प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे    
     
ग्रंथिरोग- पुरातन कालीं शरीरांत कोठल्याहि भागांत गांठ उत्पन्न झालेली दिसली अगर हातानें शरीर, उदर वगैरे चाचपतांना लागली म्हणजे तिला गांठ अगर गुल्म (अर्वुंद) असें संदिग्ध नांव देत. याचें कारण ती कोणत्या प्रकारची आहे याचें निदान करण्याची माहिती हल्लींइतकीं उपलब्ध नव्हती. म्हणून गंडमाळाच्या गांठी, पाणथरी एखादे पोटांतील गळूं अगर क्यान्सरसारखा असाध्य अगर अन्य त-हेची सुसाध्य ग्रंथि शरीरांत उत्पन्न झाली तरी सामान्यत: सर्वच प्रकारच्या गांठीनां वर सांगितले त्यांपैकीं एखादें नांव देत. परंतु हल्लीं जंतुशास्त्राची प्रगति व सूक्ष्म दर्शक यंत्रांचा निरनिराळ्या ग्रंथिरोगांची सूक्ष्म रचना कशी आहे व तिचें शरीरांतील अस्थि, मांस, त्वचा इत्यादि कोणत्या रचनेंशीं साम्य आहे हें पाहण्याच्या कामीं अधिक उपयोग करूं लागल्यामुळें पूर्वींइतकी या रोगाविषयीं संदिग्धता राहिली नाहीं. म्हणून या रोगाची व्याख्या व वर्गीकरण नवीन त-हेनें करणें जरूर आहे. दाढ, सूज, अथवा रचनावृद्धि या व्यतिरिक्त अगर यामुळें जी गांठ शरीरांत अगर शरीराबाहेर उत्पन्न होते व जी आपोआप अगर अंतर्बाह्य उपचारांनीं व औषधांनीं बरी होत नाहीं तिला ग्रंथि म्हणावें. यास पुरवणीदाखल असेंहि म्हणतां येईल की या ग्रंथीचा शरीरांतील आयव्ययादि व्यापारामध्यें कांहीं एक उपयोग नसतो. वर्गीकरणाच्या अनेक प्रकारांपैकीं एक दोन प्रकारचें वर्गीकरण पुढें दिलें आहे. (१) दाहयुक्त अगर जंतुजन्य ग्रंथि (२) विशिष्ट शारीरिक रचनावृद्धि जन्य ग्रंथि (३) कोटर ग्रंथि (४) शुद्ध अगर यादृच्छिक ग्रंथि.

(१) दा ह यु क्त ग्रं थि- यांत कोणत्या तरी प्रकारच्या दाहजंतुप्रवेशांचें निमित्त होऊन त्यानंतर ती दाहक्रिया ठरीव क्रमानें सुरू होऊन संपते. म्हणजे त्या ठिकाणीं रक्त संचय व लशीची उत्पत्ति फार होऊन दुखणारे, ठणकणारे व लाल  गळुं सर्वास परिचित असलेलें बनतें; व त्या ठिकाणीं शरीर रचना व आगंतुक जंतूमध्यें युद्ध असून त्यांत जंतूचा पराभव झाल्यास गळुं अगर सूज व पिकतां अगर न वाढता; ती जिंरु लागतें. परंतु उलट प्रकार म्हणजे जंतु प्रबल झाल्यास रचनेंतील पेशी मृत होऊन पातळ होतात व त्यांचा पू बनतो. असा प्रकार चढविणारे जंतू स्ट्रंप्टोकॉकस व स्टयाफिलोकॉकस या जातीचे असतात पू बनवीत नाहींत असे क्षय व उपदंश या रोगांचे जंतू आहेत. ते वरील प्रकारचा तीव्र व त्वरित संपणारा दाह उत्पन्न न करतां अति दीर्घकालीन प्रकारचे फार थोड्या अगर बिन पुवाचे दाह सुरू करितात. पुत्राच्या ऐवजीं त्यामुळें जाड पुटकळी (क्षय-उपदंश) रोगांमध्यें तयार होऊन ती सावकाश वाढून पुष्कळ महिने अगर वर्षें टिकते. दिसण्यांत या गांठीं जरी यादृच्छिक ग्रंथीसारख्या दिसल्या तरी सूक्ष्मदर्शक यंत्रानें पाहिल्यास त्यांत शरीररचना पेशी न आढळतां दाहावस्थेंत असलेल्या पेशींचे अनेक समूह दिसून येतात. अशा प्रकारच्या ग्रंथींस पूयग्रंथि अगर विद्रधि अथवा गळूं म्हणतात व ती शरीराच्या कोणत्याहि कटिरउदराहि अंतर्बाह्य भागांत यकृत, फप्फुसाकद इंद्रियांत अथवा अस्थिमांसमज्जादि रचनेमध्यें होऊ शकते.

(२) शा रि रि क र च ना वृ द्धि अ न्य ग्रं थि:- एखाद्या स्नायूवंर अगर अवयवांवर अधिक काम अगर व्यायाम पडला तर तो अवयव कालांतरानें मोठा होतो. म्हणजे त्याची सूक्ष्मदर्शनीय रचना न बदलतां त्याचा आकार अगर क्षेत्रफळ मात्र वाढतें. हृदयाच्या पडद्यास विकृति होऊन हृदयांत अधिक रक्त सांचल्यानें त्यास श्रम अधिक पडून हृदयस्नायु मोठा होतो व म्हणून हृदयहि मोठें होतें. पण यास कोणी ग्रंथि म्हणत नाहीं. तथापि तें नांव, हिमज्वरांत होणा-या अति मोठ्या प्लीहेंस अगर थायरॉईडवृद्धि नामक रोगांत आढळणारी त्या थायरॉइड ग्रंथीच्या वृद्धीस किंवा हॉजकिनच्या रोगांत शरीरांताल सर्वच रसग्रंथींची वृद्धि होते, त्या वृद्धिस समर्पकतेनें देतां येतें. या रचनांपैकीं कोणतीहि सूक्ष्मदर्शक यंत्रानें पाहिली असतां निरोगी स्थितींत असल्याप्रमाणेंच ती रचना असलेली दिसते. फक्त आकार एकंदर त्या संबंध रचनेचा वाढून ती रचना ग्रंथीप्रमाणें दिसतें व चाचपल्यास हातास गांठीप्रमाणें लागते. रचनेंत विकृति नाहीं फक्त वृद्धि आहे तर या स्थितीस रोग तरी कां म्हणावें? तर या वृद्धिबरोबर रक्तांत व मज्जातंतूंत बदल होऊन ठराविक त-हेचीं लक्षणें रोग्यास होतात म्हणून हे रोग ठरविले गेले आहेत. हें त्याचें उत्तर आहे. तथापि ही वृद्धि कांहीं प्रकारच्या जंतूंमुळें होते किंवा कसें याविषयीं अद्याप पुष्कळ वाद व अनिश्चितपणा आहे.

(३) को ट र ग्रं थि:- अर्बुद रोग अगर पोकळ गांठी यांतच गुल्मरोगाचा समावेश होतो. त्यांच्या आंत द्रव पदार्थ असून भोंवतालीं सालीप्रमाणें तंतुमय व अतिचिवट कोष अगर वेष्टण असतें. आंतील द्रवपदार्थांचें स्वरूप भिन्न जागीं भिन्न प्रकारचें आढळतें. अगोदर मूळचीं लहान पोंकळी असून ती विकृतीनें व आंतील स्वाभाविक द्रवबिंदूची वृद्धि होत गेल्यानें बाहेरील वेष्टणास ताण पडून तें मोठें होतें व भरीव ग्रंथीप्रमाणें रोगग्रंथि दिसते, व हातास लागते. अशा पोकळ रचना शरीरांत मूळच्याच गांठी पुष्कळ असल्यामुळें लहान मोठया अशा अनेक प्रकाराच्या व आकाराच्या पोकळ गांठी शरीरांत झालेले रोगी पुष्कळ आढळतात व खरें पाहूं गेलें तर त्या ख-या गांठीहि नव्हेत; परंतु रोगनिदानामध्यें चूकभूल होऊं नये म्हणून त्यांनां येथें स्थान दिलें आहे. या कोटरग्रंथि रोगाचें असें वेगळें वर्गीकरण करण्यालायक तो विविधस्वरूपी रोग असल्यामुळें वैद्यकीय ग्रंथांत त्यास स्वतंत्र रोग समजतात. यासच अर्बुदरोग, गुल्मरोग (पहा) असें म्हणतात व बाह्य साम्यतेखेरीज ग्रंथिरोगाशीं त्याचा फारसा संबंध नाहीं.

(४) शे व ट चा प्र का र शु द्ध अ ग र या दृ च्छि क ग्रं थि:- या गांठींचा उगम मूळ एखाद्या जीवन पेशींचें अगर त्यांच्या समूहाचें वर्धितसंख्यामान सावकाशपणें अगर एकाएकीं होऊं लागून, ती ग्रंथि तयार होऊं लागते. याच्या भोंवतालच्या रचनेपैकीं या ग्रंथीचा सांगाडा जुळविण्यापुरती तंतुमय सामुग्री संधायक रचनेंतून घेतली जाते. भोंवतालची रचना हा वृक्ष आहे असें कल्पिलें तर ही नवग्रंथि तिचें अपत्य अगर शाखा होय; म्हणून कोठल्याहि ठिकाणचा ग्रंथिरोग ज्या प्रकारच्या (अस्थि, स्नायु इ.) रचनेंतून निर्माण झाला असेल त्या रचनेची हुबेहुब प्रतिकृतीच ती ग्रंथि असते. त्वग्ग्रंथीची रचना साध्या चामडीच्या रचनेप्रमाणेंच असते. सुसाध्य स्तनग्रंथिरोगाचा पातळ पापुद्रा व स्तनरचनेचा पापुद्रा सूक्ष्मदर्शक यंत्रानें पाहिल्यास फरक दिसून येत नाहीं. अगर फरक असलाच तर तो सूक्ष्म असून तो ओळखण्यास अडचण पडते. हें समान रचनालक्षण पहिल्या म्हणजे दाहजन्य ग्रंथीपासून या ग्रंथीचें निदान निश्चित करण्यास उपयोगी पडतें. असा एक या रोगाचा नैसर्गिक नियम दिसतो कीं, संधायक अगर अन्य प्रकारच्या रचनेपासून त्या त्या विशिष्ट प्रकारचीच ग्रंथि उत्पन्न व्हावयाची याच्या उलट सिद्धांतहि खरा आहे कीं सुसाध्य ग्रंथि अगर असाध्य बाह्यत्वग्ग्रंथि म्हणजे क्यान्सरची ग्रंथि ही फक्त बाह्यरचनेपासूनच उदभवणें संभवनीय असतें व संधायक रोगग्रंथि बाह्यरचनेपासून कदापि निर्माण होत नाहीं. अनेक शोधकांच्या दीर्घकाळ सूक्ष्म निरीक्षणानें हें आतां ठाम निश्चित झालें आहे. या प्रकारच्या रोगग्रंथींचा आणखी दुसरा विशेष हा आहे कीं शरीरचनेला जे नैसर्गिक निर्बंध आहेत व ज्यामुळें त्यांचें वर्धन, पोषण व झीज भरून येणें आपोआप चालतें तसले नियम व निर्बंध या नवग्रंथीनां काहींच नसल्यामुळें त्यांची वाढ स्वतंत्रपणें व कशीतरी अव्यवस्थितपणें होते. या ग्रंथीपैकीं सुसाध्य नामक भेदांतील ग्रंथी असे निर्बंध नसतांहि विशेष बेसुमारपणें वाढून शरीरहानि प्राय: करीत नाहींत ही गोष्ट जरी खरी असली तरी या ग्रंथीची बेशिस्स वाढण्याकडे प्रवृत्ति असते हें खास. ही प्रवृत्ति असाध्यग्रंथीमध्यें इतकी असते कीं, ग्रंथिवृद्धीकडेच रोग्याच्या शक्तीचा, रक्ताचा व अन्नाचा व्यय झाल्यामुळें इतर इंद्रियांची उपासमार होऊन रोग्याचें प्राण हरण झाल्याविना ही रोगग्रंथीची वाढ थांबत नाहीं. या असाध्य ग्रंथिवर्गांपैकीं क्यान्सर व सार्कोमा या भयंकर ग्रंथी होत.

या सुसाध्य व असाध्य दोन्ही प्रकारच्या ग्रंथी कोठेंहि शरीरांत होतात. तथापि कांहीं स्थानीं (स्तन, जननेंद्रियें, जीभ, गुद इत्यादि) त्या बहुतकरून होतात. मानवजाती व अस्थिपंजरसहित इतर हीन प्राण्यांमध्येंहि हे रोग आढळतात. सुधारणेचें हें फल असल्यामुळें यूरोपियन लोकांत हा रोग फार आहे असें एक मत पैलावलें होतें पण तें खरें नसावें.

सुधारणेबरोबर अश असाध्य ग्रंथींचीं उदाहरणें लेखी नमूद करण्याचा परिपाठ अधिक पडतों व शुद्धतर व शास्त्रीय त-हेनें शिक्षणपारंगत झालेला त्यांतील भिषग्वर्गांत अगर डॉक्टर लोकांत या व सुसाध्य ग्रंथीचें निदान करण्याची पात्रता अधिक वाढल्यामुळें हा रोग सुधारणेच्या मन्वंतरांत वाढत आहे. असा भ्रम पसरला असावा. या रोगानें मृत होत असलेली माणसें पूर्वीं पोटांतील रोग, म्हतारपण अगर अन्य सदराखालीं बहुधा नोंदलीं जात असत.  म्हणून हल्लीं क्यान्सर रोगामुळें मृत्यू झालेल्या रोग्यांची संख्या डाक्टरांच्या वाढत्या ज्ञानामुळें रोगनिदानक्षमतेमुळें वाढली असावी. वरील मुख्य दोन भेदांपैकीं हा असाध्य ग्रंथि (क्यान्सर) रोग महाप्राणघातक असल्यामुळें सर्व शोधक शास्त्रज्ञांचें लक्ष त्याकडे अधिक वेधावें यांत नवल नाहीं. या प्राणघातकतेमुळें यास महत्त्व आलें असलें तरी या प्रकारच्या रोग्यांची संख्या नेहमीं सुसाध्य ग्रंथीमुळें पिडलेल्या रोग्यांच्या संख्येपेक्षां पुष्कळच कमी असते. असाध्यग्रंथि एका रोग्यास एके वेळीं एकच होते. (पुढें ती रक्तांतून अगर रक्तवाहिन्यातून इतर ठिकाणीं पसरते ही गोष्ट निराळी आहे.) परंतु सुसाध्यग्रंथि एके वेळीं रोग्यास एक दोन अगर अधिकहि होतात. सुसाध्य आणि असाध्य ग्रंथींतील लक्षणें व प्रकार तुलनात्मक पद्धतीनें दाखविल्यास समजण्यास विशेष सुलभ पडेल म्हणून तसें पुढें केलें आहे.

सु सा ध्य ग्रं थी.-  (१) ज्या ठिकाणीं ही ग्रंथि उत्पन्न होते तेथेंच ती वाढते. भोंवतालच्या रचनेंत प्रवेश करून ती कुरतडून त्यावर हल्ला करीत नाहीं. भोंवतालची रचना फार तर दबली अगर बाजूस ढकलली जाते. या ग्रंथीच्या भोंवताली चिवट तंतुमय वेष्टण असतें. कारण भोंवतालच्या रचनेशीं जणूं काय सौम्य कलहामुळें दाहक्रिया उत्पन्न होऊन कुंपणाप्रमाणें हें वेष्टण दोहोंमध्यें असतें. याचा उगम व वृद्धि सावकाशपणें होत असतात. आकार वाटोळा असतो, गांठ इलवितां येते व त्यावरील त्वचेशीं चिकटलेली नसते. (२) यापासून जिवास धोका नसतो, मात्र त्यांचा दाब मर्मस्थानीं, हृदय अगर मज्जातंतूवर पडल्यास मात्र फार वेदना होतात किंवा मृत्यु येतो. एरवीं वेदना न भीति नसते. शिरेवर दाब पडल्यास सूज येते. श्वासनलिकेवरचा दाब प्राण कासावीस करील. एरवीं त्यापासून धोका नसतो. (३) या गांठी रक्तांत शिरून इतर ठिकाणीं आपली वृद्धि करीत नाहींत. (४) शस्त्रक्रियेनें कापून काढिल्या असतां त्या पुन: उत्पन्न होत नाहींत. त्या भोंवतालीं वेष्टण असल्यामुळें कोठपर्यंत गांठ कापावयाची हें कळतें.

अ सा ध्य ग्रं थी.- (१) उगमस्थानापासून ग्रंथि वाढून भोंवतालच्या, स्नायु, चरबी, अस्थि वगैरेंच्या रचनेमध्यें शिरते व भोंवताली हलज करून सर्व ठिकाणी घर करून तेथें चिकटून बसते. या ग्रंथीभोंवतालीं वेष्टण नसतें. कारण हिच्या वृद्धीचा जोर अतिशय असल्यामुळें प्रतिकारार्थ दाहक्रिया उत्पन्न होऊन प्रतिबंधक कुंपण घालण्याइतकी शक्ति भोंवतालच्या रचनेंत नसते. यांचा उगम, वाढ व शेवट सुसाध्य ग्रंथीपेक्षां फार झपाट्यानें होतो. यापैकीं सार्कोमा ग्रंथीचा आकार सुताच्या चातीप्रमाणें लांबट असतो. इतर प्रकारचा आकार अनियमित असतो व त्यावरील त्वचेंत गांठ रुतलेली असते.

(२) यापासून-मग ती गांठ कोठें कां असेना-मृत्यु बहुधा येतो म्हणून या कष्टसाध्य अगर असाध्य असतात. यकृत, प्लीहा, मूत्रपिंड यांसारख्या इंद्रियामध्येंहि रोगानें वसाहत केल्यावर हीं इंद्रियें निरुपयोगी होतात. अशा प्रकारें चोहोंकडे ग्रंथीची वृद्धि झाल्यानें मरण त्वरित येतें. शस्त्रक्रियेनें कदाचित् रोग काढून टाकता येतो. क्यान्सर ग्रंथी रसग्रंथी मागें व साकोंमाग्रंथि रक्तवाहिन्यांतून शरीरांत इतर जागीं पसरतात.

(३) कापल्या जागीं पुन: गांठ येते. ती येऊं नये म्हणून त्याजवळील रसग्रंथी दूषित न दिसली तरी कापून काढतात. त्यामुळें किती रसग्रंथी कापाव्या हें नीट कळत नाहीं. जेथें ही गांठ उत्पन्न होते तेथील रचनेहून भिन्न प्रकारची रचना या गांठीशी असते.

वरील विवेचनावरून ध्यानांत येईल कीं क्यान्सरच्या शस्त्रक्रियेमध्यें जवळील म्हणजे जांघाड, काख व मानेंतील रसग्रंथी सुद्ध रोग कापून काढणें हें स्तन व जीभ या ठिकाणीं क्यान्सर झालें असतां इष्ट असतें म्हणून सूक्ष्मदर्शकयंत्रानें  परीक्षा न करितां तें काढून टाकणें हा हल्लीं प्रघातच पडला आहे. त्वचेस क्यान्सर झालें असतां जवळील रसग्रंथि याप्रमाणें काढून टाकली म्हणजे बहुधां शरीरांतील इंद्रियांत रोगप्रसार होत नाहीं, बाकी सर्व ठिकाणच्या क्यान्सरमुळें तसें होतें व म्हणून, वेदना, शक्तिपात, रक्तस्त्राव इत्यादीमुळें मृत्यु येतो.

कांहीं वर्षें ग्रंथि सुसाध्य प्रकारची असून एकाएकी तिला असाध्य स्वरूप प्राप्त होतें हाहि एक प्रकार आहे. तसेंच त्वग्छिद्रितग्रंथिव्रण, चिवुकमनुदुष्टग्रंथि, या कष्टसाध्य ग्रंथिवर्गापैकीं असूनहि रसवाहिन्यामागें त्या शरीरांतील इंद्रियांत पसरत नाहींत, यावरून व इतर कारणांवरून कष्टसाध्य, असाध्य व सुसाध्य यांमधील सीमा ठाम नाहीं व या सीमेमधील प्रांतांत मोडणा-या या व अशा दुस-या ग्रंथी असतात हें कळून येईल.

या रोगाचीं करणें:- सर्वच ग्रंथी कोणत्या कारणानें झाल्या हें निश्चितपणें सांगता येत नाहीं. परंतु कांहीं ग्रंथी होण्यास मात्र (१) बरेच दिवस तो भाग घांसला अगर चोळवला जाणें, (२) बरेच दिवस टिकलेली सूज व दाह, (३) दुखापत, हीं व अशा प्रकारचीं स्थानिक कारणें उघड दिसतात. परंतु अशीं कारणें असून सर्वच माणसांनां ग्रंथिरोग जर होत नाहीं, तर अगोदरच ज्या रोग्यांच्या शरीरांत ग्रंथीचा उद्भव होण्यास अनुकूल स्थिति असते तेवढ्याच रोग्यांनां हा रोग होतो हें अनुमान वावगें नाहीं. (४) गर्भ वृद्धीमध्यें ज्या नवीन रचनापेशीपासून पूर्ण शरीर बनलें त्या गर्भपेशींपैकीं कांहीं पेशींचा लहान समूह समूह शरीरांत कांहीं काल निद्रितावस्थेंत राहून त्यांनां अनुकूल वेळीं गर्भ झपाट्यानें मोठा होतो. तद्वत् एकाएकीं ग्रंथि निर्माण करतात. परंतु हें कारण क्यानसर ग्रंथीस लागूं पडत नाहीं. कारण गर्भपेशी पूर्ण रूपांतर बनून झालेल्या रचनेंतून क्यान्सर तयार होतें व त्यांत गर्भपेशींपैकीं नवीन रचनापेशी कधीं आढळत नाहींत. सार्कोमा ग्रंथीमध्यें मात्र त्या पेशी आढळतात. (५) कांहीं प्रकारच्या जंतूपासून ही ग्रंथि होते असें एकमत आहे पण यास फारशी पुष्टि मिळाली नाहीं. आनुवंशिकता, म्हातारपण, दु:ख काळजी, मानसिकश्रमातिरेक यामुळें आलेलें शरीरदौर्बल्य व रोगप्रतिकारदौर्बल्य ही कारणें पुष्कळ रोग्यांत उघड दिसतात. तसेंच कांहीं विशिष्ट प्रांतांत तो रोग अधिक आहे असें दिसतें.

मागें ढोबळपणें वर्गीकरण केलेंच आहें. तथापि ग्रंथिरोगाच्या रचनेस अनुसरून केलेलें पुढील वर्गीकरण पाहिले म्हणजे त्या ग्रंथीची बहुसंख्यांकता, वैचित्र्य व विविधता ध्यानांत येईल. यापेक्षां अधिक वर्णनासाठीं त्या त्या रोगावरील स्वतंत्र लेख पहावे आकार व वजन यांतहि फार वैचित्र्य आढळतें. म्हणजे लहान गुंज अगर पावट्यापासून तो नारळ किंवा भोंपळ्याएवढी ग्रंथि अगर आवाळूं असूं शकतें.

रोगग्रंथींचें वर्गीकरण.

(१) शुद्धसंधायक रचनापेशीपासून होणा-या ग्रंथी.

ग्रंथींचें संभवनीय
स्थान
स्वरूप
तंतुस्नायुग्रंथी अस्थ्यावरण, जबडा,
गर्भाशय, गुद, नाक,
घसा, अंडाशय मस्तक,
त्वचेखालीं (चामखीळ).
 वर्तुळाकार अथवा लंबवर्तुळाकार,
न दुखणारी, हलणारी, लोंबणारी,
मऊ अगर कठिण.
 वसामयग्रंथि  खांदा, पाठ, ढुंगण,  वाटोळी, गांठाळ, बिलबिलीत,
न दुखणारी, मऊ लहान मोठी.
 कोमलास्थि ग्रंथि  हाताचीं बोटें (क्वचित पायाचीं बोटें),
जंघास्थींचें खालील टोंक, पादास्थि
आणि दंडाच्या हाडाचें वरील टोंक.
 अति कठिण, न दुखणारी, जास्त
लक्षणें अस्थिरोगावरील ग्रंथांत पहावी.
 अस्थिग्रंथि  हाडाप्रमाणें कठिण असून हाडापासून
वाढतात. अस्थि रोगांत याविषयीं
माहिती पहावी.
 हाडाप्रमाणें भरींव अगर पोकळ,
भुसभुशीत रचना.
 श्लेष्मलत्वग्ग्रंथि  नाक, त्वचेखालीं अस्थ्यावरण,
हाडांच्या मगजांत.
 दिसण्यांत वसा अगर तंतुग्रंथीप्रमाणें; नाकांतील मात्र ओळखण्यास सोपी.
शुद्ध आणि श्लेष्मलत्व ग्रोगोत्पन्न ग्रंथि हे त्वग्रोग, फिरंगोपदंश, मूत्राशय, गुद, कंठ, या रोगांत व या स्थानीं होतात. तेथील माहिती पहावी. कालीफ्लावरच्या प्रमाणें मोठे अगर लहान, चिकट व सपाट, चपटे वगैरे प्रकार कांहीं कॅन् सर ग्रंथीप्रमाणें

(२) महाप्रधानसंधायक रचनापेशीनिर्मित ग्रंथि.

स्नायूमय ग्रंथि, मज्जानिर्मित ग्रंथि, रक्तवाहिनीनिर्मित ग्रंथि, रसवाहिनीनिर्मित ग्रंथि, रसग्रंथिनिर्मित ग्रंथि इत्यादिकांच्या नांवांवरून त्यांच्या रचनेचा व स्वरूपाचा बराचसा बोध होत असल्यामुळें येथें संक्षिप्त वर्णन दिलें नाहीं. त्याच्यासाठीं रस व रक्तवाहिन्यादि रोगांवरील ग्रंथ पहावे. येथें थोडक्यांत वर्णन करणें शक्य नाहीं.

(३) नवीन संधायक रचनोत्पन्न ग्रंथि उर्फ सार्कोमा.

ग्रंथीचें संभवनीय स्थान लक्षणें व स्वरूप
वर्तुळपेशी विशिष्ठ ग्रंथि अस्थि, अंड, स्तन यांच्या रोगांवरील ग्रंथ पहावे लवकर वृद्धि, त्यावर लाल त्वचा व शिरा,
त्वचा फाटून व्रण, शक्तिपात, इंद्रियांत
रोगप्रसार, मृत्यु हीं सर्व असाध्य लक्षणें.
वर्तुळ पेशी विशिष्ठ ग्रंथि स्नायू त्वचा यांच्यामध्यें. यांत दाह लक्षणें नसून मऊ अगर अर्धवट मऊ ग्रंथि काढून टाकली तरी पुन: येणारी, इंद्रियांत न पसरणारी.
विषमांकार पेशीविशिष्ठ ग्रंथि लांब हाडांच्या पोकळींत, जंघास्थि खालील जबडा, वगैरे. हाडाच्या रोगावरील स्वतंत्र ग्रंथ पहावा.

(४) सर्व संमिश्र प्रकार.

यांत वरील तीनहि प्रकारच्या पेशी रचनेंत सापडतात. ही ग्रंथि कापली तर रक्तप्रवाह थांबविणें अवघड पडतें.

(५) रसोत्पादकपिंडपेशीसंभूत व बाह्यत्वचोत्पन्न ग्रंथी.

  ग्रंथीचें संभवनीय स्थान लक्षणें व स्वरूप
सुसाध्य स्तन, जिव्हामूल, ओठ, शिश्नमूलग्रंथि, थायराइड व
जबड्यामागील गांठ, अश्रुंग्रंथि, त्वग्ग्रंथि.
 यांचीं लक्षणें त्या त्या रोगांच्या सदराखालीं
अगर स्वतंत्र ग्रंथांत पहावीं. या साध्य आहेत.
   असाध्य (१) वर्तुळ पेशीनिर्मित
 (अ) कठिण वर्तुळपेशी  स्तन व जठराच्या खालील छिद्र.  कठिण, गांठाळ, हळू वाढणारी, मध्यम आकाराची.
 (आ) मृदु वर्तुळपेशी  अंडयकृत, मुत्राशय, मूत्रपिंड, स्त्रियांचे अंडाशय, स्तन.  जलद वाढणारी व मोठी.
(इ) श्लेष्मल वर्तुळपेशी जठर, आंतडें, अंडाशय.
(२) त्वचोत्वन्न जुनाट, वण, व्रण, जीभ, खालील ओठ, हिरड्या, अंडाशय, शिश्न, गुद. खरबडींत पुटकुळी चरते व कडा फुगतात, शेजारील गांठी मोठ्या होतात अगर जांघेंत आरंभ, शेवटीं कालील्फावरचा आकार येणें.
(३) स्तंभाकार पेशींनिर्मित गुद, आंतडें, गर्भाशय, स्तभांतील दुग्धनलिका. त्या त्यां रोगांवरील सदरें अथवा ग्रंथ पहा.


उ प चा र- वरील सर्व ग्रंथींवर शस्त्रक्रिया हाच उपचार आहे. मात्र वर्तुळपेशीनिर्मित ग्रंथींत शक्य तेथें शस्त्रक्रिया व वेदनाशमनासाठी अफू, शक्तिवर्धक व उत्तेजक औषधें द्यावीं व साधल्यास जवळील रसग्रंथीहि काढून टाकाव्या.

मृ त ग र्भा व शे ष ग्रं थि.-  ह्या प्रकारचा रोग फार क्वचितच आढळतो व त्यांत गर्भांचे दांत, केस, अस्थि व इंद्रियांचे अवशेष इत्यादि भाग सांपडतात. वरील वर्गीकरणावरून या ग्रंथिरोगाचे अतिवैचित्र्य, कष्टसाध्यता, असाध्यता व सुसाध्यता, स्वरूप, स्थानें, लक्षणें या सर्वांची विंहगमदृष्टिने कल्पना करतां येईल. या वर्गीकरणावरून हेंहि कळेल कीं, कष्टसाध्य अगर असाध्य ग्रंथी दोनच प्रकारच्या आहेत. एकीचें नांव बाह्यत्वचोत्पन्न व दुस-या प्रकाराचें नांव नवीन संधायकरचनोत्पन्नग्रंथि. हे भेद महत्वाचे असल्यामुळें वरील अल्प वर्णनापेक्षां त्याचें स्वरूप अधिक नीटपणें कळावें म्हणून खालील दोन्ही प्रकारांची तुलनात्मक पद्धतीनें मांडणी केली आहे.

(१) ज्या नूतनसंधायक पेशींच्या या सार्कोमा ग्रंथी बनतात त्यांत जीवनपेशी द्रव्य असून त्याभोंवती वेष्टण नसतें व त्यांस एक अगर दोन मध्यबिंदु असतात. (२) वरील पेशी व अन्यपेशी यांच्यामध्यें व भोंवतालीं संधायक प्रकारचा पदार्थ व तशा प्रकारची रचना अनियभित प्रकारची असते. परंतु क्यान्सरग्रंथींच्या रचनेंत जशा पोंकळ जागा ठिकठिकाणीं असतात तशा जागा या प्रकारच्या ग्रंथींत नसतात. (३) या पेशीमध्यें अति पातळ पापुद-याच्या रक्तवाहिन्या असतात; म्हणून या ग्रंथींमध्यें रक्तस्त्राव अतिशय होण्याचा संभव असतो. क्यान्सरग्रंथीमध्यें रक्तवाहिन्या संधायकरचनेमध्यें वेगळ्या असतात; म्हणून रक्तस्त्राव इतका होत नाहीं. (४) या ग्रंथींचा प्रसार शरीरांतील इंद्रियांत या रक्तवाहिन्यांच्या मार्गें होतो. परंतु क्यानसर ग्रंथींत हा प्रसार रसग्रंथी व रसवाहिन्योमुळें होतो. (५) या प्रसारामुळें होणा-या अन्य ग्रंथीं मूळग्रंथीप्रमाणें असतात. व त्या बहुधा फुफ्फुसांत असतात. (६) भोंवतालच्या रचनेवर हल्ला चढवून या ग्रंथी मोठ्या होतात. व कापल्या असतां त्या जागीं कांहीं ग्रंथिरचनापेशी कापतानां रहाणें साहजिकच असल्यामुळें तेथें पुन: तसली ग्रंथि उद्भवते. (७) त्या रसग्रंथींत प्रवेश करीत नाहीत. यास अपवाद अस्थ्यावरण, अंडगलग्रंथि अगर रसग्रंथि या ठिकाणीं हा रोग झाल्यास रसग्रंथीसहि रोग होतो. (८) बालपण, तरुणपण या वयांत निदान ४० वर्षांच्या वयाच्या आंतील मनुष्यास हा रोग होतो. परंतु क्यान्सर रोग ४० वर्षांच्या पुढें व उतारवयांत फार करून होतो व त्यामध्यें गांठीजवळील रसग्रंथी वाढतात असा नियमच आहे. (९) या कापल्या अगर खरडून काढल्या तर क्यान्सर ग्रंथींतून निघतो तसा पांढरा दुधासारखा पदार्थ त्यांतून निघत नाहीं. वरील दोन्ही प्रकारच्या वर्गीकरणांत आलेल्या ग्रंथी, दाहात्मकग्रंथि (गळुं), पोकळ व इतर सुसाध्य, असाध्य अशा अनेक प्रकारच्या ग्रंथी: स्तन या इंद्रियांत होतात. सर्व ठिकाणच्या व सर्व प्रकारच्या ग्रंथींचें वर्णन या ठिकाणीं देणें शक्य नाहीं हें उघड आहे. तथापि या असाध्य क्यान्सर रोगाचें वर्णन व माहिती कळावी म्हणून ती स्तनाविषयीं पुढें दिली आहे. त्यावरून इतर स्थानीं हा रोग झाला असतां काय स्थिति होते याची कल्पना करतां येईल.

स्त नां ती ल क ठि ण र च ना पे शी यु क्त ग्रं थी (क्यान्सर).- प्रथम स्तनांत फार जडपणा व गांठाळपणा उत्पन्न होऊन भोंवतालीं कवच लागत नसलेला एक गोळा स्तनांत बनतो. त्याचा आकार मध्यम असतो; परंतु त्या रोगाचे लांब फांटे स्तनांच्या आंत नाना ठिकाणीं घुसतात आणि रोग स्थापित झाल्यावर त्वचा व मांस यांत हे घुसतात. कापतांना ह्या गाठींतून कुरकुर आवाज होतो व कापलेला अर्धा भाग वरील तंतुमय फाट्यांची ओढ थांबल्या मुळें खोलगट दिसतो. कापलेला भाग घट्ट व कठिण असून काळसर पांढ-या रंगाचा व ठिकठिकाणीं गुलाबी छट्टा असलेला, कांहिंसा कापलेल्या बटाट्याच्या रंगाचा असतो. व त्यांत चमकणारे पांढरे तंतू पिवळ्या रेषा व ठिपके दिसतात. गांठ कापतांना एक प्रकारचा पांढरा द्रव पदार्थ निघतो.

लक्षणें:- रोगाच्या आरंभी स्तनांत सावकाशपणें वाढत असलेलीं गांठ उत्पन्न होते. नंतर तो भराभर वाढूं लागते. व त्वचा व त्याखालील मांसांत घुसते. त्यामुळें त्वचा फाडून वेडावांकडा दिसणारा व दुर्गंधिमय व्रण तयार होतो. याच सुमारास कांखेतील रसग्रंथी वाढून त्यांचा दाब तेथील मोठ्या शिरेवर व मज्जातंतूवर पडल्यामुळें हातास सूज येते व वेदना होतात. यापुढें शरीरांतील ब-याच इंद्रियांत या क्यान्सरपेशींचा प्रवेश होऊन रोगाच्या आरंभीं रोग्याची प्रकृति दिसण्यांत बरी दिसत असली तरी या सुमारास ती बिघडून त्यावर क्यान्सरची कळा येते, वर्ण निस्तेज व फिकट अगर मातट होऊन रोगी खंगत जातो. व्रणांतून एकसारखा वाहणारा घाणेरा व पुष्कळ स्त्राव, शारीरिक व मानसिक दु:ख व यातना व इंद्रियांत रोग झाल्यामुळें आलेली दुर्बलता यामुळें रोग्याचा भयंकर शक्तिपात होतो. नंतर मृत्यु येऊन रोगी यातनांतून मुक्त होतो. शस्त्रक्रिया केली नाहीं तर या रीतीनें रोग्याचा शेवट होतो.

रोगग्रंथि स्तनाच्या वरच्या व बाहेरील एक चतुर्थांश भागांत असते. अगर स्तनाग्राच्या खालीं असते. ती हातास कठिण, गांठाळ व उंचसखल लागून भोंवताली कोठें सुरुवात होते हें हातस नक्की समजत नाहीं. आरंभीं त्यावरील त्वचा चिमटींत धरली तर तेथें किंचित् खळगा आहे असे भासतें. नंतर तो खळगा वाढून स्पष्टपणें तेथें सुरकुत्या पडतात व कातडीस गांठ चिकटली आहे हें स्पष्ट दिसतें. प्रथम स्तनग्रंथि हवलून पाहिली तर ती छातीवर मोकळी व हलती आहे असें दिसतें; परंतु पुढें ती याप्रमाणें हलवूं जातां पहिल्याइतकी हलती व सुटी नाहीं हें दिसून येतें व नंतर ती छातीवरील : मांसांत रुतून बसते; हालत नाहीं. जेथें स्तनाग्र असावयाचें तेथें खळगा होतो, कारण मागील ग्रंथि दुग्धनलिकांनां आंत ओढते. परंतु स्तनाच्या परिघाच्या सुमारास रोग असल्यास असा खळगा पडत नाहीं; अगर तो अर्धवट पडतो. स्तनाग्रथांतच रोगांस आरंभ झाल्यास तें कठिण व नेहमींपेक्षां अधिक उन्नत दिसतें. कांख तपासून पाहिल्यास एक अगर अनेक दोरखंड हातास लागावे त्याप्रमाणें त्वचेखालील रसवाहिन्या रोगग्रंथीपासून निघालेल्या लागतात व रोग तितका वाढत असल्यास त्या पोकळ जांगेंत अनेक मोठाल्या रसग्रंथीहि चांचपून पहातां येतात. या ग्रंथी प्रथम मोठ्या, मऊ व सुट्या असतात; परंतु पुढील स्थितींत त्यांचा एकच कठिण व उंचसखल गोळा बनून तो शेवटीं तर गळ्याजवळील हाडापर्यंत पोंचतो. त्वचा फाटून व्रण बनवल्यावर त्या व्रणाच्या कडा कठिण, वांकड्या, खालून पोकळ व बाहेर त्यांची लाली फिरलेली असते. व त्यांचा पृष्ठभाग छिद्रमय घाणेरडा व टणक असून त्यांतूंन अति घाण मारीत असलेला लाल स्त्राव गळत असतो. या व्रणाभोंवतालच्या त्वचेखालीं रोगग्रंथीमुळें कठिणपणा, टेंकाळें, गांठीं, उंचसखलपणा भोंवतालीं सर्व बाजूस लागतो. किंवा एकट्या दुकट्या वाटोळ्या ग्रंथी भोंवतालीं हातानें चांचपल्यास हातास लागतात. इतकीं सर्व लक्षणें दिसल्यावर रोगाच्या प्रकाराविषयीं संशय रहातच नाहीं. परंतु रोगाच्या आरंभीं मात्र सुसाध्य अगर पोंकळ ग्रंथी आहेत किंवा क्यान्सर ग्रंथी आहेत याविषयीं संशय येणें साहजिकच आहे. रोग्याचें वय त्यावेळीं ४० च्या वर असल्यास हा संशय वाढतो. व अशा वेळीं रोग्याची समजूत पाडून रोगनिदान करण्यासाठीं गांठीमध्यें चीर पाडून तिचा पापुदरा सूक्ष्म दर्शकयंत्रानें तपासल्यास रोगनिदान ठरुन त्याप्रमाणें पुढें जरूर ती शस्त्रक्रिया करण्यास बरें पडतें.

या रोगावर उपचार:- रोगाचें हें पुढील स्वरूप जरी माहीत आहे तरी रोग लहान असला तरी तो लवकर, रोगाच्या आरंभींच पूर्णंपणें काढणें श्रेयस्कर आहे. म्हणजे तो पुन: तेथें उद्भवणार नाहीं अशी आशा करण्यास अल्पस्वल्प आधार असतो. पुनरुद्भव न झाला तर रोगी अनेक वर्षें जगण्याचा संभव असतो. रोग वाढल्यानंतर म्हणजे तो मांस व त्वचेंत शिरल्यावर मग शस्त्रक्रियां केल्यानें शस्त्रवैद्यकांच्या कीर्तींस बट्टा लागतो. कारण रोगी पुढें मरणार हें ठरलेलेंच असतें या मताचे कांहीं शस्त्रवैद्य पूर्वीं व हव्वीं असण्याचा संभव आहे. कारण ते म्हणतात असे रोगी शस्त्रक्रियेनंतर दगावल्यानें आरंभावस्थेंतील रोगी कीं जे लवकर इलाज केल्यानें खरोखरी बचावण्याचा संभव असतो तेहि या उदाहरणामुळें शस्त्रक्रिया करून घेण्यास कचरतात. व हें थोडें बहुत खरें आहे ही गोष्ट नाकबूल करून उपयोग नाहीं. तथापि हेंहि खरें आहे कीं, अशा स्थितीत शस्त्रक्रिया केल्यानें जरी त्या वणाच्या जागीं पुन: रोगोद्भव झाला अगर शरीरांतील इंद्रियांत झाला तरी आयुष्य फारसें वाढत नाहीं. हें पतकरूनहि केवळ रोगाची अत्यंत घाण व शारीरिक व मानसिक दु:ख व घोर यातना यांतून मृत्यु सोडवीपर्यंत तरी रोगी मुक्त होतो व त्यास मन:स्वास्थ्य मिळणें हाहि एक त्या यातना व ती दुर्गंधि माहीत असणारांनां व सहन नं होणा-या रोग्यांनां मोठा फायदा वाटतो. म्हणून या स्थितींतहि रोग काढावा अशा मताचेहि शस्त्रवैद्य व रोगी असतात. तेव्हां शस्त्रक्रिया करणें न करणें हें अशा अत्यवस्थ स्थितींत रोग्याच्या व त्याच्या आप्तेष्ट व मित्रांच्या मर्जींप्रमाणें ठरवावें हा उत्तम मार्ग होय. शस्त्रक्रिया न करणें ठरल्यास अफू अगर मार्फीया देऊन वेदना कमी करून मृत्यु येईपर्यंत रोग्याचें हाल कमी करावे.

नू त न सं धा य क र च नो त्प न्न ग्रं थि (सार्कामा):- यांचें सर्व वर्णन येथें देणें शक्य नाहीं. तथापि उपरिनिर्दिंष्ट सार्कोमा नामक ग्रंथि क्यान्सरप्रमाणें महत्वाची व अनेक जागीं उत्पन्न होणारी असून कष्टसाध्य व असाध्य वर्गांतील असल्यामुळें तिचें वर्णन पुढें दिलें आहे. ती होण्याच्या अनेक स्थानांपैकीं लांब हाडाची पोंकळी अगर अस्थींचें बाह्यावरण यांपैकीं कोठून तरी ग्रंथीच्या वृद्धीस आरंभ होतो. अस्थिबाह्यावरणोत्पन्नग्रंथि जलद वाढणारी, असाध्य व दुस-या प्रकाराची सावकाश वाढणारी व कष्टसाध्य असते. याखेरीज मिश्र भेदहि असतो. ग्रंथि हाडाच्या आंत व बाहेर मांसांत व त्वचेंत जलद वाढते. त्वचेबाहेर पडल्यावर तेथें मोठा व्रण पडतो व इतर इंद्रियांत रोगबीजे ग्रंथींतील रक्तवाहिन्यांमार्गें जाऊन रोगी मृत्युपंथास पुरा लागला नसल्यास हा व्रण पडल्याबरोबर तो मरणाच्या दारींच असतो असें म्हणण्यास हरकत नाहीं. यांत ठणका व दु:ख फारसें नसतें. ग्रंथीस हात लावला तर ती कोमट, सुजलेलीहि लागत नाहीं; बहुधा लाल असते व कधीं नसते, काहीं ठिकाणीं बिलबिलीत, मऊ व अन्य ठिकाणीं कठिण लागते. तीवरील शिरा फुगून ताठ झालेल्या दिसतात. अस्थींत ग्रंथिरोग आहे म्हणून जवळील रसग्रंथी मोठ्या होतात. इतर जागीं रोग असल्यास मोठ्या होत नाहींत. हा रोग तरण्या माणसात होतो व त्याचें वजन शरीरप्रकृति एकदम ढांसळल्याप्रमाणें उतरते. कधीं ग्रंथी होणाच्या जागीं अगोदर कांहीं इजा झाली होती असा वृतांत आढळतो. अस्थ्यावरणांपासून झालेली ग्रंथि अंमळ लंबवर्तुळकार आणि मऊ अशी असते; अस्थीच्या पोकळींतून वाढलेली ग्रंथि वाटोळी व हातास कठिण लागते, व सावकाश वाढते.


रोग निदान:- ही असाध्य अगर कष्टसाध्य ग्रंथि असल्यामुळें चुकभूल होऊं नये याविषयीं दक्षता बाळगणें जरूर आहे. म्हणून यासारखे दिसणारे सुसाध्य ग्रंथिअसथ्यावरणदाह, अस्थिदाह, हाडांतील व्रण, हाडांतील विद्रधि हे रोग नाहींत याविषयीं काळजीपूर्वक परीक्षा करावी. एखादे वेळीं ही परीक्षा करणें बिकट असतें. पण जर ज्वर व ग्रंथींत सूज, उष्णता, लाली, दु:ख, ठणका हीं लक्षणें असून रोगी खंगत जाईल तर हाच रोग असण्याचा संभव अधिक असतो.


उपचार.- रसग्रंथी जर फार मोठ्या झाल्या नसतील तर आणि शरीरांतील इंद्रियांत हा रोग फैलावला नाहीं असें वाटत असेल तर ज्या भागास हा रोग असेल ज्या हस्त अगर पायांदिकांचें शक्य असेल तर जरूर गात्रच्छेदन करावें हें प्रशस्त होय. मस्तक व धड या ठिकाणीं असें करणें शक्य नसतें. अशा ठिकाणीं व अन्य अशा प्रसंगीं रोगग्रंथीच तेवढी जपून कापून काढावी व त्याखालील हाड पूर्णपणें खरवडून त्यास भाजून (म्हणजे दाहक औषधांचा चरका देऊन) काढावें म्हणजे पुन्हां वाढणारीं रोगबीजें नष्ट होतील. या शस्त्रक्रियेंत रक्तस्त्राव होण्याचा संभव असतो म्हणून तो थांबविण्याची भरपूर साधनसामुग्रीची अगोदर तरतूद करून मग शस्त्रक्रियेस आरंभ केल्यानें यशसिद्धीस मदत होते.

ग्रंथिरोग व गुल्मरोगाच्या प्रकारांची व ते होणा-या स्थानांची संख्या मोठी असल्यामुळें त्यांचें संकलित स्थान परत्वें संक्षिप्त नामनिर्देंश उपयुक्त असल्यानें पुढें दिला आहे. कारण हे रोग शरीरांच्या आंत असतांना ओळखणें कठिण असतें. व शरीरावर असल्यास रोगनिदान करण्यास सुलभ पडतें.

छा तीं ती ल ग्रं थी-  धमनीविस्तरणग्रंथि, क्यान्सर, व सार्कोमा ग्रंथि, मोठाल्या, रसग्रंथि, विद्रधि, तंतुमय व वसामय ग्रंथि वगैरे. उराच्या पोकळींत होणा-या ग्रंथीपैकीं महत्वाच्या तेवढ्या ग्रंथि:- (१) यकृतसंबंधी:- यकृतवृद्धि, विद्रधि, जंतोत्पन्नगुल्म, अवरोधित पित्ताशय. (२) प्लीहेंसंबंधी:- वृद्धि, विद्रधि, क्यान्सर, जंतोत्पन्नगुल्म. (३) जठरसंबंधीं:- क्यान्सर विस्तरण (४) आंत्रसंबंधीं:- क्यान्सर, अन्नरसपिंडग्रंथी, तिढा पडणें, एकांत एक घुसून दुहेरी तिहेरी घडी पडणें, आत्रंपुच्छ-  दाह, डबा रोग (आंत्रक्षय) मळाच्या गांठी. (५) प्यांक्रिया संबंधीं:- जुनाट दाह, क्यान्सरगुल्म. (६) मूत्रपिंडसंबंधीं:- वृद्धिचलनशीलता विद्रधि, क्यान्सर जतोत्पन्न गुल्म, मूत्रगुल्म, पूयगुल्म, क्षयजंतुजनित गुल्म. (७) मूत्र पिंडस्थ ग्रंथिसंबंधीं:- क्यान्सर, क्षयग्रंथि (८) आंत्रावरणसंबंधीं जुनाट दाह, क्षयादिकारणामुळें गुंतागुंत, विद्रधि, जठरव्रण, क्यान्सरजंतोत्पन्न व इतर प्रकारचा फुटलेला गुल्मरोग यांतून स्त्रवणा-या दूषित पाणीमुळें स्थानिक दाह. (९) रसग्रंथि संबंधीं:- क्षय, क्यान्सर, (१०) गर्भाशय व तत्संबंधीं रचना:- तंतुस्नायुमय ग्रंथि, क्यान्सर, विशालबंधनोत्पन्न गुल्म, रक्तगुल्म, गर्भाशयदाहवृद्धि गरोदरपणा. (११) मूत्राशयसंबंधीं:- कोंडलेलें मूत्र. (१२) एखादे वेळीं उदराचे स्नायू वाटोळे आकुंचन पावून ग्रंथिरोग अगर गरोदरपण आंत झालें आहे असा भास रोग्यास व परीक्षकास उत्पन्न करतात; या सर्वांचें निदान व ज्ञान तज्ञांच्या सहाय्यानें करून घ्यावें लागतें.

अ न्य ठि का ण च्या.-  मेंदु, पृष्ठंवंशरज्जु, अंड, स्तन, मूत्राशय व जननेंद्रियें या व इतर जागीं ग्रंथि व गुल्मरोग होतो. या ग्रंथिरोगाचें बाह्यत: गुल्म रोगाशीं साम्य असल्यामुळें गुल्मरोगावरील लेख पहावा.

को ट र ग्रं थि (गुल्म रोग व अर्बुद रोग ):- चामडी अगर अन्य रचनेचें वेष्टन असून त्याच्या आंत द्रव अगर अर्धवट द्रावक स्थितींतील पदार्थ असलेला जो फुगा शरीरावर अगर शरीराच्या आंत उत्पन्न होतो त्या व्याधीस हें नांव आहे. आकारावरून ही व्याधि एखाद्या भरींव गांठीप्रमाणेंच दिसते. परंतु हा रोग व ग्रंथिरोग हे भिन्न भिन्न वर्गांतील आहेत. तथापि त्यांच्या रोगनिदानाच्या वेळीं घोंटाळा होण्याचा संभव असतो. गळूं, गुल्म अगर ग्रंथि यापैकीं शरीरामध्यें काय झालें आहे हें अनभिज्ञ माणसास कळत नाहीं; व तज्ज्ञ माणसासहि जपून मत बनवावें लागतें. या गुल्म रोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत त्यांचें क्रमश: वर्णन करितों.

(अ) नैसर्गिक पिंडोत्पन्न गुल्म:- (१) शरीरांत स्वाभाविक लहान मोठ्या पोकळ जागा व त्यांत किंचित जरूरीपुरता उपयुक्त द्रव स्निग्ध पदार्थ ठिकठिकाणीं असतो. याची कांहीं उदाहरणें:- स्नायु, स्नायुबंधनें, सांधे, यांच्या ठिकाणीं चलनादि क्रिया सुकर होण्यासाठीं लहान मऊ पिशवीप्रमाणें या पोकळ रचना असतात. (२) त्वचेंत तैलयुक्त अगर स्निग्ध पदार्थपिंड निसर्गत: असतात. तसेंच श्लेष्मलत्वचेंत श्लेष्मल पिंड पुष्कळ असतात. (३) लाळ, दुग्ध, पित्त, मूत्र, शुक्र, धातू ही वाहून जाण्यासाठीं अनेक नलिका असतात. या सर्वांचें संकलित वर्णन हें कीं, त्यांतील द्रव पदार्थ बाहेरील नलिकांमध्यें अवरोध उत्पन्न झाल्यानें सांचतो व अर्थातच त्याचें पोंकळ गुल्म बनतें. यांवर उपचार :- या गुल्मावरील त्वचा चिरून तिच्या वेष्टनासह साधल्यास ती कापून काढावी. तसें न साधल्यास खंडश: काढावी; अगर ती मधोमध चिरून आंतील मगजं काढून टाकून आंतील अंगास दाहक औषध लाविल्यानें पुन: तेथें तो गुल्म उद्भवत नाहीं.

(आ) नवीनोत्पन्न गुल्म:- यांचीं कारणें, उदाहरणें संक्षिप्त वर्ण, व उपचार:- (१) शरीरांत कांहीं स्थळीं घर्षण दाबादि कारणांमुळें पाण्याप्रमाणें लस उत्पन्न होऊन तीभोंवती वेष्टण तयार होतें ती लस गुल्म होय. (२) मान, मस्तक व कान या ठिकाणीं कांहीं माणसांत शिरांशीं संबंध असलेले रक्तगुल्म पहाण्यांत येतात. यांस रक्तगुल्म म्हणतात. मार लागून इजा झाल्यानें व रक्त सांखळून गांठ बनतें तें एक यांचेंच उदाहरण आहे. (३) संमिश्र गुल्म म्हणजे स्त्रींतील अण्डाशय व स्तन यांतील रचनावृद्धि होत असतांना मध्यें पोकळी राहून गुल्म तयार होतो तो. (४) आगंतुक गुल्म म्हणजे हाताच्या पंजांत व इतर थोड्या ठिकाणीं छिद्राप्रमाणें खोल जखम होऊन तींत बाह्य त्वचेचे तुकडे घुसून तेथें त्यांतील स्निग्ध तैलपिंडाची वृद्धि होऊन गुल्म तयार होतो. (५) परोपजीवी चपट्या जंतांपासून होणारा गुल्म:- यांपैकीं एका प्रकारचे जंत डुकर, गाई, म्हशीचें बिघडलेले मांस खाणारांनां होतात. अन्य प्रकार कुत्र्यांनां होतो. या रोगानें पीडित कुत्र्याच्या विष्टेमध्यें या जंतांचीं सूक्ष्म अंडीं असतात व तीं अन्नपाण्याबरोबर माणसाच्या पोटांत जाऊन प्रसवतात व यकृतमार्गें शरीरांतील कांहीं अवयवांस त्यांचे गर्भ चिकटून त्याभोंवतीं दोन तीन पापुद्र्यांचा गुल्म तयार होतो व तो मोठ्या वाढीस लागतो. यांस प्रतिबंधक उपचार कुत्र्यास डुकर, मेंढी, यांची विष्टा खाण्याची संवय असते त्यास जपावे. त्याला जंत झाल्यास जंतनाशक औषध व रेचक द्यावें. कुत्र्यास मनुष्यानें खावयाच्या अन्नाजवळं फिरकूं देऊं नये. माणसास रोग झाल्यास पूर्णपणें हा गुल्म वेष्टणासह शस्त्रक्रियेनें काढला पाहिजे. नाहीं तर पुन: वाढीस लागतो. कापून काढल्यावर त्यांतील द्रवपदार्थ वगैरे काढून त्याचें अंतर्वेष्टणहि साफ कापून काढलें पाहिजे. म्हणजे मग जखमेंत निचरा होण्यासाठीं कांहीं दिवस रबरी नळी ठेविल्यानें जखम मूळापासून चांगली भरून येते. या रोगाचीं लक्षणें:- डोळ्यांनीं पहाण्याजोग्या व हातानें चांचपण्यासारख्या जागीं या प्रकारचा गुल्म असल्यास वाटोळी, ताठ, दाबल्यावर दबणारी, नंतर पूर्ववत् होणारी पोकळ गांठ दिसते अगर हातस लागतें. तीवर आडवें बोट ठेवून दुस-या बोटांनें ठोकून अगर टिचकी मारून तपासलें तर पाण्यावर तरंग अगर लाटांची हालचाल व्हावी तद्वत हालचाल झालेली भासते. हा रोग शरीरांत पुष्कळ ठिकाणीं होतो. व त्या त्या स्थानांप्रमाणें निरनिराळीं दुसरीं लक्षणें होतात.

(इ) गर्भांवशिष्ट गुल्म:- (१) गर्भसंभव झाल्यानंतर त्याचे जे तीन थर होतात त्यांपैकीं बाह्य भर मधील थरांत गुरफटला गेल्यामुळें त्या भागांत पोकळी राहून, (२) गर्भावस्थेंत कांहीं पोकळी निर्माण होतात व प्रसूतीनंतर त्या आपोआप बुजतात. परंतु कांहीं माणसांत अशा कांहीं रचना न बुजल्यामुळें तेथें गुल्म होतो. वृषणरज्जुशोधवृद्धि नामक गुल्म हा रोग, थायराइडची नलिका न बुजण्यानें गळ्याच्या मधोमध्य होणारा गुल्म, व गर्भाशयाच्या डाव्या अगर उजव्या बाजूच्या विशालनामक बंधनांत उद्भवणारा गुल्म हीं या प्रकारांची व नेहमीच्या प्रचारांतील उदाहरणें होत. असल्याच कारणामुळें स्त्रीअण्डाशय व वृषण यांतून बनणारे गुल्म होतात. त्यांचीं स्थानें व लक्षणें:- वरील गर्भावशिष्ट गुल्म वर्गापैकीं त्वचोत्पन्न गुल्म डोळ्याच्या अस्थिरंध्राच्या बाहेरच्या बाजूस उत्पन्न होतो. तो टणक, वाटोळा, हलविला तर हलणारा, गुळगुळीत, जन्मत: लहान असून हळू हळू वाढणारा मध्यम अगर लहान आकाराचा गुल्म असतो. याच्या आंत केस, तैलपिंड, धर्मपिंडादि त्वचारचनेचे अवशेष सांपडतात. यास उपचार:- मोठा वण मागून न राहील अशी शस्त्रानें गुल्मावर चीर पाडून तींतून रोग कापून काढावा. एखाद्या वेळीं त्याचे फांटे आंतील उगमापर्यंत गेलेले असतात. अगर हाडांतहि घुसलेले असतात. ते जपून कापावे. अंडाशयच्छेदन नामक महत्वाची शस्त्रक्रिया करून गर्भाशयालगत असलेला मोठा गुल्मरोग कापून काढातात. त्याच शस्त्रक्रियेनें त्या स्थानीं सार्कोमा अगर क्यान्सरग्रंथि हा रोग असल्यास तो काढतां येतो. उदर चिरूनहि शस्त्रक्रिया करावी लागत असल्यामुळें ती फार महत्वाची आहे. हा रोग शरीराच्या आंत असल्यास त्याचें ग्रंथिरोगापासून निदान करण्यास अडचण पडते. यासाठीं ग्रंथिरोगावरील लेख पाहावा. कारण ग्रंथिरोगाचे व या रोगाचे नाना प्रकार नाना स्थानीं व नाना इंद्रियांमध्यें उद्भवतात.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .