प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे       
 
गोवें, प्रां त.- उत्तर अक्षांश १४ ५३’ ते १५ ४८’व पूर्वरेखांश ७३ ४५’ते ७४ २४’यांच्या दरम्यान १३०१ चौ. मै. क्षेत्रफळाची ही पोर्तुगीज वसाहत पश्चिम किना-यावर आहे. याची दक्षिणोत्तर कमाल लांबी ६२ मैल व पूर्वपश्चिम कमाल रुंदी ४० मैल आहे पोर्तुगीजांनीं गोवा बेट १५४० मध्यें घेतलें व सासष्टी १५४३ मध्यें घेतलें आणि बारदेश सन १५४३ मध्यें घेतलें हे दोन प्रांत मिळून जुनी काबिजात आणि पेडणें, वटग्राम, सतारी, फोन्डा, पंचमहाल व कनकोन हे जिल्हे व नवी काबिजात मिळून एकंदर गोवें प्रांत होतो. नवीन मुलुखाची संपादणी १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. कारवारसमोरचें अंजिदिव बेट १५०५ मध्यें घेऊन तें गोवें प्रांतांत समाविष्ट केलें.

हा सर्व प्रदेश विशेषत: नवीन काबिजात, डोंगर व पहाड यांनी पूर्ण आहे. सह्याद्री व त्याच्या शाखा यांतून पसरल्या असून त्यांची उंची ३५०० ते ४००० फूट आहे. सोनसागर, दुधसागर वगैरे शिखरें आहेत. या प्रदेशांत नद्याहि ब-याच आहेत. त्यांत आठ मुख्य आहेत. त्यांतून बोटीहि चालतात. मांडवी वगैरे ३५। ३९ मैल लांब असून त्यांच्या शाखा ब-याच फुटतात. या सर्वांतून होड्या चालतात.

या प्रदेशांत साष्टी व बारदेश यांच्या भूशिरांनीं एक छानदार बंदर बनलें आहे. या दोहोंच्या मध्यें गोवा बेटाचें भूशीर घुसतें व अग्वादा आणि मारमागोवा अशीं दोन उपबंदरें बनलीं आहेत. पैकीं पहिलें पावसाळ्यांत बंद असतें. दुसरें बाराहि महिने उघडें असतें. लॅटेराईट नांवाचा दगड सर्वत्र व मुबलक आहे. जमिनीची भूस्तरशास्त्रीय पहाणी अद्याप झाली नाहीं. हवामान उष्म आहे. पावसाचें सरासरी मान ९० इंच आहे. सर्प, विंचू वगैरे विषारी प्राणी थोडे असून वाघांचा फारसा उपसर्ग होत नाहीं. ताप, आमांश वगैरे किरकोळ रोग चालू असतात.

पुराणांतरीं या देशाविषयीं विविध गोष्टी आहेत. पुराणांतील या प्रदेशाच्या नांवांपैकीं कांहीं नांवें शिलालेख वगैरेंतून आढळतात. गोमांतक हें त्यांतलेंच एक आहे. स्कंधपुराण सह्याद्रिखंड यांत असें लिहिलें आहे कीं, तिहोत्तरपूर (हल्लींचें तिरहूट) येथून परशुरामानें बरेच आर्यलोक येथें वसाहतीकरितां आणले. परशुरामानें गौड ब्राह्मणांचीं दहा कुलें बंगाल्यांतून आणिलीं व या ब्राहृमणांनीं सासष्टी, तिसबाड (यात तीस गांवें आहेत) या भागांतील ९६ गांवांत आपली वस्ती केली म्हणून यांनां शाण्णवी-शेणवी-म्हणूं लागलें, कांहीं शिलालेख वगैरेंवरून १३१२ पर्यंत येथें बनवासीचें कदंब घराणें राज्य करीत होतें असें दिसतें. कदंबांनीं गोवें ही राजधानीं केली होती. १३१२ मध्यें हा  प्रदेश मुसुलमानांच्या हातीं गेला. १३७० मध्यें विजयानगरचा प्रधान विद्यारण्य माधव यानें येथें आपला अंमल बसवला; १४७० मध्यें बहामनी राज्यांत याचा समावेश महमद गव्हाण यानें केला; १४९८ च्या सुमारास आदिलशाहीनें आपला अंमल या प्रदेशांत बसवला. व १५१० मध्यें अल्बुकर्क यानें हा प्रदेश घेतला. इकडील ग्रामसंस्थांची रचना पाहून त्याला मोठें आश्चर्च वाटलें. त्या वेळीं या फिरंग्यानें तीन दिवसपर्यंत गोवा शहरावर हरत-हेचा जुलूम केला व १०। १२ लाखांची लूट केली. यापुढें गोवा येथें पोर्तुगीजांचें मुख्य ठाणें राहिलें व गोवा शहर चैनी व भपकेबाज लोकांचें ठिकाण बनलें व त्यामुळेंच त्याला पुढें उतरती कळा लागली. गोव्याला 'सुवर्ण खचित शहर' म्हणत इतकें वैभव तेथें भरलें होतें. लष्करी बाणा सुटला पण बडेजाव कायम राहिला. जुबेबाजी व इतर शोक वाढले आणि सर्वत्र आळस, चैन, व अनीति यांचा सुळसुळाट झाला व गोवानीज सत्ता व डामडौल यांचा डोलारा डच लोकांच्या आगमनानें डळमळूं लागला. फिरंग्यांनीं वाटविण्याचा बाबतींत फार जुलूम केला. गांवांतील एखाद्या विहिरींत एखादें हांडूक टाकून गांवचागांव बाटविला जाई. अशा रीतीनें वाट्यांची संख्या फार वाढल्यानें माधव तीर्थावर त्यांनां गुपचुप प्रायश्चित्तें देण्यास सुरुवात झाली, पण पाद्री लोकांनां ही बातमी पोहोंचतांच त्यांनीं तें तीर्थच हाडूक टाकून बाटविलें. त्यावेळीं शेंडीवर प्रत्येकीं आठ रु. प्रमाणें कर असे व त्याचें उत्पन्न तीन हजारांचें येई. फिरंग्यांच्या सहवासानें कोंकणी भाषेवरहि परिणाम होऊन बरेचसे फिरंगीभाषेचे शब्द या भाषेंत घुसले आहेत. १६०३ मध्यें डचांनीं गोव्याला वेढा दिला तो त्यांनां उठवावा लागला. पण हलके हलके थोडा थोडा पोर्तुगीज मुलूख त्यांच्या घशांत उतरत होता. १६३९ त तसाच दुसरा प्रयत्न त्यांनीं गोव्यावर केला पण तोहि फसला. ''शहरभर चर्चें व सुंदर इमारती'' आहेत. जगामध्यें दुसरीकडे क्वचितच दिसणारें वैभव पोर्तुगीजांच्या वाट्यांस हिंदुस्थानांत आलें आहे व गोवा हें प्रति रोम शहर आहे पण या सर्वांच्या मुळांशीं पोर्तुगीजांचा पोकळ डौल व खोटा अभिमान यांची कीड लागली आहे.'' अशा त-हेचीं वर्णनें त्यावेळच्या कांहीं प्रवाशांनीं केलीं आहेत. गोव्याची त्या वेळची इतकी अनुकंपनीय स्थिति झाली होती कीं, स्थानिक स्वतंत्रतावादी मूठभर लोकहि निकरानें प्रयत्न करते तर गोवा लढवण्याचे सामर्थ्य व धमक पोर्तुगीजांत राहिली नव्हती. संभाजीमहाराजांच्या हातून हा प्रदेश स्वतंत्र होण्याचा योग अगदीं आलाच होता पण त्यांनां मध्येंच मोंगल सैन्याशीं टक्कर द्यावी लागल्यानें गोव्याचा बचाव झाला. यानंतर सावंतवाडीचें भोंसले व इतर मराठे यांच्यांशीं फिरंग्यांच्या नेहमीं चकमकी होत असत व हे एकमेकांचे मुलूख व किल्ले घेत असत. वसईच्या मोहिमेच्या सुमारांस व्यकंटराव घोरपडे यानें गोव्यावर स्वारी करून साष्टी प्रांत काबीज केला होता (१७३९ जानेवारी). इ. स. १७४१ त १२००० यूरोपियन शिपाई गोव्यास कुमकेस आले व त्यांनीं ब-याच लोकांची कत्तल करून वाडीकरांकडून किल्ले परत घेतले. व वाडीवर आपली अधिसत्ता बसविली. इतक्यांत वरिष्ठ सरकार (लिस्बन) कडून घेतलेले किल्ले व मुलूख वाडीकरास परत देण्यास व सावंत व मराठे यांच्याशीं वैर थांबविण्यास हुकूम आला पण त्याप्रमाणें घडलें नाहीं व हे खटके तसेच चालूं राहिलें.

गोवा शहरची निकृष्ठावस्था वरिष्ठसरकारचा नजरेस येऊन बराच काळ लोटला होता म्हणून यावेळीं त्यांनीं पणजी येथें नवीन गोवा शहर बांधण्याकरितां खर्च मंजूर केला. कारण जुनें शहर सुधारण्याची आशा नव्हतीच व त्यावर गैरवाजवी खर्च होऊन चुकला होता. या सुमारास कराटे व स्थानिक लोक मिळून आपलें स्वातंत्र्य मिळवू. पहातील म्हणून २००० यूरोपियन कवाइती सैन्य जय्यत ठेवावें लागे. यावेळीं चर्च वगैरेंचाहि बराच खर्च होता.

एतद्देशीय व्यापारी लोकांचा छळ करून त्यांनां त्यांच्या स्वत:च्या मुलुखांतून काढून देण्यांत आलें होतें व सर्व व्यापार जेसुइटांच्या हातांत गेला होतां. लष्करी थाट व पदव्या यांचा डामडौल अद्याप सुटला नव्हता व ज्या कामावर एखाद्या साध्या माणसाची जरूर तेथें बड्या सरदाराची नेमणूक होणें जरूर वाटत असे.

इ. स. १७९४ ते १८१५ त हिंदी पोर्तुगीज मुलुखाच्या व्यवस्थेकडे खुद्द वरिष्ठ सरकारचें लक्ष गेलें होतें. फ्रेंच लोकांचा हक्क होऊं नये म्हणून मध्यें इंग्रजी सैन्यहि मदतीला नेलें होतें. यानंतर सुमारें वीस वर्षें शांततेचीं गेलीं. पण १८४२ त पुन्हां एकदां गडबड होण्याचा संभव दिसत होता. व इं. स. १८५२, १८७१, १८९५, १९०१, व १९१३ या सालीं सैन्यांत असंतोष व सतरी भागाच्या राणे लोकांची स्वतंत्र होण्याची इच्छा यामुळें थोडीबहुत गडबड उडाली होती. १९०१ सालीं या स्वतंत्र होऊं पहाणा-या राणे लोकांनां हद्दपार करून तिमोर येथें पाठवण्यांत आलें. १८७१ च्या गडबडींत सैन्याच्या कांहीं तुकड्या कमी करण्यांत आल्या. या बंडाची हकीकत पुढें दिली आहे. पुढें इंग्रजी बंदोबस्तावर भिस्त ठेवून पोर्तुगीज हद्दींत जास्त सैन्य ठेवण्याची जरूर नाहीं म्हणून पुन्हां भरती करण्यांत आली नाहीं. १८०० त जुन्या काबिजातीची लो. सं. १७८४७८ होती. १८५९ त नव्या व जुन्या काबिजातीची मिळून ३६३७८८ होती. १९०० मध्यें नव्या व जुन्या काबिजातींत मिळून ३ शहरें (जुना मुलूंख) व ४०७ खेडीं होती. स. १९११ ची लोकसंख्या ५४८२४२ होती. गोवे सरकारांत ११५२६ लोक ब्रिटीश प्रजानन आहेत, तर गोवे संस्थानचे नागरिक ब्रिटीश राज्यांत ६३ हजार आहेत. धर्माप्रमाणें २६८ हजार ख्रिस्ती व २७० हजार हिंदु व अवघे साडेआठ हजार मुसुलमान आहेत. जुन्य काबिजातींत शेंकडा ९१ ख्रिस्ती आहेत. नवीन काबिजातींत जवळ जवळ तितकेच हिंदू आहेत. ख्रिस्ती लोक (धर्मांतरित हिंदु असल्यामुळें) जातिभेद वगैरे पाळतात. हिंदू लोक कोंकणी जिल्ह्यांतील लोकांप्रमाणें आहेत. येथें मराठीची पोटभाषा कोंकणी ही भाषा चालते व तींत पोर्तुगीज शब्दांचा बराचा भरणा झालेला दिसून येतो. सरकारी कामकाजाची व उच्च सुशिक्षितांची भाषा पोर्तुगीज आहे.

ख्रिस्ती धर्मीयांकरितां प्रायमेट आणि पॅट्रिआर्क पदव्या धारण करणारा आर्यबिशप असतो. त्याची नेमणूक पोपच्या संमतीनें पोर्तुगालचा अध्यक्ष करतो. बहुतेक ख्रिस्ती हे रोमन कॅथोलिक आहेत.

१९११ च्या सुमारास खानेसुमारीप्रमाणें ख्रिस्त्यांत साक्षर पुरुष २५८८६ व स्त्रिया १३६०० आहेत. तर हिंदूंत १९०६८ पुरुष व २५९० स्त्रिया साक्षर आहेत. प्रौढविवाह, पुनर्विवाह वगैरे सुधारणा इकडे झाल्या आहेत.

हिंदूंची देवळें विशेषत: नवीन काबिजातींत दिसतात. जुन्या काबिजातींत आरंभीं पोर्तुगीज लोकांनीं धर्मसंबंधीं अतिशय छळ केला व ते काणालांहि आपले विचार, आचार, विधी वगैरे पाळूं देत नसत. सार्वजनिक देवळांतून पूजेला मज्जाव असे.

गोवा शहर व प्रदेश घेतल्यावर जमीनीसंबंधानें लोकांचे हक्कसंबंध पूर्ववत कायम ठेवण्याची खटपट करण्यांत आली. व त्यांच्या करासंबंधानें सवलती वगैरे होत्या त्या कायम ठेवण्यांत आल्या. परंतु मागाहून नवे नवे कर बसवण्यांत आले व त्यांच्या व्यवस्थेकरितां कामदार नेमले गेले. तेथें खेडयांतून पाटील वगैरे नेमण्याची वहिवाट नाहीं. सर्वसामान्य प्रश्न पंचायत भरवून सोडविले जातात. जुन्या काबिजातींत बहुतेक जमीन समाईक असून सरकारी कर वगैरे वजा जातां सर्व खेड्यांतील लोक उत्पन्न वांटून घेतात. नव्या काबिजातींत तीच पद्धत आहे, पण खेड्यावारी नसून घराणेवारी आहे. अशीं घराणीं त्या मुलुखांत २१२ आहेत व ती निव्वळ उत्पन्न आपसांत वाटून घेतात. १५२६ मध्यें त्यावेळच्या चालूहक्क सवलतींचें नोंदणीयुक्त तयार केलें होतें.

एकंदर जमीनीपैकीं सुमारें १/३ लागवडीखाली असावी. जमीन चिक्कण आहे पण कोठें कोठें थोडी वालुकायुक्त व कमी अधिक प्रमाणात कुजलेल्या वनस्पतीनीं बनलेली आहे. कित्येक ठिकाणीं पूर्ण खडकाळ आहे. राख, मासे व शेण हें इकडे मुख्य खत असतें. जुन्या काबिजातींत लागवड चांगली होतें एकाच्या मालकीचे १०।१५ एकर म्हणजे मोठें शेत असें मानतात.

मुख्य पीक तांदुळाचें आहे. तें दोनदां काढतात. सर्व पीक स्थानिक खपालाच आठ महिन्यांत खलास होतें. नारळ बरेच होतात. शिवाय नाचणी, उडीद, कुळीथ, मूग, तूर वगैरे धान्य होतें. फळझाडांत आंबा, काजू व फणस आणि भाजीपाल्यांत रताळीं, मुळा, कांकडी वगैरे होतात. जुन्या काबिजातींतील लोक दारिद्रयानें गांजले आहेत. लिस्बनच्या नॅशनल बँकेची एक शाखा पणजी येथें आहे व मोठमोठे जमीनदार व धर्मादाय फंड यांतून पांच टक्क्यांच्या व्याजानें शेतक-यांनां कर्जाऊ रकमा मिळतात. हिंदूंच्या जिल्ह्यांत व्याजाचा दर शें. १० आहे.

नवीन काबिजातींत मोठीं अरण्यें आहेत. संरक्षित व इतर मिळून ११६ चौरस मैल जंगल आहे व त्याची अंदाजी किंमत ७० लाख रुपये आहे. फिरत्या लागवडीच्या पद्धतीनें जंगलाचें नुकसान होतें म्हणून ती पद्धत सरकारच्या देखेरखीखालीं ठेवण्यांत आली आहे. उत्पन्न २४००० रु. व खर्च १०५०० रु. आहे. इकडे लोखंडाच्या खाणी आहेत पण त्या अद्याप सुरू झाल्या नाहींत [किर्लोस्कर बंधूंनीं मागें या प्रांतांत या दिशेनें कांहीं प्रयत्न करण्याचें योजिलें होतें असें कळतें. संजय, तारीख ४ ऑगष्ट १९१८ पहा].

आपल्या वैभवाच्या दिवसांत गोवा हें व्यापाराचें केंद्र होतें. सर्व व्यापार पोर्तुगीजांच्या हातीं होता व इराणी आखाताशीं होणारा घोड्यांचा व्यापार येथूनच होत असे. आतां येथून व्यापार असा फारच थोडा होतो. तरीं अद्याप येथील सर्वच कारागीर नष्ट झाले नाहींत. अद्यापि सोनार, लोहार, सुतार व चांभार हे चांगलें कौशल्याचें काम करतात. निर्गत माल मुख्यत: नारळ, सुपारी, आंबा, फणस, दालचिनी, मीठ, काथ्या वगैरे असून आयात माल तांदूळ, कपडा, साखर, दारू, तंबाखू वगैरे आहे. १९०३-४ सालीं कस्टमचें उत्पन्न ५ लाखांचें झालें.

कॅसलरॉकपासून ५१ मैलपर्यंत रेल्वे गेली आहे. १९ इतर रस्ते आहेत. शिवाय लहानमोठे मार्ग आहेत. पणजी हें पोस्टऑफिस (तार ऑफिससह) आहे.

या प्रदेशांत मोठे पूर क्वचितच येतात. अतिवृष्टीनें मात्र कांहीं जिल्ह्यांत बरेंच पाणी होतें, अवर्षण पडलें म्हणजे शेतकरी लोकाचें फार नुकसान होतें, पण इंग्रजीं मुलुखांतून धान्य येतें व सामान्यत: महाग तरी पण मिळतें.

गोवा हा पोर्तुगीज व साम्राज्याचाच एक भाग आहे असें मानण्यांत येतें व त्यावर गव्हर्नरजनरल ऑफ पोर्तुगीज-इंडिया म्हणून एक अधिकारी असतो. दिवाणी अधिकाराबरोबर लष्करी अधिकारहि त्याच्याकडे असतात. तरी प्रचलित राज्यव्यवस्थेंत कमजास्त करणें किंवा परराष्ट्रीयसंबंध वगैरेमध्यें त्याचे अधिकार मर्यांदित आहेत. त्याच्या मदतीला एक लेजिस्लेटिव्ह कौन्सिल असतें. त्यांत ११ निवडलेले व ७ सरकारी सभासद असतात. शिवाय एक्झिक्युटिव्ह कौन्सिलहि आहे. शिवाय आणखी ५ कौन्सिलें आहेत. हल्लीं पोर्तुगालमध्यें लोकसताक राज्य सुरू आहे व त्याचा थोडाबहुत फायदा गोव्यासहि मिळतो.

कारभाराच्या सोयीकरितां 'जुन्या काबिजातीचे' तीन व नव्याचे ७ विभाग पाडले आहेत. या प्रत्येकाचे पुन: पोटविभाग आहेत. प्रत्येक मोठ्या पोअविभागाला कौन्सिलें वगैरे आहेत. मोठ्या (जुन्या काबिजातीच्या) विभागांत म्युनिसिपालिटी आहे.

दिवाणी कामाकरितां गोवा प्रदेश एक विभाग मानतात. याचे कोमॅरकस म्हणून पुन्हां भाग पडतात व त्याचेहि आणखी पोटविभाग आहेत. प्रत्येक ठिकाणीं स्वतंत्र न्यायाधीश आहे. एकंदर सर्वांवर हायकोर्टाची देखरेख व अधिकार आहे. हायकोर्टाला दिवाणी व फौजदारी हे दोन्ही अधिकार आहेत व तेंच अपीलकोर्ट असून १५०० पर्यंतच्या मालमत्तेसंबंधीं यांचा निकाल शेवटचा समजतात. १५०० वर पोर्तुगालच्या सुप्रीम ट्रिब्युनल पुढें अपील होतें.

१९०३-४ सालीं २० लाख उत्पन्न व तितकाच खर्च झाला. उत्पन्नाच्या बाबी जमिनीवरचा कर, कस्टम, पोस्ट, स्टँप, तंबाखू (लायसेन्सें) दारूवरील कर वगैरे, मीठाचें उत्पन्न म्हणण्यासारखें नाहीं. गोवा येथें टांकसाळ नाहीं.

१८७१ पासून एतद्देशीय सैन्य कमी करण्यांत आलें, त्यासालीं एक युरोपियन तुकडीं पोर्तुगालहून आली. १९०४ सालीं सैन्यसंख्या २७३० होती व पोलीस ३९० होतें दोहोंसाठीं मिळून खर्च १ लाखाच्या जवळजवळ होता.

शिक्षणाची प्रगति होत आहे. १९१० सालीं शेंकडा १४ शिक्षित होते. १९०३-४ सालीं १२१ (९८ सरकारी व २३ खाजगी) शाळा प्राथमिक शिक्षणाच्या होत्या. सरकारी गॅझेटशिवाय १२ पोर्तुगीज भाषेमध्यें एतद्देशीयांनीं चालविलेलीं वृत्तपत्रें होतीं. एक पुराणवस्तुसंशोधक मासिक होतें. सरकारी, साधे व लष्करी दवाखाने आहेत व ब-याच धर्मादाय संस्था आहेत. त्यांतील ४।५ ब-याच मोठ्या व जुन्या आहेत.

गोव्यांतील एकंदर बंडें:- लुजितांनु किंवा पोर्तुगाल लोक यांचें ज्यावेळीं वैभव संपलें, त्याचवेळीं त्यांचें शहाणपणहि गेलें. पूर्वींचे गामा, आलेमदा, आलबुकर्क, दों, ज्युवावकास्त्र इ. मासल्याचे साहसी मुत्सद्दी, तसेच कांमोंईससारखे कवी, डुकिद सालदाव्यासारखे शूर इ. त्याच वेळीं गेले. आणि एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस तर गोव्यास तीन वर्षांत आठ आठ गव्हर्नर जनरल झाले. यांत कांहीं अतिशयोक्ति नाहीं. त्यावेळीं पोर्तुगीज सरकारनें हें एक मासलेवाईक उदाहरण इतर राजांस घालून दिल्यासारखें होतें. स. १८९६ त जकात व कर मनस्वी वाढले होते. कलाकौशल्य, व्यापारउदीम वाढविण्याच्या हेतूनें बाहेरच्या मालावर शेंकडा ४० रु. प्रमाणें जकात वाढविली होती. त्या वेळीं गोव्यांत गिरणीचा धूरच दिसत नसें. तांदूळ, कपडा वगैरे त्यावेळीं बाहेरुन येत असे. निर्गत माल म्हणजे नारळ, आंबे, सुपा-या व खारी मासळी हा होता.

इ. स. १८९६ सालीं झालेल्या दंग्याच्या पायीं लोक हैराण झाले होते. त्या वेळीं बंदोबस्त एकाहि गव्हर्नराच्यानें झाला नाहीं. रा. रावजी राणे यांस मारल्याबद्दल इतर राणें खवळलेले होते, ते पोर्तुगोलहून ड्यूक ऑफ पोर्टो यास पाठविलेल्या अर्जाच्या प्रत्युत्तरांची वाट पहात होते. परंतु अर्जाचा कांहीं उपयोग झाला नाहीं. बंड मोडतांना सरकारनें प्रजेचीं घरेंदारें, धान्यसांठा जाळून घरांचे दगडहि पणजीस पाठविले. त्यामुळें साठ हजार लोक त्यावेळीं निराश्रित झाले होते. पुन्हां त्यांनीं पोर्टोंच्या ड्यूकास अर्ज पाठविला होता. त्याचाहि उपयोग झाला नाहीं. ही राणे मंडळी सतरी प्रांतांची होती. राण्यांनां पूर्वीं सरकारनें त्यांचे हक्क कायम ठेवण्याबद्दल व त्यांनां सुशिक्षित करण्याबद्दल आश्वासनें दिलीं होतीं व अशीं आश्वासनें देऊन मग त्यांचा प्रांत खालसा केला होता. परंतु तें एकीकडे राहून त्यांचा शेतसारा चौपटीपासून दसपटीपर्यंत वाढविला गेला. तो देण्यास असमर्थ शेतक-यांची ८०० रुपयांची जमीन २५ रु. सा-याकरितां जप्त व्हावी, त्यांचीं गुरेंढोरें न्यावीं असा प्रकार झाला. व्हाइसरायाकडे अर्ज केला तर कांहीं परिणाम होईना म्हणून राणे लोकांनीं वरीलप्रमाणें थोडीशी उचल केली होती. मागें बादशहाचे भाऊ येऊन ती स्वस्थता झाली होती, त्याच्या उलट या वेळच्या फेरेरा या गव्हर्नरनें मुद्दाम मिनिस्टरच्या सांगण्यावरून ही दडपशाही केली म्हणतात. त्यामुळें १८९६ चा दंगा झाला.

स. १८९६ च्या पूर्वीं जे दंगे झाले होते त्यांची त्रोटक हकीकत अशी आहे. इ. स. १८२१ त पोर्तुगॉलमध्यें राज्यासंबंधीं फेरफार झाल्यामुळें गोव्यांतील सैन्यानें बंड केलें आणि रियुदेपार्द ह्या सुभेदारास काबच्या किल्ल्यांत कैद करून चौघे असामी राज्यव्यवस्था राखण्यास नेमिले. इ. स. १८४४ सालीं वाडी संस्थानांतील फोंडसांवत नामक सरदारानें इंग्रज सरकाराविरूद्ध बंड केलें. त्यांत त्याचे आठ मुलगेहि सामील होते. बंडास विशेष बळकटी येण्याकरितां त्यानें आपला ज्येष्ठ मुलगा आण्णासाहेब याच्या साह्यानें मनोहर किल्ला आपल्या स्वाधीन करून घेतला. परंतु नंतर मेजर देलामोत यानें छापा घालून तो परत घेतला. त्या वेळीं निरुपाय होऊन ते गोव्याच्या सरहद्दीवर ३ सलकर व हवेलकर देसाई यांच्या आश्रयास जाऊन राहिले. त्यांनींहि त्या वेळीं मोठें बंड माजविलें होतें. मेजर जेकब सावंतवाडीचा पोलिटिकल एजंट यानें बंडवाल्यांस धरण्याकरितां ३००० रु. चें व फोंड सांवताचे मुलगे भीम सावंत, तान सांवत, हनुमंत सांवत, अप्पा देसाई आणि फोंड सावंत यांस धरण्यांकरिता रु. २००० चें बक्षीस लाविलें होतें. हें वर्तमान समजातंच त्यांनीं अण्णासाहेबासहित पोर्तुगीज सर सुभेदार जुजे फेर्रेरा पेस्तान याकडे जाऊन आश्रय मागितला. फिरंगी सुभेदारानें त्याचा चांगला इतमाम ठेऊन त्यांस पणजी येथें ठेविलें. हें वर्तमान इंग्रजांस समजतांच मुंबईचे गव्हर्नर यांनीं कॅप्टन ऑर्थर यांस गोमांतकांत पाठविलें, परंतु त्याच्या वकिलीचा कांहीं उपयोग झाला नाहीं. नंतर जेकब स्वत: पणजीस आला पण त्याचेहि श्रम व्यर्थ गेले. इ. स. १८४७ त अण्णासाहेब व दुसरे बंडवाले यांनीं जेकब यास फिरंगी सरकारच्या संमतीनें अपराधाची क्षमा करावी. म्हणून पत्र लिहिलें, त्यास अनुमोदन मिळून माफी झाली. त्या सर्वांस फिरंगी सुभेदारानें सोडून बाकीच्या बंडवाल्यांस समुद्रपार केलें.

इ. स. १८५२ सत्तरीचे राणे व सरदेसाई यांच्या कांहीं मागण्या गोव्याचा सुभेदार बारांव दे. वोरे यानें कबूल केल्या नाहींत; म्हणून त्यांनीं दिपाराण्याच्या हाताखालीं फिरंगीसरकारविरुद्ध बंड केलें. बंडवाले ५०० होते, ते प्रसिद्धपणें लढाईस तयार असत. ते श्रीमंतांस व गरीबांसहि त्रास देत. त्यामुळें सगळे लोक भयभीत होऊन गेले. अशा प्रसंगीं बांडे लोकांनींहि संधि साधून लूट सुरू केली. पद्दे म्हणून केरचे भट तेहि निष्ठूरपणें लोकांस त्रास देऊं लागले. ज्या वेळीं दिपाराण्यानें कुंभारजुवें बेट लुटलें, त्या वेळीं पद्यांनीं बहुतेक घरें जाळून टाकिलीं.

राणे लोकांची रीत निराळीं होती. त्यांनीं एकदम घरांत शिरून मालकास पकडावें व त्याच्या तोंडून माहिती काढून घेऊन लुटालूट करावी. 'राणा आला रे राणा आला’ असें एकानें म्हटलें कीं सर्व लोक आपली चीजवस्त कोठें तरी छपवून डोंगरावर जाऊन दडत व उजाडलें म्हणजे घरीं येत. इकडे केरीचे भट यांनीं भरवस्तीची गांवें उध्वस्त करून टाकलीं. अशा त-हेचा प्रजेचा छळ झाला तेव्हां फिरंग्यांनीं बंडवाल्यांपैकीं कित्येकांस पकडून अर्धें गाडून त्यांचीं डोकीं उडविलीं व इतरांस तोफेच्या तोंडीं दिलें व बहुतेक लष्कर बंडखोरांचा पाठलाग करण्यास पाठविलें. यावेळीं बहुतेक सैन्य काळ्या लोकांचें होतें. त्यांची बंडवाल्याशीं गांठ पडली कीं ते पळून जाई. त्यांत फोंडे महालांतील सेनाधीश 'माज्योर' यानें महत्प्रयासानें तें बंड मोडलें. या सरदारानें कांहीं जणांस फोंडेजवळच फांशीं देऊन इतरांस जेथें सांपडतील तेथें गोळी घालून मारलें.

नंतर बंडखोरांचा व सरकारचा सल्ला झाला; तेव्हां पेस्तान हा सुभेदार होता. त्यावेळीं दिपा राण्यास ५०० रु. वर्षासन करून द्यावें लागलें. तेव्हां राण्याच्या नांवावर जे लुटारू लोक बंड करीत होते ते अजीबात स्वस्थ बसले.

इ. स. १८७० त पेस्तानच्या कारकीर्दींत गोमांतकांत सर्वत्र शांतता होती. इतक्यांत फौजेनें एकाएकीं बंड केलें. हें बंड करण्याचें कारण असें झालें कीं, इ. स. १८६९ च्या डिसेंबर २ तारखेस पोर्तुगॉलच्या बादशहाकडून जें आज्ञापत्र आलें होतें त्यातं कांहीं लष्करी लोकांस बडतर्फ करून बाकीच्यांचा पगार कमी करावा असें होतें त्यावरून शिपाई लोकांनीं बंड उभारलें. या वेळीं गोमांतकांत, मठग्राम, फोंडें, डिचोली, पणजी या शहरांत ३००० वर सैन्य होतें.

त्याशिवाय म्हापसें येथेंहि होतें, पणजींचें लष्कर म्हणण्यासारखें सरकारच्या ताब्यांत होतें. मठग्राम येथील पहिल्या पलटणींतील कांहीं शिपायांस बडतर्फ केलें, हें जिकडे तिकडे समजतांच सगळ्या लष्कराचा एकोपा झाला. प्रजा सगळी घाबरून गेली. गव्हनर पेस्तान हुशार होता. त्यानें त्यांचें मागणें मान्य करून त्यांस माफी दिली. चारीहि पलटणी फिरल्यावर त्याचा नाइलाज झाला. त्यानें त्यावेळीं निवडक मंडळी बंडवाल्यांचा काय उद्देश आहे हें समजून घेण्याकरितां पाठविली होती.

नंतर विस्कोंददे सां जानुआर याच्या कारकीर्दींत तसेंच बंड झालें. हा सुभेदार जात्या शूर शिपाई होता. त्यानें पणजी शहराभोंवतीं तोफा मांडल्या, पणजी शहर केवळ समरांगण होऊन गेलें होतें. सर्व पलटणा एकत्र झाल्या हें वर्तमान सर सुभेदार यांस समजताच, राजवाड्याकडे येण्यास जेवढे मार्ग होते, तेथें त्यांनीं मेढेकोट उभारले, आणि गोलंदाज लोकांस असा हुकूम सोडला कीं, जर बंडवाले शहरावर चालून येतील तर त्यांवर एकदम तोफा सोडाव्या. नंतर शहरसंरक्षणार्थ जेवढे राजनिष्ठ लोक होते, त्यांकडून शपथ घेवविली. दुस-या दिवशीं लोकांत जाहीरनामा प्रसिद्ध केला. तो प्रसिद्ध होताच बंडवाले आपपल्या छावणींत परत गेले व बंड आपोआप मोडलें. यावेळीं दों आगुस्त हा त्यावेळच्या बादशहाचा भाऊ आला होता, त्यानें बंडवाल्यांनां माफी दिली. यानंतर सन १९१२ सालींहि राणे लोकांनीं बंड केलें होतें. [इंपेरियल ग्याझे. पु. १२; मेंदेस, पोर्त्युगीज इंडिरा कुज्ज गोवा. केसरी, ३।३।१८९६, १२।८।१८९६.]

श ह र.- उ. अक्षांश १५ ३०’व. पू. रेखांश ७३ ५७’. पोर्तुगीज हिंदुस्थानची राजधानी, मांडवी नदीच्या मुखापाशीं हें शहर वसलें आहे. गोवा या नांवाचीं तीन शहरें होती. पहिलें अगदीं जुनें हिंदूंच्या वेळचें; याचा आतां मागमूसहि नाहीं, दुसरें मुसलमानांचें म्हणजे जुनें गोवें अथवा रोमन कॅथोलिक पंथाचें पूर्वेकडचें आद्यपीठ व तिसरें नवें गोवें अथवा राजकीय सत्तेचें मुख्य ठिकाण, नवें गोवें लोकसंख्या (१९००) २३०२ व घरें ५०० जुन्या गोव्याची लो. सं. ९३२५ व घरें १७३५. जुन्या गोव्यांत पूर्वीं २००००० पर्यंत लोक रहात असत. ३।- ३॥ शें वर्षांच्या अल्पकालांत पूर्वींचा गोव्यांतील फरक केवळ कालमहिन्यानेंच घडून आला. त्या ठिकाणीं आज कांहीं चर्चेस व कॅथेड्ल्स मात्र दिसतात व तेहि अद्याप धर्माची गादी तेथें आहे म्हणून. जुन्या ऐतिहासिक वस्तूंपैकीं व्हाइसरायचा बंगला, कॉलेज, चर्च वगैरे सर्व इमारती कालाच्या भक्ष्यस्थानीं पडल्या व त्यांच्या जागीं आतां रान व जंगल माजलें आहे. जुनें शहर हें नव्या गोव्याचें आतां केवळ उपनगरच झालें आहें. १७५९ पर्यंत जुनें गोवें शाबूद होतें. त्या सालीं जेसूइट लोकांनां हांकलून दिलें. नवीन गोवा शहरांत पणजी, जुना गोवा व रानबंदर असे तीन भाग आहेत. यांचें क्षेत्रफळ दहा. चौ. मैल आहे. येथेहि मुंबईप्रमाणेंच समुद्र हटवून व भर घालून जागा वाढवीत आहेत. पूर्वींपासून येथें फक्त एक किल्ला असे व हल्लीं तो व्हाइसरिगल लॉज म्हणून उपयोगांत आहे. नवीन शहर सुंदर, रेखीव व स्वच्छ आहे. अल्बुकर्कचा एक पुतळाहि येथें आहे.

मार्मागोवा बंदराची वाढ करण्यासाठीं एक इंप्रूव्हमेंट टस्ट स्थापन करण्यांत आलें; या ट्रस्टच्या ताब्यांत २००० एकर जमीनींचे तुकडे असून त्याचें क्षेत्रफळ प्रत्येकीं ८०० ते १६०० चौ. यार्ड आहे. हे जमीनीचे तुकडे कायमच्या भाडेपट्टीनें देण्यांत येतात. या तुकड्यांचें भाडें जागेच्या महत्वावर अवलंबून असतें. जागेचा तुकडा जर अगदीं एकीकडे असेल तर प्रत्येक चौरस मीटरला २ आणे भाडें आहे व तीच ऐन तिठ्यावर जर जागा असेल तर १ रुपया ८ आणे भाडें पडतें. याशिवाय प्रत्येक चौरस मीटरगणीक ४पै ही पट्टी निराळा द्यावी लागतेच. या जागेपैकीं बराच भाग उद्योगधंदे व व्यापार यासाठीं राखून ठेवण्यांत आला आहे. आयात व निर्यात मालावर फार कमी जकात ठेवण्यात आली असल्यामुळें, येथील व्यापार बराच वाढेल व मार्मागोवा हें व्यापाराचें केंद्र बनेल असें वाटतें.

सर केटनो गोनसालव्हज याला वरिष्ठ कोर्टाच्या न्यायाधिशाची जागा १९२४ मध्यें देण्यांत आली. हा स्वत: गोव्याच्या रहिवाशी व गोआन असल्यानें गोव्यांतील लोकांनां त्याबद्दल फार समाधान वाटत आहे. गोनसाल्व्हज याचें शिक्षण कोइंब्रा विश्वविद्यालयांत झालें असून, मॅजिस्ट्रेटची जागा पटकविणारा हा पहिलाच गोआन होय. १९१० त पोर्तुगीज रिपब्लिक जाहीर करण्यांत आलें, त्यावेळीं याला पोर्तुगीज वेस्ट आकिेचा गव्हर्नर जनरल नेमण्यांत आलें.

१९२४ त, पोर्तुगीज वसाहतपरिषदेचें दुसरें अधिवेशन लिस्बनमध्यें भरलें. त्यांत वसाहतींनां कायदेमंडळांत जे हक्क देण्यांत आले आहेत त्यांपेक्षां अधिक हक्क देण्यांत यावेत असा ठराव पसार झाला. गोआन लोकांनां पोर्तुगीज लोकांच्या बरोबरीनें वागविण्यांत येत असल्यानें येथें ब्रिटीश हिंदुस्थानांतल्याप्रमाणें सरकार व प्रजा यांमध्यें फारसा देवनाथ दिसून येत नाहीं.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .