प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे    
     
ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क (कॉपी राईट)-  मुद्रणकलेच्या उत्पत्तीपासूनच या प्रकाराच्या हक्काच्या आणि बेस विशेष सुरुवात झाली असें म्हणावयास हरकत नाहीं. या हक्काचें महत्व ज्या भाषेंत ग्रंथप्रकाशन व्हावयाचें त्या भाषेच्या प्रसारावर अवलंबून असणार हें साहाजिक आहे. तेव्हां इंग्रजी भाषेंतील ग्रंथप्रकाशनाच्या मालकी हक्कास आज सर्वांत जास्त महत्व आहे. व त्यामुळेंच या हक्कासंबंधींचा कायदा विशेष स्पष्ट व सूक्ष्म करावा लागला. प्रथम या कायद्याच्या इतिहासाचें अवलोकन करून मग प्रत्यक्ष कायद्याकडे वळूं.

इ ति हा स, इं ग्लं ड.- इंग्लंडमध्यें ग्रंथ छापण्यासंबंधीं जे निर्बंध घालण्यांत आले त्यामुळें ग्रंथप्रकाशनाचे हक्क प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. पुढें 'स्टेशनर्स हॉल' म्हणून छापखानेवाल्यांनीं आपला संघ स्थापन केला, व सरकाराकडून त्याला १५५६ सालीं 'चार्टर' किंवा सनद मिळाली. सन १५५६ पासून सन १६४० पर्यंत ग्रंथ छापण्याचे परवाने देण्याचा अधिकार स्टार चेंबरकडे होता; व छापलेल्या ग्रंथांची नोंद ठेवण्याची व्यवस्थां वर दर्शविलेल्या 'स्टेशनर्स हॉल' या संस्थेनें केली होती. सन १६३० सालीं स्टार चेंबरनें फर्मान काढून या नोंदींत अनाधिकारी लोकांनीं छापलेल्या ग्रंथांची नोंद करण्याविषयीं मनाई केली. सन १७०९ सालीं स्टेशनर्स हॉल संस्थेनें ग्रंथप्रकाशनाच्या हक्कास कायदेशीर स्वरुप मिळावें म्हणून पार्लंमेंटकडे अर्ज केला. त्याच वर्षीं ग्रंथप्रकाशनाच्या हक्कासंबंधीं कायदा झाला. ह्या कायद्यानें कर्त्यांस ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क सन १७१० पर्यंत छापलेल्या ग्रंथांच्या बाबतींत त्या सालापासून एकवीस वर्षे, व १७१० सालानंतर छापलेल्या ग्रंथांच्या बाबतींत ग्रंथ छापल्यानंतर १४ वर्षें व यापुढें ग्रंथकर्ता हयात असल्यास आणखी चौदा वर्षें अशा मुदतीनें दिला होता. सन १८११ मध्यें ग्रंथप्रकाशनाच्या हक्काच्या मुदतींत कायद्यांनें कांहींशी भर घातली; म्हणजे ग्रंथप्रसिद्धीच्या तारखेपासून २८ वर्षें, व ग्रंथकार त्यापुढें हयात राहिल्यास त्याच्या मरणापर्यंत, अशी ही मुदत ठरविण्यांत आली. पुन्हां १८४२ सालीं ह्या मुदतींत जास्त भर घालण्यांत आली. म्हणजे ग्रंथप्रकाशानाच्या तारखेपासून ग्रंथप्रकाशकाच्या निधनापर्यंत व त्यापुढें आणखी सात वर्षें, व जर ही मुदत ४२ वर्षांहून कमी भरली तर एकंदर ४२ वर्षें, अशी ग्रंथप्रकाशनाच्या हक्काची मुदत ठरली १९११ सालीं झालेल्या कायद्यानें ग्रंथप्रकाशनाच्या हक्काची मुदत साधारणत: ग्रंथकर्तां हयात असेतोंपर्यंत व त्यापुढें पन्नास वर्षें, अशी ठरविलेली आहे. परंतु कर्त्याच्या मरणानंतर पंचवीस वर्षांच्या पुढें, व सन १९११ पूर्वीं प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांच्या बाबतींत तीस वर्षांपुढें, ग्रंथाच्या प्रती करून विकण्याची मुभा इतरांस काहीं अटींवर दिली आहे. पहिली अट अशी कीं, अशा रीतीनें प्रती काढणारानें ग्रंथकर्त्यांच्या वारसाला अगाऊ नोटीस द्यावी, व ज्या प्रती विकल्या जातील त्यांच्या किंमतींतून त्यास स्वामित्वाबद्दल दहा टक्के द्यावे. तसेंच कॉपीराइटसाठीं स्टेशनर्स हॉलमध्यें ग्रंथ रजिस्टर करण्याविषयींची अट या कायद्यानें काढून टाकली. सन १९११ च्या ह्या कायद्यास ''इंपीरियल कॉपीराईट अँक्ट'' म्हणजे ''साम्राज्यांतील ग्रंथप्रकाशनाचा कायदा'' अशी संज्ञा आहे. कारण ब्रिटीश साम्राज्यांत अंतर्भूत होणा-या सर्व देशांत त्याचा अंमल होईल असें ह्या कायद्यांत फर्मविलें आहे.

हिंदुस्थान:- हिंदुस्थानांत ग्रंथप्रकाशानाचा पहिला कायदा ईस्ट इंडिया कंपनीच्या अमदानींत सन १८४७ च्या २० व्या अँक्टानें झाला. सन १८४७ चा २० वा अँक्ट हिंदुस्थानाकरितां स्वतंत्र कायदा म्हणून करावा लागला. हा अँक्ट म्हणजे जवळ जवळ इंग्लंडमधील सन १८४२ च्या कायद्याची नक्कल आहे. म्हणजे ह्या कायद्यानें ग्रंथप्रकाशनाच्या मालकी हक्काची मुदत ग्रंथप्रसिद्धीच्या तारखेपासून ग्रंथकर्त्यांच्या निधनापर्यंत व त्यानंतर सात वर्षें व जर ही मुदत बेचाळीस वर्षांहून कमी भरली तर एकंदर बेचाळीस वर्षें अशी ठरविली व ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क प्रस्थापन होण्याकरिता ग्रंथ सरकारांत रजिष्टर करावा असा निर्बंध घातला. हा अँक्ट सन १९१२ तील आक्टोबर महिन्याच्या ३० तारखेपर्यंत अंमलांत राहिला. ह्या तारखेस हिंदुस्थान सरकारच्या प्रसिद्धी-  प्रत्रकानें इंग्लंडांतील १९११ चा इंपिरियल कॉपीराईट अँक्ट हिंदुस्थानास लागू करण्यांत आला व त्या वेळीं १८४७ च्या २० व्या अँक्टाचा लोप झाला. पुढें सन १९१४ मध्यें इंग्लंडांतील ह्या कायद्यांत इकडील परिस्थितीप्रमाणें फेरफार करून हिंदुस्थानाकरितां ग्रंथप्रकाशनाचा कायदा म्हणून सन १९१४ चा ३ रा अँक्ट पसार करण्यांत आला. सध्यां हिंदुस्थानांत ग्रंथप्रकाशनाचा हाच कायदा अमलांत आहे.

इतर देश:- आस्ट्रिया, जर्मनी, जपान व स्वित्झर्लंड या राष्ट्रांत ग्रंथकर्त्यांच्या हयातींत व त्यानंतर ३० वर्षें हा हक्क राहतो. बेल्जम, फ्रान्स, हंगेरी, नॉर्वे, पोर्तुगाल, रशिया, स्वीडन आणि डेन्मार्क या देशांत कर्त्याच्या हयातीपर्यंत व पुढें ५० वर्षें मालकी हक्क टिकतो. स्पेन मध्यें कर्त्यांच्या मृत्यूनंतर ८० वर्षें टिकतो. हालंडमध्यें कर्त्यांच्या हयातींपर्यंत किंवा ५० वर्षें, यापैकीं जो काळ जास्त असेल तेथपर्यंत हा हक्क रहातो. इटली देशांत कर्त्याच्या हयातीपर्यंत किंवा प्रकाशनानंतर ४० वर्षें मालकी हक्क टिकतो. ग्रीसमध्यें प्रकाशनानंतर फक्त १५ वर्षें हक्क असतो. अमेरिकेंत कर्त्याला प्रथम प्रकाशनाच्या तारखेपासून २८ वर्षें व या मुदतीनंतर कर्ता जिवंत असेल तर त्याला किंवा जवळच्या नातलगाला पुन्हां २८ वर्षेंपर्यंत मालकी हक्क मिळवितां येतो. एका देशांत ग्रंथ नोंदण्यापासून मिळालेला हक्क दुस-या देशांत चालत नाहीं.

ग्रं थ प्र का श ना चे ह क्क.- ग्रंथस्वामित्वाचीं तीन अंगें आहेत. (१) ग्रंथ म्हणजे केवळ जंगम माल ह्या दृष्टीनें ज्या कागदांवर ग्रंथ लिहिला असेल त्या कागदांवरील मालकी (२) ग्रंथाच्या प्रती प्रसिद्ध करण्याची. व इतरांस प्रती करण्यास प्रतिबंध करण्याची सत्ता, म्हणजे कॉपीराइट् अथवा ग्रंथप्रकाशनाचा हक्क व (३) ग्रंथांतील (शब्दविरहित) केवळ कल्पना, विचार किंवा माहिती यांचा स्वतंत्र ग्रंथ रचना करण्यांत उपयोग करण्याचा अधिकार. ग्रंथ प्रसिद्ध केल्यानंतर देखील इतरांस विक्रीकरितां त्याच्या प्रती करण्याविषयीं प्रतिबंध करण्याचा अधिकार ग्रंथकर्त्यास आहे. तथापि ग्रन्थांत ग्रथित झालेल्या कल्पना, नमूद केलेले विचार किंवा दिलेली माहिती, स्वतंत्र ग्रंथरचनेनें प्रसिद्ध करण्याविषयीं इतरांस प्रतिबंध करण्याची सत्ता ग्रंथकर्त्यास नाहीं. ज्या ठिकाणीं विश्वासघात किंवा दगलबाजी करून ग्रंथाचें कर्तुत्व कोणीं पटकाविलें असेल तर त्या ठिकाणीं कॉपीराइट अँक्टांतील नियमांस व जुमानतां असल्या विश्वासघातकी किंवा दगलबाजींच्या कृत्यास मनाई करण्याचा व त्यासंबंधीं कायद्यास अनुसरून मूळ ग्रंथकारास इतर दाद देण्याचा अधिकार कोर्टास आहे.

कोणत्याहि ग्रंथाच्या किंवा त्यांतील महत्वाच्या भागाच्या प्रती काढण्याचा किंवा ग्रंथ अप्रकाशित असल्यास तो ग्रंथ किंवा त्यांतील महत्वाचा भाग प्रसिद्ध करण्याचा कर्त्याच जो हक्क तो कॉपीराइट अशी ग्रंथप्रकाशनाच्या हक्काची व्याख्या आहे. ग्रंथप्रकाशानाविषयीं कायदा करण्याचा मुख्य हेतु विद्येस उत्तेजन देणें हा होय. ग्रंथकर्त्यावांचून इतरांस ग्रंथप्रती न करूं देण्याचा उद्देश ग्रंथलेखनास उत्तेजन मिळावें व चांगले ग्रंथ निर्माण होऊन विद्येचा प्रसार व्हावा हा आहे. परंतु ग्रंथकर्त्याचे हक्क संरक्षणाच्या बाबतींत उपाय योजतांना, ज्ञानप्रसाराच्या मार्गांत प्रतिबंध व येण्याविषयीं खबरदारी घेणें अवश्य आहे. शाळेंतील विद्यार्थ्यांकरितां रचलेल्या जुन्या ग्रंथांतील उता-यांच्या पुस्तकांत जरी आधुनिक ग्रंथकर्त्यांच्या ग्रंथातूंन त्यांच्या ग्रंथप्रकाशनाच्या हक्कास बाध आणणारी वरील त-हेची अवतरणें दिलीं, तरी तें क्षम्य आहे असें कायद्यानें ठरविलें आहे. फक्त त्याबद्दल दोन अटी प्रकाशकानें पाळल्या पाहिजेत. पहिली अट, पांच वर्षांच्या मुदतींत त्याच प्रकाशकानें त्याच ग्रंथकाराच्या ग्रंथांतून दोहोंहून अधिक अवतरणें घेऊं नयेत; व दुसरी अट, अवतरणें घेतल्याबद्दल ज्या ग्रंथांतून तीं घेतली असतील त्या ग्रंथांचा उल्लेख करून कबुली देण्यांत यावी. ग्रन्थप्रकाशनाच्या हक्कास तिसरा एक अपवाद आहे. कांहीं लोक उपजीविकेंचें साधन म्हणून लहान किंवा मोठ्या जनसमूहापुढें निरनिराळ्या ग्रंथातूंन चुटके किंवा उतारे किंवा पाठ बोलून दाखवितात. ह्यामुळें ग्रंथकर्त्याच्या हक्काचें तात्त्विकदृष्टया उल्लंघन होतें खरें; परंतु जोंपर्यंत अशा रीतीनें उपयोगांत आणलेले उतारे बेसुमार नाहींत तोंपर्यंत त्याविषयीं ग्रंथकर्त्यांस आक्षेप घेण्याचें कारण नाहीं असें कायद्यानें फर्माविलें आहे.

प्रकाशित झालेल्या कोणत्याहि ग्रंथासंबंधीं कॉपीराइट उत्पन्न होण्यास, तो ग्रंथ सन १९११ च्या कॉपीराइट अँक्टाचा अंमल असेल अशा ब्रिटीश साम्राज्यांतील देशांत प्रथम प्रकाशित झाला झाला पाहिजे. मित्र, शिष्य, वृतपत्रांचे संपादक वैगरे निवडक मंडळींत ग्रंथ प्रसिद्ध केल्यानें ग्रंथ प्रकाशन होत नाहीं. रंगभूमीवर प्रयोग केल्यानें ग्रन्थप्रकाशन होत नाहीं. ग्रंथप्रकाशन म्हणजे लोकांस ग्रंथ उपलब्ध करणें; मग ग्रंथ विक्रीसाठीं ठेवून हें घडो किंवा मोफत ग्रंथ वाटल्यामुळें हें होवो. परंतु प्रकाशन घडून येण्यास अमुक प्रती खपल्या पाहिजेत असा मात्र निर्बंध नाहीं. प्रकाशनाची किंवा एक प्रत खपल्यानें देखील होते.

ग्रंथांसंबंधीं कॉपीराइट प्राप्त होण्यास तो ग्रंथ, ग्रंथकर्त्याची मूळ कृति असली पाहिजे असा निर्बेंध सन १९११ च्या कायद्यानें घातला आहे. अनेक जुन्या ग्रंथांतून जरी उतारे घेऊन ग्रंथ बनविला असला, ग्रंथांत कर्त्यांची कृति अगदीं अल्पांशानें जरी असली, ग्रंथांत वैचित्र्य किंवा नाविन्याचें नांव जरी नसलें व वाङ्मयदृष्ट्या ग्रंथ कुचकामाचा असला, तरी त्या ग्रंथांविषयीं कर्त्यास ग्रंथप्रकाशनाचे सर्व हक्क मिळतात. व्यापा-यांनीं तयार केलेल्या विक्रीच्या जिन्नसांच्या याद्यांविषयीं देखील कॉपीराइट प्रस्थापित करण्याकडे कोर्टाची प्रवृत्ति आहे. निरनिराळ्या ग्रंथांतील उतारे एकत्र छापल्यास त्या उता-यांवर हक्क प्राप्त होत नाहीं. परंतु त्यांस  स्पष्टीकरणार्थ टीपा जोडल्यास त्या टीपांवर कॉपीराइट राहतो असा प्रीव्ही कौन्सिलनें निकाल दिला आहे. परंतु कृतींत परिणामीं उतरणा-या साम्यामुळें एकानें दुस-याची नक्कल करण्यास कायद्यानें प्रत्यवाय नाहीं असें समजूं नये.

अनेकदां ग्रंथकार आपल्या ग्रंथाच्या अनेक आवृत्या काढतो. त्यापैकीं काहीं आवृत्या ग्रंथकार स्वत: काढतो. व या निरनिराळ्या आवृत्या काढतांना त्यांत सुधारणा करतो किंवा भर घालतो. जर ही सुधारणा किंवा भर महत्वाची असली तर ती आवृत्ति मूळकृति म्हणून गणली जाते व त्या आवृत्तीसंबंधीं त्या ग्रंथकर्त्यास स्वतंत्र कॉपीराइट प्राप्त होतो. ग्रंथाच्या नांवासंबंधीं जरी ग्रंथकारास मालकी हक्क पोंहोंचत नसला तरी ट्रेडमार्कचा हक्क पोहोंचतो. क्वचित् प्रसंगीं नांवाच्या वैचित्र्यामुळें ग्रंथांचें नांव देखील कॉपीराइटचा विषय होणें शक्य आहे व अशीं कांहीं उदाहरणें झालींहि आहेत. तें नांव ज्या अर्थानें योजिलें आहे, त्यांत वैचित्र्य आहे. त्यामुळें त्याविषयीं कॉपीराइट आहे असें मानल्यास तें अपवादात्मक होणार नाहीं.

ह क्का ची मु द त.- कॉपीराईटची अर्थात् ग्रंथप्रकाशनाच्या हक्काची मुदत हल्लींच्या कायद्यांने ग्रंथकर्त्याच्या हयातीपर्यंत व त्यापुढें पन्नास वर्षें इतकी ठरविली आहे. परंतु ग्रंथकर्त्याच्या हयातींतील कॉपीराइट व त्याच्या मरणांनतरचा कॉपीराइट सारख्या दर्जाचे नाहींत. ग्रंथकर्त्याच्या हयातींतील कॉपीराइट अगदीं पूर्ण किंवा अबाधित असतो; म्हणजे ग्रंथकर्त्याखेरीज इतरांस ग्रंथांच्या प्रती प्रसिद्ध करण्यास अजिबात प्रतिबंध असतो. ग्रंथकर्त्यांच्या निधनानंतरच्या पन्नास वर्षापैकीं पहिली पंचवीस वर्षें (व सन १९११) च्या अगोदर प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांच्या बाबतींत तीस वर्षे) कॉपीराइट तसाच अबाधित असतो. म्हणजे कॉपिराइटच्या मालकाशिवाय इतरांस त्या ग्रंथाच्या प्रती प्रसिद्ध करण्याचा पूर्ण प्रतिबंध असतो. पंरतु शेवटल्या पंचवीस (१९११ साली अगोदर प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाच्या बाबतींत वीस) वर्षांत कॉपीराइट मर्यादित स्वरूपाचा होतो. तो असा कीं, ह्या मुदतींत कांहीं अटींवर ग्रंथाच्या प्रती प्रसिद्ध करून विकण्याचा अधिकार इतरांस संपादन करणें शक्य असतें. त्या अटी अशा:- प्रती प्रसिद्ध करणारानें कॉपीराइटच्या मालकांस आपण प्रती प्रसिद्ध करणार आहोंत ह्याबद्दल आगाऊ नोटीस द्यावी, व ज्या प्रती विकल्या जातील त्यांच्या किंमतींतून स्वामित्वाबद्दल म्हणून शेंकडा दहा टक्के त्यास द्यावे. नोटीस कशी द्यावयाची, नोटिशींत कोणता खुलासा करावयाचा, स्वामित्वाबद्दल रक्कम कशी व केव्हां आगाऊ किंवा पाहिल्यानें जामिन पटवून नंतर द्यावयाची वगैरे बाबींविषयीं नियम करण्याची सत्ता कायद्यानें हिंदुस्थान सरकारकडे सोंपविली आहे. ग्रंथकर्त्याच्या हयातींतील कॉपीराइट व हयातीनंतरचा कॉपीराइट यांमध्यें दुसरा एक महत्वांचा फरक कायद्यानें केला आहे तो असा कीं, ग्रंथकर्ता हयात असतां आपला ग्रंथ आरंभीं प्रसिद्ध करणें किंवा न करणें हें त्याच्या मर्जीवर असतेंच; परंतु ग्रंथ प्रसिद्ध केल्यानंतर देखील ग्रंथाच्या अधिक प्रती छापून विकणें किंवा न विकणें तसेंच देशांत त्या छापून विकण्याची परवानगी देणें किंवा न देणें हें सर्वस्वीं ग्रंथकर्त्याच्या अगर कॉपीराइटच्या मालकाच्या इच्छेवर अवलंबून असतें. ग्र्रंथकर्त्याच्या निधनानंतर हा प्रकार बदलतो. तो असा कीं ग्रंथकर्त्याच्या हयातींत प्रसिद्ध झालेल्या कोणत्याहि ग्रंथाच्या अधिक प्रती छापून विकण्याचें किंवा इतरांस छापून विकण्याबद्दल परवानगी देण्याचें कॉपीराइटच्या मालकानें नाकारल्यामुळें लोकांस तो ग्रंथ मिळेनासा झाला तर प्रीव्हीकौन्सिलकडे अर्ज करून तो ग्रंथ छापून विकण्याचें लायसन्स अर्थात् परवाना-संपादन करण्याचा हक्क इतरांस कायद्यांने ठेविला आहे. हा परवाना देतांना प्रीव्ही कौन्सिलनें कॉपीराइटच्या मालकास स्वामित्वाबद्दल काय द्यावयाचें वगैरेंबद्दल अटी घालावयाच्या असतात.

अनेक लेखकांचे पृथक् पृथक् लेख एकत्र ग्रथित करून बनलेला ग्रंथ कायद्याच्या दृष्टीनें एक ग्रंथ नव्हे. परंतु जो ग्रंथ अनेक ग्रंथकार एकमेकांच्या सहकारित्वानें लिहितात व ज्यांतील अमका भाग अमक्याची पृथक् कृति म्हणून दाखवितां येणें शक्य नसतें, अशा ग्रंथास अनेक ग्रंथकारांनीं लिहिलेला एक ग्रंथ असें कायद्यानें मानिलें आहे. अशा ग्रंथाच्या कॉपीराइटची मुदत त्याच्या अनेक कर्त्यांपैकीं प्रथम जो मरण पावेल त्याच्या हयातीपर्यंत व त्यापुढें पन्नास वर्षें किंवा सर्वांच्या मागून मरणा-या कर्त्याच्या हयातीपर्यंत, ह्या दोन मुदतींपैकीं जी मुदत ज्यास्त भरेल ती कॉपीराइटची मुदत असें कायद्यानें ठरविलें आहे. हा नियम कर्त्यांपैंकीं एक किंवा अधिक हयात असतांना ग्रंथ प्रसिद्ध झाल्यास लागू पडतो. ग्रंथकर्त्यांपैकीं सर्वच मयत झाल्यानंतर जर ग्रंथ प्रसिद्ध झाला तर कॉपीराइटची मुदत प्रसिद्धीच्या तारखेपासून पन्नास वर्षें समजावयाची असते. १९११ सालच्या कायद्यानें भाषांतर करण्याच्या हक्काचा समावेश कॉपीराइटमध्यें केला आहे. हिंदुस्थान सरकारच्या १९१४ सालच्या अँक्टानें हिंदुस्थानांत प्रथम प्रसिद्ध होणा-या ग्रंथांच्या बाबतींत भाषांतर करण्याच्या मालकी हक्काची मुदत दहा वर्षें ठरविली आहे. परंतु हीं दहा वर्षें संपण्यापूर्वीं ग्रंथकर्त्यानें अगर त्याच्या परवानगीनें कोणी भाषांतर प्रसिद्ध केलें तर भाषांतर करण्याविषयींच्या हक्काची मुदत कॉपीराइटमधील इतर हक्कांच्या इतकीच – म्हणजे ग्रंथकर्त्याची हयाती व त्यापुढें पन्नास वर्षें अशी होते. शिवाय भाषांतरकार आपल्या भाषांतराचा स्वतंत्र कृति ह्या नात्यानें मालक असल्यामुळें भाषांतररूपी ग्रंथाचा त्याला स्वतंत्र कॉपीराइट मिळतो, व इतरांस त्याची नक्कल करण्यास प्रतिबंध होतो.

कॉपीराइटच्या दृष्टीनें ग्रंथांचे दोन विभाग आहेत. पहिला विभाग, निरनिराळ्या कर्त्यांच्या पृथक् प्रसिद्ध होणा-या ग्रंथांचा; व दुसरा विभाग अनेक कर्त्यांनीं लिहिलेल्या अनेक लेखांचा समुच्चय करून बनलेल्या ग्रंथांचा. पहिल्या विभागांतील ग्रंथांच्या स्वामित्वावर प्रथम हक्क अर्थात् कर्त्यांचा असतो. ह्या नियमास एक अपवाद आहे. तो असा कीं, जर कर्त्यांनें ग्रंथरचनेची नोकरी पतकरून, नोकरींतील कामगिरीं म्हणून ग्रंथरचना केली, तर त्या ग्रंथाचें स्वामित्व तत्संबंधीं निराळ्या ठरावाच्या अभावीं कर्त्यांच्या मालकाकडे जातें. दुस-या विभागांत वृत्तपत्रें, मासिकें, ज्ञानकोश वगैरे अनेक लेखकांचे पृथक् लेख एकत्र करून बनलेल्या कृतींना समावेश होतो. अशा अनेक लेखकांचें एक किंवा अनेक लेखकांचें पृथक लेख एकत्र ग्रंथित करून बनलेल्या कृतीचें अथवा ग्रंथांचें स्वामित्व कायद्यांनें ग्रंथप्रकाशकास दिलें आहे. कॉपीराइटची मुदत संपेपर्यंत प्रकाशक व कर्ता ह्यांनीं आपसांत तडजोड केल्यावांचून लेख समुच्चयांतील कोणताहि लेख पृथक ग्रंथरूपानें प्रसिद्ध होण्यास मार्ग नाहीं.

कॉपीराइट बेचन करून देण्याचा तसेंच मृत्युपत्रानें त्याची विल्हेवाट लावण्याचा अधिकार कर्त्यांस आहे. मृत्युपत्राच्या अभावी कॉपीराइट कर्त्यांच्या वारसामध्यें विभागला जातो.

कोणताहि ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वीं त्याच्या कॉपीराइटचें बेचम करतां येतें. परंतु केवळ ग्रंथांच्या हस्तालिखित किंवा मूळ प्रतीची मालकी मिळाल्यामुळें त्या ग्रंथाचा कॉपीराइट मिळत नाहीं.

१९१४ सालच्या कायद्यानें कॉपीराइटसाठीं सरकारांत ग्रंथ रजिस्टर करण्याविषयीं निर्बंध काढून टाकला आहे. ग्रंथकर्त्याचें  नांव व प्रकाशकाचें नांव ग्रंथाच्या, छापील प्रतींतील मूळ पृष्ठावर देण्यांत यावें, व तचें कॉपीराइटकरितां प्रमाणभूत मानलें जावें, असें या कायद्यानें फर्माविलें आहे. [- वि. ज्ञा. विस्तार, ज्युबिली ग्रंथ पहिला; उत्तरार्ध निबंधावली'' १९२३].

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .