विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
ग्रेनाडाईन्स- ग्रेनाडाईन्स बेटांची रांग वेस्ट इंडिज मधील विंडवर्ड बेटांत आहे हीं बेटें व्हिन्सेंट व ग्रेनाडा यांच्यामध्यें ६० मैलपर्यंत पसरलीं आहेत. राज्यकारभाराच्या सोयीसाठीं सेंटव्हिन्सेंट व ग्रेनाडा यांच्यांमध्यें ग्रेनाडाईन्स बेटें वांटून दिलीं आहेत. सेंटव्हिन्सेंटपैकीं वेक्विआ मुख्य असून त्यांचे क्षेत्रफळ ६ चौ. मै. आहे. कॅरिआकु ग्रेनाडा द्वीपसमूहांत असून त्याची लांबी ७ मैल, रुंदी २ मैल व क्षे. फ. १३ चौ. मै. आहे. कापूस व गुरेंढोरें यांची निर्गत होते. सर्व समूहाची लोकसंख्या (१९०१) ६४९७ आहे.