विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घटकर्पर - या नांवाचा एक कवि व काव्य. घटकर्पर हा विक्रमादित्याच्या दरबारांतील नवरत्नांपैकीं एक होता अशी आख्यायिका आहे. कोणी कालिदासाचें हें एक टोंपण नांव होतें असें मानितात. वर्षाॠतूंचें वर्णन करणारें एक छोटेसें कृत्रिम काव्य “घटकर्पर” या नांवानें संबोधिलें जातें अभिनवगुप्त (घटकर्परकुलकवृत्ति), चतुर्भुजपुञ कमलाकर, कुशलकवि, घनश्यामपुञ गोवर्धन, ताराचंद्र विंध्येश्वरीप्रसाद, वैद्यनाथ वगैरेंच्या या काव्यावर टीका आहेत. याचें जर्मन भाषेंत भाषांतर झालें आहे.