तिला खबर दिली नाहीं, तर त्या स्त्रींने तिचा जिवंत असतां दुसरा नवरा तिला वाटेल तर करावा. पण नवरा देशांतरास गेला असला तरी पुनर्विवाह करतां येत नाहीं याचें एक पुढील उदाहरण आहे. बायको अगदीं अल्पवयी असतांना लग्न झालें. नंतर नवरा कोठें देशांतरास गेला  १५।१६ वर्षांत बायकोचा समाचार घेतला नाहीं; तिची अन्नवस्त्रांची वगैरे कांहीं सोय केली नाहीं. लग्न झाल्यापासून या अवधींत शरीरसंबंध घडला नाहीं अशा स्थितींत गंगा नांवांच्या स्त्रीनें फारकत मिळविण्याकरितां जातीकडे मागणें केले-जातीनें-पंचांनी चौकशी करून  गंगास पुनर्विवाह करण्यास परवानगी दिली. तिनें त्याप्रमाणें दुसरें लग्न केलें. नंतर नवरा परत आला व नवरा जिवंत असता दुसरें लग्न केलें तें रद्द आहे;  सबब ती पीनलकोडचें कलम ४९८ यांतील गुन्ह्यास पात्र आहे म्हणून तिच्यावर फौजदारी फिर्याद लाविली.

मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तीनीं १९ मुं.लॉ. रिपोर्टर पा. ५६ यांत ठरविलें कीं, जातींस  नवराबायकोचें लग्नसंबंध तोडण्याबद्दल ठराव करण्याचा अधिकार नाहीं. ही चाल किंवा रूढी जनपदहितास विरूद्ध अतएव गैरकायदेशीर आहे. अठरा वर्षे देशांतरास राहून त्यानंतर पतीचा हक्क पत्नीवर फौजदारींत फिर्याद करण्यांकरितां बजावला. दुसरें लग्न करावयाचें नाहीं पहिला नवरा या बायकोस काय वागविणार हें दिसतेंच आहें, अशा वेळीं दुसरें लग्न सशास्त्र मानणें हेंच न्यायाचें व जनहिताचें आहें. नव-याच्या व बायकोच्या संमतीनें लग्नसंबंध तोडणें व दुसरें लग्न करणें हें अनीतिमान नाहीं असें मद्रास हायकोर्टानें ठरविलें  (१७ म. ४७९). नव-याच्या संमतीशिवाय जातीनें बायकोस दुसरें लग्न करण्यास परवानगी देणें हें अनीतिमान एतएव बेकायदेशीर आहे असें मानिलें आहे  (२ मुं. १२४; २. मुं. १४०.)  जात ठरवील ती रक्कम दिली कीं नवराबायकोचे लग्नसंबंध नव-यास किंवा बायकोस तोडून टाकतां येतात अशी चाल इं. कॉन्ट्रॉक्ट ॲक्टाचें कलम  (करारशास्त्र) २३ याप्रमाणें अनितीमान किंवा सार्वजनिक  (हित) युक्तीस विद्यातक आहे असें ठरविलें  (३९.मुं.५३८;  १९ मुं. लॉ. रिपोर्टर ५६).

ग्री क-प्राचीन ग्रीक लोकांत घटस्फोट करण्याची नव-याला पूर्ण मुभा असे. स्त्रीधन स्वाधीन करून बायकोला तिच्या बापाच्या घरीं पाठविली कीं घटस्फोट झाला. उभयतांच्या सम्मतींनें केव्हांहि घटस्फोट करतां येत असे. व्यभिचार हें बायकोविरूद्ध नव-याला घटस्फोटास मोठें कारण असे. मात्र नव-याविरूद्ध बायकोतर्फे हें कारण कायदा मान्य करीत नसे.

रो म न.-प्राचीन रोमन कायद्यांत खि.पू.५ व्या शतकापूर्वी घटस्फोटाला परवानगी होती. पण  दुस-या शतकाच्या सुमारास घटस्फोटांची संख्या फार वाढूं लागली. चांगल्या आचरणाच्या प्रसिद्ध रोमन पुरूषांनींहि अनेकदां विवाह केले. पाँपीनें पांच वेळां, सझिरनें चार वेळां, सिसरोनें तीन वेळां, प्लिनीनें तीन वेळां लग्न केलें. घटस्फोट ही अगदीं साधी खासगी बाब गणली जात असे व नवरा किंवा बायको कोणीहि गैरवर्तणूक वगैरे कोणतेंही कारण न दाखवितां नोटिस पाठवून घटस्फोट करूं शकत असत. विवाहसंस्थेची ही अवनति रोमन राष्ट्राच्या अध:पाताला अंशत: कारणीभूत झाली असें काहींचें मत आहे.

ख्रि स्ती.-रोमन लोकांतील वैवाहिक:बंधनाची शिथिलता पाहिल्यास ख्रिस्ती धर्मप्रवर्तकांची प्रवृत्ति घटस्फोटा कडक निर्बंध घालण्याकडे झालीसें दिसतें. न्यू टेस्टामेंटमध्यें या बाबतींत स्पष्ट उल्लेख नाहींत. तथापि घटस्फोटाला बायबलांत परवानगी नाहीं असेंच प्रारंभीं सर्वांचें मत होतें. पण
पुढें प्रॉटेस्टंट धर्मसुधारणेच्या वेळीं घटस्फोट हा धार्मिक प्रश्न नसून खासगी सामाजिक प्रश्न आहे असें ठरविण्यांत आलें. १७ व्या शतकांत प्रथम हॉलंड व अमेरिका ह्या देशांत घटस्फोटविषयक स्वतंत्र कायदा करण्यांत आला. १८०३ मध्यें झालेला “कोडनेपोलियन” हा फ्रेंच कायदा
घटस्फोटाच्या प्रश्नाला यूरोपांत सर्वत्र निश्चित स्वरूप देण्यास परिणामकारक झाला. अलीकडे घटस्फोटाला सामान्यत: पुढील पांच कारणांपैकी कोणतेंहि एक कायदेशीर समजतात. (१) व्यभिचार, (२) खुनाचा प्रयत्न, (३) द्वेषभूलक त्याग, (४) वैवाहिक कर्तव्याच्या महत्वाचें अतिक्रमण किंवा विवाहसंबंधाला अपमानस्पद असें वर्तन आणि  (५) तीन वर्षे टिकलेलें वेड. ही तीं पांच कारणें होत.
     सर्व ख्रिस्ती देशांत सामान्यत: वरील स्वरूपाचा कायदा प्रचलित आहे. अशा कायद्याअन्वयें झालेल्या घटस्फोटाचें कोष्टक पुढें दिलें आहे :-

 देश  इ.स. १८८६  इ.स. १८९४  इ.स. १९०४
 आस्ट्रिया   ७४८  ८५६  १८६४
 बेल्जम  ३५४  ५४८  ९३२
 कानडा  ५७७  ३१६  ५४९
 डेन्मार्क  ...  ६२४५  ९८६०
 इंग्लंड  ...  ७२७  ...
 फ्रान्स  ...  ५३४२  ९५६३
 जर्मनी  ५३४२  ९५६३  ८०३७
 इटाली  ...  ...  ५९१
 नार्वे  ...  ७१  १८५
 ग्रीस  ८८  १०३  ...
 रशिया  १३८८  ...  ...
 स्वित्झर्लंड  ११०२  ...  १२४३

      
१९२० मध्यें इंग्लंड व वेल्स मिळून ३०९० घटस्फोट झाले. सां प्र त चा इं ग्र जी का य दा.-वैवाहिक संबंध्विष यका तीन प्रकारचे दावे कोर्टांत येतात.  (१) विवाह मूलत: गैरकायदा (व्हॉइड ॲबइनीस) ठरविण्यासंबंधीं दावे, (२) विवाहसंबंध पुन प्रस्थापित करण्याचे (रेस्टिटयूशन ऑफ कॉंज्युगल राइट्स) दावे; आणि  (३) कायदेशीर विभक्तपणा (ज्यूडिशियल सेपरेशन) व घटस्फोट (डायव्होर्स.)

विवाह मूलत:च रद्द ठरविण्यास (१) नजीकचा आप्तपणा,  (२) अनेकपतित्व किंवा अनेकपत्नीत्व,  (३) असंमति,  (४) वेड आणि  (५) विवाहपूर्तीची  (अपत्योत्पादनाची) अशक्यता; यांपैकीं कोणतेंहि एक कारण पुरते. पतिपत्नीपैकीं कोणाहि एकानें दुस-याचा त्याग केल्यास एकत्र नांदणुकीचा हक्क प्रस्थापित करण्याकरितां दावा आणतां येतो. पण कोर्टाचा पुन: प्रस्थापनाचा हुकुमनामा अमलांत न आल्यास पतिपत्नींनी एकमेकांचा त्याग केला असें कायदा मानतो व घटस्फोटाच्या दाव्यास तें कारण पुरेसें होतें.

कायदेशीर विभक्त स्थिति मागण्याचा दावा व्यभिचार क्रूरकर्म, दोन वर्षे किंवा अधिक अकारण त्याग, या कारणानें आणतां येतो. या उपायानें विवाह रद्द न होतां स्वतंत्र रहाण्याचा हक्क मात्र मिळतो. हा कायदेशीर विभक्तपणा पुढें घटस्फोटाच्या दाव्यास कारण होंऊ शकतो.

घटस्फोटाच्या दाव्यास   (१) क्रूरकर्म,  (२) व्यभिचार सृष्टिनियमाविरूद्ध गुन्हा,  (३) अनेक पतिपत्निसंबंध,  (४) जबरीसंभोग, आणि  (५) त्याग यांपैकीं एक कारण असावें लागतें. क्रूरकर्म या सदरांत जिवाला, अवयवाला किंवा आरोग्याला (शारीरिक किंवा मानसिक) अपाय करणा-या कृत्यांचा समावेश होतो.

घटस्फोटाचा किंवा विवाहविघटनाचा (नलिटि ऑफ मॅरेज) हुकुमनामा सहा महिने मुदतीनंतर कायम झाला असें कायदा समजतो म्हणजे त्या मुदतीपर्यंत पूर्वीचा विवाहसंबंध तुटत नाहीं व पुनर्विवाहाला मोकळीक होत नाहीं.

मुलांच्या पालकत्वाचा हक्क दाव्याचा निकाल होईपर्यंत प्रत्यक्ष ज्याच्या ताब्यांत मुलें असतील त्यास असतो. निकालानंतर पालकत्व, पोषणखर्च व शिक्षण या बाबतींत  मातापितरांच्या मागणीअर्जाचा योग्य तो निकाल करण्याचा कोर्टाला पूर्ण अधिकार असतो.

पोटगी खर्चाची मागणी दाव्याच्या निकालापर्यंतच्या काळापुरती दावा लागतांच बायकोला करतां येते, व पोटगी म्हणून उभयतांच्या संमतीनें ठरलेली किंवा उभयतांच्या उत्पन्नाच्या बेरजेच्या एकपंचमांशाइतकी रक्कम कोर्ट देववितें.

मु स ल मा नी का य दा.— या कायद्यांत घटस्फोटाला पूर्ण परवानगी आहे;  कारण इस्लामीधर्मांत विवाहाला धार्मिक स्वरूप नसून केवळ कराराचें स्वरूप आहे. विवाहरूपी करार मोडण्याचे उर्फ घटस्फोटाचे तलक, खुला, मुबारत, वगैरे प्रकार आहेत. नवरा कांहीं एक कारण न दाखवितां घटस्फोट (तलक) करूं शकतो; किंवा उभयतांच्या संमतीनें घटस्फोट (खुला) होतो; किंवा कोर्टांत दावा लावून क्लैब्य वगैरे कारणास्तव बायको घटस्फोटाचा हक्क मिळवूं शकते.

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .