विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे    
     
ग्योबिंगाक- हें शहर ह्याच नांवाच्या लहान जिल्ह्यामध्यें खालच्या ब्रह्मदेशांत मुख्य ठिकाण आहे. ह्या शहरीं उन्हाळ्यांत पाण्याचा दुष्काळ पडतो. हें शहर रंगून-प्रोम-रेल्वे लायनीवर तांदुळाच्या व्यापाराचें अतिशय महत्वाचें ठिकाण आहे. ह्या शहरीं म्युनिसिपालिटी व इस्पितळें आहेत. म्युनिसिपालिटीचें उत्पन्न १९०४ सालीं ४१००० रुपये व खर्च ४५००० रुपये होता.