प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे   
       
ग्रीस- हा देश यूरोपखंडाच्या आग्नेय टोंकास व वाल्कन द्वीपकल्पाच्या अगदीं दक्षिणभागांत आहे. रोमन लोकांनीं प्राचीन देशाला दिलेंले हें नांव थोडेंबहुत मोघम होतें. पूर्वींचे ग्रीक लोक आपल्या देशाला व आपल्या जातिबांधवांना हेलास, हेलेनेस या नांवानीं संबोधींत असत. त्यांचा देश म्हणजे थेसलींतील फ्यिओटिसमधील एक भाग (जिल्हा) होता.

प्राचीन ग्रीस देशाला हेलास म्हणत असत. हा देश जेव्हां पूर्णपणें भरभराटींत होता व त्या वेळची त्याची मर्यादा म्हटली म्हणजे साधारणपणें पश्चिमेकडे अंब्रेसिआ आखाताच्या उत्तर किना-यापासून पूर्वेकडे पेनिअसच्या मुखापर्यंत गेलेल्या रेषेपर्यतचा भाग होय. इ. सनापूर्वीं ३८६ पर्यंत मॅसिडोनिआ आणि थ्रेस यांत मोडत नव्हते. येथील लोक नेहमीं व्यापारीं गलवतें व आरमार बाळगीत असत. ईब्रिअन समुद्र किंवा द्वीपसमूह हें त्यांच्या राष्ट्राचें केंद्रस्थान होय. हा देश फार डोंगराळ असल्यामुळें स्वाभाविकपणें त्याचे निरनिराळे भाग पडले आहेत. प्राचीन काळी हे भाग १७ होते व प्रत्येक भागांत स्वतंत्र राज्य होतें.

भौ गो लि क व र्ण न.-  थेसलीमधील कांहीं ठिकाणें सोडून या देशाचा कोणताहि भाग समुद्रकिना-यापासून ५० मैलांहून दूर नाहीं. याचें क्षेत्रफळ पोर्तुगालपेक्षां कमी आहे, परंतु समुद्रकिना-याची रेषा स्पेन आणि पोर्तुगालच्या समुद्रकिना-याच्या रेषेपेक्षां मोठी आहे. जमिनींत बरींच आखातें शिरलेलीं आहेत व समुद्रांत ठिकठिकाणीं बेटें आहेत. येथील पर्वतांच्या रांगांची संख्या बरीच असून या रांगांची बरीच गुंतागुंत झालेली आहे; त्यामुळें तेथील लोकांनां खुष्कीच्या मार्गानें दळणवळण ठेवण्यास कठिण पडतें पण त्यांनां समुद्रावर जाणें सुलभ असल्यामुळे ते आपलें दळणवळण जलमार्गानें चालू ठेवितात. देशाच्या या नैसर्गिक स्थितीमुळें तेथील लोक फार स्वदेशाभिमानी व एक प्रकारच्या विशिष्ट वळणाचे बनले. तेथील लोकांत व्यापारी धाडस व त्याचप्रमाणें काव्य आणि कला यांची अभिरूचि होती.

प र्व त.-  पिंडस पर्वतांची रांग; माव्हारोव्हौनोषी रांग; कैबुनिअनपर्वत; हेल्लोरो पर्वत, कटाबोथ्रपर्वत, एटोलिआ आणि अकारनेनिआ, किओना; हा सर्वात उंच पर्वत आहे; व्हर्डुसि, लिआकौरा, पालाइओव्हौनो, एलाटीज, अँटिकामधील पर्वत, मोरिआमधील पर्वत- झिरिआ, चेलमोस, ओलोंनोस आणि व्हाइडिआ; आरगोलिड द्वपिकल्पांत शाजिआस एलिआस हें शिखर सर्वांत उंच आहे; व टेगेटस पर्वतांची रांग; हे पर्वत होत. जास्त तटबंदीचीं आणि महत्वाचीं ठिकाणें म्हणजे अँक्रोक्रोरिन्थस, इथोम, लारिस्सा, अँक्रोपोलिस, टिरिम्स, आणि कडमिआ ही होत.

न द्या.- येथें फार थोड्या नद्या असून त्याहि अगदीं लहान आहेत. त्यांत सालंब्रिआ, मव्होपोटनोहेल्लदा, अस्प्रोपोटगो, रुफिआ आणि व्हासिलिको या मुख्य होत.

स रो व रे:-  कर्ला, त्रिचोनिस, कोपैस, फेनिअस आणि स्टिम्फालस हीं सर्वांत मोठी आहेत.

मै दा ने.-  थेसलि, बोइओशिआ, मेस्तेनिआ, अरगास, एलिस आणि माराथन हीं मुख्य बदरें आहेत.

स मु द्र कि ना रा.-  उपसागर आणि आखातें यांनीं सर्व समुद्रकिनारा भरून गेला आहे. एजिना आणि लिपान्टो हीं आखातें मुख्य आहेत. याशिवाय मोरिआच्या किना-यावरहि आखातें आहेत.

ज्वा ला मु खी प र्व त.- येथें ज्वालामुखी पर्वत मुळींच नाहींत. तरी पण सांटोरिन बेटांतील ज्वालामुखी पर्वत जवळ असल्याकारणानें त्यांच्या स्फोटांचे व भूकंपाचे धक्के येथें नेहमीं बसतात. बोतुशिअमधील लाफिस्टिअम नांवाच्या पर्वतांचें थंड झालेलें तोंड अजून अस्तित्वांत आहे.

व न स्प ती.- येथील वनस्पतींचे दक्षिण इटाली व आशिया मायनरमधील वनस्पतींशीं बरेंच साम्य आहे. समुद्रसपाटीपासून निरनिराळ्या उंचीच्या प्रदेशांत निरनिराळ्या प्रकारचीं झाडें व वनस्पती होतात. १५०० फूट उंचीपर्यंतच्या प्रदेशांत नारिंगें, खजूर, अंजीर, द्राक्षें, कापूस, तंबाखू वगैरे होतात.

प्रा णी.-  आरिस्टॉटलपर्यंतच्या काळांत सिंह असे. हल्लीं अस्वल, लांडगे, कोल्हे, रानडुक्कर, हरिण, ससे, वगैरे जातींचे पशू असून ३५८ जातींचें पक्षी, ६१ जातींचे सर्पटणारे प्राणी व २४६ जातींचे मोस आढळतात.

ह वा मा न.- येथील हवा स्पेन आणि इटली येथील हवेपेक्षां जास्त उष्ण व थंड आहे. कांहीं ठिकाणीं हवेमध्यें एकदम फेरफार होतात. वसंतकाल अगदीं थोडा असतो. मार्च महिन्यांत उन्हाळा कडक असतो. पण उत्तरेकडून येणा-या थंड वा-यामुळें तो जास्त वाढत नाहीं. शरदूतूंतील हवा सर्व ॠतूंतील हवेपेक्षां जास्त रोगट असते. हिवाळ्यांतील हवा सौम्य असते. पावसाचें मान निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळें असतें.

इ. स. १९१२ पर्यंत ग्रीसचें क्षेत्रफळ २५०१४ चौ. मै. होतें. पण बाल्कन युद्धांत ईजियन समुद्राच्या कांठचा मॅसेडोनिया, एपिरस, क्रेट इत्यादि मुलुख मिळाल्यामुळें ग्रीसचें क्षेत्रफळ १,८०,९९,९०८ चौ. किलोमीटर झालें. १९२१ सालीं ग्रीसची लोकसंख्या ६७,२७,८७७ इतकी होती.

ग्रीक लोकांची सायप्रस, अँनाटोलिया, बाल्कन संस्थानें, ईजिप्त इत्यादि ठिकाणीं बरीच संख्या होती. अमेरिकेंतहि दरवर्षीं पुष्कळच ग्रीक लोक वस्तीसाठीं जात असत. १९१४ सालीं ग्रीसमधून ४५८८१ लोक अमेरिकेंत गेलें. व यानंतर १९१५-२० च्या दरम्यान ग्रीसमधून अमेरिकेंत जाणा-या लोकांची सरासरी २६५०० होती.

लो क.-  ग्रीक, अल्बेनिअन व व्हलाच या तीन वंशांचें लोक आढळतात. आणि ग्रीक लोकांचीं संख्या सर्वात जास्त आहे व त्यांत इतर वंशाचे लोक मिसळून एक झाले आहेत. यूरोपांतील इतर राष्ट्रांप्रमाणें येथील हल्लीचें लोकहि मिश्र वंशाचे आहेत. यांच्या मुळ उत्पत्तीविषयींचा प्रश्न बराच वादग्रस्त आहे. हल्लीचे ग्रीक प्राचीन ग्रीक लोकांचे वंशज आहेत असा सर्वसाधारण समज आहे व ह्या समजुतीमुळें राष्ट्राची योग्यता जास्त वाढली आहे. उत्तर ग्रीस आणि मोरिआमधील मूळच्या लोकांची जागा ८ व्या शतकाच्या शेवटीं स्लाव्ह लोकांनीं घेतली आणि हल्लीचें ग्रीक लोक बायझन्टाइन आणि स्लाव्ह यांच्यापासून बनलेल्या मिश्र वंशाचे आहेत असे कांहीं शास्त्रज्ञांचें मत आहे. या मतावर बरीच टीका होऊन हल्लीं साधारणपणें असें ठरलें आहे कीं ग्रीसचा मुख्य भाग आणि मोरिआ या दोन ठिकाणचे लोक स्लाव्ह वंशाचे नसून हेलेन वंशाचे आहेत.

ग्रीक लोक उच्च प्रकारच्या संस्कृतीचे होते व त्यामुळें इतर लोकांचा ते आपल्यांत अंतर्भाव करून घेत असत ही गोष्ट जरी खरी आहे तरी इतकें पूर्णपणें साम्य होण्याला हेलेन लोकांचीच संख्या त्यांत जास्त असावी. वाटोळें तोंड, लांब व थोडेसें गरुडासारखें नाक, सारखी दंतपंक्ति, उत्साहपूर्ण आणि विशेष चमक मारणारे डोळे हा हल्लींच्या लोकांच्या तोंडवळ्याचा साधारण नमुना आहे. उत्तम शरीरप्रकृतीचें लोक आरकेडिआ, ईजिअन बेटें आणि क्रीट या ठिकाणीं सांपडतात.

अलबेनिअन लोक स्वत:स श्किपेटर म्हणतात व ग्रीक लोक त्यांना आरव्हानिटे म्हणतात. हे टोस्क वंशाचे आहेत. १८ व्या शतकाच्या पूर्वार्धांत त्यांनीं देशांतर केलें. अलबेनियन लोकांचें वसाहत करण्याचें काम तुर्की लोकांनीं बंद पाडलें. हे लोक हळूहळू हेलेन लोकांत मिसळले. आतां सर्व अलबेनियन लोक ग्रीक भाषा बोलूं शकतात. परंतु घरी ते अल्बेनिअन भाषाच बोलतात. हे लोक बहुतेक शेतकरी पेशाचे आहेत.

व्हलाच लोक आपल्याला अरोमानि म्हणजे रोमन वंशाचे समजतात. यांच्यांपैकीं बहुतेक धनगराचा किंवा ओझे वाहणा-यांचा धंदा करणारे आहेत. व ते नेहमीं एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणीं हिंडत असतात. ह्या लोकांतील जे शहरांत रहाणारे आहेत त्यांच्यावर बहुतेक हेलेन संस्कृतीचा पूर्ण पगडा बसलेला आहे व ह्यांनां व्यापारकरण्याची जास्त चटक लागली आहे. डोंगराळ प्रदेशांतील भटकणा-या लोकांनां आपला राष्ट्रीय बाणा व आपल्या चालीरिती कायम ठेवल्या आहेत आणि यांच्यापैकीं बरेच लोक जरी ग्रीक भाषा बोलूं शकतात तरी त्यांनीं आपली लॅटीन भाषा अजून सोडली नाहीं. ह्यांचें ग्रीक लोकांशीं फारच थोडे लग्नविवाहसंबंध होतात. हे बहुतेक अशिक्षित आहेत व त्यामुळें ग्रीक लोक त्यांनां तुच्छ मानतात. दहाव्या शतकाच्या सुमारास आयोनिनअ बेटांत ब-यांच  इटालिअन लोकांचा भरणा झाला व त्यामुळें तेथील उच्च दर्जाच्या ग्रीक लोकांच्या भाषेंत व धर्मांत बराच फेरफार झाला. इटालिअन लोकांचे वरच्या वर्गांतील लोकांशीं लग्नसंबंधहि होऊं लागले. खालच्या वर्गाच्या किंवा शेतकरी वर्गाच्या लोकांवर इटालिअन संस्कृतीचा अगदीं परिणाम झाला नाहीं. शेवटीं इटालिअन लोकांचें ग्रीक लोकाशीं पूर्णपणें तादात्म्य झालें. स्वातंत्र्यासाठीं लढाई होण्यापूर्वीं येथें तुर्की लोकांची संख्या ७०००० होती. परंतु लढाईनंतर हे लोक येथून नाहींसे झाले.

रा ष्ट्री य गु ण ध र्म.- सांप्रतचे ग्रीक लोक सारख्या गुणधर्माचे आहेत व त्यांचें गुणधर्म शेजारच्या राष्ट्रांतील लोकापेक्षां अगदीं भिन्न आहेत. हे राष्ट्रीय ध्येय डोळ्यापुढे ठेवून जुटीनें काम करितात व स्वत:ला इतर राष्ट्रांपेक्षां उच्च प्रकारचे समजतात, पूर्वेकडील भागांत हे नेहमीं जास्त सुधारलेले असल्यामुळें मॅसिडोनियन, रोमन आणि तुर्की लोकांनीं जरी त्यांनां जिंकलें तरी त्यांच्या सुधारणेची त्यांच्या वर छाप पडत असे. त्यांचें बुद्धिसामर्थ्यहि दांडगें असल्यामुळें पुढें होणा-या राष्ट्रांच्या उलाढालींत त्यांनां वरची जागा मिळाली. यांच्या देशाभिमानाच्या कळकळीविषयीं विचार करतांना यांची हंगेरियन लोकांशीं तुलना करण्यास हरकत नाहीं. ह्या कळकळीचें कधीं कधीं उद्दामपणांत आणि असहिष्णुतेंत पर्यवसान होण्याचा संभव असतो व कधीं कधीं त्यांची विवेकबुद्धी नाहींशीं होऊन त्यांनां अविवेकाचीं व धाडसाचीं कामें करण्याची बुद्धि होते. परंतु शेवटीं या कळकळीमुळें त्यांनां आपलें राष्ट्रकार्य साधेल ही पूर्ण खात्री असते. मोठ्यापासून लहानापर्यंत सर्व लोकांत राजकीय विषयांची चर्चा होते. प्रत्येकजण या बाबतींत आपलें स्वतंत्र मत देतो. थ्यामुळें घोंटाळा उडतो व कोणतीहि गोष्ट प्रत्यक्ष रीतीनें घडून न येतां उलट शब्दावडबंरच माजतें. यांच्यापैकीं प्रत्येक सैनिक सेनापती आहे व प्रत्येक खलाशी अँडिमरल आहे असे म्हटलें आहे. त्यामुळें कोणाचेंही कार्य एका तत्वाला अनुसरून चालत नाहीं. युरोपीय राष्ट्रांत हे लोकसत्ताक राज्य पद्धतीचे सर्वांत जास्त चहाते आहेत. सामाजिक दृष्ट्या यांच्यांत जातिभेद मुळींच नाहीं. हे फार तीक्ष्ण बुद्धीचे, चौकस, प्रसंगावधानी आणि शोधक आहेत. पण यांचें ज्ञान फार खोल गेलेलें नसतें. यांनां अंगमेहनतीचा विशेष कंटाळा आहे. अलिकडील शास्त्रीय ज्ञान संपादन करण्याकडे त्यांची प्रवृत्ति नाहीं. हे उत्साहपूर्ण, आनंदी, कर्तबगार, दयाळु, परकीयांशीं मिळून मिसळून वागणारे, आतिथ्य करणारे, नौकरचाकरांवर दया करणारे, बेतानें व काटसकरीने वागणारे, कुटुंबात मिळून मिसळून वागणारे आहेत. त्यांच्यावर पारतंत्र्याचें जोखड नेहमीं राहत गेलें व त्यामुळें त्यांच्या अंगीं बरेच दुर्गुण आले. ते लवकर क्षुब्ध होऊन त्यांचा राग अनावर होण्याचा फार संभव असतो. हे धार्मिक आहेत पण त्यांच्यात धर्मवेडेपणाचें खूळ नाहीं.

चा ली री ती.- शहरांत आणि खेड्यांत प्राचीन आचार विचारांचेच वर्चस्व अजून आढळून येतें. शहरांतून उच्च दर्जाच्या लोकांची फ्रेंच चालीरीतींचे अनुकरण करण्याकडे जास्त प्रवृत्ति दिसून येते. खेडेगांवांतील बायका समाजांत मोकळ्या रीतीने वावरत नाहींत व त्यांचे हक्क पुरुषांपेक्षां कमी दर्जाचे आहेत. जन्म, धर्मदीक्षा, लग्न आणि प्रेताचें दहन करणें या विषयींचे विधी फार गंमतीचे आहेत व कांहीं विधी फार पुरातन कालापासून चालत आलेले आहेत. सामान्यतः स्वच्छतेकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केलें जाते. नृत्यकला फार लोकप्रिय होती. जुना, सुंदर राष्ट्रीय पोषाख वरच्या दर्जाच्या लोकांनीं टाकून दिला आहे. बायकांच्या पोषाखांत बरेच वैचित्र्य आढळतें.

रा ज्य का र भा र.- येथील कारभार राजाच्या हातीं असतो. गादी वंशपरंपरेनें पुरुषांच्याच कडे चालत येते. परंतु वंशांत जर पुरुष नसला तर गादीचा वारसा स्त्रियांकडे जातो. आगष्ट १८६३ च्या लंडनच्या कॉन्फरन्समध्यें राजाला 'हेलेन लोकांचा राजा’ ही पदवी दिली गेली आहे. राजा अठराव्या वर्षीं कायदेशीरपणें वयांत येतो. गादीवर बसतांना त्याला धर्मोपदेशकांपुढे शपथ घ्यावी लागते. राजकीय घटना २९ ऑक्टोबर १८६४ पासून चालत आलेली आहे. राजा आणि लोकनियुक्त (एक) मंडळ यांच्यामध्यें कायदें करण्याचा अधिकार वाटूंन घेतलेला असतो. १९०६ सालीं या मंडळाचे १७७ डेप्युटी होते. १९११ सालीं कौन्सिल ऑफ स्टेटची पुनर्घटना झाली. सध्यां कार्यकारी सत्ता राजाच्या हाती असते, पण या सत्तेची जबाबदारी त्याच्यावर नसून त्यानें निवडलेल्या मंत्र्यावर असते. या शिवाय सरकारी नेमणूका करणें, कायदे करणें, नाणें पाडणें वगैरे अधिकारही राजाकडेच असता. परराष्ट्रीय काम करणारे ७ प्रधान असतात. चेंबरमधील डेप्युटी सध्या (१९१९) ३३२ आहेत.

स्था नि क रा ज्य का र भा र.-  यासाठीं देशाचे २६ भाग केलेले असून, प्रत्येक भाग प्रिफेक्टच्या ताब्यांत आहे. २६ भागांचे ६९ पोटभाग आणि या पोटभागांचे ४४५ कम्यून केले आहेत. लोकनियुक्त डिपार्टमेंटल कौन्सिलची प्रिफेक्टला मदत असते. मेयरच्या अध्यक्षतेखालीं आणखी कम्युनल कौन्सिल असे.

शि क्ष ण.- येथील लोक बुद्धिवान आहेत व शिक्षणाच्या बाबतींत त्यांचें पाऊल बरेंच पुढें गेलेलें आहे. खेड्यांतील लोकांनांहि शिक्षणाची गोडी असल्यामुळें तेथें शाळा स्थापन केलेल्या आहेत. शेतकरी वगैरे लोकांचीं मुलें उच्च शिक्षणासाठीं अथेन्समध्यें येत, व तेथें मोलमजुरी करून राहिलेल्या वेळांत विश्वविद्यालयांत शिक्षण मिळविण्यासाठीं जात. ओथों हा राजा गादींवर आल्यानंतर लवकरच प्राथमिक शिक्षण सक्तींचे केलें गेले. १९१०-११ सालीं ३५५१ प्राथमिक शाळा, ४३ हायस्कुलें, २८४ दुय्यम शाळा ६ व्यापारी शाळा व २ शेतकरी शाळा होत्या. अथेन्समध्यें २ विश्वविद्यालयें होतीं. शेतकीच्या शास्त्रीय शिक्षणाकडें बरेंच दुर्लक्ष केलें जाई. धर्मशास्त्राच्या शिक्षणाच्या दोन शाळा होत्या. व्यापारी आणि औद्योगिक शिक्षणाची एक शाळा असून तिच्यापासून लोकांनां बराच फायदा होत असे. अथेन्समध्यें स्त्रीशिक्षणासाठीं एक मोठी शाळा होती व तींत १५०० मुली होत्या. त्या शिवाय इतर शाळा व विश्वविद्यालयें होतीं.

ध र्म.- धर्मासंबंधी सर्व कारभार मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या ताब्यांत आहे. चर्चचा कारभार होली सिनॉल्डच्या कडे आहे. धर्माविरूद्ध वागणा-याला दंड करण्यासाठीं चर्च सरकारी मदत मागूं शकतें.

शे ती.-  हा देश मुख्यत्वेंकरून शेतीचा आहे. याची भरभराट शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे आणि येथील अर्धेअधिक लोक शेती आणि तत्संबंधीं इतर धंदे यांवर आपली उपजीविका करतात. मैदांनांतील आणि खो-यांतील जमीन अतिशय सुपीक आहे आणि जेथें पाण्याचा पुरवठा पुरेसा असतो तेथें पिकेंही उत्तम निघतात. आतांपर्यंत जे राजे होऊन गेले त्यांनीं इकडे दुर्लक्ष केल्यामुळें शेतकीची जुनी पद्धतच चालू आहे. सुधारलेल्या आऊतांचा आता हळू हळू उपयोग करण्यास सुरूवात झाली आहें. जमीन फार असली म्हणजे ती भागानें लावून देतात. थेसली प्रांतांतील जमीन विशेष सुपीक आहे. १९१८ सालीं ग्रीसमधील पेरणीखालीं आलेल्या जमीनीचें प्रमाण १४१५६३३ हेक्टर होतें. १९१८ सालीं या जमीनींचें उत्पन्न १५९१५२६०२४ ड्रक्मे झालें. गहूं, मका, मस्ट, ऑलिव्ह तेल, ओट इत्यादि मुख्य धान्यें ग्रीसमध्यें पिकतात. या सालीं शेतकीसुधारणा करण्यासाठीं स्थापना झालेल्या संस्थांची संख्या ७३० होती व त्या संस्थांच्या सभासदांची एकंदर २७०५१ होती. १९१४ सालच्या गणनेप्रमाणें ग्रीसमध्यें (बाल्कन युद्धानंतरचा संपादित मुलूख धरून) १६००००० हेक्टेर जंगल होतें. या जंगलाचें उत्पन्न ३८०००००० ड्रक्में होतें. १९१८ सालीं ग्रीसमध्यें १५४४१२० ड्रक्मे किंमतीचे मासे पकडण्यांत आले. १९१९ सालीं मासे पकडणा-या जहाजांची संख्या १९४१ होती व मासे पकडणा-या लोकांची संख्या ७६७९ होती.

खा णी.- चांदी, शिसें, जस्त, कॉपरमँगेनीज, मँगेनेशिया, लोखंड, गंधक आणि कोळसा ही मुख्य खनिजद्रव्यें येथें सापडतांत. कुरुंद, मीठ, चक्कीचा दगड आणि जिप्सम ही ब-यांच प्रमाणांत सापडतात व हीं खोदून काढण्याचें काम सरकार स्वतः करतें.

व्या पा र आ णि उ द्यो ग धं दे.-  ग्रीक लोकांची व्यापाराकडे नैसर्गिक प्रवृत्ति असल्यामुळें व नौकानयनाची त्यांनां आवड असल्यामुळें लिव्हाटम्धील बराच व्यापार त्यांच्या हातीं आला होता. तुर्कस्तानचा धान्याचा सर्व व्यापार ग्रीसच्याच ताब्यांत आहे. १९२०सालीं ग्रीसमध्यें २१३१०३८३२१ इतक्या ड्रक्मेची आयात झाली व ६६४११२६४७ इतक्या ड्रक्मेची निर्गत झाली. १९२० मध्यें ग्रीसचें नौकाबल २९८९०३ टेन होतें. ग्रीसजवळ या सालीं २२८ आगबोटी व १०४८ जहाजें होतीं.
    
का र खा ने-  इसवी सन १९२० सालीं ग्रीसमध्यें एकंदरींत २२११ कारखाने असून त्यांत काम करणा-यांची संख्या ३६३१२४ होती. कारखान्यांत एकंदर ८७१४९४५०८ ड्रॅक्मेचा माल तयार झाला. या कारखान्यांपैकीं ५७० कारखाने वाफेच्या जोरावर व ३८३ विजेच्या सहाय्यानें चालत होते. या कारखान्यांत तेल काढणें, कापड विणणें, चामडीं तयार करणें, इत्यादि धंदे चालू असतात. ग्रीसमध्यें लोखंडाची पैदास सर्व धातूंपेक्षा अधिक आहे. १९१८ मध्यें या खाणींतून ६८००० मेट्रिक टन लोखंड निघालें. जस्त १८००० टन निघालें व लिग्राईट धातू २१४००० टन निघाली. १९१८त या खाणींतून बाहेर काढलेल्या धातूंची किंमत २०९२०००० फ्रँक्स झाली. येथें लिग्राईट धातू काढणारी सोसायेट फायनॅन्सियरेड ग्रीस, इतर धातू काढणारी कँपेग्नी फ्रँकैस, ड माइन्स, ड लारियम, मॅग्नेसाइट काढणारी एल डेपियन, एन रफायल इत्यादि खोदकंपन्या प्रसिद्ध आहेत.
    
ग्रीसमध्यें मजूरांचे प्रश्न १९१८ पर्यंत फारसा बिकट नव्हता. पण १९१८ सालीं मात्र मजुरांमध्ये मजूरीच्या प्रश्नानें ग्रीसमध्यें थोडी फार खळबळ उडाली. १९१९ सालीं जवळजवळ ३०० संप झाले. त्यांत २०० सरकारनें सलोख्यानें मिटविले. १९१८ सालीं मजूरांच्या संस्थांची बेरीज ९१८ होती. महायुद्धनंतर सार्वराष्ट्रिक मजूरपरिषद वाशिंग्टन येथे भरली होती. त्यात ठरलेल्या अटींना ग्रीसनें पूर्ण मान्यता दिली. त्याप्रमाणें मजूरांचे तास आठ करण्यात आले. १९१४ मध्यें मजूरांच्या हितासाठीं पुष्कळ कायदे करण्यांत आले होते.

द ळ ण व ळ ण.-  १९१९ सालीं ग्रीक रेल्वेची लांबी २३०७.५ किलोमीटर्स होती. पुढें सॅलोनिका ते कॉन्टांटिनोपलपर्यंत रेल्वे झाल्यानंतर ७०० किलोमीटरची भर पडली. मार्च १९१९ च्या तहानें ३४० किलोमीटरची वाढ झाली. याशिवाय कवल्ला ते ड्रम इत्यादि ठिकाणीं रेल्वे बांधण्याचे काम चालूंच आहे. ग्रीसमध्यें वैमानिक दळणवळण अद्यापि सुरू झालेलें नाहीं.

ल ष्क र.-  ग्रीसची पूर्वींचीं लष्करी स्थिती समाधानकारक नव्हती. १८९७ सालच्या लढाईंत सैन्यांतील बरेच दोष उघडकीस आले व त्यामुळें लष्कराची पुनर्घटना करण्याची योजना तयार करण्यांत आली. या नव्या योजनेप्रमाणें शांततेच्या वेळीं १८८७ वरिष्ठ अधिकारी, बिनकमिशनाचे अधिकारी इतर लोक आणि ४०९९ घोडे व खेचरे ठेवण्याचें ठरविलें आणि लढाईच्या वेळीं कमीतकमी १२०००० सैन्य लढाईवर पाठवावयाचें आणि ६०००० स्वदेशी सैन्य ठेवावयाचें असें ठरले. या योजनेस मूर्तस्वरूप देण्यास अतिशय खर्च लागत असल्यामुळें ही योजना अंशतः अमलांत आणावयाची नाहीं असें १९०६ सालांत ठरविलें. येथें लष्करी शिक्षण सक्तीचें आहे या शिक्षणाची जबाबदारी वयाच्या २१ व्या वर्षापासून सुरू होते.

सां प त्ति क स्थि ति.-  १८९८-१९१३ या काळाच्या दरम्यान ग्रीसनें पुष्कळदां कर्ज काढलें होतें. बाल्कन युद्धामुळें तर ग्रीसची आर्थिक स्थिती अधिकच खालावत चालली. पुढें महायुद्धाला सुरूवात झाल्यावर तर, ग्रीसला पुष्कळच कर्ज काढावें लागलें. १९२१ सालीं ग्रीसचें एकंदर कर्ज ३००००००००० ड्रॅक्मे इतकें होतें. १९२१ सालीं ग्रीसचे उत्पन्न ५९७०११००० इतकें ड्रॅक्मे असून खर्च २००५३०४००० इतका होता.

प्रा ची न इ ति हा स.-  ग्रीस देशाचा इतिहास म्हणजे कोणत्याहि एक जात अशा एकाच राष्ट्राचा इतिहास नसून तो भिन्न भिन्न व एकमेकांपासून अगदीं स्वतंत्र असणा-या अशा राजकारणविशिष्ट ज्ञातींचा इतिहास आहे. म्हणून ग्रीक इतिहासांत घडलेल्या वृत्तांची जन्त्री देत न बसतां त्या वृत्तांची कारणमिमांसा करणें, या इतिहासापासून कोणते सिद्धांत काढतां येतील व काय बोध घेतां येईल हें पाहणें व त्याचप्रमाणें एकंदर जगाच्या सुधारणेंत ग्रीस देशाचें महत्व काय आहे याचा विचार करणें हेंच जास्त संयुक्तिक व फायदेशीर होईल.
    
अशा पद्धतीनें ग्रीसचा त्या देशावर रोमन लोकांचा अम्मल सुरू होईपर्यंतचा (ख्रि. पू. १४६) इतिहास चवथ्या विभागांत (बुद्धोत्तरजग, प्र. ४थें-  ग्रीस संस्कृतीची व्यापकता) दिला आहे. त्याचा सारांश पुढीलप्रमाणें आहे.

(१) पुरावणवस्तुसंशोधनशास्त्रीय पुराव्यावरुन ग्रीसच्या इतिहासाचा आरंभ ख्रि. पू. ३-या किंवा ४ थ्या सहस्त्रकापासून धरला पाहिजे.

(२) मायसीनीयुग व होमरयुग यांचा संबंध जोडतां येतो. पण पुराणवस्तुयुग आणि ख्रिस्त पू. ८ व्या शतकापासूनचें ऐतिहासिक युग यांच्यामध्यें मोठें खिंडार आहे.

(३) ख्रि. पू. १२व्या शतकाच्या सुमाराच्या महितीला आधार होमरचीं काव्यें हा आहे.

(४) ख्रि. पू. ८ व्या ते ६ या शतकापर्यंतच्या काळात ग्रीकांचा व्यापार व वसाहत यांची वाढ होत होती.

(५) ख्रि. पू. ७ व्या ते ४ थ्या शतकांत बेजबाबदार (टायरंट) राजे होऊन गेले. पण त्यांच्या ग्रीक संस्थानांनां अनेक फायदे झाले.

(६) ख्रि. पू. ६व्या व ५व्या शतकांत ग्रीकांचीं पर्शियन लोकांबरोबर युद्धें झालीं. त्यांत अखेर ग्रीकांना विजय मिळाला.

(७) ख्रि. पू. ४८० ते ३३८ पर्यंतच्या काळाला महायंग (ग्रेट एज) म्हणतात. त्यांत प्रथम अथेन्सचें, नंतर स्पार्टाचें व शेवटीं मॉसिडोनियाचें वर्चस्व होऊन एकंदर ग्रीस देशाची सर्व अंगांनीं फार भरभराट झाली व ग्रीक संस्कृति अनेक देशांत पसरली.

(८) ग्रीक लोकांचे लष्करी गुण व भौतिक शास्त्रांचें ज्ञान यांचा फायदा इराणीं लोकांनीं करून घेतला.

(९) हिंदुस्थानांतील ज्योतिषशास्त्र, नाट्य, कलाकौशल्य वगैरेंवर झालेल्या ग्रीकसंस्कृतीच्या परिणामाबद्दलची माहिती पहिल्या विभागांत (हिंदुस्थान आणि जग, प्र. ११वें) दिली आहे.

(१०) सिरियामध्यें भाषा व चालीरिती यांवर ग्रीकसंस्कृतीचा बराच परिणाम झाला.

(११) ईजिप्तमध्यें देश्य संस्कृतीनें ग्रीक संस्कृतीच्या प्रसारात फार अडथळा केला. फक्त अलेक्झांड्रिया हें शहर ग्रीक संस्कतीचें केंद्र बनलें होतें.

अलेक्झांडरच्या स्वा-यांमुळें ग्रीक संस्कृतीचा दूरवर प्रसार झाला. पण नंतर लवकरच सर्व ग्रीस रोमन सत्तेखाली जाऊन ग्रीसच्या इतिहासास निराळें वळण लागलें.

रोमन कारकीर्दीचा काळ (ख्रि. पू. १४६ ते सन १८००:- ग्रीस रोमचें अंकित बनल्यावर रोमन सीनेटनें कमिशन नेमून ग्रीसची पुनर्घटना करण्याचा त्या कमिशनला हुकूम केला. कॉरिन्थ शहरांत सर्वांत जास्त विरोध केला असल्यामुळें तें शहर उध्वस्त करण्यांत येऊन तेथील रहिवाशी गुलाम म्हणून विकण्यांत आले. एका शहराचें दुस-या शहरांशीं असलेलें व्यापारी दळणवळण नियंत्रित करण्यांत आलें व सर्वसाधारण लोकांच्या हातीं असलेली राजकीय सत्ता काढून घेण्यांत येऊन इस्टेटदार वर्गाच्या हातीं देण्यांत आली. अथेन्ससारखीं जीं जेत्यांच्या प्रीतींतील संस्थानें होती त्याचे राजकीय हक्क कायम ठेवण्यांत आले. मेसिडोनियाच्या गव्हर्नराला देखरेखीचा अधिकार देण्यात आला.

यापुढें विरोध करणें व्यर्थ आहे असें पाहून ग्रीक लोकांनीं या व्यवस्थेच मुकाट्यानें मान्यता दिला पारतंत्र्यांच्या यातना किती भयंकर असतात याचा आतां ग्रीक लोकांनां चांगला अनुभव येऊं लागला. रोमन व्यापारी व भांडलववाले यांच्या अपहारबुद्धीमुळें व अधाशीपणामुळें कित्येकांनां आपल्या अत्यंत आवडत्या अशा कलाकौशल्याच्या वस्तू विकाव्या लागल्या. सरकारी अधिका-यांच्या जबरदस्तीमुळें त्यांनां नजराणे देतां देतां व त्यांचा आदरसत्कार करतां करतां ग्रीक लोकांच्या नाकीं नव येऊं लागले. इटाली व लीव्हँट यांच्या दरम्यान प्रत्यक्ष दळणवळण सुरू करण्यांत आल्यामुळें ग्रीक व्यापाराला जबरदस्त धक्का बसला. पशुपालनाचा धंदा मात्र लोकांच्याच हातीं ठेवण्यांत आला होता. परंतु त्यापासून श्रीमंतांचाच तेवढा फायदा होऊं लागल्यामुळें भांडवलवाला वर्ग व गरीब वर्ग यांच्यांतील विरोध विकोपाला जाऊन गरीबांची फारच दैना होऊं लागली.

पांपे व ज्युलिअस सीझर यांच्यांत झालेल्या युद्धांत ज्यूलिअस सीझरला जय मिळून ग्रीसचें अधिपत्य ज्यूलिअस सीझरकडे गेलें. सीझरच खुनानंतर ग्रीक लोकांनीं ब्रूटसची बाजू घेतली. ख्रि. पू. ३९ व्या वर्षीं पालपोनिज सेक्सटस् पाँपीअसच्या ताब्यांत देण्यांत आलें. त्याच्या पुढील काळांत ग्रीसवर मार्क अँन्टनींचा अंमल होता. लढायांचा खर्च भागावा म्हणून यानें ग्रीसवर जबरदस्त कर लादण्यास सुरूवात केली. सैन्याच्या खर्चाची तरतूद करतां करतां ग्रीसचें साधनबळ संपूर्ण खलास झालें व देशाचें दुष्काळापासून संरक्षण करण्याला फारच त्रास पडला.

आगस्टस बादशाहाच्या अमदानींत थेसली संस्थान मॅसिडोनियांत सामील करण्यांत आलें व बाकीच्या संबंध ग्रीस देशाचा एक प्रांत बनविण्यांत येऊन त्याला अकेइआ हें नांव देण्यात आलें. रोमन साम्राज्याखालीं ग्रीसची आर्थिक स्थिती फारशी सुधारली नाहीं. रोमन लोकांच्या चैनी भागवितां याव्या म्हणून पुष्कळ नवीन धंदे काढण्यांत आले पण त्या धंद्यांपासून ग्रीकांचा फायदा न होतां इटानियनांचे खिसे गरम होऊं लागले. भांडवलवाले व जमीनदारवर्ग यांच्या हातांत सर्व संपत्ति जाऊन मध्यम वर्गाचे फारच हाल होऊं लागले व ब-याचशा लोकांनां उदरनिर्वाह चालविण्याची देखील पंचाईत पडूं लागली.

रोमन राज्यव्यवस्था:-  अकेइआ प्रांताची राज्यव्यवस्था सीनेटकडून काढून घेऊन ती बादशाही प्रतिनिधीकडे सोंपविण्यांत यावी अशी ग्रीक लोकांनीं टायबेरिअस बादशाहाला इ. स. १५ मध्यें विनंति केली. ही नवीन व्यवस्था मान्य करण्यांत आली पण ती फार दिवस टिकली नाहीं. इ. स. ४४ मध्यें क्लॉडोअस बादशहानें फिरून अनेकदा प्रांत सीनेटच्या स्वाधीन केला. इ. स. ६६-६७ व्या वर्षीं नीरो बादशहानें ग्रीसला भेट दिली. ग्रीक लोकांनीं केलेल्या दिखाऊ आदरसत्कारानें खुष होऊन त्यानें खंडणी भरण्याच्या करारापासून ग्रीसला मुक्त केलें व आपल्या भेटीच्या स्मरणार्थ ग्रीसला स्वराज्याची देणगी बहाल केली. परंतु या देणगीपासून ग्रीक लोकांचा कांही फायदा होऊं शकला नाहीं. कारण व्हेस्पेशियन बादशहानें ही देणगी रद्द केली व अकेइआचा किरून प्रांत बनवून त्यांवर जास्त कराचें ओझें लादले. दुस-या शतकांतील बादशहांनीं मात्र ग्रीसची सुबत्ता वाढविण्याचे मनापासून प्रयत्न केले. हॅड्रिअन बादशाहनें राहिलेली खंडणी माफ करून निरनिराळ्या जाचक करांपासून ग्रीसची मुक्तता केली. ग्रीक लोकांत राष्ट्रीय भावनांचें पोषण व्हावें म्हणून त्यानें अथेन्स येथें ग्रीक संस्कृतीचें वर्धन करणारी एक काँग्रेस स्थापन केली व रोम येथेंहि त्या संस्कृतीचा सन्मान व्हावा म्हणून त्यानें कांहीं संस्था स्थापन केल्या.

तिस-या शतकांत ग्रीसला परकीय स्वा-यांपासून फार त्रास झाला. इ. स. १७५ मध्यें कॉस्टोबीसी नामक टोळी मध्य ग्रीसपर्यंत चाल करून गेली होती. परंतु स्थानिक जुजबी फौजेनें त्वरा करून टोळीवाल्यांनां हांकून लावलें. इ. स. २५३ त या टोळींने फिरून ग्रीसवर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला. पण थेसलोनिका शहरानें जोराचा विरोध केल्यामुळें या वेळींहि टोळीवाल्यांना यश आलें नाहीं. इ. स. २६३-२६८ त गांधिक टोळ्यांनीं अकेइआ प्रांतावर स्वारी करून अथेन्स व इतर कांहीं शंहरे काबीज केलीं. पण रोमन आरमाराची ऐन वेळीं कुमक आल्यामुळें स्वारीवाल्यांनां पिटाळून लावण्यांत आलें.

पहिल्या कॉन्स्टंटाइन बादशहाच्या अमदानींत ग्रीसचे हेलास, पेलापोनेरास, नीकापोलीस व इतर बेटें असे लहान लहान तुकडे पाडण्यांत आले. थेसली शहर मॅसिडोनियांत सामील करण्यांत आलें. ज्या पद्धतीच्या योगानें मध्यवर्ती, सरकारला बिनचूकपणें उत्पन्न मिळत जाईल अशी कर उकळण्याची पद्धत तयार करण्यांत आली. सर्व घटना रोम येथील म्युनिसिपालटीच्या धर्तीवर तयार करण्यांत आल्या. कॉन्स्टँन्टिनोपल हें राजधानीचें ठिकाण करण्यांत आलें. ईजिप्तपासून युक्झाईन व ईजिअन समुद्रापर्यंत पूर्वेकडे व्यापारी रस्ते खुले करण्यांत आल्यामुळें मंदावलेल्या व्यापाराला फिरून चलन मिळालें. ज्यांच्या मिळाकती अल्प होत्या अशांची स्थिती फार हलाखीची झालेली होती. परंतु या वर्गाला निकृष्टावस्थेंत ठेवण्यांत सरकारच्या हिताला बाध होता. सरकारचे वसूलविषयक हितसंबंध या वर्गाशीं निगडीत झालेले होते व यामुळें या वर्गाची स्थिति सुधारणें सरकारला भाग पडलें. या कारणास्तव या वर्गाची स्थिति उत्तरोत्तर सुधारत जाऊन देशाची सुबत्ता व भरभराट यांचें साधारण मान वाढत्या प्रमाणांत राहिले.

परंतु ही भरभराट फार वेळ टिकूं शकली नाहीं. इ. स. ३७५ त ग्रीस देशाला एकामागून एक असे भूकंपाचे धक्के बसूं लागल्यामुळें व इ. स. ३९५-९६ व्हीजाँगोथ लोकांनीं स्वारी करून नेववेल तितकी संपत्ति लुटून नेल्यामुळें कित्येक शतकांपर्यंत ग्रीसला वर डोकें काढतां आलें नाहीं.

चवथ्या शतकांतील बादशहांनीं ग्रीक लोकांची खोट्या धर्मावरील (पेगन रिलिजन) श्रद्धा उडून जावी म्हणून पुष्कळ प्रयत्न केले. परंतु त्यांनां फारसें यश आलें नाहीं. इ. स. ६०० पर्यंत हा असद्धर्माचार (पेगॉनिझम) ग्रीसमध्यें चालू होता, पण ख्रिस्ती धर्माच्या पुष्कळ दिवसांच्या सहवासानें त्याचें स्वरूप बरेंच पालटलें होतें. पाद्री लोकांच्या मनमिळाऊपणानें नेहमीं लेकांचा पक्ष उचलून धरणाच्या खुबीदार युक्तिमुळें अगोदरच ग्रीक लोकांचें मन ख्रिस्तिधर्मोन्मुख होऊं लागलें होतें. हळू हळू हे लोक ख्रिस्ती धर्माच्या जाळ्यांत अडकूं लागले व शेवटीं सबंध ग्रीस देशानें या धर्माचा स्वीकार केला. ५ व्या व ६ व्या शतकांतील बादशहांना ग्रीकसंस्कृती विषयीं मुळींच आदर नसें. कॉन्टन्स्टाईन व त्याच्यानंतर गादीवर आलेल्या बादशहांनीं सबंध साम्राज्यांत रोमन सुधारणा फैलावण्याचें धोरण स्विकारलें होतें. या धोरणाप्रमाणें पहिल्या जस्टीनियन बादशहानें ग्रीसमध्यें रोमन कायदा लागूं करून स्वराज्योपभोगी शहराचे हक्क काढून घेतले व अथेन्स येथील तत्वज्ञानाचीं सर्व पीठें बंद केलीं. याचा परिणाम असा झाला कीं लोकानां आपल्या प्राचीन संस्कृतीची विस्मृति पडली व हेलिनीज हें नांव टाकून देऊन त्यांनीं रोमन्स नांव स्वीकारलें. ग्रीकसंस्कृति अजीबात नष्टच झाली असती, परंतु साम्राज्यांतील प्रांतांचे पूर्व व पश्चिम असे वेगवेगळे भाग करण्यांत आल्यामुळें ग्रीक भाषेला व चालीरितींनां पुनरपि त्यांचें अग्रस्थान प्राप्त होऊन, ग्रीस संस्कृतीवरील हा प्रसंग एकदांचा टळला.

सहाव्या शतकाच्या शेवटीं स्लाव्हॉनिक टोळ्यांनीं ग्रीसवर स्वारी केली. स्लाव्हानीज व वेंडस् या ज्ञातींनीं ग्रीसमध्यें प्रवेश करून पुढें त्या ठिकाणीं जें कायमें ठाणें दिले त्याचें ही स्वारी म्हणजे पूर्वचिन्हच होय. स्लाव्होनिक लोकांचा अंश वायव्य ग्रीस व पेलॉपोलेशस येथें जितका दिसतो तितका ग्रीसमध्यें दिसत नाहीं. इ. स. ७८३ मध्यें महाराज्ञी आयरीनी हिनें या लोकांविरूद्ध सैन्य पाठवून, त्यांनां मध्यवर्ती सरकारला खंडणी भरण्यास भाग पाडलें. इ. स. ८१० मध्यें स्लाव्ह लोकांनीं पॅट्री काबीज करण्याचा प्रयत्न केला. पण्ण तों सिद्धीस गेला नाहीं. यापुढें ते बादशहाचें एकनिष्ठ प्रजाजन होऊन राहिले.

बायझंटाईन काळ:-  ७व्या शतकांत ग्रीसचे ४ विभाग करण्यांत आले व प्रत्येक विभागावर एक वर्षाकरिता नेमलेल्या मुलकी व लष्करी अंमलदाराची नेमणूक करण्यांत आली. तिसरा लीथो यांच्या मूर्तिभंजक आज्ञापत्रामुळें चिडून ग्रीक लोकांनीं इ. स. ७२७ त बंड उभारलें. पण बादशाही आरमाराच्या जोरावर तें लवकरच मोडण्यांत आलें. ७ व्या शतकांत ग्रीसचा व्यापार व उद्योगधंदे फिरून भरभराटीस आले. इटालींत लोकसत्ताक राज्यांचा उदय होईपर्यंत सर्वच युरोपाला ग्रीस देशच रेशीम पुरवीत असे. १० व्या शतकांत बाल्कन द्वीपकल्पांतील टोळ्यांनीं फिरून ग्रीसवर स्वा-या करण्याला सुरूवात केली. इ. स. ९२९ नंतर बल्गेरिअनांनीं ग्रीसवर स्वारी करून इस्थमसपर्यंत शिरकाव केला. परंतु इ. स. ९९५ त बायझंटाईन सैन्यानें सार्किअस येथें त्याचा पराभव करून त्यांनां पिटाळून लावलें. इ. स. १०८४ मध्यें व्हलाक्स येथील पशुचारणानुसारी टोळ्यांनीं थेसली शहर काबीज केलें. त्याच वर्षीं सिसिली येथील नॉर्मन लोकांनीं आयोनियन बेटांवर स्वारी करून तेथें आपला पाय रोंवून घेतला. इ. स. १४५-४६ त याच लोकांनीं थीब्ज व कॉरिंथ हीं शहरें मनसोक्त लुटून काढलीं.

तुर्की विजय व तुर्क अंमल:-  बायझंटाईन साम्राज्य ढासळून पडल्यानंतर नवीन मुलुख मिळविण्याच्या लालसेनें फ्रँकिश सरदारांनीं ग्रसीवर हल्ले करण्याला सुरूवात केली. ग्रीसचा वायव्य भाग काय तो या स्वा-यांपासून सुरक्षित राहिला. हा भाग खेरील करून बाकीचा सर्व देश फ्रँकिश सरदार, व्हेनिशियन्स व इटालींतील साहसी लोक यांनीं आपापसांत विभागून घेतला. इ. स. १३०८ पर्यंत थेसली शहरावरव एपीरोट वंशशाखेचा अंमल होता. यावंशाच्या मृत्यूनंतर तें शहर ग्रँट कॅटलान कंपनीकडे गेलें. इ. स. ११३५० त सर्व्हियाचा राजा स्टीफनडूशन यानें तें काबीज केलें. १३९७ च्या सुमारास तुर्कानीं तें आपल्या साम्राज्यास जोडून घेतलें.

मध्य ग्रीसमधील मुख्य सत्ता बर्गेडियन घराण्याकडे होती. इ. स. १२९६ त या घराण्याला फ्रान्सचा राजा नववा लुई यानें ड्यूकच्या पदाला चढविलें. इ. स. १३११ मध्यें ग्रँड कॅटलान कंपनीशीं झालेल्या युद्धांत फ्रँक लोकांचा पराभव झाला व मध्यग्रीसचें स्वामित्व स्पेन येथील भाडोत्री सैनिकांकडे गेलें. कॅटलनांनीं मध्यग्रीसमध्यें ७५ वर्षेंपर्यंत मनसोक्त सुलतानीं गाजविली व शेवटीं पेलापोनेशस येथील नेरीओ आक्कीआईऊओली या सरदारानें त्यांनां तेथून हांकून लावलें. इ. स. १४५६ त सुलतान दुसरा महंमद यानें या नवीन घराण्याला अधिकारभ्रष्ट करुन मध्यग्रीस आपल्या साम्राज्यास जोडून घेतला. फ्रेंच नाईट जीऑफ्रे व्हीलीहार्डोइन यानें पेलापोनीज जिंकून तेथें स्वतंत्र वंशाची स्थापना केली. इ. स. १४०० च्या सुमारास बायझंटाईन राजपुत्रांनीं या घराण्यापासून पेलापोनीज काढून घेऊन तें आपापसांस विभागून घेतलें. इ. स. १४१५ मध्यें तुर्कीं सैन्यानें मोरियामध्यें शिरून तेथील कित्येक रहिवाशांना देश सोडून जाण्यास भाग पाडलें. बायझंटाईन राजपुत्र थॉमस यानें खंडणी देण्याचें नाकारल्यावरून दुस-या महमदानें इ. स. १४५८ त फिरून मोरियावर स्वारी केली व थॉमसला खंडणी देण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाही. इ. स. १४६० मध्यें मोरिया तुर्कस्तानला जोडण्यांत आला.

तुर्की राज्यव्यवस्थेखालीं ग्रीसचे सहा लष्करी विभाग करण्यांत आले ते येणेंप्रमाणें:-  (१) मोरिया, (२) एपीरस, (३) थेसली, (४) युबोईओ, वोटिया आणि अँटिक व (५) आईटोलिया, आकार्नेनिया, व (६) उरलेला मध्य ग्रीस, सुलतनाच्या सैन्याला मनुष्यबळ पुरविण्याच्या अटीवर प्रत्येक विभागांतील कांहीं जमिनी तुर्की रहिवाशांनां तोडून देण्यांत आल्या. स्थानिक राज्यव्यवस्था पाहण्याचें काम प्रत्येक ज्ञातींतींल आर्चबिशपाकडे सोपण्यिांत आलें.

इ. स. १४६३-७९ व १४९८-१५०४ या वर्षांच्या दरम्यान टर्की व व्हेनिस यांच्यांत ब-याच लढाया होऊन भूखंण्डावरील इटलीच्या ताब्यांतील मुख्य मुख्य ठाणीं तुर्क लोकांनीं काबीज केलीं. १५७० च्या सुमारास ईजिअन समुद्राच्या आसपांसचा प्रदेश तुर्कांनीं पूर्णपणें काबीज केला. इ. स. १६८४ मध्यें तुर्कांचें लक्ष डान्यूबकडे गुंतलें असल्यामुळें व्हेनिशिअनांनीं त्याचा फायदा घेऊन मोरियावर स्वारी केली. १६८७ मध्यें त्यांनीं अथेन्स व लीपँटो ही शहरें देखील काबीज केलीं. १६९९ त कार्लोबिट्झ येथें तह होऊन मोरिया व्हेनिसला देण्यांत आला. परंतु इ. स. १७१५ मध्यें तुर्कांनीं फिरून मोरियावर स्वारी केली व व्हेनिशिअनांचा पराभव करून तो प्रान्त त्यांच्याकडून हिसकून घेतला. तुर्कांच्या बेजबाबदार व जुलमी राज्यपद्धतीमुळें ग्रीक लोक नेहमीं असंतुष्ट असत. ‘जेनसिरी’ नामक तुर्की शिपायाच्या पायदळांत भरती होण्याकरितां मुलांची खण्डणी द्यावी लागत असते व ही खण्डणी फारच क्रूरपणें वसूल करण्यांत येत असे. त्याचप्रमाणें तुर्की रहिवाशी एतद्देशीयांचाफार छळ करीत. या जुलुमाला ग्रीक लोक फार त्रासून गेले होते. तथापि आरंभीं आरंभीं भीतीमुळें ते आपला असंतोष बाहेर प्रगट करीत नसत. हीं निराशाजनक स्थिति १८व्या शतकापर्यंत सुरू होती. परंतु १८ व्या शतकांत नवीन शाळा व नवीन विद्यापीठांच्या द्वारें शिक्षणाचा झपाट्यानें प्रसार होऊं लागल्यामुळें लोकांनां आपल्या पारतंत्र्याची जाणीव हळू हळू उत्पन्न होऊं लागली व शिक्षणाचा लाभ झाला असल्यामुळें असंतोष बाहेर प्रगट करण्याचें धैर्यही त्यानां प्राप्त झालें. वाढत्या शिक्षणामुळें आकांक्षाहि उत्तरोत्तर वाढूं लागल्या व तुर्की अंमलापासून स्वतंत्र होण्याची इच्छा दिवसेंदिवस बळावूं लागली.

ग्रीसच्या राजकारणांत युरोपियन राष्ट्रें फार करून ढवळाढवळ करीत नसत. परंतु इ. स. १७६४ त रशियानें ग्रीक लोकांनां तुर्क सत्तेविरूद्ध चेतवितां आल्यास पहावें म्हणून कांहीं लोक मुद्दाम ग्रीसमध्यें पाठविलें. इ. स. १७६९ त रशियाचें सैन्य मोरियांत उतरलें. पण तें ग्रीक लोकांच्या राष्ट्रीय भावना शाबीत करूं शकलें नाहीं. इ. स. १७४४ त क्वचककैतारजी येथें रशिया व टर्की यांच्यात जो तह झाला त्यायोगें ग्रीक व्यापार भूमध्यसमुद्रावर झपाट्याने वाढूं लागला व वाढत्या दळणवळणामुळें लुप्तप्राय झालेली ऐक्यभावना ग्रीक लोकांत फिरून उदित झाली. पूर्वजांनीं केलेल्या वैभवशालीं कृत्यांचा व फ्रेंच राज्यक्रांतीचा ग्रीक लोकांच्या मनावर विलक्षण परिणाम होऊन त्यांनीं स्वातंत्र्यप्राप्तीचा प्रयत्न करण्याचा ठाम निश्चय केला. १८०० च्या सुमारास ग्रीसमध्यें १०००००० लोकसंख्या होती. पैकीं २००००० अलबेनियन्स होते. तथापि मुसुलमानी सत्तेचा ग्रीक व अलबेनियन्स यांनां सारखाच तिटकारा असल्यामुळें या दोन जातींचें ऐक्य घडून येण्यास फार वेळ लागला नाहीं.

अ र्वा ची न इ ति हा स.- (१८००-१९२४) १९व्या शतकाच्या आरंभी ग्रीस तुर्की अधिपत्याखालीच होता. परंतु स्वातंत्र्याची उषा अगोदरच दिसूं लागली होती व राष्ट्रीय स्वातंत्र्यप्राप्तीचा मार्ग सुलभ करण्याचें कार्य सुरू झालेलें होतें. तुर्क साम्राज्याचा पाया ढासळूं लागण्याला १७ व्या शतकांतच सुरूवात झालेली होती. १९ व्या शतकांत साम्राज्यांतील ख्रिस्ती प्रजेंने प्रथम बंड उभारलें. इ. स. १८०४ मध्यें सर्व्हिया व १८२१ त ग्रीस हे देश तुर्कांविरूद्ध उठले. या दोन्ही देशांनां बंडास प्रवृत्त करण्याला मुख्यतः रशिया कारणीभूत झाला. फार दिवसांपासून रशियाचा काँस्टांन्टिनोपलवर डोळा होता. ग्रीसमधील ख्रिस्ती लोकांनां तुर्कांविरुद्ध चिथावण्याच्या धोरणांत प्रथम महाराज्ञी आना हिनें सुरूवात केली व दुस-या कॅथराईननें हेंच धोरण पुढें चालविले. इ. स. १७८१ त रशिया व ऑस्ट्रिया यांच्यात संगनमत होऊन तुर्की मुलुखाची विभागणी करून त्या ठिकाणीं दुस-या कॅथराईनचा मुलगा कॉन्स्टाईन याच्या अधिपत्याखालीं वायझंटाईन साम्राज्याची पुनरूत्थापना करावी असें ठरलें.
    
फ्रेंच राज्यक्रान्तीनें ग्रीक लोकांच्या राष्ट्रीय भावनांनां चलन देऊन, त्यांच्यांत स्वातंत्र्यलालसा उत्पन्न केली. लोकांत स्वाभिमान व स्वदेशाभिमान उत्पन्न व्हावा म्हणून निरनिराळ्या संस्था स्थापन करण्यांत आल्या. इ. स. १८१७ त एक क्रान्तिकारक संस्था स्थापन करण्यांत आली व मॉस्को, बुखारेस्ट, ट्रीस्ट व ग्रीसमधील प्रत्येक शहरीं तिच्या शाखा निर्माण करण्यांत आल्या. इ. स. १८२० त आयोनिनचा अलीपाशा यानें सुलतानच्या सत्तेविरूद्ध बंड उभारलें व तो या क्रान्तिकारक पक्षास जाऊन मिळाला. १८२१ च्या मार्च महिन्यांत रशियाचा झार पहिला अलेक्झांडर याचा देहरक्षक व वरील क्रान्तिकारक संस्थेचा अध्यक्ष अलेक्झांडर सीलांटी हा लहानसें सैन्य घेऊन मोलडोव्हियांत शिरला व त्याच महिन्यांत पेट्रासच्या आर्चबिशपनें मोरियांत बंडाचें निशाण उभारलें.

या स्वातंत्र्याच्या युद्धांत ग्रेटब्रिटन, फ्रान्स व रशिया हीं तीन बलाढ्य राष्ट्रें ग्रीसच्या बाजूनें लढत असल्यामुळें ग्रीसला या युद्धांत विजय मिळाला व स्वातंत्र्यप्राप्तीस्वत केलेल्या ग्रीक लोकांच्या प्रयत्नाला शेवटीं यश मिळालें. तारीख २० ऑक्टोबर १८२८ रोजीं नेव्हारीनों येथें तुर्की आरमाराचा पराभव झाला व ग्रीसमध्यें स्वतंत्र राजसत्तेची स्थापना करण्यांत आली. तारीख ७ मे १९३२ रोजीं लंडन येथील तहान्वयें ग्रेट ब्रिटन, फ्रान्स व रशिया या राष्ट्रत्रयीच्या संरक्षणाखालीं ग्रीस हें स्वतंत्र राज्य आहे असें जाहीर करण्यात आलें. बव्हेरीयाचा राजा पहिला लुई याचा मुलगा ओटो याची ग्रीसच्या राजसिंहासनावर स्थापना करण्यांत आलीं.  ओटो हा अनियंत्रितपणें व जुलुमानें राज्य करूं लागल्यामुळें सैन्यानें चिडून जाऊन तारीख १५ सप्टेंबर १८४३ रोजीं बंड उभारलें व ओटोला राज्यघटना स्विकारण्यास भाग पाडलें. जबाबदार मंत्रिमंडळ, राजनियुक्त सीनेट व सार्वत्रिक मताधिकारानुसार निवडलेंलें लोकसभागृह इत्यादि संस्था स्थापना करण्यांत आल्या. ओटो यानें प्रथम प्रथम या घटनेनुसार राज्यकारभार चालविला पण लवकरच तो फिरून बेजबाबदारपणें राज्य करूं लागला. यामुळें १८६२ त सैन्यानें फिरून बंड उभारलें व ‘राष्ट्रीय सभेच्या’ संमतीनें ओटोला पदच्युत करण्यांत आलें. इ. स. १८६३ त श्लेजविग-हॉलस्टेन-साँडरबर्ग-ग्लुक्जबर्ग येथील राजपुत्र विल्यम जॉर्ज याला ‘राष्ट्रीयसभेनें’ ग्रीसच्या रिकाम्या झालेल्या राजपदावर अधिष्ठित केलें. तारीख १३ जुलै १८६३ रोजीं ग्रेटब्रिटन, फ्रान्स व रशिया या संरक्षक राष्ट्रांनीं या नूतन राजवंशाला आपली संमति दिली.

पहिला जॉर्ज हा गादीवर येतो न येतो तोंच कित्येक भानगडीचे राजकीय प्रश्न त्याच्यापुढें दत्त म्हणून उभे राहिले. इ. स. १८६४ त त्याला राष्ट्रीय सभेनें तयार केलेली अत्यंत लोकसत्ता स्वरूपाची अशी राज्यघटना स्वीकारणें भाग पडलें. ग्रीसमध्यें अद्यापि हीच राज्यघटना चालू आहे. क्रीट बेटांतील राज्यक्रान्तीच्या प्रयत्नाला ग्रीक सरकारचा पाठिंबा असल्यामुळें टर्की व ग्रीस यांच्यांतील मित्रभाव दिवसेंदिवस कमी होत चालला होता. इ. स. १८६९ त क्रीट बेटांतील बंडाचा टर्कीनें बीमोड केला व पॅरिस येथें भरलेल्या युरोपीयन राष्ट्रांच्या परिषदेंनें टर्कीच्या वादग्रस्त प्रश्नाचा निकाल लावून तो निकाल मान्य करण्याला ग्रीसला भाग पाडलें. रशिया व टर्की यांच्यांतील यांच्यांतील युद्धानें ग्रीसमध्यें चलबिचल उडवून दिली. आपली सरहद्द वाढविण्याची ग्रीसची फार दिवसांपासून इच्छा होती व म्हणून बर्लिन येथील काँग्रेसनें ग्रीसच्या आग्रहामुळें हा प्रश्न विचारात घेतला. टर्की व ग्रीस यांनीं होतां होईतों या प्रश्नाचा गोडीगुलाबीनें आपसांत निकाल लावून घ्यावा व सलोखा न झाल्यास यूरोपियन राष्ट्रांनीं मध्यस्थी करावीं असें काँग्रेसनें ठरविलें. त्याप्रमाणें नवीन सरहद्द कोठून कोठेपर्यंत आंखण्यांत यावीं हेंहि काँग्रेसनें सुचवून ठेवलें. ग्रीस व टर्की यांनीं या प्रश्नाचा विचार करण्याकरितां एक संयुक्त कमिशनची नेमणूक केली. पण बर्लिन काँग्रेसनें आंखून दिलेली सरहद्द टर्की मान्य करीना. तेव्हां ग्रीसनें यूरोपियन राष्टांनां मध्यस्थी करण्याविषयीं विनंति केली. त्याप्रमाणें इ. स. १८८१ च्या जुलै महिन्यांत सहा यूरोपियन राष्ट्रें, ग्रीस आणि टर्की यांचें संयुक्त कमिशन नेमण्यांत येऊन त्या कमिशनच्या अनुमतें एक नवीन सरहद्द आंखण्यांत आली. यायोगें १३३९५ चौरस किलोमीटरांचें क्षेत्र व ३००००० लोकसंख्या ग्रीसच्या राज्याला जोडण्यांत आली.

या वेळीं ग्रीसच्या राजकारणांतील दोन विरोधी पक्षांचें पुढारीपण ट्रीकूप्स व डेली आनीज या दोन पुढा-यांकडे होतें. १८८२ मध्यें ट्रीकूप्स याला मुख्य प्रधानाची जागा देण्यांत आली. परंतु त्यानें राज्यकारभारांत घडवून आणलेल्या सुधारणा लोकांनां न आवडल्यामुळें त्याला लवकरच म्हणजे १८८५ त आपल्या जागेचा राजीनाम द्यावा लागला व डेलीआनीज याला मुख्य प्रधान निवडण्यांत आलें. डेली आनीज हा तुर्कद्वेषी धोरणाचा पुरस्कर्ता होता. बलगेरि. याच्या संबंधांत कांहीं भानगड उपस्थित झाल्यामुळें त्यानें ताबडतोब सैन्य व आरमार यांची लढाईकरीतां हालचाल सुरू केली. परंतु इतर राष्ट्रांनीं या कृत्यांचा कडक निषेध केल्यामुळें डेलीआनीज याचा नाइलाज होऊन त्याला आपल्या अधिकाराचा राजीनामा देणें भाग पडलें. ट्रीकूप्स याची फिरून मुख्य मंत्रिपदावर योजना करण्यांत आली. डेलीआनीज यानें युद्धाची तयारी करण्यांत बराच पैसा खर्च केल्यामुळें राज्याची वसूलविषयक परिस्थिति सुधारण्याचें काम आतां ट्रीकूप्सवर येऊन पडलें. अधिकारावर येतांच ट्रीकूप्सनें लोकांवर जबर कर लादण्यास सुरवात केली. याचा डेलीआनीज यानें फायदा घेऊन ट्रीकूप्सविषयीं लोकांच्या मनांत अप्रीति उत्पन्न करण्याच्या प्रयत्नास तो जारीनें लागला. कर हलके करण्याचें लोकांनां अभिवचन देऊन त्यानें लोकांचीं मनें आपल्याकडे वळवून घेतलीं. निवडणुकींत ट्रीकूप्स याचा पराभव झाला व फिरून डेलीआनीज यांची अधिकारावर योजना करण्यांत आली. परंतु वसुलविषयक अडचणीला डेलीआनीज तोंड देऊं न शकल्यामुळें राजानें त्याला अधिकारावरून दूर करून ट्रीकूप्स याला मंत्रिपदावर बोलाविलें. ट्रिकूप्स अधिकरसूत्रें हातीं घेतो न घेतो तोंच त्यांच्यांत व राजांत कांहीं गैरसमज उत्पन्न होऊन त्याला फिरून राजीनामा देणें भाग पडलें. यानंतर फक्त एकदांच ट्रीकूप्स यानें मुख्य मंत्र्याचें काम केलें. १८९५ त त्यानें आपल्या अधिकाराचा व त्याबरोबरच राजकारणाचा निरोप घेऊन तारीख ११ एप्रिल १८९६ रोजीं परलोकीं प्रयाण केलें.

तारीख २३ एप्रिल १८९६ रोजीं ट्रीकूप्सच्या प्रेताचा अथेन्य येथें मोठ्या समारंभानें दफनविधि करण्यांत आला. ऑलिम्पियन उत्वाच्या वेळीं ज्याप्रमाणें शहर शृंगारून काढीत असत. त्याचप्रमाणें त्यावेळीं यावेळीं पताका व तोरणें यांनीं सर्व शहराला शोभा आणण्यांत आली होती. प्राचीन ऑलिंपिक उत्सवाचें पुनरुज्जीव करण्यांत आल्यामुळें दूरदूरचे ग्रीक लोक उत्सवाकरीतां अथेन्समध्यें एकत्र होऊं लागले व राज्याच्या बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळें दडपून गेलेल्या ग्रीक लोकांच्या राष्ट्रीय भावना फिरून उद्दीपित झाल्या. १८९४ त स्थापन करण्यांत आलेल्या ‘एथनिकी हेटेरिया’नामक गुप्त मंडळाने आतां जोराची चळवळ सुरू केलीं. बलगेरियांनीं मॅसिडोनियांत टर्कीपासून विभक्त होण्याची सुरू केलेली चळवळ व प्रिन्स फर्डीनंड याचा रशियाशीं झालेला सलोखा यामुळें मॅसिडोनिया ग्रीक संस्कृतीच्या तटांतून फूटून निघणार अशी कित्येकांनां भीती वाटून त्यांनी त्या ठिकाणीं बंडखोरीच्या चळवळीची तयारी करण्याच्या उद्देशानें वरील मंडळ स्थापन केलें होतें. १८९६ व क्रीटमधील लोकांनां टर्कीनें कांहीं राजकीय सुधारणा दिल्या परंतु त्या अंमलांत आणण्याचा प्रश्न दिरंगाईवर टकाण्याचा टर्कीचा निश्चय दिसून आल्यामुळें तेथील ख्रिश्चन लोकांचा धीर सुटला व वरील मंडळाच्या सभासदांनीं तेथें जाऊन त्यांनां बंड करण्यास प्रोत्साहन दिलें. तारीख ४ फेब्रुवारी १८९७ रोजीं कॅनिआ येथें दंगा होण्याचें दिसून येतांच तुर्की सैन्यानें ख्रिश्चन लोकांवर गोळीबार करण्यास सुरवात केली व याप्रमाणें लोकांच्या असंतोषाच्या अग्नींत तेल ओतले जाऊन तो जास्तच भडकला.

या वेळीं डेलीआलीज हा मुख्य प्रधानाच्या जागेवर होता. क्रीट येथील गोळीबाराचें वृत्त ऐकतांच त्यानें ग्रीक सरकार कीट प्रकरणासंबंधानें यापुढें मुग्धता धारण करणार नाहीं असें जाहीर करून केनिआ येथें दोन लढाई जहाजें रवाना केलीं. ‘एथनिकी हेटेरिआ’ मंडळानें प्रधानमंडळांतील बहुमत आपल्या बाजूस करून घेऊन राजाला टर्कीविरूद्ध युद्ध पुकारण्यांस भाग पाडलें. युरोपीय राष्ट्राकडे एक खलिता पाठवून ग्रीक सरकारनें त्यांनां आपला उद्देश कळविला. तेव्हां ग्रेटब्रिटन, फ्रान्स, जर्मनी वगैरे राष्ट्रांनीं ग्रीक व तुर्क सरकारांकडे उलट खलिता पाठवून असें कळविलें कीं, सद्य:- स्थितींत क्रीट हें ग्रीसच्या राज्याला जोडतां येणें शक्य नसल्यामुळें सुलतानाच्या अधिपत्याखालीं अन्तर्गत राज्यकारभारांत क्रीटला स्वातंत्र्य देण्यांत येऊन हा युद्धप्रसंग टाळवा. या उत्तराला ग्रीक सरकारनें प्रत्युत्तर पाठवून अन्तर्गत स्वातंत्र्यानें क्रीटचा कांहीं फायदा होणार नाहीं व आपण आपलें सैन्य क्रीटमधून हालवणार नाहीं असें कळविलें. यापुंढें काय करावें यांसंबंधीं यूरोपियन राष्ट्रें भवती न भवती करूं लागलीं. तोंच इकडें ‘एथनीकी हटेरिया’ मंडळाच्या बाजारबुणग्या फौजेनें कित्येक तुर्की ठाण्यांवर हल्ला चढवून गोष्टी हातघाईवर आणल्या. तारीख १७ एप्रिल १८९७ रोजीं तुर्कांनीं ग्रीसविरूद्ध युद्ध पुकारलें. तुर्कांच्या हे लष्करी बलाबलाचा ग्रीकांनीं पूर्ण विचार केला नव्हता हें आरंभींच दिसून आलें. लवकरच ग्रीक सैन्य डबघाईस आलें व यूरोपीयन राष्ट्रांच्या मध्यस्थीनें तारीख १९ मे रोजी तात्पुरत्या तहान्वयें युद्ध थांबविण्यांत आलें. तारीख ६ डिसेंबर १८९७ रोजीं कॉन्स्टँटिनोपल येथें ग्रीस व टर्की यांनीं तहनाम्यावर सह्या केल्या. टर्कीला जेणेंकरून कित्येक लष्करी नाक्याचीं ठाणीं मिळतील अशा रीतीनें या दोन राष्ट्रांमधील सरहद्दींत थोडा फेरफार करण्यांत आला. यूरोपियन राष्ट्रांनां यापुढें क्रीट टर्कींच्या ताब्यांत ठेवणें योग्य होणार नाहीं असें वाटून त्यांनीं ग्रीसचा राजपुत्र जॉर्ज याजकडे क्रीट बेटाची राज्यव्यवस्था सोंपविण्याचें ठरविलें. हा निकाल तारीख २६ नोव्हेंबर १८९८ रोजीं अथेन्य येथें कळविण्यांत आला व तारीख २१ डिसेंबर रोजीं राजपुत्र जॉर्ज यांचें क्रीट येथील लोकांनीं मोठ्या आनंदानें व उत्साहानें स्वागत केलें. इ. स. १८९९ च्या एप्रिल महिन्यांत ट्रीकूप्स पक्षांचा मुख्य आधारस्तंभ थीओटोक्स याला मुख्य प्रधान नेमण्यांत आलें. यानें न्यायखात्यांत पुष्कळ सुधारणा घडवून आणल्या. राणीच्या इच्छेप्रमाणें बायबलाचें भाषांतर अर्वाचीन ग्रीक भाषेंत करण्याचें प्रधानमंडळानें ठरविल्यामुळें लोकांची माथीं भडकून गेलीं. पुराणमताभिमानी ख्रिस्ती लोकांवरील ग्रीक वर्चस्व हाणून पाडणें हा या भाषांतराचा उद्देश आहे असें लोकांनां वाटून पुष्कळ लोकांनीं व विश्वविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीं अथेन्स येथें १९०१ च्या नोव्हेंबरात दंगे व मारामा-या केल्या. थीओटोक्स याच्या खुनाचा प्रयत्न करण्यांत आल्यामुळें त्यानें आपल्या जागेचा राजीनामा दिला व अथेन्सच्या आर्चशिपालाहि आपला अधिकार सोडावा लागला. थीओटोक्स याची जागा झेमीज याला देण्यांत आली. १९०२ मधील निवडणुकींत झेमीजचा पराभव झाला व डेलीयामीज याला प्रथम निवडण्यांत आलें. जून इ. स. १९०३ मध्यें डेलीयानीश यानें आपल्या जागेचा राजीनामा दिला व थीओटोवॅक्स याला फिरून अधिकारावर घेण्यांत आलें. एका महिन्याच्या आंतच थीओटोक्स यांचे प्रधानमंडळ अधिकारभ्रष्ट झालें व-हालीज यानें नवीन प्रधानमंडळाची स्थापना केली.-हालीज याचें टर्कीविषयीं मित्रभावाचें धोरण होतें. १९०३ च्या डिसेंबरात-हालीज यानें राजीनाम दिल्यामुळें थीओटोक्सला फिरून प्रधान निवडण्यांत आलें. परंतु लोकांवर नवीन कर लादण्यास त्यानें सुरूवात केल्यामुळें त्याला लवकरच आपल्या जागेचा निरोप घ्यावा लागला व मुख्य प्रधानकीचीं सुत्रें फिरून एकदां डेलीयानीजच्या हातांत गेलीं. तारीख १३ जून १९०५ साजीं डेलीयानीजचा खून करण्यांत आल्यामुळें मुख्य मंत्रिपदावर-हालीज याची पुनरपि योजना करण्यांत आली.

तारीख २६ सप्टेंबर १९०६ रोजीं राजपुत्र जॉर्ज यानें क्रीटच्या हाय कमिशनरच्या जागेचा राजीनामा दिला. १९०८ च्या आक्टोबरांत क्रीट येथील लोकसभेनें ग्रीसशी एकत्र होण्याचा आपला निश्चय जाहीर केल्यामुळें तेथील मुसलमानी लोकपक्षाचा क्षोभ होऊन युद्धाचा प्रसंग ओढवतो की काय अशी भति उत्पन्न झाली. ग्रीक सरकारनें संशयास्पद धोरण स्विकारल्यामुळें सैन्यांत चळवळ सुरू झाली व १९०९ मध्यें या चळवळीला चांगलाच रंग चढला. या वेळीं थीओटोक्स हा मुख्य प्रधानाच्या जागेवर होता. त्याचें क्रीटसंबंधीचें धोरण लोकांनां नापसंत पडल्यामुळें त्याला आपल्या जागेचा राजीनामा द्यावा लागला व ती जागा-हालीज यानें भरून काढली. सैनिकांनां शांत करण्याकरितां –हालीज यानें आपला लष्करी व आथिक सुधारणेचा कार्यक्रम जाहीर केला. परंतु सैनिकांचें समाधान न होऊन त्यांनीं स्वतःस्थापन केलेल्या ‘लष्करी संघाच्या’ एका पुढा-याला-हालीजच्या जागीं मुख्य प्रधान नेमलें. त्यामुळें कांहीं काळपर्यंत सर्व कारभार ‘लष्करी संघा’कडे जाऊन राजवंश ढांसळून पडण्याचीं चिन्हें दिसू लागलीं. परंतु सैन्य व आरमान यांच्यांत एकससारखीं भांडणें उपस्थित होऊं लागल्यामुळें संघाचें वर्चस्व व शक्ति हीं नाहींशीं होऊन संघाचा पुढारी माव्होमायकेलस याला मुख्य प्रधानाची जागा सोडावी लागली. तारीख २९ मार्च १९१० रोजीं संघ मोडण्यांत आला व सर्वत्र स्थीरस्थावर करण्यांत आलें.

इ. स. १९१० च्या जानेवारी महिन्यांत लष्करीसंघाचें आपली सत्ता पूर्णपणें ग्रीसवर प्रस्थापित केल्यानंतर व्हेनीझोलास याला सल्लागार या नात्याने बोलावण्यांत आलें. १९१० च्या सप्टेंबरमध्यें राष्ट्रीय सभेची बैठक भरली. त्यावेळीं व्हेनिझोलास हा सभासद निवडला गेला असतांनादेखील तुर्कस्थानच्या इच्छेला मान देऊन त्यानें राष्ट्रीय सभेला न जाण्याचें ठरविलें होतें. पण पुढें व्हेनिझोलास याचा व ड्रॅगमेस या प्रधानाचा तंटा झाल्यामुळें प्रधानानें राजीनाम दिला व व्हेनिझोलास याला आपले मंत्रिमंडळ बनविण्याची जॉर्ज राजानें आज्ञा केली. व्हेनिझोलास हा त्यावेळीं अतिशय लोकप्रिय झाला होता. त्याची सत्ता उत्तरोत्तर वाढत आहे हें पाहून जुन्या लोकपक्षाच्या पुढा-यांनीं त्याचा नक्षा उतरविण्याचा निश्चय केला व त्याच्या कोणत्याहि बैठकीला न जातां ती बैठक कोरमच्या अभावीं बंद पाडण्याचें ठरविलें. अशी परिस्थिति दिसून येतांच व्हेनिझोलासनें राष्ट्रीय सभा बरखास्त करून लोकांकडे दाद माण्याचा निश्चय केला. नवीन निवडणुकींत फिरून व्हेनिझोलास हाच प्रचंड मताधिक्यानें निवडून आला.

अशा रीतीनें राष्ट्रीय सभेंत आपलें बहुमत केल्यानंतर त्यानें ग्रीसमध्यें नवीन नवीन सुधारणा अमलांत आणण्यास सुरूवात केली. निवडणुकीच्या वेळीं जे लांचलुचपतीचे अनिष्ट प्रकार घडत, त्यांनां आळा घालण्याचें त्यानें ठरविलें. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचें करावयाची योजना त्यानें अमलांत आणली. ग्रीक भाषा ही राजभाषा करण्यांत आली. परराष्ट्रीय खात्याची पुनर्घटना करावयाचें त्यानें ठरविलें. कौन्सिल ऑफ स्टेटचें पुनरुज्जीवन झालें. रुमानियाशीं राजकीय हितसंबंध पुनः सुरू करण्यांत आले.

१९१२ च्या जानेवारी महिन्यांत पुनः निवडणुकी होऊन त्यांत व्हेनिझोलासलाच मताधिक्य मिळालें. बल्गेरियाशीं सलोख्याचें धोरण ठेवण्यासाठीं त्यानें जॉर्ज राजाला मुद्दाम सोफियामध्यें पाठविलें होतें. त्याप्रमाणें १९१२ च्या मे महिन्याच्या २९ व्या तारखेस ग्रीस व बल्गेरियांमध्यें गुप्त तह झाला. त्यांत तुर्कस्थान व ग्रीस यांमध्यें लढाई सुरू झाल्यास तो प्रसंग खेरीज करून इतर प्रसंगीं ग्रीस व बल्गेरिया यांनीं परस्परांनां साहाय्य करावें अशा प्रकारचें कलम होतें.

तुर्कस्तानच्या सत्तेखालीं मॅसिडोनियाची स्थिति फार खालावत चालली होती. तुर्की लोक मॅसिडोनियांतील रहिवाश्यांनां फार त्रास देत असत. त्यामुळें १९१० च्या सप्टेंबरच्या ३० व्या तारखेस बाल्कन संस्थानांनीं कॉन्टांटिनोपलवर स्वारी केली. रशियाखेरीज सर्व युरोपियन राष्ट्रांनीं बाल्कन राष्ट्रांनां धमकीवजा पत्र लिहून त्यांत तुर्कस्तानच्या सार्वभौम सत्तेला बाध न आणतां यूरोपीय तुर्कस्तानच्या राजकीय स्थितींत सुधारणा घडून आणण्यासाठीं आपण प्रयत्न करूं, त्यांत बाल्कन राष्ट्रांनीं ढवळाढवळ करण्याचें कारण नाहीं असें कळविलें. पण हा खलिता पोहोंचण्यापूर्वींच माँटेनीग्रोनें तुर्कस्थानविरूद्ध युद्ध पुकारलें. ग्रीसनेंहि माँटेनिग्रो आपल्या राज्याला जोडून त्याला मदत करावयाचें ठरविलें. तुर्कस्ताननें ग्रीसविरुद्ध तेवढें युद्ध न पुकारतां त्याला आमीष दाखवून इतर बाल्कन राष्ट्रांशीं लढाई पुकारली. पण या अमिषाला बळी न पडतां व्हेनीझोलासनें बाल्कन राष्ट्रांनांच मदत करावयाचें ठरविलें.

लगेच ग्रीक सैन्यानें ग्रीसच्या युवराजाच्या अधिपत्याखालीं सरहद्द ओलांडून तुर्कस्तानचा सॅरांडोपोरान, सॅलोनिका इत्यादि ठिकाणीं पराजय केला. माँटेनिग्रो, बल्गेरिया, सर्व्हिया इत्यादि राष्ट्रांच्या सैन्यांनाहि तुर्कस्तानवर ठिकठिकाणी जय मिळविलें. तेव्हां तुर्कस्ताननें या बाल्कन राष्ट्रांशीं तह करावयाचें ठरविलें. बाल्कन राष्ट्रांच्या प्रतिनिधींचीं व तुर्कस्तानच्या वकिलांची लंडनमध्यें तहाच्या वाटाघाटी करतां बैठक भरली. त्यावेळीं ग्रीसनेंहि त्यांत भाग घेतला होता. ही तहाची वाटाघाट चालूं असतां, तुर्कस्तानमधील राष्ट्रीयपक्षानें बंड करून, आपली सत्ता प्रस्थापित केली व पुन्हां बाल्कन राष्टाशीं लढाई सुरू केली. ग्रीक सैन्यानें यनीना शहरांवर हल्ला करून तें काबीज केलें व बल्गेरियन व सर्व्हियन सैन्यानें अँड्रियानोपल, स्कुटारी इत्यादि ठिकाणें काबीज केलीं. तेव्हा पुन्हां लंडन येथें तुर्कस्तान व बाल्कन राष्ट्रें यांच्यांमध्यें तारीख ३० मे इ. स. १९१३ रोजीं तह होऊन युरोपमधील आपल्या ताब्यातील प्रदेशांपैकीं बहुतेक सगळा भाग तुर्कस्तानला सोडून द्यावा लागला. ग्रीक, बल्गेरिया व सर्व्हिया यांच्यामधील सरहद्द देखील याच वेळीं निश्चित ठरविण्याचा या राष्ट्रांनीं बेत केला होता, पण आड्रियाटिक समुद्रकांठच्या मुलुखांतून सर्व्हियाला चाट मिळावी हा जो आस्ट्रियाचा डाव होता त्याला इंगलंडनें पाठिंबा दिल्यामुळें या बाल्कन राष्ट्रांत असंतोष पसरला. बल्गेरियानेंहि यावेळीं बाल्कनमध्यें आपलें सर्वांत अधिक वर्चस्व असावें असा हट्ट धरला व आपलें म्हणणें कबूल न झाल्यास लढाईचा प्रसंग आणण्याचेंहि ठरविलें. त्यामुळें ग्रीस व सर्व्हिया या राष्ट्रांनां बल्गेरियाचें वर्चस्व होऊ न देण्याकरीतां, आपापसांत तह करणें भाग पडलें. शेवटीं बल्गेरियानें ग्रीक व सर्व्हियन सैन्यावर किज्की येथें हल्ला केला. पण त्यांत बल्गेरियाचा पराभव झाला.

बल्गेरियाचा पराभव झालेला पाहतांच व बाल्कन राष्ट्रांत फुटाफुट झालेली पहातांच या संधीचा फायदा घेऊन तुर्कस्ताननें पुन्हां आड्रियानोपल काबीज केलें. शेवटीं बुखारेस्टच्या तहानें या सर्व बाल्कन राष्ट्रांमध्यें तात्पुरता समेट होऊन त्यांत ग्रीसला मॅसिडोनियाच्या सरहद्दीवरील बराचसा मुलुख घशांत टाकावयास मिळाला. पण बल्गेरिया, हे नूतन संपादित मुलूख आपल्याला पचूं देणार नाहीं अशीं व्हेनीझोलासला सकारण भीति वाटत होती. त्यामुळें त्यानें सर्व्हिया व रूमानियाशीं तहाचें संधान जमविलें.

पण या बुखारेस्ट येथील तहामुळे ग्रीसला ईजियन बेटांवर जो ताबा प्राप्त झाला त्याला तुर्कस्ताननें संमति दिली नाहीं व त्यानें याचा सूड म्हणून ग्रीक जहाजांवर बहिष्कार घालून अशियामायनरमध्यें ग्रीकांचा छळ करण्यास सुरवात केली व ग्रीसला धमकी देण्यास सुरवात केली. अशी स्थिति पहातांच ग्रीसनें सर्व्हियाजवळ मदतीसाठीं याचना केली. सर्व्हियानें ती कबूल करून तुर्कस्तानच्या विरुद्ध आपली बाजू घेण्यासाठीं, यूरोपियन राष्ट्रांनां विनंति केली. पण तुर्कीच्या विरुद्ध ग्रीस व सर्व्हिया यांना कोणी मदत करण्यास तयार होईना व त्यामुळें यूरोपीयन राष्ट्रेंहि तुर्कस्तानविरुद्ध आपली बाजू घेण्यांत राजीखुषी नाहींत असें व्हेनिझेलास याला दिसल्यावरून त्यानें दोन अमेरिकन जहाजें खरेदी करून आलें आरमारी सामर्थ्य वाढविलें. अर्थातच तुर्कस्तानला ग्रीक आरमानी सामर्थ्यांपुढे आपला टिकाव धरणें अशक्य असल्याचें आढळून आल्यामुळें त्यानें तहाची वाटाघाट करण्यास संमति दिली. पण इतक्यांत महायुद्ध सुरू झाल्यामुळें या सर्व गोष्टींनां नवीनच वळण लागलें.

ग्रीस व महायुद्ध:- महायुद्ध सुरू होतांच जर्मनीनें ग्रीसला एक विनंतीपत्र पाठवून ग्रीसनें आपल्याला मदत करावी असें ग्रीसला कळविलें. पण कॉन्स्टंटाईन राजानें तें नाकारलें. व्हेनीझोलासनें बाल्कनसंघाचें सामर्थ्य वाढविण्याची खटपट केली. जर्मनीच्या आरमारी मदतीमुळें तुर्कस्तानला जोर चढून आशियामायरनच्या युद्धाचा वणवा पेटल्याखेरीज रहाणार नाहीं असें व्हेनीझोलास याला पक्कें वाटत होतें. यासाठीं त्यानें दोस्तराष्ट्रांच्या बाजूचें आपण राहूं असें जाहीर केलें. अर्थांतच इंग्रज सरकारला ही गोष्ट पसंत पडण्यासारखी होती. तेव्हा गॅलिपोलीचा टापू आपल्या ताब्यांत घेण्यासाठीं ग्रीसशीं संगमनत करण्याकरतां इंग्रज सरकारनें अँडमिरल कर यास ग्रीस येथें पाठविलें. पण ग्रीसमध्यें येताच कान्स्टंटाईननें तुर्कस्ताननें आपण होऊन कुरापत काढीतों आपण तुर्कस्तानशीं लढाई करण्याच्या विरूद्ध आहों असा कर यास खणखणीत जबाब दिला. व्हेनीझोलास याचें मत राजाच्या उलट होतें. त्यानें राजाचें मन आपल्या निश्चयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ. शेवटीं व्हेनीझोलास यानें राजीनामा देण्याची धमकी घातली पण राजाच्या आग्रहावरून त्यानें राजीनामा दिला नाहीं. पुढें एक महिन्याच्या आंतच तुर्कस्ताननें दोस्तराष्ट्रांविरुद्ध लढाई पुकारली.

१९१५ सालच्या जानेवारीमध्यें इंग्लंडनें बाल्कन राष्ट्रांत जूट करुन जर्मनीला शह देण्यासाठीं ग्रीसची मदत मागितली. पण कॉन्स्टँटाईननें तिकडे दुर्लक्ष केलें. व्हेनीझिओलासनें वारंवार राजाला इंग्रजांनां सहाय्य करण्यासाठीं विनंति केली. पण कॉन्स्टंटाईन हा त्याचें मुळीच ऐकेना. पुढें ब्रिटीशांनीं दार्दानेल्सचा समुद्र ताब्यांत घेण्यासाठीं ज्यावेळीं स्वारी करावयाचें ठरविलें त्यावेळीं त्यांनां सहाय्य करण्यासाठीं राजाचें मन वळवण्याचा व्हेनिझोलासनें अखेरचा प्रयत्न केला. त्यांत त्याला थोडेसें यश येण्याचा रंग दिसूं लागला. पण इतक्यांत लष्करी अधिका-यांचा नायक कर्नल मेट्राक्सस यानें राजीनामा दिल्यामुळें राजाचें मन पुन्हां पालटलें. शेवटीं राजाच्या अध्यक्षतेखालीं, ग्रीसमधील सर्व पक्षांच्या प्रतिनिधीची बैठक भरून दार्दानेल्सवरील ब्रिटीशांच्या स्वारीला सहाय्य करण्यासाठीं म्हणून एक पलटण पाठविण्याचा ठराव सर्वानुमतें मंजूर झाला. पण कॉन्स्टंटाईननें या सूचनेलाहि विरोध केला. त्यामुळें अखेर व्हेनीझोलास याला राजीनामा देणें भाग पडलें.

व्हेनिझोलासच्या जागीं गोनारेस याला मुख्य प्रधान नेमण्यांत आलें व त्यानें आपलें नवीन मंत्रिमंडळ बनविलें. ग्रीसनें या महायुद्धांत कोणताहि भाग न घेता तटस्थ रहावें या मताचा गोनारेस हा होता. पण त्यानें ग्रीसचें बल्गेरिया पासून संरक्षण करण्याच्या अटीवर दोस्तांनां आरमारी साहाय्य करण्यास संमति दिली व तसें फ्रेंच सरकारला कळविण्यांतहि आलें. पण कोणतीहि अट कबूल न करतां ग्रीस जर मदत करण्याचें कबूल करील तर ती स्वीकारण्यास दोस्त राष्ट्रें तयार आहेत असें फ्रेंच सरकारनें ग्रीसला कळविलें. कॉन्स्टंटाईन राजा हा जर्मनीच्या बाजूचा आहे हे फ्रेंच सरकारला पक्के कळून चुकले होतें व ग्रीसनें मदत करण्याचें कबूल करण्यांत कॉन्स्टंटाईनचा कांहीं तरी डाव असला पाहिजे अशी त्यांची कल्पना होती. जर्मन वृत्तपत्रकारांनीं तर कॉन्स्टंटाईन व त्याचा पक्ष यांनीं तटस्थपणा ठेवावा यासाठीं जोरानें चळवळ चालू ठेवली होती व व्हेनीझोलासच्या पक्षाविरूद्ध वाटेल तीं विधानें करून त्या पक्षाचें वजन कमी करण्याचा प्रयत्न चालविला होता. पण जून महिन्याच्या १३व्या तारखेस जी नवी निवडणूक झाल तींत व्हेनीझोलासच्याच बाजूला अखेर अधिक मतें मिळून त्याचा पक्ष विजयी झाला. असें असून देखील राजा आजारी आहे व त्याच्या परवानगीशिवाय आपण प्रधानकी सोडणार नाहीं या सबबीवर गोनारेस व त्याच्या मंत्रिमंडळानें राजीनामा देण्याचें नाकारलें. पुढे आगस्ट महिन्यांत व्हेनीझोलास हा अधिकारूढ झाला.

तथापि व्होनिझोलास याला अनेक हितशत्रू उत्पन्न झाले होते. जर्मन वृत्तपत्रकारांनीं तर त्याची एकजात नालस्ती करण्याचा विडा उचलला होता. व्हेनीझोलासनें अधिकाररूढ होतांच बल्गेरियापासून सर्व्हियाचें संरक्षण करण्याचें आपलें धोरण जाहीर केलें. बल्गेरियानें ज्या वेळीं सर्व्हियावर स्वारी करण्यासाठीं आपलें सैन्य जमा करण्यास सुरूवात केली. त्यावेळीं नाईलाजास्तव व्हॅनीझोलासनेंहि आपलें सैन्य गोळा करण्यास सुरूवात केली. सर्व्हियाच्या हातून ग्रीसला जितकी मदत व्हावयाला पाहिजे तितकी मदत मिळणें अशक्य आहे, या सबबीवर राजानें व्हेनीझोलासला फ्रान्सनें व इंग्लंडनें बलोरियाविरुद्ध मदत करावी अशी विनंति करण्यास सांगितलें. त्याप्रमाणें या सरकारास कळविण्यांतही आलें व फ्रान्स व इंग्लंड यांनीं आपलें सैन्य व पलटणी सॅलोनिकाला पाठविल्याचें जाहीर केलें. पण या संधीस पुन्हां राजानें मन पालटून त्यानें बल्गेरियानें आपण होऊन लढाईं पुकारल्याशिवाय फ्रेंच व इंग्लिश पलटणींनीं कोणत्याही प्रकारची हालचाल करतां कामा नये असें जाहीर केलें. त्यामुळें व्हेनीझोलासचा नाईलाज झाला. पुढें थोडक्याच दिवसांत व्हेनिझोलासचें व राजाचें पटेनासें झाल्यामुळें व्हेनीझोलासला राजीनामा देणें भाग पडलें व त्याच्या जागीं झैमेसची नेमणूक झाली.

झैमेस हा ग्रीस व सर्व्हियांमध्यें जो तह झाला तो बाल्कन पुरताच आहे अशा मताचा होता. महायुद्धांत ग्रीसनें आपली बाहेरून तटस्थपणाची वृत्ति राखावी पण आंतून मात्र आपली जास्त तयारी ठेवावी असें त्यानें आपलें धोरण जाहीर केलें होतें. व्हेनेझोलासला जरी ग्रीसनें दोस्त राष्ट्रांच्या बाजूनें युद्धांत पडावें असें वाटत होतें तरी पण राष्ट्रीय सभमध्यें बखेडा होऊं नयें यासाठीं, झैमेसच्या पक्षाच्या बाजूनें तो आपल्या पक्षाला मतें देण्यास सांगत असे. पण युद्धमंत्र्यानें कांहीं आगळीक केल्याच्या निमित्तावरून व्हेनिझोलासला फार चीड येऊन त्यानें एका प्रश्नावर प्रधानमंडळाचा पराभव केला. अर्थातच प्रधानाला राजीनामा देणें भाग पडलें. तेव्हां त्याच्या बदली राजानें स्कौलौडेस याला प्रधान नेमलें.

लवकरच नवी निवडणूक सुरू झाली, पण या निवडणुकीच्या वेळीं, व्हेनांझोलास व त्याचा उदार पक्ष यांनीं निवडणुकींत मतें न देण्याचें ठरविलें. यामुळें स्कौलोडिस हाच पुन्हां अधिकाररूढ झाला. मे महिन्याच्या २३ व्या तारखेस जर्मनींनें ग्रीसला एक खलिता पाठवून त्यांत पूर्व मॅसिडोनियाकडे जातांना घाटामध्यें रूपेला नांवाचा जो किल्ला आहे तो आत्मसंरक्षणासाठीं आपल्या ताब्यांत जर्मनरीनें घ्यावयाचें ठरविलें असून ग्रीसच्या सार्वभौमत्वाला यत्किंचित्  कमीपणा न येईल अशा त-हेंची खबरदारी जर्मनी घ्यावयास तयार आहे असें लिहिलें होतें. स्कौलौडिसनें याला कबुली दिली पण भर सभेंत जर्मनीला आपण कबुली दिली नसल्याचें त्यानें प्रतिपादन केलें. पण जर्मनीला अशी सवलत दिली नसल्याचें त्यानें प्रतिपादन केलें. पण जर्मनीला अशी सवलत दिल्याचा परिणाम असा झाला कीं, दोस्त राष्ट्रें व ग्रीस यांच्यामध्यें वैरभाव उत्पन्न झाला. कान्स्टंटाईन राजाविरूद्ध दोस्त राष्ट्रांतील पत्रांनीं टीका करण्यास सुरूवात केली. तर जर्मन पत्रकारांनीं त्याची पाठ थोपटण्यास सुरवात केली. कान्स्टंटाईन तर पूर्णपणें जर्मनीच्या बाजूचा झाला होता व जर्मनीचा जय व्हावा अशी त्याची मनापासूनच इच्छा होती.

शेवटीं जून महिन्यांत दोस्तराष्ट्रांनीं सालोनिका शहरावर लष्करी कायदा बजावला व तेथील ग्रीक सैन्य ताबडतोब काढून नेण्यांत यावें असें ग्रीसला कळविलें. स्कौलौडिसला या अटी जाचक वाटून त्यानें राजीनामा दिला. त्याच्या जागीं झैमेस हा प्रधान म्हणून नेमला गेला. त्यानें, सॅलोनिकामधून ग्रीस लष्कर दुसरीकडें नेण्याचें ठरविलें. पण या दोस्तांच्या कृत्यानें मात्र कॉन्स्टंटाईन तर पूर्णपणें जर्मनीच्या बाजूला झाला. इतक्यांत बल्गेरियन लोकांनीं मॅसिडोनियावर स्वारी केली व त्यांनीं मॅसिडोनियाचा बराच मुलूख काबीज केला. हें पहातांच राजाचे डोळे उघडले व त्यानें दोस्तराष्ट्रांशीं बोलणें लावण्याकरीतां झैमेसला हुकूम केला. रूमानियानें याच सुमारास जर्मनीच्याविरूद्ध लढाई पुकारली. हें पहातांच व्हेनीझोलास व त्याच्या अनुयायांनीं पुन्हां एकदां, जर्मनीविरुद्ध युद्ध पुकरण्यासाठीं राजाला विनंति करावयाचें ठरविलें पण राजानें व्हेनीझोलासनें पाठविलेल्या प्रतिनिधिमंडळाची भेटच घेतली नाहीं. अशी परिस्थिती उत्पन्न झाल्यामुळें, व्हेनीझोलासच्या कांहीं प्रमुख अनुयायांनीं एक क्रांतिकारक मंडळ स्थापन केलें व राष्ट्रसंरक्षकमंडळ निर्माण करून त्यातर्फें ब्रिटीशांनां व दोस्तराष्ट्रांनां शक्य ती मदत करण्यांस सुरवात केली. कांहीं दिवसानंतर दोस्तराष्ट्रांनीं, ग्रीसमधील पोस्ट व तारऑफिसें आपल्या ताब्यांत घेण्याचें ठरविलें. यामुळें झैमेसनें प्रधान मंडळाचा राजीनामा दिला.

सप्टेंबरच्या २५व्या तारखेला व्हेनीझोलासनें क्रीट येथें येऊन अँडमिरल कौंटोरियोहिस व जनरल डँकल्स यांच्या सहाय्याने क्रांतिकारक पक्षाची स्थापना केली. या पक्षाचा उद्देश ग्रीसमध्यें राजांच्या विरुद्ध चळवळ करून राजाला दोस्तांच्या बाजूनें लढाईंत भाग घेण्याला भाग पाडण्याचा होता. या त्रिमूर्तींनीं ग्रीसभर चळवळ करून सॅलोनिका येथें एक तात्पुरतें सरकार स्थापन करून दोस्तांच्या साहाय्यानें राष्ट्रसंरक्षक सैन्य उभारण्यास सुरवात केली. पुढें एक महिन्यांत या नूतन सैन्याच्या जोरावर व्हेनीझोलासनें जर्मनी व बल्गेरियाच्या विरुद्ध युद्ध पुकारलें. पण दोस्त राष्ट्रांनीं व्हेनीझोलासच्या पक्षाला उघड मान्यता दिली नाहीं. अद्यापहिं ग्रीसमध्यें राजाच्या बाजूचें पुष्कळच अनुयायी होते व त्याचा शब्द झेलण्यास तयार होते असें दोस्तराष्ट्रांनां वाटत होतें. दोस्त राष्ट्रें व्होनीझोलासचा पक्ष मान्य करीत नाहींत हे पहातांच कॉन्स्टंटाईनला फार आनंद झाला व त्यानें व्हेनीझोलास व त्याचा पक्ष हे बंडखोर आहेत असें जाहीर केलें.

नोव्हेंबरच्या १९ व्या तारखेस फ्रेंच अँडमिरल डार्टिन यानें शत्रुराष्ट्रांच्या वकीलांनां अथेन्समधून हांकून लावलें व ग्रीक तोफखाना आपल्या स्वाधीन करून घेण्याचें ठरिवलें. त्याप्रमाणें तो तोफखाना आपल्या स्वाधीन करून घेण्यास जात असतां ग्रीक सैन्यानें राजाच्या हुकूमावरून त्यास अडथळा केला व फ्रेंच सैन्याची कत्तल केली व व्हेनीझोलाच्या बाजूच्या अथेन्समधील नागरिकांचीहि कापाकाप केली. तेव्हा दोस्तराष्ट्रांनीं झालेल्या नुकसानीबद्दल भरपाई करून देण्याबद्दल व ग्रीक सैन्य कमी करणें, बंदीवानांनां मुक्त करणें इत्यादि अटी कबूल करण्याबद्दल राजाला कळविलें. व्हेनीझोलासच्या पक्षाला दोस्तराष्ट्रांनीं पूर्ण मान्यता दिल्याचें जाहीर करण्यांत आलें.

राजाला या गोष्टी इतक्या थरावर येतील अशी कल्पना नव्हती. पण इतक्या निकरावर गोष्टी आलेल्या पहातांच त्यानें दोस्तांच्या अटी पाळण्याचें कबूल केलें व दोस्तांचें निशाणहि अथेन्सवर झळकूं लागलें. पण अद्यापिहि राजाला जर्मनीकडून आपल्याला मदत मिळेल अशी मनांतून खात्री वाटत होती. पण ती मिळण्याचा रंग दिसेना. इतक्यांत अमेरिकेनेंहि दोस्तांच्या बाजूनें जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारल्याचें जाहीर केलें. तेव्हां निराश होऊन दोस्तराष्ट्रांशीं बोलणें लावण्याचें राजानें नक्कीं ठरविलें.

पण राजाच्या या बेताला दोस्त राष्ट्रांनीं संमति दिली नाहीं. राजा हा अद्यापि जर्मनीच्या बाजूचाच आहे असें त्यांनां नक्की वाटत होतें. तेव्हां राजानें व युवराजानें ग्रीसचें राज्यपद सोडून व आपल्यापैंकीं दुस-या कोणालाहि राज्यपद देऊन, दुसरीकडे कोठेंहि निघून जावें असें त्यांनीं राजाला कळविलें. राजालाहि निरुपायास्तव हें कबूल करणें भाग पडलें. त्यानें अलेक्झांडर या आपल्या धाकट्या मुलास राज्यपद देऊन स्वित्झरलंडला प्रयाण करावयाचें ठरविलें. व्हेनीझोलास हा पुन्हां अथेन्समध्यें परत आला व त्यानें राजनिष्ठेची शपथ घेतलीं. त्यानें जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारल्याचें ताबडतोब जाहीर केलें. अशा रीतीनें ग्रीस मध्यें तात्पुरती शांतता झाली. तथापि अद्यापि कान्स्टंटाईनच्या बाजूचें लोक ग्रीसमध्यें पुष्कळच होते व कॉन्स्टंटाईन हाहि स्वित्झर्लंडमधून अनेक कारस्थानें करून ग्रीसमध्यें आपल्या बाजूचें अनुकूल मत करून घेण्यासाठीं हरप्रयत्न करीत होता. व्हेनीझोलासनें ग्रीक सैन्याची वाढ करून दोस्त राष्ट्रांनां पुष्कळ ठिकाणी चांगलें साहाय्य केलें. विशेषतः मॅसिडोनियामधील लढायांत तर दोस्तांना ग्रीक सैन्यांचें फारच साहाय्य झालें. या सैन्याच्या जोरावर २० सप्टेंबर इ. स. १९१७ रोजीं बल्गेरियाचा दोस्तराष्ट्रांनीं पूर्णपणें पाडाव केला.

महायुद्ध संपल्यानंतर शांततापरिषदेची बैठक भरली. तींत व्हेनीझोलास हा ग्रीसतर्फे प्रामुख्यानें भाग घेत होता. उत्तर एपिरस, थ्रेस, स्मर्ना हे प्रदेश आपल्याला मिळावे असें आपलें म्हणणें ग्रीसनें या परिषदेपुढें मांडलें. नुइली येथें ग्रीस व बल्गेरिया यांमध्यें तह होऊन बल्गेरियानें ईजियन बेटांवरील आपला हक्क सोडून दिला व बाल्कनमधील दोस्त राष्ट्रांचे हितसंबंध राखण्याला त्यानें संमति दिली. तुर्कस्तानसंबंधीं प्रश्नाचा निकाल लावध्याला बराच अवधी लागला.

शेवटीं पुष्कळ वाटाघाटीनंतर ग्रीस व तुर्कस्तानांमध्यें सेव्हर्स येथें तह घडून आला. या तहान्वयें आड्रियानोपलपासून चटलजापर्यंतचा थ्रेसमधील प्रदेश, गॅलीपोली इत्यादि टापू ग्रीसला मिळाला. स्मर्नावर जरी तुर्कस्तानचा ताबा राहिला तरी तेथील राज्यकारभार पहाण्याचें काम ग्रीसकडे आलें.

अशा रीतीनें शांततापरिषदेंचें काम संपल्यानंतर व्हेनीझोलास हा पॅरिस येथून अथेन्स येथें येण्यास निघाला. त्याचा पॅरिस येथें खून करण्याचा प्रयत्न करण्यांत आला होता पण तो सुदैवानें फसला. पुढें अथेन्समध्यें आल्यावर त्यानें ग्रीसमध्यें सुधारणा करण्याचें मनावर घेतलें. पण व्हेनिझोलासच्या गैरहजीरींत कॉन्स्टंटाईन राजानें व्होनीझोलासचें वजन कमी करण्याचा प्रयत्न चालविला होता व त्याला यश येत चाललें होतें. याच सुमारास अलेक्झांडर राजा वारल्यामुळें ग्रीसवर कोणाला राजा नेमावें याविषयीं वाटाघाट सुरू झाली. कॉन्स्टंटाईनचा सर्वांत लहान मुलगा पॉल यास राजपदारूढ करावयाचें ठरलें पण कॉन्टंटाईन अगर युवराज यांनीं राज्यावरील आपला हक्क सोडल्याचें जाहीर करीतोंपर्यंत आपण ग्रीसचें राज्यपद स्वीकारणार नाही असें पॉलनें जाहीर केलें. नवीन निवडणुकींत या प्रश्नावर बराच वादविवाद होऊन व्हेनीझोलासच्या पक्षाचा पराभव झाला. व्हेनीझोलासनें व त्याच्या अनुयायांनीं ग्रीस सोडून परदेशीं जावयाचें ठरिवलें. कॉन्स्टंटाईन राजा पुन्हां ग्रीसमध्यें आला व त्यानें राज्यपद स्वीकारलें. कॉन्स्टंटाईननें राज्यपद स्वीकारल्यामुळें दोस्त राष्ट्रांनीं ग्रीसला कोणतीहि मदत न करण्याचें ठरविलें. इकडे मुस्ताफा केमलपाशा यानें अनाटोलियामध्यें तुर्कस्तानची सत्ता वाढविण्याचा प्रयत्न चालविला होता. दोस्त राष्ट्रांनींही कॉन्स्टंटाईन यानें राज्यपद स्वीकारल्यामुळें सेव्हर्सच्या तहाची पुनर्घटना झाली पाहिजे असें जाहीर केलें व केमलपाशाची बाजू घ्यावयाचे ठरविलें. लंडन येथें इंग्लंड, फ्रान्स, इटली या त्रिकूटाची बैठक भरली. त्या बैठकीला कॉन्स्टंटीनोपल व अंगोरा येथील दोन प्रतिनिधिमंडळें हजर होतीं. ग्रीसतर्फे कलोजरोपालस हा हजर होता. या बैठकीमध्यें बराच वादविवाद झाला पण ग्रीसच्या प्रतिनिधींचे कोणत्या अटींनीं समाधान होईना. तेव्हां या परिषदेनें ग्रीसच्या प्रतिनिधीला आपल्या अटी कळविल्या. त्यांतील मुख्य अटी अशा होत्या कीं, ग्रीसकडे थ्रेसमधील मुलुख रहावयाचा, स्मर्नाचा राज्यकारभार संयुक्तमंडळातर्फें चालावयाचा व राष्ट्रसंघानें आपला एक गव्हर्नर या प्रांतावर देखरेख करण्याकरितां ठेवावयाचा. या अटींनां ग्रीसनें संमति दिली नाहीं. उलट थोडक्याच दिवसांत ग्रीसच्या सैन्यानें अंगोरा रेल्वे लाईनवरील हिसर व एस्कीशेहर हीं शहरें आपल्या ताब्यांत घेतलीं. एस्कीशेहरजवळ तुर्की सैन्यानें ग्रीक सैन्याचा मोठा पराभव केला.

यावेळीं गोनारेस हा ग्रीसचा मुख्य प्रधन होता. यानें ग्रीसच्या अंतस्थ कारभारांत पुष्कळच सुधारणा घडवून आणल्या होत्या. कॉन्स्टंटाईन राजाला स्मर्ना आपल्या केव्हां ताब्यांत घेईन असें झालें होतें. तुर्कस्तानमध्यें व इंग्लंडमध्यें कांहीं बाबतींमुळें वितुष्ट उत्पन्न झालें होतें. ही संधि साधून कॉन्स्टंटाईननें स्मर्नावर स्वारी करून तें आपल्या ताब्यात घेतलें व कॉन्स्टंटीनोपलचा बादशहा असल्याचें जाहीर केलें. ग्रीस व तुर्कस्तानमधील या बेबंदशाहीला आळा घालण्याचा पुन्हां दोस्त राष्ट्रांनीं प्रयत्न केला. पण त्या प्रयत्नास यश आलें नाहीं. ग्रीसनें तुर्कस्तानविरूद्ध आपलें चढाईचें धोरण चालूच ठेवलें व एस्कीशहर, हिसर, कुतहिया हीं शहरें काबीज केलीं. पण शेवटीं हिसर येथें तुर्कस्ताननें ग्रीक लोकांनां जोराचा प्रतिकार करून ग्रीसला थोपवून धरलें.

मे इ. स. १९२१ ते ऑगष्ट इ. स. १९२४ या कालाच्या अवधींत ग्रीसमध्यें पुष्कळ महत्वांचीं स्थित्यंतरें घडून आलीं. ग्रीसनें या काळांत इटली व तुर्कस्तान यांच्याशीं युद्ध केलें. खुद्द ग्रीसमध्यें क्रांति होऊन कॉन्स्टंटाईन व त्याचा मुलगा जॉर्ज या दोन्हीं राजांची उचलबांगडी करण्यांत आली व प्रजासत्ताक राज्याच्या कल्पनेला अनुकूल वातावरण तयार झालें.

तुर्कस्तानशीं लढा:-  इ. स. १९२१ च्या मे महिन्यांत अशियामायनरमध्यें ग्रीक सैन्यांनें बरेच दंगेधोपे सुरू केल्यामुळें त्याच्या त्या पुंडाईबद्दल पोर्टेनें तक्रार केली. जून मध्यें ग्रीकांनीं आशियामायनरमधील काळ्या समुद्रावरील एरेग्लो व इनेबोली या बंदरावर तोफांचा मारा केला. हा मुलुख सर्वांनां खुला असल्याचें दोस्त राष्ट्रांनीं ठरविलें होतें. असे असतां, ग्रीकांनीं या तटस्थ मुलाखांतील शांततेचा भंग केला व दोस्तांच्या अटीविरूद्ध आचरण केलें अशी पोर्टेनें तक्रार केली. अर्थांतच ब्रिटन, फान्स व इटली यांनीं हा प्रश्न सोडविण्याचें मनावर घेतलें. ग्रीक लोकांनीं आशियामनयर वरील आपला हक्क सोडून द्यावा असे फ्रेंच सरकारचें म्हणणें होतें पण ग्रीक लोक त्या म्हणण्याला तयार होईनात. ग्रीस व तुर्कस्तान यांमध्यें शांतता प्रस्थापित करण्याचा युद्ध हाच काय तो उपाय आहें असें ग्रीकांचे म्हणणें होतें पण तें कोणालाच पसंत पडलें नाहीं. तरीं पण ग्रीसनें या टापूंत चढाई करून कुतहिया या एस्कीशेहर येथें जय मिळविलें. या जयांनीं हुरळून जाऊन अथेन्समधील वर्तमानपत्रकारांनीं कॉन्स्टंटीनोपलवर ग्रीसचाच हक्क आहे व ग्रीसला तें परत मिळालें पाहिजे अशी जुनी हाकाटी पुन्हा मारण्यास सुरूवात केली. १९२१ च्या ऑगष्टमध्यें अंगोरावर ग्रीकांनीं विमानांतून बाँब फेंकण्यास सुरूवात केली व त्यामुळें केमलपाशाला तें शहर सोडणें भाग पडलें. पण सप्टेंबर महिन्यांत ही स्थिति पालटूं लागली. तुर्की सैन्यानें त्यांना जोराचा प्रतिकार करून त्यांच्या सैन्याची दुर्दशा केली. त्यामुळें अंगोरा हस्तगत करण्याचा ग्रीकांचा बेत फसला. फ्रान्स व इटली या राष्ट्रांनीं या झगड्यांत भाग न घेण्याचें ठरविल्यामुळें ग्रीक लोकांनीं युद्धतहकुबी घडवून आणण्याबद्दल दोस्त राष्ट्रांनां विनंति केली. तुर्कांनां सारखे विजय मिळूं लागल्यामुळें, ग्रीक लोक नामोहरम झाले. हें पाहताच ग्रीक व बल्गेरिया यांच्या सरहद्दींवर ग्रीक व बल्गेरियन लोकांत चकमकी झडूं लागल्या. रुमानिया व जुगोस्लाव्हिया या राष्ट्रांनीं ग्रीसला मदत करण्याचें ठरविलें. पण ऑक्टोबरमध्यें ग्रीक लोकांची नांगी बरीच खाली उतरली. आर्थिक व लष्करीदृष्टया हमी म्हणून अँनटोलियाचा मुलूख आपल्या लष्कराच्या ताब्यांत रहावा असें ग्रीकचें म्हणणे पडलें. पण ही सुबुद्धि ग्रीकांनां अगोदर सुचली नाहीं. तुर्क लोकांनीं यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देतां ग्रीकांच्या ताब्यांत असलेल्या शेंकडों खेड्यांचा विध्वंस केला व त्यांतील लोकांची कत्तल केली. तेव्हा ग्रीक लोक थोडेसे शुद्धीवर आले व १९२२ च्या एप्रिल महिन्यांत त्यांनीं तहाची वाटाघाट करण्यास सुरूवात केली. दोस्त राष्ट्रांनीं तहाचा कच्चा मसुदा तयार केला पण ग्रीस व तुर्कस्तान या दोन्हीं राष्ट्रांनां तो पसंत पडला नाहीं. शेवटीं बरीच भवती न भवती होऊन १९२३ च्या आगस्टमध्यें लॉसेन येथें दोन्हीं राष्ट्रांत तह घडून आला.

१९२२ च्या एप्रिलमध्यें राजपक्ष व अशियामायनरमधील ग्रीक राष्ट्रसंरक्षक कमीटी यांमध्यें बेबनाव माजला. या कमीटींत व्हेनीझोलासच्या पक्षाचें पुष्कळ लोक होते. त्यांनीं अंगोरा सरकारच्या घटनेवर हुकूम आयोनियन सरकार स्थापन करण्याची धमकी घातली. सप्टेंबर महिन्यांत ग्रीक आरकारी व लष्करी सैन्यानें कॉन्स्टंटाईन राजाला पदच्युत करून त्याच्या जागीं क्राऊन प्रिन्सला गादीवर बसविलें. कॉन्स्टंटाईन हा १९२३ च्या जानेवारींत मरण पावला. पण बंडखोर ग्रीक सैन्यानें कॉन्स्टंटाईनला पदच्युत करूनच न थांबतां माजी मंत्रिमंडळापैकीं पुष्कळांचा शिरच्छेद केला. त्यामुळें दोस्तराष्ट्रांची ग्रीसविषयीची सहानुभूति नष्ट झाली.

१९२०-२३ च्या दरम्यान ग्रीसची आर्थिक स्थिति फारच वाईट झाली होती. १९२३ च्या फेब्रुवारींत ग्रीसनें राष्ट्रसंघाकडे एक कोटी पौंडाचें कर्ज मिळण्यासाठीं हमी राहण्याबद्दल विनंति अर्ज पाठविला. १९२३ मध्यें कम्युनिस्ट पक्षानें अथेन्समध्यें मोठा संप केला.

ग्रीस व इटली यांमधील लढायांची माहिती इटली या लेखांत आलीच आहे. इटलींनें नुकसानभरपाईखातर ग्रीसवर जबर अटी लादल्या होत्या व ग्रीसनेंहि त्या नाईलाजास्तव मान्य केल्या होत्या. पण इटलींचें निशाण ग्रीसमध्यें फडकत रहावयसंबंधीची अट मात्र ग्रीसनें अजीबात मान्य केली नाहीं.

ग्रीसमधील अंतस्थिति:- इ. स. १९२३ मध्यें, निवडणुकीमध्यें जो पक्षपात होत असे तो नष्ट व्हावा यासाठीं सैन्यानें बंड केलें, पण तें बंड मोडण्यांत आलें. इ. स. १९२३ च्या डिसेंबरमध्यें राष्ट्रीय सभेनें ग्रीसला कशा प्रकारची शासनपद्धति पाहिजे हें नक्की ठरेतोंपर्यंत ग्रीसच्या राजानें बाहेर कोठेंतरी रहाण्यास जावें असें ठरविलें. त्याचप्रमाणें ग्रीसचा राजा जॉर्ज यानें रूमानियाची वाट धरली. राजाच्या गैरहजेरींत अँडमिरल काँडोरियोटिस याला रीजंट नेमण्यांत आलें. पुढें इ. स. १९२४ मध्यें व्हेनीझोलास याला मंत्रिमंडळ बनविण्यासाठीं विनंति करण्यांत आली. पण व्हेनीझोलासनें मंत्रिमंडळ बनवून थोडे दिवस लोटतात न लोटतात तोंच नवीन संकट उपस्थित झालें. प्रजापक्षानें ग्री राजघराण्याची सत्ता संपुष्टांत आल्याचें राष्ट्रीय सभेकडून वदविण्याचा घाट घातला. यामुळें व्हेनिझोलासच्या मंत्रिमंडळाला मार्चमध्यें राजीनामा देणें भाग पडलें. या अंदाधुंदींतून मार्ग काढण्यासाठीं, नेमस्त राजपक्षीयांचें एक मंडळ स्थापन झालें. त्या मंडळानें प्रजासत्ताक राज्यपद्धति स्थापन कराण्याचें ठरविलें व त्याप्रमाणें जॉर्ज याला विधिपूर्वक पदच्युत करण्यांत आल्याचें जाहीर करण्यांत आलें. इ. स. १९२४ च्या मे महिन्यांत जॉर्जनें राजसत्ता स्थापित करण्याबद्दल मागणी केली पण त्या गोष्टीला लोकमत अनुकूल पडलें नाहीं.

मॅसिडोनिया प्रांत हा जूगोस्लाव्हियासच्या ताब्यांत आहे तो पुन्हा स्वतंत्र व्हाया या हेतूनें तेथे नवीन चळवळ सुरू झालेली आहे. सप्टेंबरमध्यें मॅसिडोनियांतील बंडखोर सैन्याचे अधिपति होडॉट अलेक्झांड्रोफ यांचा मॅसिडोनियांतील विरुद्ध पक्षाकडून खून करण्यांत आला. खूनी इसमांना तात्काल पकडण्यांत येऊन त्यांचा शिरच्छेद करण्यांत आला.

इ. स. १९२४ च्या जुलै महिन्यांत एक ग्रीक सेनापतींनें ५७ बल्गेरियन शेतक-यांची कत्तल केली. त्यामुळें ग्रीस व बल्गेरियांत तंटा उपस्थित होऊन तें प्रकरण राष्ट्रसंघाकडे निकालाकरतां आलें. तेव्हां या तंट्याचा निकाल लावण्यासाठीं, राष्ट्रसंघानें एक न्यूझीलंडचा व एक बेल्जमचा तज्ज्ञ अशा दोन तज्ज्ञांची कमिटी नेमली आहे.

[संदर्भ ग्रंथ-फिनले-अर्ली हिस्ट ऑफ ग्रीस (ऑक्स.१८७७) ग्रोट्स-हिस्टरी ऑफ ग्रीस, महाफी-सोशल लाइफ इन ग्रीस; रँवल्स अँड स्टडीज इन ग्रीस; हिल-हँडबुक ऑफ ग्रीक अँड रोमन कॉईन्स, ग्रीनिज-हँडबुक ऑफ ग्रीक कॉन्स्टिट्यूशनल हिस्टरी (मॅकमिलन १८९६), बेंट-मॉडर्न लाइफ अँड थॉट अमंग दि ग्रीक्स (लंडन १८९१), रॉड-दि कस्टम्स अँड लोअर ऑफ मॉडर्न ग्रीस (लंडन, १८९२), केनेथ ब्राऊन- कॉन्स्टंटाईन किंग अँड ट्रेटर (१९१७) कॅसाबेट्टी-हेलास अँड दि बाल्कन वार्स (१९१४), मेरियट-दि ईस्टर्न क्वश्चन (१९१८), मार्टिन-ग्रीस ऑफ दि ट्वेंटिएथ सेंचुरी (१९१३), रँकीन दि इनर हिस्टरी ऑफ दि बाल्कन वार्स १९१४].

ग्री क वा ङ्म य.- प्राचीन ग्रीक वाङ्मय हें स्वतःसिद्ध आहे. यामध्यें दुस-या कोणत्याहि वाड्मयाचा भाग भाषांतरीनें अथवा रूपांतरानें आलेला नाहीं. हें वाङ्मय म्हणजें ग्रीक समाजाची बाल्यावस्था, तारुण्य व-हास यांचें चित्र आहे. हें सर्वांगयुक्त आहें. ग्रीक भाषेच्या ज्या तीन मुख्य उपभाषा ‘आयोनियन’ ‘एओलियन’व‘डोरेयिन’या तिन्ही मिळून या वाङ्मयास पूर्णत्व आलें आहे.

सध्यां आपल्याला होमरच्या काव्यापासूनचेंच वाङ्मय उपलब्ध आहे. याच्या पूर्वीं पुष्कळ गाणीं प्रचलित असावीं असें दिसतें. पहिली गाणीं निरनिराळ्या ॠतुंवर रचलेलीं असावीं. यानंतर निसर्गाच्या निरनिराळ्या शक्तींस दैवतें कल्पून त्यांच्या स्तुतिपर गाणीं प्रचारांत आलीं. ही पारमार्थिक स्वरूपाचीं काव्यें झालीं, परंतु कांहीं विधींमध्यें म्हणावयाचे मंत्र वगैरे सुद्धां लौकिक स्वरूपाचे असत. लौकिक काव्यांस सामान्यतः आरंभ युद्धांच्या पोवाड्यांपासून होतो. याच पोवाड्यांचें व वीरकथांचें पुढें ऐतिहासिक महाकाव्यांमध्यें रूपांतर झालें. होमरनें आपलें ‘ईलियड’हें महाकाव्य अशाच निरनिराळ्या वीरकथा एकत्र करून तयार केलें असें म्हणतात. होमरचा काल ‘ऑरिस्टॉटल’व अँरिस्टार्कस यांच्या म्हणण्याप्रमाणें ख्रि. पू. १०४४ व ‘हिरोडोट्स’यांच्या मतानें ख्रि. पू. ८५० हा आहे.

हेसिअड यांचीं काव्यें निराळ्या प्रकारचीं आहेत. एका काव्यांत त्यानें ॠतू व शेतक-यांच्या कामांचें वर्णन करून शेवटीं शुभ व अशुभ दिवस कोणतें तें सांगितलें आहे. ‘थिऑगानी’ या काव्यांत त्यानें देवांची उत्पत्ति वर्णन केली आहे. एकंदर याच्या काव्यांत त्या वेळच्या प्रचलित दंतकथा, स्तोत्रें व विश्वत्पत्तीच्या कल्पना यांचा संग्रह दृष्टीस पडतो. याचा काल अजमासें ख्रि. पू. ८५०-८०० हा असावा, परंतु कांहींच्या मतें तो ख्रि. पू. ७ व्या शतकातला असावा. कवि व ईश्वरप्रेरित भविष्यवादी हीं दोन्हीहि कामें यानें केली व हेंच तो कवीचें कार्यक्षेत्र समजत असे. होमरच्या वेळचीं जीं हिंम्स’ आहेत तीं प्रार्थनेचीं स्तोत्रें नसून महाकाव्यांस प्रस्तावनेदाखल म्हणावयाचीं आहेत.

वरील काव्यांवरून कवींचें हृद्गत स्पष्टपणें दिसून येत नसे. त्याबद्दल फक्त अनुमानें काढतां येत असत. हेसिअड याच्या काव्यांमध्यें त्याची मनस्थिति कांहीं ठिकाणीं आपणास ओळखूं येते. ग्रीक काव्यांचा आरंभ महाकाव्यांपासूनच होतो पुष्कळ वर्षेपर्यंत दुस-या त-हेचीं काव्यें कोणी लिहिलीच नाहींत. कारण त्यावेळीं साम्राज्यसत्ता एका बादशहाच्या अथवा कांहीं बडे लोकांच्या हातांत असे. त्यांनां आपल्या पूर्वजांबद्दलचीं गांणीं आवडत असें व सामान्य जनतेसहि दुसरें कांहीं वाङ्मय नसल्यामुळें हींच बरीं वाटत. परंतु हळूहळू लोकसत्ताकपद्धतीचा जय होत जाऊन सर्व साम्राज्य सत्ता लोकांच्या हातांत आल्याबरोबर सामान्य जनतेंचें महत्व व कार्यक्षेत्र वाढलें. त्याबरोबर लोकांच्या मानसिक व कर्तुत्व शक्तीची वाढ झाली व सामान्य लोकांस आपले विचार काव्यांत प्रकट करावेसें वाटूं लागलें; पण गद्यवाङ्मय प्रचारांत नसल्यामुळें हे विचार काव्यांतच प्रकट होऊं लागले व त्यामुळेंच ‘एलेजी’व‘आथँबिक’या चालीच्या कविता प्रचारांत आल्या.

ग्रीक‘एलेजी’म्हणजे केवळ शोकगीतें नव्हत. या कवितांचे विषय निरनिराळे असून त्यांमध्यें कवीचे व त्याच्या मित्रमंडळींचे विचार प्रकट केलेले असत. ‘आथँबिक’चालीचा प्रथम औपरोधिक काव्यांत उपयोग करीत असत. या चालीच्या काव्यांमध्यें ‘एलेजी’पेक्षां जास्त स्पष्ट रितीनें कवींचें हृद्गत दिसून येतें.

‘एलेजी’काव्यांचा उपयोग निरनिराळ्या गंथकारांनीं निरनिराळ्या कामीं केला. प्रथम ‘कॅलिनस’व‘टिर्टिअस’या प्राचीन कवींनीं लोकांत वीरश्रीचा प्रसार करण्याच्या कामीं केला. नंतर ‘आर्चिलॉकस’यानें याच काव्यांतून आपले मृताबद्दलचे दुःखोद्गार काढलें. आयोनियन लोकांचे स्वातंत्र्य गेल्याबद्दलचा शोक भिम्नरसायानें याच काव्यांत प्रगट केला. सोलन यानें याच काव्यांचा उपयोग राजकीय व नैतिक बाबतींत केला. थि ऑग्निस यानें राजनिति व तत्वज्ञान याच काव्यांतून प्रचारांत आणलें. झेनोफेन्स यानें आपलें तत्वज्ञान याच काव्यांत सांठविलें आहे. सिमॉनिड्स यानें पुन्हां (सिऑस येथील) इराणी युद्धांत पतन पावलेल्या वीरांचें शौर्य याच काव्यांत वर्णन केलें. ‘अमॉर्गस’येथील सिमॉनिड्स यानें या काव्यांचा औपरोधिक रीतीनें उपयोग केला.

यानंतर‘लिरिक’कविता प्रचारांत आल्या. या काव्यांमध्यें कवीचें हृद्गत अधिक स्पष्टपणें दिसून येतें. या कालांत संगीताची व वाद्यांचीहि प्रगति बरीच झाली होती. लेस्बॉस येथील ‘लिरिफ’काव्यांमध्यें त्या वेळची समाजाची आंदोलनें व त्याबरोबर कवीची निरनिराळ्या प्रसंगांचीं मनस्थिति यांचें स्पष्ट चित्र दिसतें. येथील प्रमुख कवि ‘अलसीअस’हा होय. सॅफो या कवयित्रीची निरनिराळे मनोविकार वर्णन करण्याची शैली अप्रतिम आहे. वरील कवी ‘एओलियन’होते. त्यांचीं चित्रें विशेषतः वैयक्तिक असत. डोरियन कवींच्या ‘लिरिक’कविता सामान्यतः सर्व समाजाचें वर्णन करीत व हीं काव्यें पुष्कळजणांनीं मिळून म्हणावयाचीं असत. सार्वजनिक देवतार्चनाच्यावेळीं व उत्सवप्रसंगीं हीं काव्यें म्हणण्याचा प्रघात असें. यांच्या स्वरूपात निरनिराळ्या कवींनीं सुधारणा केली. 'सिमॉनिड्स' व 'पिंडार' या दोन कवींनीं या काव्यांस पूर्णत्यास नेलें.

आर्टिक:-  निरनिराळ्या समाजस्थितीस अनुरूप अशा प्रकारचीं काव्यें आतांपर्यंत तयार झालीं होतीं. यापुढें आणखी निरनिराळ्या प्रकारांची जरूर लोकांस भासूं लागली व त्याचें फळ म्हणजे नाटक हें होय. 'डायबोनियस' यांच्या उत्सवाच्या वेळीं त्याच्या वेदीभोंवतीं लोक जमून त्यांच्या पराक्रमाचें वर्णन करीत असत. त्यांचा पुढरी आपण 'डायोनिसस' यांचा दूर आहों अशी कल्पना करून त्याच्या एखाद्या प्रसंगीच्या पराक्रमाचें वर्णन करी, व बाकीचे सर्व त्यास उत्तर देत. पुढें उत्तर देणारा दुसरा एक इसम निवडूं लागले. पुढे या दोहोंचे वाढतां वाढतां चार झाले व त्याप्रमाणें नाटकांचा आरंभ झाला.

'ट्रॅजडी' हें नाव मूळ बोकड (ट्रॅगॉस) या शब्दापासून निघालें व हें नांव बोकडी बळी दिल्यानंतर जें गाणें महणावयाचें असे त्यास मिळालें. 'कॉमेडी' याचा अर्थ खेडवळ असा आहे व हें नांव वरील गाणें इतर प्रसंगीं म्हटलें असतां त्यास लावीत. 'ट्रॅजडी' या नाटकाचा खरा आरंभ 'इश्चिलस' यानें प्रथम दोन नटांस भूमिका देऊन केला. व यानें संभाषणास अग्रस्थान देऊन ताफ्याच्या गायनास गौणस्थान दिलें. याच्याच वेळेस डायोनिसचें नाटकगृह बांधलें. यानंतर 'सोफोक्लिस' हा नाटककार झाला. यानें नाटकांत पुष्कळ प्रगति केली. युरोपिडिस यानें वरील नाटककाराप्रमाणें पौराणिक नाटकें न लिहितां सामान्य विषयांवर लिहिलीं. या वेळेस या नाटकांची वाढ पूर्णत्वास पोंचली.

'ट्रॅजडी' ज्याप्रमाणें भारदस्त विषयांवर असत त्याच प्रमाणें सामान्य विषयांवर 'कॉमेडी' रचीत असत. पहिल्या प्रकारचीं नाटकं अँटिकामध्यें विशेष झालीं तर दुस-या प्रकारच्या नाटकांची वाढ डोरिअन लोकांनीं केली. मेगारा येथील सुझारिअन यानें काहीं प्रहसनें लिहीलीं. सायराक्यूज येथील सोफत यानें कांहीं 'कॉमेडी' लिहिल्या. परंतु या नाटकांसहि परिणत स्वरूप अँटिका प्रांतांतच मिळालें. यांपैकीं अँरिस्टोफेन्स हा प्रमुख नाटककार होऊन गेला. याचीं ११ नाटकें उपलब्ध आहेत.

यानंतर 'मिडल कॉमेडी' (मध्ययुगीन नाटकें) प्रचारांत आलीं. यांमध्यें जी औपरोधिक टीका पूर्वी राजकीय गोष्टींवर होत असे तीच आतां सामाजिक गोष्टींवर व वाङमय यांवर होऊं लागली. या त-हेचीं नाटकें विशेषतः 'अथेन्स' येथील 'अँटिफेन्स' व 'थुरी' येथील 'अँलेक्झीस' यांनी लिहिलीं. यानंतर 'न्यू कॉमेडी' अर्वाचीन सामाजिक नाटकांच्या धर्तीवर तयार झाली. या त-हेचीं नाटकें विशेषतः मिनँडर यानें लिहिलीं.

यांपैकीं 'ओल्डकॉमेडी' हीं नाटकें वैयक्तिक टीकांनीं भरलेलीं असत व त्यांतील टीका ही फार कडक असे. हीं नाटकें धार्मिक व उत्सवाच्या प्रसंगीं करीत असत. त्यामुळें या नाटकांत केलेली टीका अगर गौरव हजारों मनुष्यांच्या तोंडीं एकदम होत असे.

ग्रीक भाषेंत गद्यवाड्मयाचा आरंभ होण्यापूर्वींच काव्याची वाढ पूर्ण झाली होती. पहिला गद्यग्रंथप्रकार 'हिरोडोट्स' याचें नांव ऐकूं येण्यापूर्वींच नाटकांची वाढ पूर्ण होऊन गेली होती. 'हिरोडोट्स' च्या पूर्वीं कांहीं ग्रंथकारांनीं गद्यांमध्यें ग्रंथरचना केली होती. परंतु अद्यापि गद्यवाङमय असें तयार झालें नव्हतें. 'हिरोडोटस्' याचा इतिहास हा ज्याप्रमाणें काव्यांमध्यें 'ईलियड' त्याप्रमाणें गद्यामध्यें मूळ आधार आहे. याच्या इतिहासाचा विषय ग्रीस व आशिया यांच्या मधील लढाया हा आहे. हा पौराणिक गोष्टींना जरी ऐतिहासिक गोष्टींइतकें महत्व देत नाहीं तरी त्यांचा उल्लेख करणें अवश्य समजतो. यानें आपल्या इतिहासात भूवर्णनहि केलें आहे. परंतु यानें राजनीतीच्या दृष्टीनें विचार केलेला दिसत नाहीं. यामुळें याच्या इतिहासात राजकीय व शासनसंस्थांचा इतिहास आढळत नाहीं.

याचा समकालीन 'थुसिडाइड्स' यानें 'पिलॉपोनिशियन' युद्धावर एक इतिहास लिहिला आहे. याच्या इतिहासांत विचारशक्ति जास्त दिसून येते. यानें कोणत्याहि गोष्टीवर आपलें मत दिलें नाहीं व निःपक्षपातीपणानें केवळ त्या वेळीं घडलेल्या एकंदर घडामोडींच्या महत्वाकडे लक्ष्य देऊन लिहिला आहे.

यानंतर याच्याच पुढील काळाचा ख्रि. पू. ३६२ सालापर्यंतचा इतिहास झेनोफोन यानें लिहिला आहे. हा स्वतःयोद्धा होता व त्यानें पुष्कळ लढाया व देश पाहिले होते व तो चांगला लेखकहि होता. परंतु याच्या इतिहासास वरील इतिहासांची सर येत नाहीं व तो स्पार्टाचा पक्षपाती दिसतो. यानें कांहीं विषयांवर निबंध लिहिले. याच वेळीं 'स्टेसिअस' यानें इराणचा व 'फिलिस्टस' यानें सिसिलीचा इतिहास लिहिला. यानंतर कांहीं किरकोळ इतिहासकार झालें.

अँटिका प्रांतांत एकंदर गद्यवाङमयाची वाढ कशी झाली व गद्यलेखनपद्धतीमध्यें कसकशी सुधारणा होत गेलीं तें आपणांस वक्तृत्वामध्यें चांगलें स्पष्ट दिसतें. अथेन्स मधील प्रत्येक नागरिकास राजकारणांत भाग घेणें असल्यास अथवा न्याय कचेरींत स्वसमर्थन करण्याकरितां तरी निदान सभेमध्यें भाषण करण्याची विद्या अवगत करावी लागत असें. सार्वजनिक वादविवादप्रसंगीं नागरिकांचें वक्तृत्वांतील प्रावीण्य दिसून येत असे. यामुळें ग्रीसमध्यें वाङ्मयावर वक्तृत्वाचा परिणाम विशेष झाला. या वाङ्मयाचा आरंभ सिसिलीमध्यें सायराक्यूज येथील 'कोरॅक्स' यानें 'आर्ट ऑफ वर्ड्स' हा ग्रंथ लिहिल्यापासून झाला. 'कोरॅक्स याचा शिष्य टिसिअस यानें हा ग्रंथ अथेन्स येथें आणला. पुढें 'सोफिस्ट' यांच्या शिक्षणामुळें व्याकरण व तर्कशास्त्र यांजकडे लक्ष्य गेलें. जॉर्जिअस यानें एकंदर वक्तृत्वामध्यें ओजस्विता आणिली.

गद्यवाङमयास व लेखनशैलीस वळण देणारा पहिला ग्रंथकार अँटिफन हा होय. याची भाषासरणी गंभीर व भारदस्त असून तो परस्परविरुद्धर्थी क्रियापदांवर जोर देत असें. अँडोसाइड्स याचें महत्व फक्त ऐतिहासिक आहे. याची वर्णनशक्ति चांगली आहे. 'लिसिअस' यानें पूर्वीच्याप्रमाणें अपरिचित व क्लिष्ट भाषा वापरण्याचें सोडून सामान्य प्रचारांतील भाषा वापरण्यास सुरवात केली. 'इसोक्रेटस' याची भाषा 'अँटिफन' व 'लिसिअस' यांच्या दरम्यानची आहे. यानें ऐकणारांपेक्षा वाचणारांकरितांच ग्रंथरचना केलेली दिसते. याच्याच भाषासरणीचें अनुकरण यानंतरच्या ग्रंथकारांनी केलेलें दिसतें. सिसरानें हिचाच अंगिकार केला व पुढील अर्वाचीन वाङ्मयास वळण लावलें. इस्थिअस याचीं कांहीं भाषणें महत्वाचीं आहेत व त्यांमध्यें 'लिसिअस' या भाषाशैलीची छटा मारते. डेमॉस्थेनीस हा गद्यवाङमयामध्यें आपल्या सर्वांगपरिपूर्णतेनें व अलौकिक वक्तृत्वशक्तीनें सर्वांवर ताण करतो. त्याचीं राजकीय व सामाजिक विषयांवरील भाषणें व कांहीं खटल्यांतील विषय प्रतिपादन यांमध्यें त्याचें भाषेवरील प्रभुत्व स्पष्टपणें दिसून येतें. यानें गद्यवाङ्मयास पूर्णता आणली. याच्यानंतर साधारण नांव घेण्यासारखा असा हायपराइड्स हा वक्ता होऊन गेला. अँरिस्टॉटलचा शिष्य फॅलेरम येथील डेमेट्रिअस यांच्या पासून ग्रीक वक्तृत्वाचा-हास होत गेला. यानें कल्पित विषयांवर भाषणें करण्याचा प्रघात पाडला. यानें अलेक्झांड्रिया येथील ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली.

यानंतर वक्तृत्वाचा अभ्यास ग्रीसच्या किना-यावर एशियामानरमधील वसाहतींत व विशेषतः-होड्स बेटांत चालू असे. तत्वज्ञानामध्यें ज्याप्रमाणें प्लेटो याला अग्रस्थान आहे त्याप्रमाणेंच ग्रीक वाङ्मयांतहि आहे. याच्या संभाषणांमध्यें सर्वांग परिपूर्णता दिसून येते.

अँरिस्टॉटल यांचीं भाषणें जर ग्रीक वक्तृत्वाच्या भरभराटीच्या काळांत प्रसिद्ध झालीं असती तर त्यांचा परिणाम ग्रीक वाङ्मयावर फार झाला असता. यानें विचारशक्तीस चालना देऊन एक नवीनच शास्त्राचा पाया घातला. याचा शिष्य थिओफ्रेस्ट्रस यानें वनस्पति शास्त्रावर ग्रंथ लिहून संशोधन करण्यास व शास्त्रीय वर्गीकरण पद्धतीस उत्तेजन दिलें.

-हासकाल:-  ग्रीक लोकांच्या राजकीय स्वातंत्र्याच्या अस्ताबरोबर ग्रीक वाङ्मयाच्या-हासास आरंभ झाला. जोंपर्यंत ग्रीक नगरसंस्था अस्तित्वांत होत्या. तोंपर्यंत प्रत्येक मनुष्य हा नागरिक या नात्यानें या नगरसंस्थेचा एक अवयव समजला जात असे व त्या दर्जास योग्य असें त्याचें शिक्षण झालेलें असे. फिलिप राजानें जरी ग्रीक शहरांचे सर्व हक्क काढून घेतले नाहीं तरी नगरसंस्थांच्या स्वातंत्र्यास फार मोठा धक्का बसला. व त्यामुळें ग्रीक नगारिकांमधील पूर्वींचें स्वतंत्रतेचें वारें अस्तंगत होऊं लागलें व त्यांचें हात, त्यांची जीभ व त्यांचीं कलाकौशल्याचीं हत्यारें हीं पूर्वींच्या स्फूर्तींनें उचलत नाहींशीं झालीं. अलेक्झांडर याच्या स्व-यांमुळें ग्रीक प्राच्य संस्कृति व ग्रीक संस्कृतींचा मिलाफ झाला. अँलेक्झांडर याचें साम्राज्य मोडल्यावर या वसाहतींमध्यें स्वायत्त शासनसंस्थांचें तेज राहिलें नाहीं. परंतु रहाणी मात्र बाह्यतः ग्रीक राहीली. ग्रीक देवळें, पुतळे, नाटकगृहें वगैरे सर्व तशींच चालू राहिलीं. ग्रीक भाषा बोलण्यांत येऊं लागली. ग्रीक पद्धतीनेंच उत्सव साजरे करू लागले. परंतु हें एकीकरण निरनिराळ्या प्रांतात निरनिराळ्या प्रमाणावर झालें. सीरिया प्रांत लवकर व पूर्णपणें ग्रीक संस्कृतीच्या कह्यांत आला. परंतु जुडिया प्रांत शेवटपर्यंत तीपासून अलग राहिला.

इजिप्त देशांमध्यें कित्येक ग्रीक सरदार, उच्च कुलांतील स्त्रीपुरूष व विद्वान लोक पुष्कळ दिवसांपासून रहात असत. अलेक्झांडरपासून ऑगस्टपर्यंत अलेक्झांड्रिया हें वाङ्मयाचें व विद्वत्तेचें केंद्र होतें. तेथें पहिल्या टॉलेमीनें येथील पदार्थसंग्राहलय व विद्यालय यांची स्थापना केली व यावेळीं दुसरी कोणतीही जागा नसल्यामुळें सर्व विद्वान लोक तेथें जमा होऊं लागले. या कालामध्यें संशोधनाचें व वर्गीकरणाचें कार्य विशेषतः चालू होतें. या कालच्या काव्यामध्येंहि स्फूर्ति अथवा कल्पनेपेक्षां बाह्यांगाकडेच विशेष लक्ष्य दिलेलें असतें. याचीं उदाहरणें म्हणजे अपोलोनिअस-होडिअस याचें महाकाव्य व अँरॅटस आणि निकॅडर यांचीं ज्योतिष व वैद्यक यांवरील काव्यें हीं होत. या कालांतली शेरिअन गोपगीतें हीं फार आल्हाददायक आहेत. याप्रकारचीं काव्येंहि लिहिण्यांत थिऑक्रिटीस हा अग्रगण्य आहे. परंतु याच्या काव्यांतहि कृत्रिमता दिसून येतें. वर लिहिल्याप्रमाणें या कालांतलें संशोधनाचें काम व शास्त्रीय विषयांवरील वाङ्मय हीं फार महत्त्वाचीं आहेंत. अँरिस्टार्कस यानें पूर्वार्ध ग्रंथ तपासून शुद्ध करण्याचें काम केलें. याच्या मागून येणा-या ग्रंथकारांनीं यांचेंच काम पुढें चालवून व्याकरणशास्त्राचा पाया घातला. पहिलें ग्रीक व्याकरण डायनेशिअस थ्रॅक्स याचें आहे. याच वेळेस भाषांतरें करण्याचेंहि काम झपाट्यानें चाललें होतें. जुन्या कराराचें भाषांतर याचे वेळेस झालें. एरॅटोस्थेनीस यानें सनवार माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला व याचेंच परिणत स्वरूप मॅनेथोनें लिहिलेला ईजिप्तचा इतिहास व बेरॉसस यानें लिहिलेला खाल्डियाचा इतिहास होय. सोटर टॉलेमी याच्या कारकीर्दींत युक्लिड हा अँलेक्झांड्रिया येथें होता. 'हेरोफिलस' व 'एरिसिस्ट्रेअस' हे प्रख्यात वैद्य व इंदियविज्ञानशास्त्रवेत्ते होते व यांनीं वैद्यकावर बरेच ग्रंथ लिहिले आहेत.

रोमन लोकांनीं ग्रीस देश जिंकल्यावर जरी रोमन संस्कृतीवर ग्रीक संस्कृतीचा पगडा पूर्णपणें बसला तरी ग्रीस हें कांहीं जगांतील विद्वत्तेचें केंद्र राहिलें नाहीं. रोमन हें कांहीं जगांतील विद्वत्तेचें केंद्र राहिलें नाहीं. रोमन साम्राज्याच्या कालांत अथेन्स येथील विद्यालयाची कीर्ति सर्वत्र कायचम होती. परंतु हळूहळू विद्वान् लोक रोमकडे जाऊं लागले. रोममध्यें ग्रीक वाङमयानें ख्रि. पू. २-या शतकांतच कायमचें ठाणें दिलें होतें. 'सल्ला' यानें कांहीं ग्रीक पुस्तकें रोममध्यें अथेन्स येथून आणलीं. सिसरो व अँटिकस यांनीं ग्रीक पुस्तकांचा मोठा संग्रह केला. ग्रीक भाषेचें ज्ञान प्रत्येक रोमन नागरिकास अवश्यक झालें. सीझर यानें ज्या ग्रंथसंग्रहालयाची कल्पना काढली व ऑगस्टस यानें ज्याची स्थापना केली त्यांत लॅटिन व ग्रीक असे ग्रंथसमूहाचे दोन मुख्य भाग होते. टायबेरिस वगैरे बादशाहांनीं हा ग्रंथ समूह बराच वाढविला. हळूहळू रोम शहर अँलेक्झँड्रिया शहराचें प्रतिस्पर्धी झालें व तेथें विद्वान लोकहि चोहोंकडून जमा होऊं लागले व त्यांची तेथें चहा व सन्मान होऊं लागला व त्यांस उत्तेजन मिळूं लागलें. ग्रीक वाङ्मयाच्या विशेषतः वक्तृत्व, ग्रंथनिरीक्षण, इतिहास व तत्वज्ञान अंगांची वाढ रोम येथेंच झाली.

यांपैकीं लोकसत्ताक राज्याच्या अमदानींतील कालांत प्रथम आपणास पॉलिबिअस याच्या रोमन स्वारीची इतिहास आढळतो. यांच्यामध्यें ग्रीक नागरिकांचें पाणी आढळतें. यानंतरच्या शतकांत डायोडोरस सिक्युलस याचा जगाचा इतिहास बाहेर आला. या इतिहासांत केवळ हकिकत सांगण्यापलिकडे ग्रंथकारानें कांहीं केलेलें दिसत नाहीं. ऑगस्टसपासून जस्टिनिअनपर्यंत कालांतलें रोमन साम्राज्यांतील ग्रीक वाङ्मय हें जास्त सर्वांगी दिसतें. यावेळीं ग्रीक भाषेचा प्रसार फार दूरवर झालेला होता. परंतु या वाङ्मयामध्यें एक गोष्ट दिसून येते ती ही कीं, यांपैकीं मूळ अथवा अस्सल असा एकहि ग्रंथ आढळत नाहीं. याला ल्युकन हाय काय तो अपवाद आहे.

या वेळच्या गद्यवाङ्मयांत (१) इतिहास, भूगोल व चरित्रें, (२) टीकात्मक व शास्त्रीय वाङ्मय, (३) वक्तृत्व व उच्च सारस्वत (४) आणि तत्वज्ञान इतके प्रकार आढळतात.

इतिहासांत डायोनिशिअस, कॅशिअसडायो वगैरे ग्रंथकार प्रमुख आहेत. भूगोलांमध्यें निकाया येथील हिपार्कस, स्ट्रबो, टॉलेमी, वगैरेंचीं नांवें आढळतात. चरित्रें विशेषतः प्लुटार्च, डायोजिनस, लारटियस, फिलोस्ट्रेट्स यांनीं लिहिलीं. ग्रंथसंशोधन व टीका लिहिण्याचें काम अँलेक्झँड्रिया येथें चालूच होतें. यांपैकीं जुलिअसपोलक्स, हार्पोक्रेटिअन यांचे कोश, हेफिस्टिऑन याचा छंदःशास्त्रावरील ग्रंथ, गॅलन याच्या प्लेटोवरील टीका हे ग्रंथ प्रमुख आहेत. त्याप्रमाणेंच अथेनिअस, एइलियन व स्टोबिअस यांचे ग्रंथहि महत्वाचे आहेत. वक्तृत्वावर हरमॅगोरास, हरमोजिनिस, कशिअस लाँगिनस यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. सोफिस्ट लोकांपैकीं डायोक्रिसोस्टोम एलिअस, अँरिस्टाइड्स वगैरे प्रसिद्ध आहेत. ज्यूशिअन यांचेहि ग्रंथ प्रसिद्ध आहेत. तत्वज्ञानामध्यें एपिकोटस आणि मार्कस आरेलियस यांच्या नांवाचा उल्लेख करणें अवश्य आहे. यांचें तत्वज्ञान स्टोइक पद्धतीचें असे.

ग्रीक काव्यांमध्यें या कालांत नाव घेण्यासारखें एकहि काव्य दिसत नाहीं. बेब्रिअस यानें ईसापच्या गोष्टी कवितारूपांत लिहिल्या. सिविलाइन आरेकल्स याच सुमारास (ख्रि.पू. १७०-इ. स. ७००) तयार होत होतीं. या वेळचें कांहीं काव्यसमुच्चय फार नांवाजण्यासारखे आहेत.

इसवी सनाच्या चवथ्या शतकांत ग्रीक वाङ्मयाचा-हास फार जोरानें सुरू झाला. दिवसेंदिवस ख्रिस्ती धर्मोपदेशकांची या प्राचीन ग्रीक वाङ्मयाकडे वक्र दृष्टी वळूं लागली. ख्रिस्ती सांप्रदायिक नवें ग्रीक वाङ्मय तयार होऊं लागलें होतें. त्यामुळें गृहस्थ वर्ग ग्रीक वाङ्मयापासून हळूहळू दूर होऊं लागला. ग्रीक भाषाहि रोमन साम्राज्याकालापर्यंत शुद्ध राहिली होती ती दूषित होऊं लागली. शेवटीं इ. स. ५२९ च्या जस्टीनिअनच्या हुकुमानें सर्व ख्रिस्त संप्रदायाखेरीज असणारीं ग्रीक विद्यालयें कायमचीं बंद झालीं.

बायझंटाईन वाङ्मय.-  रोमच्या पूर्वेकडील साम्राज्याच्या कालांत ग्रीक भाषेंमध्यें जें वाङ्मय तयार झालें त्यास बायझंटाईन वाङ्मय हें नांव देतात. या वाङ्मयाचा आरंभ जरी कांहीं लोक जस्टीनिअन राजापासून धरतात तरी तसें समजण्यास पुरेसा आधार नाहीं. याचा आरंभ वास्तविक कॉन्स्टन्टाईन राजापासून होतो व १४५३ त कॉन्स्टांटिनोपल शहर तुर्कांच्या हातांत गेल्यावर अस्त होतो. या बादशहानें ख्रिस्ती संप्रदायाचा राजधर्म म्हणून स्विकार करून काँन्स्टंटिनोपल येथें नवीन गादी स्थापिली. याच सुमारास ग्रीक भाषेमध्येंहि फरक होऊन पूर्वींची संगीताच्या धर्तीवरची भाषा जाऊन साधी संभाषणासारखी भाषा प्रचारांत आली.

तथापि सामान्यतः देशाच्या राजकीय अथवा धार्मिक इतिहासांमध्ये जसां कांहीं कारणांमुळें एकदम फरक होतो तसा बौद्धिक परंपरेमध्यें एकदम होत नाहीं. याच कारणामुळें प्राचीन ग्रीक वाङ्मयाचें वर्चस्व बरेच दिवस कायम राहिलें. याप्रमाणें नवीन (ख्रिस्त) सांप्रदायिक वाङ्मयास व नवीन समजुतींस व कल्पनांस आपलें वर्चस्व सर्वत्र स्थापन करण्यास बरीच शतकें लागलीं. अथेन्स येथील विद्यापीठ इ. स. ५२९ पर्यंत बंद झालें नव्हतें. याप्रमाणें ४ थ्या शतकापासून ७ व्या शतकापर्यंतचा काल हा प्राचीन व मध्ययुगीन काळांतील संक्रमणकाल होय. या कालांत यद्यपि नव्याजुन्या कल्पना एकत्र वावरत असून त्यांची चढाओढ चालली होती तरी नव्या कल्पनांचा उत्कर्ष स्पष्टपणें दिसत होता.

पश्चिम साम्राज्याप्रमाणें रोमनपूर्वसाम्राज्यांत संस्कृतींचा मिलाफ चांगला झाला नव्हता. पश्चिम साम्राज्यांत रोमन व ग्रीक संस्कृतींचा मिलाफ होऊन जी रोमन संस्कृति तयार झाली. तिचा प्रसार तेथील राज्यकर्त्यांनीं सर्व जित राष्ट्रांत करून सर्व साम्राज्याची भाषा लॅटिन व सर्वत्र रोमन संस्कृतीचा पूर्णपणे प्रसार केला. ख्रिस्त सांप्रदायिक प्रार्थना सर्वत्र लॅटिनचा भाषेमध्यें होऊं लागली व त्यामुळें हें एक जबरदस्त बंधन त्या सर्व देशांमध्यें ऐक्य घडवून आणण्यास कारण झालें. पूर्वसाम्राज्याची स्थिति त्याच्या उलट होती. तेथें ग्रीक संस्कृति सर्वत्र पसरली असून ग्रीक भाषा सार्वत्रिक असून राजभाषा मात्र लॅटिन होती. पूर्वेकडील निरनिराळ्या जित राष्ट्रांनीं आपलें राष्ट्रीयत्व कायम ठेवलें होतें व तसें करण्यास ते समर्थहि होते. या साम्राज्यांतील निरनिराळें भाग जरी ख्रिस्त संप्रदायानुयायी होते तरी त्यांनीं बायबलचें आपआपल्या भाषांत भाषांतर करून घेतलें होतें व त्यांच्या प्रार्थनाहि त्यांच्या जन्मभाषेंतच चालत. यामुळें पुढें ग्रीक संप्रदायामध्यें निरनिराळें पंथ निघाले. या लोकांनीं ग्रीक संस्कृतीचा पूर्णपणें स्वीकार केला नव्हता. त्यामुळें पूर्वसाम्राज्यास केव्हांहि एकत्व आलें नाहीं.

पूर्वसाम्राज्यामध्यें जरी ग्रीक संस्कृति विशेष प्रचलित होती व पुष्कळ काळपर्यंत राजा व मंत्री हे सर्व जरी ग्रीक होते तरी त्यांतील रोमन वर्चस्व पूर्णपणें केव्हांहि नष्ट झालें नाहीं. कायदेकानून व राज्यकारभाराची पद्धति हीं पूर्णपणें रोमन होतीं व हीच पद्धति साम्राज्यावरील बिकट प्रसंगीहि तशीच कायम राहिली. कांहीं ग्रीक लोकहि आपणांस हेलेन्सच्या ऐवजीं रोमन्स म्हणवूं लागले. ग्रीक भाषेमध्येंहि न्याय व राज्यकारभारासंबंधीचें रोमन शब्द शिरले. वाङ्मयामध्यें मात्र यांचा उपयोग होतां होईल तो टाळून त्यांच्या समानार्थी ग्रीक शब्द वापरीत.

ग्रीक संस्कृतीवर विशेष महत्वाचा परिणाम ख्रिस्ती संप्रदायानें घडवून आणला. परंतु हा परिणाम एकदम न होतां फार सावकाश झाला. परंतु याची पूर्वतयारी जुन्या दैवतांवरील विश्वास हळूहळू नाहींसा होऊन स्टोइक तत्वज्ञानाचा प्रसार होऊन, 'निओप्लेटोनिझम' च्या कल्पना अस्तित्वांत येऊन अगोदरच झाली होती. ख्रिस्ती संप्रदायामध्येंहि कांहीं जुन्या चाली तशाच चालू ठेवून बरेंच जुने वाङ्मयहि सामील करण्यांत आलें. शिक्षणपद्धति तर जुनीच कायम राहिली. प्राच्य संस्कृतीचाहि परिणाम या काळच्या ग्रीक वाङ्मयावर विशेष झाला. ज्या प्राच्य संस्कृतीचा ग्रीक संस्कृतीशीं संबंध आला तिचा आरंभ अलेक्झांडर याच्या स्वा-यांपासून होतो. ईजिप्तमध्यें या संस्कृतीची वाढ विशेष होऊन ती बरेच दिवस टिकली. अलेक्झांड्रिया शहराच्या स्थापनेपासून तें अरब लोकांच्या हातांत पडेपर्यंत सुमारें १००० वर्षें ही संस्कृति ईजिप्तमध्यें टिकाव धरून होती. या देशानें ग्रीक वाङ्मयामध्यें फारच मोठी भर टाकली आहे.

सिरिआ व पॅलेस्टाइन हे प्रांत ईजिप्तनंतर ग्रीक संस्कृतीखालीं आले. परंतु ख्रिस्ती सांप्रदायिक वाङ्मय हें येथेंच जन्म पावलें.

एशियामायनरमध्यें टासर्स, सीझरिया वगैरें शहरें ग्रीक संस्कृति व वाङ्मय यांचीं केंद्रें होतीं. याच प्रांतांतून कॅपॅडोशिया येथील तीन धर्मोपदेशक बाहेर पडले. या कालीं झालेल्या एकंदर ग्रंथकारांपैकीं साधारणपणें ९/१० ग्रंथकार आशिया व आफ्रिका खंडांतूनच आलेले दिसतात व बाकीचे १/१० यूरोपमधील ग्रीस देशांतील दिसतात. त्यामुळें यावेळच्या वाङ्मयावर प्राच्य संस्कृतीचाही ठसा उमटलेला दिसतो.

प्राचीन कालानंतरच्या अर्वाचीन ऐतिहासिक कालापर्यंतचें वाङ्मय बहुतेक कॉइनें नांवाची जी भाषा अँलेक्झांडरच्याकालीं प्रचारांत आली त्याच भाषेंत लिहीलेंलें आढळतें. हीच भाषा बहुतेक सार्वत्रिक असून सर्व वाङ्मयांमध्यें आढळतें. ही भाषा लेखनामध्यें पुष्कळ दिवसांपर्यंत जरी उपयोगांत येत होती तरी तिच्यामध्यें अथेन्स येथील भाषेपासून तो तहत अर्वाचीन नव्या कराराच्या भाषेपर्यंतचीं निरनिराळीं रूपें आढळतात. यावरून जी भाषा लिहिण्यांत वापरीत असत तीच भाषा बोलण्याच्या प्रचारांत असावी असें वाटत नाहीं. कारण प्रत्येक चालू भाषेप्रमाणें ग्रीक भाषेची जी प्रचारांतील भाषा तिच्या रूपांमध्यें वरचेवर फरक होत होता व त्याबरोबर तिच्यांतील शब्द व तिचे व्याकरणहि बदलत होतें व त्याचप्रमाणें व्यवहारांतील भाषा व ग्रंथांची भाषा यांमध्यें पुष्कळसें अंतर पडलें. डायोनिसिअस यानें ही ग्रंथांची भाषा पुन्हा अँटिक भाषेच्या वळणावर नेण्याचा प्रयत्न केल्यामुळें त्या भाषेला उलट गति मिळाली. कांहीं ग्रंथकारांनीं 'प्रचारांतील' भाषेंतच ग्रंथरचना केली. परंतु या त-हेचे ६ व्या शतकापासून १० व्या शतकापर्यंतचे सर्व प्रयत्न फुकट जाऊन जुन्या भाषांचा ९ व्या शतकांत सुरू झाली, व 'काम्नेनी’ व पॅलिऑलॉगी' पर्यंत तशीच ती जोरांत चालली. पश्चिमेकडे यावेळीं सिसरोच्या काळची लॅटिन भाषा प्रचारांत आणण्याची खटपट चालली होती. परंतु तिचा तादृश परिणाम झाला नाहीं. यामुळें या कालच्या (११ व्या पासून १५ व्या शतकापर्यंतच्या) सर्व ग्रंथकारांची भाषा प्राचीन ग्रीक आहे. यामुळें प्रचारांतील भाषा व ग्रंथांची भाषा यांमध्यें फार मोठा फरक पडला व त्याचा परिणाम वाङ्मयावरहि झाला. बाराव्या शतकांत कांहीं ग्रंथ कारांनीं देशी भाषेंत ग्रंथरचना केली. ग्रीक भाषेंतील ग्रंथांची भाषांतरें इटालियन, फ्रेंच वगैरे भाषांत केलीं. १६ व्या व १७ व्या शतकांत पुन्हां देशी भाषांस उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. परंतु १९ व्या शतकांत पुन्हां जुन्या भाषेच्या जीर्णोद्धरार्थ चळवळ सुरू होऊन हा प्रश्न मागें पडला. यामुळें २०व्या शतकांतील ग्रंथांतहि कांहीं ग्रीक शब्दांचीं रूपें अशीं सापंडतात कीं तीं १० व्या शतकापूर्वींच प्रचारांतून गेलीं होतीं. याप्रमाणें ग्रीक वाङ्मयाची स्थिती अरबी अथवा चीनी वाङ्मयाप्रमाणेंच आहे. या कालामध्यें ख्रिस्त संप्रदायाचा सर्वत्र जोरानें प्रसार होता होता. त्यामुळें या कालांतील वाङ्मयामध्यें ख्रिस्त सांप्रदायिक वाङ्मयासच अगस्थान मिळालें. याच्या खालोखाल ऐतिहासिक वाङ्मय येतें. त्या वाङ्मयाची वाढ साम्राज्याच्या अस्तापर्यंत सारखी चालू होती. इतर प्रकारच्या गद्य वाङ्मयाकडे म्हणजे भूगोल, तत्वज्ञान, वक्तृत्व व भौतिक शास्त्रें या विषयाकडें दुर्लक्ष्यच दिसून येतें. या विषयांवरील पूर्वींचें वाङ्मय मात्र यांनीं जतन करून ठेवलें. काव्यामध्येंहि ख्रिस्त सांप्रदायिक काव्यें अग्रगण्य आहेत. लौकिक काव्यामध्यें चुटक्यांची मात्र बरीच वाढ झालेली दिसते. इतरहि कांहीं चांगलीं काव्यें नजरेस पडतात.

ख्रिस्त सांप्रदायिक वाङ्मयाची वाढ ४ थ्या शतकामध्यें फार झाली. कारण यावेळीं ख्रिस्त संप्रदाय हा राजधर्म झाला व त्याच सुमारास अँरिअस याच्या मताचा प्रचार होत होता व त्याच्या खंडनाकरितां 'अँस्थॅनेशिअस' सारख्या ग्रंथकारांनीं बरेच ग्रंथ लिहिले. 'युरेबिअस' यानें सांप्रदायिक इतिहासास आरंभ केला व अँटोनिअस यानें इजिप्तमध्यें मठाची स्थापना केली. यावेळीं प्लेटोच्या तत्वज्ञानाचा अस्त होत जाऊन ख्रिस्त सांप्रदायिक तत्वांचा प्रसार होत होता, हें विशेषतः 'सायरन' येथील 'सायनेशिअस' याच्या ग्रंथावरून स्पष्ट दिसतें. या कालांत कॅपॅडोशिआ येथील तीन धर्मोपदेशकांनीं विशेष कार्य केलें. तें महात्मा बॅसिल, निस्सा येथील ग्रेगरी व नॅझिअँझस येथील ग्रेगरी होत.

चवथ्या शतकानंतर सांप्रदायिक वाङ्मयाचा हळू हळू-हासच होत गेला. यानंतर निरनिराळ्या नवीन निघणा-या पंथाच्या मतखंडणार्थ कांही ग्रंथकारांनीं लेखणी उचलली दिसते. ५ व्या व ६ व्या शतकांत 'मोनोफिसाइट्स' पंथांतील लोकांनीं वाङ्मयामध्यें पुष्कळ भरी टाकली. ७ व्या शतकात 'मोनोथेलाइट्स' या पंथानें ही कामगिरी केली व ८ व्या शतकांत इकॉनोक्लॅस्टस' यांनीं व नवीन महमदी संप्रदायानें ही कामगिरी केली. ६ व्या शतकामध्यें बायझंटाइन येथील 'लिओन्टिअस' या ग्रंथकारानें प्रथम या सांप्रदायिक वाङ्मयामध्यें अँरिस्टॉटल यांच्या व्याख्यांचा उपयोग केला. गाझा येथील 'प्रकोपिअस' यानें ग्रंथ संशोधन व टीका लिहिण्याचें काम केलें. 'जोहॅनिस क्लिमॅक्स' यानें निवृत्तीपर वाङ्मय लिहिलें. जोहॉनिस मॉस्कस याच्या ग्रंथावरून त्यावेळच्या मठांतील भिक्षूंची रहाणी त्यांच्याच शब्दांमध्यें वर्णन केल्याप्रमाणें दिसतें. दमास्कस येथील जॉन यानें इकॉनोक्लॅस्ट या पंथाविरुद्ध लेख लिहिण्याचें काम करून शिवाय 'ज्ञाननिर्झर' या नांवाचा एक विद्वत्ताप्रचुर ग्रंथ लिहिला. ग्रीक ख्रिस्त संप्रदायामध्यें हा ग्रंथ आदर्श मानतात. यानंतरचें सांप्रदायिक वाङ्मय म्हणजे पूर्वींच्याच ग्रंथावरील टीका व संशोधनात्मक स्वरूपाचें होतें. या कालच्या लेखकांमध्यें बादशहा सहावा लिओ, थीओडोरस, फोटिअस वगैरे नांवें प्रामुख्यानें पुढें येतात. कामेनी बादशहांच्या अंमलाखालीं सांप्रदायिक वाङ्मयास पुन्हां थोडेसें चालन मिळालें. यावेळीं झिगॅबोनास याचा 'पोनोप्ली' हा ग्रंथ बाहेर आहा. महंमदी संप्रदायाच्याविरुद्ध बादशहा मॅन्युअल दुसरा पॉलिऑलोगस यानें पुष्कळ चळवळ केली. शेवटीं शेवटीं सर्व सांप्रदायिक वाङ्मयाचा विषय रोमशीं ऐक्य करावें कीं नाहीं हा होता. ऐक्याच्या बाजूनें बेसॅरिअन हा असून त्याचा प्रतिस्पर्धी मार्कस युजेनिकस हा होता.

या कालांत साधूसंतांचीं चरित्रें व त्यांची कृत्यें वर्णन करणारें एक स्वतंत्रच वाङ्मय तयार झालें. यापैकीं बरेंचसें वाङ्मय सिथियन मेटॅफ्रेस्टस यानें संपादन केलें आहे. अलेक्झांड्रिया येथील अथॅनॅशिअस यानें सेंट अँथनी याचें चरित्र लिहिलें आहे.

ग्रीक काव्यरचनेच्या ठराविक स्वरूपामुळें ख्रिस्त सांप्रदायिक काव्याच्या वाढीस आरंभीं बराच अडथळा झाला. याचा आरंभ अलेक्झांड्रिया येथील क्लेमंटपासून त्याच्या पेडॅगॉग्सबरोबर जीं कांहीं हस्तलिखित स्तोत्रें चालत आलीं तेव्हांपासून होतो. यानंतर 'कुमारीचें गीत' बाहेर आलें. निझीअँझस येथील ग्रेगरी यांचीं गीतें क्लिष्ट असल्यामुळें प्रार्थनेंत सामील झालीं नाहींत. यानंतर 'समगतिक' कविता प्रचारांत आल्या व या कविता प्रचलित भाषेस योग्य असल्यामुळें लोकांस आवडूं लागल्या. प्रथम स्तोत्रें अस्तित्वांत आलीं व त्यांची हळू हळू वाढ होऊन ६ व्या शतकांमध्यें यांची वाढ पूर्ण होऊन या कालचीं विशेषतः रोमॅनोस याचीं स्तोत्रें सर्व स्तोत्रांमध्यें श्रेष्ठ पद पावलीं. ग्रीक संप्रदायांमध्यें 'अँकॅथिस्टस' हें कुमारीवरचें काव्य 'सर्गिअस' यानें लिहिलें होतें असें म्हणतात. यानंतर 'कॅनन्स' हीं गीतें प्रचारांत आलीं. ही प्रथम कीट येथील आर्चबिशप अँड्रिअस यानें प्रचारांत आणलीं असे म्हणतात. दमास्कसचा, 'जॉन' व जेरुशलेम येथील 'कॉसमस' यांनीं या प्रकारचीं काव्यें पुष्कळ लिहिलीं. यांचीं काव्यें फार लोकप्रिय होऊन त्यांवर टीकाहि ब-याच झाल्या. यानंतर दुसरेहि कांहीं नावाजण्यासारखे कवी झाले. रोमजवळील ग्रोटाफेरॅटा याचा मठ हें या काव्याचें आगर होतें.

लौकिक वाङ्मयामध्यें विशेषतः ऐतिहासिक वाङ्मयाची वाढ विशेष झाली. कारण ग्रीक लोकांनीं आपल्या निरनिराळ्या पालटलेल्या स्थितींमध्ये आपला पूर्वीपासूनचा इतिहास लिहून ठेऊन तो पुढच्या पिढीच्या हवालीं केला आहे. यामुळें याचें ऐतिहासिक वाङ्मय हिरोडोट्सपासून दुस-या सुलतान महमुदापर्यंत अखंड चालू राहिलें. या ऐतिहासिक वाङ्ममयाचें दोन भाग करतां येतात. (१) इतिहासकारानें आपल्याच कालाचा अथवा आपल्या पूर्वीं नुक्त्याच लोटलेल्या काळाचा लिहून ठेवलेला इतिहास, व (२) सर्व जगाचा संक्षिप्त रूपाने दुस-या ग्रंथावरून तयार केलेला इतिहास हा दुस-या प्रकारचा ख्रिस्ती सांप्रदायिक दृष्टीनें विशेष उल्लेख कण्यासारखा इतिहास म्हटला म्हणजे जस्टस टायबेरियस याचा होय. याचा आरंभ मोझेसपासून होत असून तो इसवी सनाच्या दुस-या शतकांत लिहिला गेला होता. हा अनुपलब्ध आहे.

या कालांतील तत्कालीन इतिहास हे पूर्वींच्या इतिहासांप्रमाणेंच आहेत. मात्र यामध्यें ख्रिस्ती सांप्रदायिक छटा मारतें. कॉन्स्टंटाइनच्या कालापासून साम्राज्याचा इतिहास लिहिण्याचें काम-  साम्राज्य जरी रोमन होतें तरी- ग्रीक लोकच करीत. यापैंकीं 'युनॅपिअस', 'ऑलिंपिओडोरस' 'प्रिस्कस' वगैरेंच्या इतिहासांचे फक्त कांहीं भाग शिल्लक आहेत. ६ व्या शतकांमध्यें या वाङ्ममयास बरेंच चालन मिळालें. 'प्रोकोपिअस' व 'अगॅथिअस' यांनीं 'जस्टीनिअन' च्या कारकिर्दींचें वर्णन केलें व 'थिओफेन्स', 'मिनॅन्डर प्रोटेक्टर' वगैरेंनीं या शतकाच्या उत्तरार्धाचा इतिहास लिहिला. 'इव्हॅग्रियस' यानें ख्रिस्त संप्रदायाचा ४३१-५९३ पर्यंतचा इतिहास लिहिला. यानंतर दहाव्या शतकापर्यंत नांव घेण्यासारखा एकहि ग्रंथ तयार झाला नाहीं. सातवा कॉन्स्टंटाइन पोर्फिरो जेनिटस बादशहा यानें या वाङ्मयास उत्तेजन दिलें व याच्या कारकीर्दींत जोसेफ जेनेशिअस यानें ८१३-८८६ पर्यंतचा इतिहास लिहिला. ‘जोसेफ कॅमेनिआटा’ यानें थेसोलोनिका शहराचा पाडाव कौसेंयर्स यानें केल्याचें वर्णन केलें आहे. तें मानवेतिहासाच्या दृष्टीनें महत्वाचें आहे. यानंतरच्या कालाचा इतिहास लिहिण्याचें काम निरनिराळ्या ग्रंथकारांनीं केलें आहे. ख्रिस्ती धर्मयुद्धांचा इतिहास निरनिराळ्या चार ग्रंथांत आढळतो. यानंतरचा इतिहास कांहीं ग्रंथकारांनीं लिहून ठेवला आहे. शेवटीं पूर्व साम्राज्य व तुर्क यांच्या युद्धाचा इतिहास तीन निरनिराळ्या ग्रंथकारांनीं निरनिराळ्या पद्धतीनें लिहिलेला आढळतो.

बायझंटाइन कालांतील जगाच्या इतिहासाचें महत्व विशेषतः त्यांनीं पूर्वींच्या नष्ट झालेल्या इतिहासांत कायम ठेवलें या दृष्टीनें फार आहें. वाङ्मयदृष्ट्या याचें महत्व फारसें नाहीं. परंतु भाषेच्या इतिहासाच्या दृष्टीनें हे ग्रंथ उपयुक्त आहेत. या ग्रंथांत कांहीं चित्रेंहि असत. हे इतिहास बहुतकरून मठांतील जोग्यांनीं लिहिलेले असत. व त्यांचा उद्देश आपल्या अनुयायांमध्यें लहान लहान ग्रंथ लिहून ज्ञानाचा प्रसार करण्याचा होता. यामुळें या ग्रंथांचाहि प्रसार फार दूरवर झाला. यांच्यांपैकीं सर्वांत जुनी बखर मलालास (६वें शतक) याची आहे. ९ व्या शतकाच्या आरंभीच्या सुमारास जाँर्जिअस सिन्सेलस यानें एका जगाच्या आरंभापासून इ. स. २८४ पर्यंतच्या कालाची संक्षिप्त बखर लिहिली. याच्याच विनंतीवरून थिओफेन्स कन्फेसर यानें ही बखर इ. स. ८१३ पर्यंत आणली. यानंतर निरनिराळ्या ग्रंथकारांनीं हिचा धागा १०५७ पर्यंत आणल्यानंतर जॉर्जिअस सेड्रेनस यांनें आपल्या जगाच्या बखरीमध्यें या सर्व बखरींचा समावेश केला. यानंतर जॉन झोनॅरस यानें आपली जगाची बखर लिहिली. मायकेल ग्लायकस याची बखर याच काळीं झाली. यानंतर मॅनॅलस यानें कवितात्मक बखर लिहिली. अशाच त-हेंची एक बखर एफ्रेअस यानें लिहिली आहें.

भूगोल व भूपृष्ठवर्णन या विषयांकडे रोमन लोकांप्रमाणें यांचेंहि दुर्लक्ष दिसतें. नौकानयन, प्रवास, यात्रांचे मार्गदर्शक वगैरे ग्रंथ आढळतात व कांहीं स्थळांच्या याद्या दिसतात. या काळांतील कॉसमॉस इंडिकोप्ल्युस्टस याचा 'ख्रिस्ती भूपृष्ठवर्णन' हा ग्रंथ उपलब्ध आहे. 'काँन्स्टांटिनोपलचा प्राचीन इतिहास' या ग्रंथात कॉन्टांटिनोपलचें भूपृष्ठवर्णन आलें आहें.

ग्रीक तत्वज्ञानामध्यें रोमन साम्राज्याच्या काळांत दोन पंथ निघालें. ते 'निओपायथागोरिअँनिझम' आणि 'निओप्लॅटोनिझम' होत. यांपैकीं दुस-या पंथानें ख्रिस्ती धर्मप्रसारात बराच प्रतिबंध केला. त्यांच्यापैकीं शेवटचा तत्ववेत्ता प्रोक्लिअस हा अथेन्स येथें होऊन गेला (सु. ४८५). जस्टिनिअन यानें इ. स. ५२९ मध्यें अथेन्स येथील विद्यापीठ बंद केल्यामुळें या तत्वज्ञानाच्या प्रसारास जबरदस्त धक्का पोहोंचला. यानंतर तात्विक वाङ्मय अंरिस्टॉटलचीं तत्वें ख्रिस्ती संप्रदायसास लागू करून त्यांस व्यवस्थित रूप देण्यामध्यें व पूर्वींच्या ग्रंथांवर टीका लिहिण्यामध्यें तयार झालें. बायझंटिअन येथील 'लिओंटिअस' यानें आधींच अँरिस्टाटलचीं प्रवेश केला. परंतु ख्रिस्त सांप्रदायिक तत्वज्ञानाचा वास्तविक आरंभ दमास्कस येथील जॉन यानें केला. परंतु त्याचें हे काम लवकरच बंद पडलें. यानंतर ११ व्या शतकांत या वाङ्मयाचें पुनरुज्जीवन झालें व मायकेल सेलस यानें प्लेटो व अँरिस्टॉटल यांच्या मतांचा अभ्यास पुनः सुरू केला. वक्तृत्वाचें अध्यापनाच्या दृष्टीनें महत्व वाटून या काळांत वाङ्मयाच्या या अंगांची वाढ विशेष झाली. परंतु त्यांत कृत्रिमता अतिशय दिसून येते. भाषेची ठराविक पद्धति व नियम अक्षरश: पाळण्याची चाळ पडल्यामुळें त्याचा इतर वाङ्मयावरहि अनिष्ट परिणाम झाला. व भाषेमधील वैयक्तिक वैचित्र्य व साधेपणा यांचा लोप झाला. तथापि 'फिलोपॅट्रिस', 'टिमॅरिऑन' व 'जर्नी टू दि अंडर वर्ल्ड' (पाताळाचा प्रवास) हे ग्रंथ नावाजण्यासारखे आहेत. यांशिवाय 'मायकेल अकॉमिनेटस' यांचीं कांहीं भाषणें प्रसिद्ध आहेत.

या काळांत जें एकंदर टीकात्मक वाङ्मय तयार झालें त्याचें भाषाशास्त्रदृष्टीनें महत्व फार आहे. फेक्टिअस याचा लायब्ररी हा ग्रंथ याचें उदाहरण आहे. यानंतर सुइडास याचा 'लेक्झिकन' हा ग्रंथ येतो. 'युस्टॅथिअस' व 'जोहॅनिस झेझस' त्यांचेहि ग्रंथ महत्वाचे आहेत. मात्र यांच्यामध्यें पूर्ण विरोध आहे. दुसरेहि  कित्येक वैयाकरण व टीकाकार होऊन गेले.

जस्टिनिअन यानें सर्व कायदा एकत्र केल्यावर त्याचें मूळचें रोमन स्वरुप व भाषा जाऊन त्याचें रुपांतर होण्यास आरंभ झाला. इन्स्टिट्यूट्स व डायजेस्ट यांचीं ग्रीक भाषांतरें होऊन 'नॉव्हेल्स' ग्रीकमध्यें निघूं लागलीं. परंतु मॅसिडोन घराण्याच्य कारकीर्दींत पुनः जस्टिनिअन याचा कायदा अमलांत आणण्याची प्रवृत्ति दिसूं लागली. परंतु सहावा लिओ व सातवा कॉन्स्टंटाईन याच्या कारकीर्दींत सर्व कायद्यांचें ‘वॅसिलिका’या नांवानें एकीकरण होईपर्यंत तीस व्यवस्थित स्वरुप आलें नाहीं. पूर्व साम्राज्यामध्यें जस्टिनिअन याचें 'कार्पस ज्यूरीस' जाऊन त्याची जागा 'बॅसिलिका' कायद्यानें घेतली. निवळ सांप्रदायिक नियम प्रथम 'कॅनन' मध्यें असत. ते लौकिक कायद्यांमध्यें सामील केले जाऊन 'नोमो-कॅनॉन' हा ग्रंथ  तयार झाला. 'थिओडोरस वेस्टस' यानें १०९० मध्यें संपादन केलेली याची प्रत फार महत्वाची आहे.

ग्रीक लोकांमध्यें गणित व ज्योतिष या विषयांच्या ज्ञानाचें पुनरुज्जीवन होण्यास इराणी व अरबी लोकांचा परिचय कारण झाला. 'टॉलेमी' याचा 'ग्रेटसिंटक्सिस' हा ग्रंथ 'अलमॅगेस्ट' या नावानें पूर्वेकडे प्रचलित होता. इसवी सनाच्या तेराव्या शतकाच्या अखेरीस ग्रीक लोकास इराणी ज्योतिषाचें ज्ञान झालें. १४ व्या शतकाच्या आरंभीं 'जॉर्जिअस क्रिसोकोका' आणि ‘ऐझाक जार्जिअस’यांनीं इराणी ग्रंथाच्या आधारें ज्योतिषविषयक ग्रंथ लिहिले. या नंतर ग्रीक लोकांचें लक्ष्य आपल्या मूळच्या ग्रंथाकडे गेलें. युद्धकलेमध्यें यांचें बरेंच प्राविण्य दिसतें. या विषयावर सहावा लिओ याच्या नांवाचा एक ग्रंथ प्रसिद्ध आहे.

लैकिक काव्यें सर्व पूर्वींच्या वळणावर गेलेलीं आढळतात. महाकाव्यें विशेषतः  ग्रीक, प्रचलित भाषेमध्यें झालीं. परंतु त्यापूर्वींहि कांहीं काव्यास महाकाव्य हे नांव देतां येईल. 'नानस' यांचें‘डायोनिससचें हिंदुस्थानास प्रयाण’ हें काव्य व तोच ख्रिस्ती झाल्यावर त्यानें सेंट जॉन याच्या शुभ वर्तमानावर लिहिलेली टीका हीं काव्यें या प्रकारचीं होत. 'जॉर्जिअस पिसिडस' याचें व ‘थिओडोशिअस’याचें काव्यहि याच प्रकारचें आहें. अकराव्या शतकानंतर सांप्रदायिक व्याकरण, फलज्योतिष, वैद्यक, वगैरे विषयांवर व ऐतिहासिक आणि बोधपर कविता प्रचारांत आल्या. कांहीं अद्भुत काव्येंहि आढळून येतात. हीं विशेषतः १२ व्या शतकांत 'कॉम्नेनी' राजांच्या कारकीर्दींत आढळतात. या कालांत लौकिक काव्यांमध्यें 'लिरिक' काव्यांची मुळीच वाढ झाली नाहीं. चुटके मात्र पुष्कळ लिहिलेले आढळतात. सार्वजनिक नाटक प्रयोगांच्या अभावामुळें नाटकांची वाढ होणें या कालांत अशक्यच होतें. कांहीं बोधपर संभाषणें मात्र आढळतात. 'ख्रिस्ताचा छळ' हा ग्रंथ काय तो नाटक या नांवास पात्र असा या कालांत बाहेर पडला.

या काळांत प्रचलित अथवा देशभाषेंत लिहिलें गेलेलें वाड्मय हें अगदींच अलग दिसतें. यामध्यें आपणास नवीन कल्पना व नवीन मध्यकालीन विषय आढळतात. या वाड्मयामध्यें काव्य हें गूणामध्यें व विपुलतेमध्यें अग्रस्थान पटकावतें. याचा आरंभ १२ व्या शतकापासून झाला. पंधराव्या शतकाच्या अखेरीस यमक प्रचारांत आलें. या काव्याचें विषय विविध आहेत. राजधानीमध्यें बोधपर, स्तुतीपर विनंतीपर काव्यें प्रचलित असत. या त-हेची रचना 'स्पॅनिअस' या काव्यामध्यें व 'मायकेल ग्लायकस' व 'थिओडोरस पेट्रोमस' या कवींनीं केलेली आढळते. यानंतर शृंगारिक काव्यें आढळतात. याखेरीज वनदेवतांच्या गोष्टी, प्रार्थना, संतचरित्र वगैरे विषयांवर कविता आढळते. व कांहीं महाकाव्येंहि दिसून येतात. याशिवाय प्राण्यांच्या अद्भुत गोष्टींवर कविता रचलेली आहे. 'डॉयजेनिस अँक्रिटस' याचें वीररसप्रधान महाकाव्य प्रसिद्ध आहे.

गद्य वाड्मयामध्यें हिंदुस्थानांतील 'सात शहाण्यांचें पुस्तक' याचें भाषांतर अवश्य उल्लेखिलें पाहिजे. याखेरीज हितोपदेशाचें अरबी 'कलिल व दिग्म' ग्रंथावरुन भाषांतरहि प्रमुख आहे. याशिवाय जेरुशलेम व सायप्रस येथील ग्रीक कायाद्यावरील पुस्तकें आढळतात. परंतु लवकरच या वाड्मयाचा-हास होत गेला. व प्राचीन पद्धतीवर ग्रंथ लिहिण्याचाच प्रघात चालू राहिला. बायझंटाईन वाड्मयाचें जगाच्या इतिहासामध्यें फार महत्वाचें स्थान आहे. रानटी लोकांचे एकामागून एक सारखे हल्ले होत असतांना पूर्व साम्राज्यानें पूर्वींची बौद्धिक परंपरा एक हजार वर्षांवर सारखी चालू ठेवली व त्यांनीं अवगत ज्ञानाचा सर्वत्र प्रसार केला. व त्यांनीं आपल्या शिक्षणानें एक पूर्वयुरोप संस्कृति नवी निर्माण गेली. अखेरीस तुर्कांच्या भीतीनें यांनीं पळून येऊन आपल्या सर्व ज्ञानाच्या पश्चिमेकडे प्रसार करुन पाश्चिमात्यांमध्यें संस्कृतीचें बीजारोपण केलें.

अर्वाचीन वाड्मय:- तुर्क लोकांनीं कॉन्स्टॅटिनोपल शहर घेतल्याबरोबर त्यांचा अंमल जेवढ्या प्रांतावर बसला तेवढ्या प्रांतामधून ग्रीक संस्कृति व वाड्मय यांची पूर्णपूणें हकालपट्टी झाली. या शहरांतून जे ग्रीक विद्वान पळून दुसरीकडे जाऊन राहिले ते तेथीलच भाषा बोलूं लागले व त्याच भाषेंत ग्रंथरचना करुं लागले. परंतु ग्रीक भाषेमध्येंहि कांहीं ग्रंथ लिहित असत. यामुळें ग्रीक संस्कृतीचा व बौद्धिक परंपरेचा लोप झाला नाहीं व तिच्यामध्यें विशेषसा खंडहि पडला नाहीं. ग्रीक लोक व पश्चिमेकडील लोक यांचें धर्मयुद्धापासून बरेंचसें संघटन होऊं लागलें होतें व फ्रँक लोकांचें लिव्हंट मध्यें व कॉन्स्टँटिनोपल येथ राज्य असल्यामुळें त्यांचा संबंध वरचेवर जास्त येऊ लागला होता. ख्रिस्त संप्रदायाचे जे दोन मुख्य पंथ 'ग्रीक व 'लॅटिन' त्यांतील विद्बानांनीं वादविवाद करून एकीकरण करण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता. कांहीं लोक आधींच इटलींत जाउच्न राहिले होते. यांच्यापैकीं प्रमुख ग्रीक ग्रंथकार 'लिऑंटिओस पिलँटोस' अथवा लिऑन, 'जॉर्जिअस गोमिस्टस' अथवा फेल्थो, मॅन्युअल वगैरे होत.

तुर्क लोकांनीं सपाट जमीन आक्रमण केल्यावर क्लेप्ट व हैडुक वगैरे लोक डोंगरांत पळून जाऊन आपलें स्वातंत्र्य रक्षण करुन राहिले. तेथें निर्सगाच्या सहवासांमुळें त्यांस स्फूर्ति होऊन कांहीं अगदीं नवीन काव्यें, विशेषतः पोवाडे बाहेर पडले. यांच्यामध्यें निसर्गाचें वर्णन फार आढळतें.

कॉन्स्टांटिनोपल पडल्यानंतर पुष्कळ वर्षेंपर्यंत क्रीट बेट व्हेनिसच्या अमलाखालीं होतें. येथें कांहीं ग्रीक कवींनीं काव्यरचना केलेली आढळते, पण तीवर रोमन ठसा स्पष्ट दिसतो. या काव्यांची भाषा कंडिओट लोकांची पोटभाषा असून तींत व्हेनिस येथील भाषेंतीलहि बरेच शब्द आढळतात. 'व्हिसेन्स कोरनॅरो' यानें लिहिलेले 'एरोटोक्रिटोस' हें यांपैकीं आद्य काव्य असून त्यामध्यें त्या वेळची रहाणी चांगली वर्णन केलेली आहे. 'जॉर्ज चोरटॅकिस' यानें 'एरोफाइल' नांवाचें नाटक लिहिलें आहे. निकोलस ड्रिमिटिकॉस यानें शेपर्डेंस् हें काव्य लिहिलें. याशिवाय 'ग्रेगोरोपौलस' आणि 'मेलिसीनोस' हे कवी होऊन गेले.

कॉन्स्टँन्टिनोपल शहर तुर्कांनीं घेतल्यानंतर ग्रीक भाषेचा युरोपमध्यें प्रसार करण्याच्या कामीं जॉन अर्गिरोप्युलोस, डेमोट्रिअस चॅलकाँडाइल्स व जॉन लॅस्कॅरिस व 'मार्कस मुसुरस' यांनीं बराच पुढाकार घेतला. यांनीं ग्रीक भाषा लोकांस शिकवून तिचा प्रसार केला. कांहींनीं ग्रीक व्याकरणावर ग्रंथ लिहिले. कांहींनीं जुने ग्रंथ संशोधन करुन पुन्हां लिहून काढलें. यांच्या श्रमामुळें व्हेनिस, रोम, पॅरिस, वगैरे ठिकाणीं ग्रंथसंग्रहालयें स्थापन होऊन संपन्न झालीं. यांची ग्रंथरचना प्रचारांतील भाषेंत नसून पूर्वींच्या ग्रंथांच्या भाषेंतच आहे. परंतु यांपैकीं कोणींहि वाड्मयामध्यें नवीन भर टाकली नाहीं. १५ व्या शतकाच्या अखेरीस प्लेटो व अँरिस्टॉटल यांच्या तत्वज्ञानपद्धतीसंबंधीं जीं भयंकर रणें माजलीं होतीं त्यांमध्यें हेहि सामील झाले होते. वास्तविक हा वाद सांप्रदायिक असून तात्विक मुळींच नव्हता. ज्यांच्या मनांतून रोतन व ग्रीक पंथाचें ऐक्य करावयाचें होतें. ते प्लेंटोची बाजू घेत व त्यांविरुद्ध असणारे आरिस्टॉटलची बाजू घेत असत. याप्रमाणें वायझंटाइन कालाची पुन्हां पुनरावृति झाली. 'आसेंनिअस' यानें 'ऑरिस्टोफेन्स' व 'युरिपिड्स' यांच्या ग्रंथावर टीका लिहिली. 'एमिलिअस पोर्टोस' व लिओ 'अलॉटिओस' यांनीं पुष्कळ जुने ग्रंथ संपादन केलें व टीका लिहिल्या. याखेरीज कांहीं किरकोळ कवीही होऊन गेले.

सोळाव्या शतकांत बरेचसे इतिहासकार होऊन गेले. १५ व्या शतकाच्या अखेरीस इंब्रोस येथीज क्रिटोब्युलोस यानें दुस-या महायुद्धच्या कारकीर्दींचा इतिहास लिहिला. 'एमॅन्युअल मेलॅक्सॉस' यानें ‘पॅट्रिआर्च' यांचा इतिहास लिहिला. 'थिओडोशिअस झिगोमॅलस' राजाचा इतिहास लिहिला. 'थिओडोशिअस झिगोमॅलस' यानें १३९१-१५७८ पर्यंतचा कॉन्स्टँटिनोपलचा इतिहास लिहिला. दुसरेहि कांहीं सायप्रास व क्रीटचे इतिहास, प्रवासवर्णनें, संतचरित्रें वगैरे ग्रंथ आहेत. याकाळीं कांहीं व्याकरण, कोश वगैरे ग्रंथ लिहिले गेले. परंतु उच्च सारस्वताचा बहुतेक लोप झाला.

१८ व्या शतकांमध्यें पुनःवाड्मयाचें पुनरुज्जीवन झालें. कान्स्टँटिनोपल येथे राहणा-या 'फॅनरिओट' वगैरे घराण्यांतील पुरुषांच्या प्रयत्नानें व ग्रीक धर्मोपदेशकांच्या अध्ययनाच्या कामीं घेतलेल्या श्रमानें ग्रीक व्यापा-यांनीं मिळविलेल्या संपत्तीनें व घरंदाज ग्रीक लोकांच्या दातृत्वानें शिक्षणाच्या सार्वत्रिक प्रसारास फार सहाय्य केलें. लोकहि शिक्षणाविषयीं फार उत्सुक होतें. यामुळें ग्रंथाचा व शिक्षणाचा प्रसार फार जारीनें सुरु झाला. याचेंच फळ त्यांस स्वातंत्र्यरुपानें मिळालें. १८ व्या शतकांमध्यें सांप्रदायिक वाड्मयच विशेष तयार झालें. पश्चिमेकडील विद्यापीठांतून शिकून आलेले तरुण धर्मोपदेशक अर्वाचीन संस्कृतीचा प्रसार करुं लागले यावेळचे सांप्रदायिक ग्रंथ फार म्हटलें म्हणजे 'एलिअस मिनिएटसः' यानें प्रचलित भाषेंत कांहीं प्रार्थना लिहिल्या. 'मेलेटिऑस' यानें सांप्रदायिक इतिहास, ग्रीसचा भूगोल वगैरे ग्रंथ लिहिले. थिओटोफस यानें सांप्रदायिक ग्रंथाशिवाय गणित, भूगोल, पदार्थविज्ञानशास्त्र वगैरे विषयावर ग्रंथरचना केली. 'वल्गेरस' यानें पुराणवस्तु संशोधन, तत्वज्ञान, गणित, पदार्थविज्ञान, ज्योतिष वगैरे विषयांवर ग्रंथ लिहिले. यानें 'इनिअड' व 'जॉर्जिक्स' यांचें (दुस-या कॅथराईनच्या विनंतावरुन) होमरच्या धर्तीवर भाषांतर केलें.

या वेळीं 'कॉन्स्टंटाईन-हिगास', 'क्रिस्टोपौलस' व 'जेकोबस रिझोस' वगैरे कवी होऊन गेले. यानंतर ग्रीसला स्वातंत्र्य मिळाल्यावर 'पॅनॅगिओटस' व 'अलेक्झांडर' 'सौंटझोस' बंधु आणि 'अलेक्झांडर रिझोस-हॅगॅबस' हे कवी प्रसिद्धीस आलें. यांचीं स्वातंत्र्यगीतें नांवाजण्यासारखीं आहेत यांनीं निरनिराळ्या प्रकारची काव्यरचना केली आहे. या दोन बंधूपैकीं पहिल्यानें 'लिरिक काथ्यें' बरींच रचली व दुस-यानें औपरोधिक काव्यें केलीं. अलेक्झाडर रिझोस यानें विविध काव्यरचना केली आहे. त्यांमध्यें पोवाडे, वर्णनें, नाटकें वगैरे असून शिवाय यानें कांहीं गद्यरचनाहि केली आहे.

गद्य वाड्मयामध्येंहि या पुनरुज्जीवनाच्या काळांत पुष्कळ वाढ झाली. इतिहासामध्यें 'स्पिरिडन ट्रिकैपिस' याचा 'राज्यक्रांतीचा इतिहास' हें त्याचें अखंड स्मारकच झालें आहे. या ग्रंथकाराचें या काळच्या उलाढालींत बरेंच अंग होतें. दुस-याहि कित्येक सरदारांनीं आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. के. पॅपॅ-हेगेपौलस याचा ग्रीक राष्ट्राचा इतिहास व नामांकित आहे. सॅकेलॅरिऑस यानें सायबसचा इतिहास भूवर्णन लिहिलें आहे. के. अँसॉपिओस यानें ग्रीक वाड्मय व इतिहास यांवर ग्रंथरचना केली. सांप्रदायिक वाड्मयामध्यें 'ओइकोनॉमस' याचें नांव प्रामुख्यानें आढळतें. याखेरीज 'काँटोगोनेस', 'फिलोथिऑस', 'कॅस्टॉर्कस' वगैरे ग्रंथकार होऊन गेले ग्रीक राज्याची स्थापना झाल्यानंतर कायदा, अर्थशास्त्र, गणित, भौतिक शास्त्रें, प्राचीनवस्तु संशोधन वगैरे विषयांवर पुष्कळ निरनिराळे ग्रंथ बाहेर पडले.

परंतु या कालचा, ज्याची सर्व समकालीन ग्रंथकारांवर छाप पडलेली दिसते व ज्यानें पुढील सर्व ग्रीक वाड्मयाचें धोरण आंखून ठेवलें असा ग्रंथकार 'अँडॅमंटिऑस कोरेइस' हा होय. यानें भाषाशास्त्राचा अभ्यास करुन पुष्कळ जुने ग्रंथ संपादन केले व यानेंच अर्वाचीन ग्रीक भाषेचा पाया घातला.

या कालच्या ग्रीक भाषेंमध्यें दोन प्रकार दृष्टीस पडतात. एक लौकिक अथवा रुढ (प्रचारांतील) भाषा व दुसरी व्याकरणशुद्ध भाषा. पहिली भाषा बोलण्यांत वापरीत व दुसरीचा उपयोग ग्रंथलेखनामध्यें करीत असत. पहिली भाषा निरनिराळ्या प्रांतांत थोडी फार बदलेली असे पण दुसरी मात्र प्राचीन ग्रीक भाषेंपासूनच थोड्या फार फरकानें चालत आली होती. या दोन भाषांच्या पुरस्कर्त्यांमधील लढा पूर्वींप्रमाणें अद्यापहि चालला आहे. यामुळें या वेळींहि ग्रीक वाड्मयामध्यें गोंधळ झालेला आहे. बोलण्याची भाषा कोठेंहि शिकविली जात नाहीं, मात्र ही सर्वत्र बोलण्यांत आढळते. व ही प्राचीन भाषेपासूनच थोडथोडा फरक होऊन तयार झाली आहे. परंतु ग्रंथलेखनामध्यें या भाषेचा उपयोग करणारा कोणीहि मोठा ग्रंथकार न झाल्यामुळें ही मागें पडली. एकंदर ग्रीक ग्रंथकारांची प्रवृत्ति प्राचीन ग्रंथकारांचें व त्यांच्या भाषेचें अनुकरण करण्याकडेच विशेष असे. सुमारे पन्नास वर्षांपासून अर्धवट प्राचीन, अर्धवट अर्वाचीन अशीच भाषा शाळा, विद्यापींठे, लोकसभा व सरकारी कागदोपत्रीं चालू आहे. या भाषेचा परिणाम सुशिक्षित जनतेच्या बोलण्यांतील भाषेवर झालेले स्पष्ट दिसत आहे. या भाषेला जरी कायमचें स्वरुप अद्याप आलें नाहीं तरी तिचें सर्व श्रेय 'कोव्हेइस' याच्याकडे आहे. यानें लेखनाच्या भाषेपासून सुरवात करुन तिच्यांतील बाहेरुन आलेले शब्द काढून टाकून त्यानें कांहीं जुनें व कांहीं ठराविक पद्धतीनें तयार केलेले नवीन शब्द घेऊन त्या भाषेचा शब्दसंग्रह वाढविला व अशा त-हेनें मध्यम मार्ग स्वीकारुन त्यानें ही भाषा प्रचारांत आणली.

अर्वाचीन कवीपैकीं पुष्कळांनीं बोलण्याच्या भाषेमध्येंच कविता केली आहे. 'डायोनिसिअस सॉलोमस' याच्या लिरिक काव्यांपैकीं स्वातंत्र्यावरचें काव्य फार सरस आहे. याच आयोनियन पोटभाषेमध्यें 'अँड्रिअस कॅलव्हॉस' 'जुलिअस टिपॅल्डॉस' वगैरे कवींनीं कविता केली आहे. याखेरीज व्हलॅओरिट्स याच्या काव्यांचा ग्रीक लोकांच्या मनावर फार परिणाम झाला. याशिवाय 'व्हिलॅरॅस' 'झॅलो फोस्ट्स' वगैरे कवी होऊन गेले. याच वेळीं कॉन्स्टांटिनोपलमध्यें कांहीं कवींनीं प्रौढ भाषेंत काव्यरचना केली. यांपैकीं 'स्पिरिडिअन बॅसिलिअँड्स' 'अँजेलॉस व्हलॅ चॉस' वगैरे नामांकित आहेत. एकंदरींत प्रौढ भाषेंमध्यें अलीकडे कोणी कविता करिनासें झालें आहे. अलीकडच्या काळांत नाटकें मात्र फार आढळतात. 'सौटझोस' बंधूनंतर 'क्लिऑन-हँगवेस', अँजेलॉसेव्हलॅचॉस, 'डेमेट्रिओंस कोरोमेलास' वगैरेनीं बरीच नाटकें रचलेलीं आढळतात. त्यांपैकीं 'रोमिओ आणि जुलिअट', 'ऑथेल्लो' 'हॅम्लेट' 'किंग लिअर' वगैरे इंग्रजी नाटकांचीं भाषांतरेंहि आढळतात.

'जॉर्ज सौरेस' हा औपरोधिक ग्रंथकार होऊन गेला. यानें सामाजिक व राजकीय प्रश्नांची चर्चा केली आहे. गद्यग्रंथकरांनीं मात्र सर्वत्र प्रौढ भाषेचाच उपयोग केलेला आढळतो. ऐतिहासिक ग्रंथलेखन व संशोधन बरेंच झालें आहे पण महत्वाचा असा ग्रंथ झालेला आढळत नाहीं. 'स्पिरिडिअन लँप्रॉस' यानें एक इतिहास लिहिला आहे व कॅरोलाइडस् याचा १९ व्या शतकाचा इतिहास नुकताच बाहेर पडला आहे. याशिवाय दुसरेहि कांहीं इतिहास प्रसिद्ध झाले आहेत. कांहींचें इंग्रजींत ब्यूटच्या मार्क्विसनें भाषांतर केलें आहे. 'पीटर पपॅ-हेगोपौलस,' 'कॅलिगस' बगैरेनीं कायद्यावर ग्रंथ लिहिले आहेत. 'ब्रेलस आर्मेनिस' व 'जॉन स्कँल्टझोनेस' यांनीं तत्वज्ञानावर ग्रंथ लिहिले. यांतील दुस-यानें डार्विनच्या विरुद्ध सिद्धांत काढले आहेत. 'डायोमिडिस किरि ऑकोस' याचा ख्रिस्तसांप्रदायिक इतिहास व 'लाटास' येथील मुख्य धर्मोपदेशकानें लिहिलेले सांप्रदायिक ग्रंथ लक्षांत घेण्यासारखे आहेत.

भाषाशास्त्रावरील प्रमुख ग्रंथकार 'कान्स्टंटाइन कांटोस' हा होय. याखेरीज 'जॉर्ज हॉर्ट्झ डेक्स' 'थिओडोर पॅपॅडेमेट्र कोपौलोस' व जॉन सिचरि यांनीहि ग्रंथ लिहिलेले आहेत. प्राचीन वस्तुसंशोधनाच कामीं 'स्टीफन कौमंनीडस' 'पॅनॅजिऑट्स कॅम्बॅडिअस' आणि क्रिस्टोस सौंट्स' हे प्रसिद्ध आहेत.

'जॉन स्व्होरेनोस' यानें नाण्यांच्या संशोधनांत प्रावीण्य मिळविले आहे. गणितामध्यें 'जॉन हॉर्टझडेक्स', रसायनशास्त्रांत क्रिस्टोमॅनॉस व ज्योतिषामध्यें डेमाट्रिअस एजिनेट्स हे पारंगत आहेत.

ग्रीस देशास स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या प्रथमच्या कालांत प्रसिद्ध झालेल्या कादंब-यांमध्यें परकी लोकांशीं असलेल्या संबंधाचा बराच परिणाम झालेला दिसतो. अर्वाचीन ग्रीस देशांत नांवाजण्यासारखा कादंबरीकार कोणीच झाला नाहीं. कॅलिगस याचीं एक दोन पुस्तकें बरी आहेत. नवीन कादंब-या कोणीच लिहित नाहींत. परंतु दुस-या भाषांतील कादंब-यांची भाषांतरें बरींच होतात. डी. बिकेलस यानें सुरवात केल्यापासून लहान गोष्टी प्रचारांत येऊं लागल्या आहेत. बोलण्याच्या भाषते गद्यग्रंथरचना 'जॉन सिचारि' यानें केली आहे. यापैकीं त्याचा ग्रीकचा प्रवास प्रसिद्ध आहे. एम्. पल्ली यानें इलियडचें भाषांतर केलें आहे. या भाषेचा शास्त्रीय ग्रंथ लिहिण्याच्या कामीं कोणीहि कधींच उपयोग केला नाहीं.

अथेन्स येथें कांहीं नियतकालिकें निघतात. त्यांत 'कॉन्स्टंटाईन काँटॉस' यानें चालविलेलें अथेना, हारमोनिया आणि 'एथ्निके अगोगे' हीं प्रमुख आहेत. यांशिवाय 'पॅर्नासॉस' 'प्राचीनवस्तुसंशोधन' वगैरे संस्थांचीं नियतकालिकें निघत असतात.

[संदर्भग्रंथ.- ग्रीक वाड्मयावर बरेच ग्रंथ आहेत, पण बहुतेक इंग्रजीतर युरोपीय भाषेंत आहेत. पुढील कांहीं इंग्रजी ग्रंथ उपयुक्त दिसतील. मुरे-क्रिटिकल हिस्टरी ऑफ दि लँग्वेज अँड लिटरेंचर ऑफ एन्शंट ग्रीस (१८५७-५७): महाफी-हिस्टरी ऑफ क्लासिकल ग्रीक लिटरेचर: साँडिसहिस्टरी आफ क्लासिकल स्कॉलरशिप (१९०६-१९०८); गेलडार्ट-फोकलोअर ऑफ मॉडर्न ग्रीस (लंडन, १८८४).]

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .