प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे 
         
ग्लॅडस्टन विल्यम इचर्ट (१८०९-१८९८)- हा ब्रिटिश मुत्सद्दी लिव्हरपूल शहरीं रॉडने स्ट्रीट नं. ६२ मध्यें २९ डिसेंबर १८०९ रोजीं जन्मला. त्याचे वाडवडील मूळ लानर्कशायरमधील रहिवासी होते. जॉन व अँन या दांपत्याला एकंदर सहा अपत्यें झालीं. पैकी विल्यम ग्लॅडस्टन हें चवथें अपत्य होय. लहानपणापासून या मुलाचे गुण मनांत भरण्यासारखे असल्यामुळें तो घरांत सर्वांचा अत्यंत आवडता बनला. प्रथम लिव्हरपुल नजीकच्या सीफोर्थ गांवीं थोडेसें शिक्षण झाल्यावर विल्यम १८२१ मध्यें ईटन येथील शाळेंत जाऊं लागला. १८२८ मध्यें ईटन येथील अभ्यासक्रम संपवून तो ऑक्स्फोर्ड येथील खाइस्ट चर्चमध्यें शिक्षण घेऊं लागला व इ. स. १८३१ मध्यें ग्लॅडस्टननें ग्रॅजुऐट होऊन डबल फर्स्ट-क्लास मिळविला. पुढें ग्लॅडस्टन १८३२ सालीं इटलीमध्यें जाऊन तो पांच सहा भाषांचा व कलेचा अभ्यास करीत राहिला. इतक्यात इंग्लंडांत नव्या निवडणूकीची धामधूम सुरु झाली. तींत नीवॉर्कतर्फे तो सर्वांत अधिक मतें पडून पार्लमेंटचा सभासद झाला. या पार्लमेंटांत त्यानें पहिलें भाषण गुलामगिरीविरुद्ध केलें. पुढील बैठकींतहि एक दोन महत्वाचीं भाषणें ग्लॅस्टननें केलीं. १८३४ मध्यें पीलप्रधानमंडळानें ग्लॅडस्टनला ट्रेझरीच्या ज्यूनियर लॉर्डच्या जागीं नेमलें व १८३५ मध्यें वसाहतीचा अंडरसेक्रेटरी केलें. पण लवकरच पीलप्रधानमंडळ मोडलें अर्थात् ग्लॅडस्टनहि कामावरुन दूर झाला.

सरकारी कामांतून मोकळा झाल्यामुळें फावणारा वेळ ग्लॅडस्टन होमर व डान्टे यांची काव्यें नाचण्यांत घालवूं लागला. शिवाय चर्चमध्यें होणारा धर्मोपदेश ऐकण्यासहि तो पुष्कळ वेळां हजर असे. १८३७ मध्यें ४ था विल्यम वारल्यावर व्हिक्टोरियाच्या कारकीर्दींच्या आरंभीच पार्लमेंटची नवी निवडणूक झाली तींत ग्लॅडस्टन नीवॉर्कतर्फे पुन्हां निवडून आला. १८३८ सालीं त्यानें आपला 'धर्मव्यवस्थेचा राज्यव्यवस्थेशीं असलेला संबंध' (दि स्टेट इन इट्स रिलेशन्स वुइथ दि चर्च) हा विख्यात ग्रंथ प्रसिद्ध केला.

१८३९ जुलै २५ रोजीं हॉवर्डेंन येथें मिस कॅथराईन ग्लीने या बॅरोनेट स्टीफन ग्लीनेच्या बहिणीशीं ग्लॅडस्टटनें विवाह केला. स्टीफनच्या ईस्टेटीचा वारसाहि कॅथेराईनच्या मुलाकडेच जावयाचा होता. १८४० मध्यें ग्लॅडस्टटनें 'चर्चसंबंधाचीं तत्वें व त्यांचे परिणाम' (चर्च प्रिन्सिपल्स कन्सिवर्ड इन देअर रिसल्टस) हें पुस्तक प्रसिद्ध केलें. १८४१ मध्यें पार्लमेंटाची नवी निवडणूक झाली, तींत टोरीपक्षाचें ऐशीनें संख्याधिक्य झालें व पुन्हा पीलप्रधानमंडळ अधिकारावर आलें. ग्लॅडस्टनला बोर्ड ऑफ ट्रेडच्या व्हाइसप्रेसिडेंटची जागा मिळाली व त्या जागेवर असतां त्याने ब-याच आर्थिक प्रश्नांवर वादविवाद व भाषणें केली. पुढें १८४३ मध्यें लॉर्ड रिपनची बोर्ड ऑफ ट्रेडच्या प्रेसिडेंटची जागा मिळून ग्लॅडस्टनचा प्रधानमंडळांत प्रवेश झाला. परंतु १८४५ मध्यें आयर्लंडमध्यें बिनधर्मपंथीं कॉलेजें काढण्याचा व मेनूथ येथील रोमन कॅथोलिक कॉलेजला सरकारी मदत बरीच वाढविण्याचा प्रश्न प्रधानमंडळानें हातीं घेतला, त्या बाबतींत मतभेद असल्यामुळें ग्लॅडस्टननें आपल्या जागेचा राजीनामा दिला. पण त्याच सालीं प्रधानमंडळांत कांहीं उलथापालथ होऊन शेवटीं पीलच मुख्य प्रधान झाला व त्यानें ग्लॅडस्टनला वसाहतीच्या स्टेटसेक्रेटरीची जागा दिली. पण १८४६ च्या निवडणूकींत ग्लॅडस्टन उमेदवार म्हणून उभा राहिलाच नाहीं. व तें अत्यंत महत्त्वाचें वर्ष दीडवर्ष त्यानें घरीं स्वस्थ विश्रांतींत काढलें. १८८७ मध्यें ऑक्सफोर्ड युनिव्हार्सिटीतर्फे तो निवडून आला.

१८५०-५१ मध्यें नेपल्समध्यें असतां त्यानें तेथील जुलमासंबंधी जीं पत्रें प्रसिद्ध केलीं त्यांमुळें सर्व युरोपांत खळबळ उडाली. व इटलीच्या स्वातंत्र्यास मदत झाली. १८५२ मध्यें मिलिशिया बिलावरील वादांत व्हिग प्रधानमंडळाचा पराजय होऊन लॉर्ड डर्बीचें प्रधानमंडळ अधिकारारुढ झालें, त्यांत डिझरायली चॅन्सलर ऑफ एक्सचेकर झाला. १८५२ च्या निवडणुकीतहि तेंच प्रधानमंडळ कायम राहिलें. डिझरायलीनें केलेल्या बजेटावरील वादविवादांत ग्लंडस्टननें केलेल्या जोरदार भाषणामुळें बजेट फेटाळलें जाउच्न डिझरायली पक्षाचा पराजय झाला. थेव्हा व्हिगपक्ष व पीलचे अनुयायी यांचें संयुक्त प्रधानमंडळ स्थापन होऊन आबर्डींन हा मुख्य प्रधान झाला व ग्लंडस्टन चॅन्सलर ऑफ एक्सचेकर झाला. १८५३ मध्यें ग्लॅडस्टननें पहिल्याच प्रसंगीं बजेट तयार करुन सभेपुढें मांडलें, त्यांत अनेकप्रकारें सामान्य लोकांचें जीवित कमी खर्चाचें व अधिक सुखकर होईल अशी योजना होती व उत्पन्नावर कर बसविला होता. याप्रमाणें त्यानें अनेक वर्षें फडनविशीचें काम केलें.

पुढें १८५८ मध्यें पामरस्टनच्या ऐवजीं डर्बी प्रधानमंडळ आलें. ग्लॅडस्टनला आयोनियन बेटांवर एक्स्ट्रा अर्डिनरी हाय कमिशनर नेमिलें. १८५९ मध्यें सौम्य स्वरुपाचें सुधारणाबिल प्रधानमंडळानें पुढें आणलें. पण तें नापास होऊन डर्बी प्रधानमंडळ मोडून पुन्हां पामरस्टन मुख्य प्रधान झाला व ग्लॅडस्टन फडणिशीवर रूजू झाला. परंतु वास्तविक आतां कामन्ससभेचा ग्लॅडस्टनचा खरा पुढारी बनला होता. १८६० व १८६१ मधील बजेटांतील महत्वाच्या गोष्टी म्हणजे फ्रान्सबरोबरचा व्यापारी तह व कागदावरील कराची बंदी या होत. १८५९ ते १८६५ पर्यंत अधिकारारुढ असलेल्या पामरस्टन प्रधानमंडळांतला अत्यंत हुषार व वजनदार मंत्री ग्लॅडस्टनच होता. त्या कारकीर्दींत मतदारीचा हक्क अधिक विस्तृत करण्यासंबंधानें व ऐरिश चर्च संबंधानें बिलें सभेंपुढें आलीं त्यावेळीं ग्लॅडस्टननें प्रतिपादिलेली मतें अत्यंत प्रागतिक म्हणजे रॅडिकल पक्षीयांनां शोभेशीं होतीं पण त्यामुळें ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मतदारसंघाचा ग्लॅडस्टनवरील विश्रवास उडून त्यानें १८६५ च्या निवडणुकींत हार्डी नांवाचा इसम ग्लॅडस्टनच्या ऐवजीं निवडून दिला. तेव्हां ग्लॅडस्टन साऊथ लँकॅशायरमर्फें उभा राहून निवडून आला. लवकरच पामरस्टन वारला व रसेल मुख्य प्रधान झाला, व ग्लॅडस्टनकडे ठराविक फडणिशी आली. कामन्स सभेचें नेतृत्वाहि त्याच्या गळ्यांत पडलें. त्यानें पूर्वीचे रिफार्मविल पुढें मांडलें. व समारोपसमयीं मोठें उत्कृष्ट भाषण केलें. पण सर्व निष्फळ होऊन बिलावर प्रतिकूल मतेंच अधिक पडलीं; प्रधानमंडळ मोडलें, डर्बी मुख्य प्रधान झाला व डिझारायली फडणीस झाला. या अधिकारारुढ टोरी पक्षानें आपल्या तर्फेचें रिफॉर्म बिल पुढें आणलें. त्यांत बरोमधल्या (शहराव्यतिरिक्त गावांत) सर्व घरवाल्यांनां मताधिकार देण्याचें योजिलें होतें. हें बिल बरेच फेरबदल होऊन अखेर १८६७ च्या आगष्ठमध्यें पास झालें.

१८६७ मध्यें रसेलनें राजकारणांतून कायमचें अंग काढून घेतलें, तेव्हांपासून ग्लॅडस्टन लिबरल पक्षाचा पुढारी बनला. विरुद्ध म्हणजे टोरी पक्षांत डर्बींच्या जागीं डिझरायली हा पुढारी व मुख्य प्रधान झाला होता. पंरतु एकंदर पक्षांपैकीं ग्लॅडस्टनच्या पक्षांचे संख्याधिक्य होतें ही गोष्ट प्रत्ययास आल्यामुळें डिझरालीनें व त्याच्या सहका-यांनीं राजीनामे दिले. अर्थात राणींनें ग्लॅडस्टनला विंडसर राजवाड्यांत बोलावून मुख्य प्रधानकीची माळ त्याच्या गळ्यांत घातली. या नव्या प्रधानानें प्रथम ऐरिश चर्चचा प्रश्रन हाती घेऊन राणीच्या सर्वस्वी मतानुसार तो पार्लमेंटकडून पास करविला. १८७० मध्यें एरिश लँड अँक्ट पास करुन ठराविक खंड शेतकरी देत राहीतोंपर्यंत जमीनदारानें त्यांस काढूं नये व स्वतःच्या मेहनतीनें शेतांत केलेल्या सुधारणांची किंमत शेतक-याला मिळावी अशी योजना केली. नंतर युनिव्हसिट्यांतील धार्मिक अटी काढून टाकल्या; व खुद्द राणीच्या हुकुमानें कमिशनांची विक्री बंद करविली. १८७३ सालीं आयर्लंडमध्यें रोमन कॅथॉलिक व प्रॉटेस्टंट या दोघांच्या सोयीची युनिव्हर्सिटी स्थापण्याचें बिल त्यानें सभेपुढें मांडलें पण तें नापास झाल्यामुळें त्यानें प्रधानकी सोडली. राणीनें डिझरायलीला नेमण्याचा बेत केला पण त्यानें स्वपक्षाच्या संख्याहीनत्वामुळें प्रधानकी नाकारली. नाइलाजास्तव ग्लॅडस्टननें प्रधानकी पत्करली, पण लोकमत प्रतिकूल होतें. १८७३-७४ सालीं राजीनामे व निवडणुकी या घोटाळ्यांत जाऊन अखेर टोरीपक्षाचें सेहेचाळीसनें मताधिक्य झालें; व ग्लॅडस्टननें अधिकार सोडला. या सुमारास त्याचें वय चौसष्ट वर्षांचें होतें व उतार वयांत राजकारण सोडून देण्याचा आपला बेतहि तो जाहीरपणें बोलूं लागला. त्याप्रमाणें १८७४ सालीं कॉमन्स सभेच्या बैठकींनां तो फारसा हजरहि नसें. १८७५ मध्यें लिबरल पक्षाचा पुढारीपणाहि त्यानें सोडला. पण स. १८७५ च्या पावसाळ्यांत बल्गेरियांत बंड झालें तें तुर्कांनीं जुलूम व कत्तली करुन मोडलें. या जुलुमाचा प्रतिकार करण्याकरितां ग्लॅडस्टन मोठ्या आवेशानें पुढें सरसावला व लेख, जाहीर व्याख्यानें व पालेमेंटांतींल भाषणें यांनीं तुर्की सरकारविरुद्ध इंग्लिश लोकमत त्यानें खवळून सोडलें. डिझरायली तुर्की सरकारचा पक्षपाती होता. त्याच्याविरुद्ध  ग्लॅडस्टननें १८७६-८० या सालांत भयंकर गहजब उडवून दिला. अखेर १८८० मध्यें होणा-या निवडणुकींत डिझरायलीचें परराष्ट्रीय धोरण पसंत कीं नापसंत या एकाच मुद्यावर मतदारांनीं सभासद निवडून दिले व त्यांत टोरी पक्षाचा पूर्ण पराभव होऊन लिबरलपक्ष फार मोठ्या मताधिक्यानें आधिकारारुढ झाला. तेव्हां मुख्य प्रधानकीचा प्रश्न आला; राणीनें हॅरिंगटन, ग्रॅनव्हिल यांनां प्रधानकी देऊं केली; पण दोघांनीं ग्लॅडस्टनकडे बोट दाखविलें. त्यामुळें १८८० च्या एप्रिलमध्यें ग्लॅडस्टन पुनरपि मुख्य प्रधान झाला. या कारकीर्दींतील त्याची मुख्य कामगिरी म्हणजे शेतमजुरांनां मताधिकार देण्याचा कायदा करणें ही होय. त्यांत त्याला यश मिळालें, पण त्याच वेळीं आयलँड व ईजिप्तसंबंधानें मोठे वादग्रस्त प्रश्न उपस्थित होऊन ते लिबरल पक्षास अत्यंत कमकुवत करण्यास कारण झाले. आयर्लंडांतील जमीनीबाबत हक्कांत सुधारणा करण्यासंबंधीचें व जमीनदारांनीं काढून टाकलेल्या कुळांनां नुकसानभरर्पाई देण्यासंबंधाचें अशीं दोन बिलें ग्लेंडस्टननें हातीं घेतलीं; पण त्यामुळें इंग्लंड व आयर्लंड या दोन्हीं देशांत बरेंच लोकमत त्याच्या विरुद्ध झालें. आणि बिलें नापास झाल्यामुळें आयर्लंडांत अनेक दंगंधोपं व खूनहि झाले, व पार्लमेंटात ऐरिश पक्ष प्रधानमंडळावर नाखूष झाला. तिकडे ईजिप्तमध्यें अलेक्झांड्रियाचा किल्ला तोफांच्या मा-यानें उध्वस्त करण्यांत आला ही गोष्टहि ब-यास लिवरलपक्षीयांनां पसंत झाली नाहीं. पुढें लवकरच जनरल गॉर्डन हा अकाली मृत्युमुखीं पडला. त्यामुळें प्रधानमंडळाविरुद्ध क्रोधाग्नि भडकून विरुद्ध पक्षानें निषेधपर ठरावहि पुढें आणले. अखेर १८८५ च्या बजेटावर प्रधानमंडाळाचा पराजय होऊन ग्लॅडस्टटनें राजीनामा दिला व सॅलिसबरी मुख्य प्रधान झाला. नव्या निवडणुकींत टोरी व पार्नेल पक्ष हे दोन पक्ष मिळून लिबरलपक्षापेक्षां संख्याधिक्य होतें. पण अकल्पित चमत्कार असा झाला कीं, आयर्लंडला होमरुल देण्यास ग्लॅडस्टन अनुकूल असल्याचें प्रसिद्ध झालें. त्याबरोबर पार्नेंलपक्ष ग्लंडस्टनला मिळून टोरी पक्षाच्या संख्याहीनत्वामुळें सॅलिसबरीच्या जागीं १८८६ मध्यें ग्लॅडस्टन तिस-यांदा मुख्य बनला. त्यानें एप्रिलमध्यें आपलें ऐरिश होमरुल बिल पुढें मांडलें; परंतु तें तीस मतांनीं नापास झालें. तेव्हां ग्लॅडस्टनच्या आग्र्हाच्या विनंतीवरुन राणीनें पार्लमेंटची नवी निवडणूक केली. तींतहि होमरुल बिलाविरुद्ध संख्याधिक्य झाल्यामुळें ग्लॅडस्टटनें राजीनामा दिला. व पुन्हा सॅलिसवरी प्रधान झाला. या सुमाराच्या दोन खासगी महत्वाच्या गोष्टी म्हणजे एक १८८९ जुलै २५ रोजीं त्यानें आपल्या विवाहाचा पन्नासावा वार्षिक दिनोत्सव केला. व १८९१ जुलै रोजीं त्याचा वडील मुलगा विल्यम हेनरी वयाच्या ५३ व्या वर्षीं वारला.

१८९२ मध्यें नवी निवडणूक झाली. तींत होमरुल पक्षाचें चाळीसांनीं मताधिक्य झालें, त्यामुळें सॅलिसबरीच्या ऐवजीं पुन्हां ग्लंडस्टन मुख्य प्रधान झाला. येणेंप्रमाणें प्रधानकीचा अधिकार त्याला चवथ्यांदा मिळाला व चार वेळां मुख्य प्रधान झाल्याचें इंग्लिश मुत्सद्यांमध्यें ग्लॅडस्टनचेंच पहिलें उदाहरण होय. १८९३ मध्यें त्यानें आपलें नवें होमरुल बिल पुढें मांडलें व कॉमन्स सभेंत तें पासहि झालें; पण लॉर्डांच्या सभेनें तें नापास केलें. ग्लॅडस्टनला आतां आपली राजकीय कामगिरी संपली असें वाटूं लागल्यामुळें त्यानें १८९२ मार्च १ रोजीं पॅरिस कौन्सिल्स बिलावर आपलें शेवटचें भाषण केलें व मार्च ता.३ रोजीं राजीनामा राणींच्या हातीं दिला. त्यानंतर त्यानें कामन्तसभेंत मुळीच पाऊल टाकलें नाहीं.

राहिलेलें आयुष्य ग्लॅडस्टननें हावर्डेंन येथें काढलें. तेथून लंडन, स्कॉटलंड व दक्षिण फ्रान्समध्यें मित्रांनां भेटण्यास तो कधींकधीं जात असे. रिकामा वेळ होरेसच्या ओडसचें भाषांतर करण्यांत, बललरच्या अँनॉलजी व सर्मन्स या पुस्तकांची सटीक आवृत्ति तयार करण्यांत व होमरविषयीं अभ्यांसांत तो घालवित असे. १८९५ मध्यें आर्मिनियांत तुर्कांनीं कत्तली केल्या तेव्हां मात्र पुन्हां त्या राजकीय प्रकरणांवर व्याख्यानें देण्याच्या व लेख लिहिण्याच्या कामांत १८९६-९७ सालीं तो पडला होता. तथापि सरकारी काम सुटल्यापासून त्याचें शारीरीक सामर्थ्य झपाट्यानें कमी होत गेलें, व १८९७ च्या उन्हाळ्याअखेर त्याच्या शरीराला कांहीं तीव्र वेदना होऊं लागल्या, व त्यांतूनच पुढें रोग उद्भवून १८९८ मे १० रोजीं हाबर्डेन येथें मरण पावला. मे २५ रोजीं त्याचें प्रेत लंडनला नेऊन वेस्टमिन्स्टर हॉलमध्यें ठेवण्यांत आलें. तेथें दोन अडीच लाख लोक त्याच्या अखेरच्या दर्शनास येऊन गेले. २८ रोजीं प्रेत वेस्टमिन्स्टर अँबेमध्यें पुरण्यांत आलें प्रेतयात्रेला दोन्हीं सभांचे सभासद व इतर बडेबडे गृहस्थ वगैरे मोठा जमाव जमला होता. या ग्लॅडस्टन दांपत्याला ४ मुलगे व चार मुली झाल्या. वडील मुलगा पार्लमेंटचा सभासद होता, तो १८९१ त वारला व त्याचाच मुलगा पुढें ईस्टेटींचा वारस झाला. चवथा मुलगाहि पार्लमेंटचा सभासद होऊन व मोठ्या हुद्दयावर चढून १९१० मध्यें दक्षिण आफ्रिकेचा गव्हर्नर-जनरल झाला. मुलीपैकीं शेवटची हेलन ही कांहीं वर्षें केंब्रिज येथील न्यूहॅम कॉलेजची व्हाईस प्रिन्सिपॉल होती.

ग्लॅडस्टनच्या स्वभावाविषयीं विचार करतां त्याच्या अंगाच्या नैतिक गुणांतील मुख्य गुण म्हणजे धर्मिक बुद्धि हा होय. ही धर्मनिष्ठा त्याच्या अगदीं बालपणापासून अखेर नव्वद वर्षांपर्यंत कायम होती, व त्यामुळें त्याचें खाजगी व सार्वजनिक आचरण, साधी दूरद्दष्टि किंवा व्यवहारचतुरता यांपेक्षां उच्च दर्जाच्या तत्वाला अनुसरुनच नेहमीं होत असे. त्याच्या स्वभावांतील दुसरा पण वरच्या इतकाच जोमदार गुण म्हणजे सत्ताप्रियता. परंतु ही महत्वाकांक्षा केवळ पैसा, मोठा हुद्दा व श्रेष्ठ सामाजिक दर्जा अशा क्षुद्र गोष्टींविषयीं नसून प्रत्यक्ष राज्यतंत्र आपल्या हातीं घेऊन परमेश्वरी सत्तेनें आपल्यावर सोंपविलेलीं, राजकीय कर्तव्यें पार पाडण्याविषयींची होती. या अधिकारापेक्षेला निर्भयतेचांहि उत्कृष्ट जोड मिळाली. कोणत्याहि संकटांनां तो भीत नसे, अडचणीमध्यें डगमगत नसे व कोणत्याहि कार्यांतील श्रमांना कंटाळत नसे. स्वसामर्थ्यापलीकडचें असें कांहींहि त्यास वाटत नसे. अधिकारलालसा व निर्भयता यांच्याप्रमाणें त्याची अधिकार बजावण्याची कदरहि विलक्षण होती. पण तींतहि त्याच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो तो असा कीं, इतरांबरोबर बोलण्यासवरण्यांत व वागण्यांत तो अत्यंत आदरशील, मनमिळाऊ व नम्र असे. मात्र वरील कदर व मानीपणा सरकारी अम्मलबजावणींत, स्वमताभिमानांत, दृढनिश्चयांत, स्वमतांच्या व सुसंस्कृत लोकांच्या मतांच्या एकवाक्यतेविषयींच्या आत्मविश्रवासांत दिसून येत असे. तथापि त्याचें आत्मसंयमन इतकें विलक्षण असे कीं मोठ्या रागलोभाच्या भरांत केलेलीं विधानेंहि परत घेण्याचा प्रसंग त्याच्यावर कधीं आला नाहीं. वास्तविक ग्लॅडस्टन पुराणप्रेमीच होता. कारण जुन्या संस्था, चालीरीती व पद्धती प्रत्यक्ष अनर्थकारक होईपर्यंत कायम ठेवण्याकडे त्याचा नेहमीं ओढा असे. अनुभवानें ही पुराणप्रियता कमी होतां होतां उत्तर वयांत त्यानें राजकारणांत अनेक क्रांतिकारक गोष्टीहि केल्या हें खरें आहे. तथापि लोकसत्ताक राज्यपद्धति चालू असलेल्या देशांत केवळ हरएक बाबतींत क्रांति घडवून आणण्याच्या उत्कट भावनेंनें प्रेरित झालेले इसम लोकनायक बनल्यानें, आणि उलटपक्षीं ग्लॅडस्टनसारखें योग्य कारणांनीं व सावकाश पूर्ण विचारांतीं मनाची खात्री पटल्यावर त्या त्या गोष्टींचा स्वीकार करुन त्या योग्य मार्गांनीं अमलांत आणणरे लोकनेते लाभल्यानें लोकशासित राज्यावर अगदीं निरनिराळ्या प्रकारचे परिणाम घडत असतात, ही गोष्ट विशेष ध्यानांत ठेविली पाहिजे. वक्तृत्व व जमाखर्चाच्या कारभारांतील  कौशल्य या गोष्टी ग्लॅडस्टनमध्यें उत्कृष्ट होत्या हें तर खरेंच; पण मनाची एकाग्रता करण्याची शक्ति हा गुण इतर समकालीन मुत्सद्यांपेक्षां आपणांत विशेष आहे असें तो स्वतःच म्हणत असे. कोणतीहि गोष्ट एकदां हातीं घेतल्यावर तींत तो इतका व्यग्र होत असे कीं, बाकींचें जग तो साफ विसरुन जात असे. लॉर्ड मोर्लेनें १९०३ सालीं प्रसिद्ध केलेल्या ग्लॅडस्टनच्या चरित्रग्रंथाहून जास्त सविस्तर व प्रमाणभूत संदर्भाग्रंथ दुसरा कोणताहि आढळणार नाहीं.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .